कला बघा कलाकारांची
काव्यरस
कला बघा कलाकारांची
डोंबारी - छायाचित्रः पाषाणभेद
मायबाप हो तुम्ही कला बघा कलाकारांची
अंगमेहनतची कला दाखवूनी
खळगी भरतो आम्ही पोटाची ||धॄ||
गावोगाव फिरावं उन्हातान्हात राबावं
मिळलं ते खावं अन जमंल तसं रहावं
नाही हक्काचं ठिकान आम्हां
दोन हात करतो जिंदगीशी
अंगमेहनतची कला दाखवूनी
खळगी भरतो आम्ही पोटाची ||१||
दोरीवरून चालणं नशीबी आलं
ढोलकी वाजवत बालपण चाललं
कालचा दिस गेला आजचा चालला
कठीण परीक्षा काळाची
अंगमेहनतची कला दाखवूनी
खळगी भरतो आम्ही पोटाची ||२||
नाही आम्हाला कुठंलं घरदार
जमीनजुमला नाही गायीगुरंवासरं
कसं जवावं कळंना काही
कला बघा तुम्ही शरीराची
दया करा अन
खिशात हात घालून मदत करा गरीबाची ||३||
- पाषाणभेद
०५/०४/२०११
वाचने
2828
वाचनखूण
प्रतिक्रिया
11
विदारक...
In reply to विदारक... by प्रभाकर पेठकर
धन्यवाद प्रपे. अवांतर: सदरची
कशी नशीबानं थट्टा आज मांडली...
वा !
छान कविता...
......
एकदम करुण. वाईट वाटलं..
...
पा.भे. व्यथीत करुन टाकलत हो
पाषाणाला जेंव्हा
उत्तम