Skip to main content

हल्ली मी लिहीतच नाही ...(२)...

लेखक फिझा यांनी शुक्रवार, 18/11/2011 10:13 या दिवशी प्रकाशित केले.
हल्ली मी लिहीतच नाही ...(२)... वेडावलेले मन एकदा कागदावर उमटलेले व्यर्थ ... आणि उगीचच निघाला अर्थ त्या अर्थाची व्यापकता कुणा कळतच नाही हल्ली मी लिहीतच नाही ... लिहीण्याची कारणे होती हजार शाळा, कॉलेज, प्रेम आणि मग संसार ... रंगीत कागद घेतला तरीसुद्धा ..... लेखणी आता खुलतच नाही हल्ली मी लिहीतच नाही ... नाही नाही म्हणत बरीच बरी जमली एकदा कविता ... दिली वाचायला कुणाकुणाला ... मिळालेली दाद आणि मनातला वाद यांची सांगड घालणे पण जमलेच नाही .... हल्ली मी लिहीतच नाही ...
लेखनविषय:

वाचने 1588
प्रतिक्रिया 3

प्रतिक्रिया

मिळालेली दाद आणि मनातला वाद यांची सांगड घालणे पण जमलेच नाही .... क्या बात!! सुंदर!!