Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Profile picture for user सोत्रि
Submitted by सोत्रि on Fri, 11/11/2011 - 15:29
लेखनविषय (Tags)
मौजमजा
छायाचित्रण
लेखनप्रकार (Writing Type)
आस्वाद
अनुभव
माहिती
विरंगुळा
दिवाळीच्या सुट्टीत काय करायचे असे मुलांना विचारले. मोठा मुलगा म्हणाला कुतुबमिनार आणि ताजमहाल बघायचाय. पण आता असे घोड्यावर बसुन रेल्वे बूकिंग शक्य नव्हते. मग सहज त्याला म्हटले तुला मिनी ताजमहाल आणी मिनी कुतुबमिनार बघायचा का? तो एकदम चकितच झाला आणी म्हणाला म्ह्णजे काय? लगेच गुगलबाबाच्या चित्र विभागाला साकडे घातले आणि त्याला बिबी का मकबराची आणि चाँद मिनारची चित्रे दाखवली. ती चित्रे बघुन तो पडलाच. असं कसं काय शक्य आहे असे विचारून त्याने भंडावून सोडले. त्याला म्हटले जायचे का बघायला तर तो म्हणाला जाउया. मग जरा सिरीयस होउन औरंगाबाद परिसर - वेरूळ - अजंठा- पैठण अशी एक 'हिस्टॉरिकल टूर' प्लान केली आणि धमाल एन्जॉय केली. सर्वप्रथम पोहोचलो देवगिरी किल्ल्यावर. देवगिरी म्हणजे 'देवतांचा पर्वत'. पुढे महंमद-बीन-तुघलक ह्याने त्याचे दौलताबाद असे नामांतर केले. यादव राजवंशाने ह्या किल्ल्याचे निर्माण केले. ह्या काळात यादव साम्राज्य समृद्धी आणि उत्कर्षाच्या परमोच्च बिंदूवर होते. त्याची खबर अलाउद्दिन खिलजीला लागली आणि त्याने देवगिरीवर हल्ला केला. हा मुस्लिमांचा दक्षिणेवरचा पहिला हल्ला. हा हल्ला धरून एकून 3 हल्ले झाले देवगिरीवर. त्यात अनुक्रमे रामदेवराय, शंकरदेव आणि हरपालदेव ह्यांचा पराभव होउन देवगिरीवर मुस्लिम शासन सुरू झाले. एके काळी काही काळ ह्या किल्ल्याने भारताची राजधानी व्हायचा मानही मिरवलाय. पेशवाईतील 2 वर्षे सोडता हा किल्ला आणि आजुबाजुचा प्रदेश पुर्णकाळ मुस्लिम शासकांच्या ताब्यात होता. ह्या किल्ल्याची रचना इतकी अभेद्य केलीय की हा किल्ला अपराजित आहे. ह्यावर जो कब्जा मिळवला गेला तो फक्त कपट कारस्थानं आणि फंदफितुरीने. देवगिरी किल्ल्याचे प्रवेशद्वार हत्तींच्या धडकेपासुन संरक्षणासाठी लावलेले महाकाय खिळे ह्या किल्ल्यामधे बरेच दरवाजे आहेत आणी त्यांच्या दिशा आणी त्यांच्यामधली अंतरे अशा प्रकारे ठेवली आहेत की शत्रुला हल्ला करणे आणि रणनीती ठरवणे एकदम अशक्य होउन जावे. आत आल्यावर दिसणारे काही बुरुज मुख्य महादरवाज्यातुन आत आल्यावर बर्याच तोफा मांडुन ठेवल्या आहेत. भारतमाता मंदिर आतमधे एक मंदिर आहे जे यादवकालीन जैन मंदिर होते. तेथे कुतबुद्दीन खिलजी ने मस्जिद बनवली. जेव्हा 1948 साली हैद्राबाद संस्थान भारतात विलीन झाले तेव्हा त्या तिथे भारतमातेची मुर्ती स्थापन केली आणी ते ठिकाण भारतमाता मंदिर म्हणुन प्रसिद्धीस आले. त्या मंदिराच्या प्रांगणातील काही कोरीव खांब चाँद मिनार भारतमाता मंदिराजवळ एक मोठा 3 मजली मिनार आहे. हे मंदिर तोडुन तिथे मस्जिद बांधली असल्यामुळे अहमदशहा बहामनीने हा उत्तुंग मिनार त्यावेळेच्या मशिदीजवळ बांधला. दिल्लीच्या कुतुबमिनार नंतर उंच मिनारांमधे ह्या 3 मजली चाँद मिनारचा दुसरा क्रमांक लागतो. चिनी महल एके काळी ह्या महालाच्या भिंती चिनी मातीच्या नक्षीकामानी अलंकृत केल्या होत्या. ह्या महालाचा कारागृह म्हणुन वापर केला जात असे. औरंगजेबाने ह्या महालात संभाजीराजांच्या पत्नी येसुबाई आणि पुत्र शाहुराजे ह्यांना कैद करून ठेवले होते अशी वंदता आहे. मेंढा तोफ चिनी महालापासुन जवळच एका बुरुजावर ही मेंढा तोफ आहे. चारही दिशांना फिरू शकणार्‍या ह्या तोफेला मागच्या बाजुला मेंढ्याचे तोंड आहे त्यामुळे ह्या तोफेला मेंढा तोफ असे नाव पडले. मुस्लिम शासक हिला 'तोप किला शिकन' म्हणजे 'किल्ला तोडणारी तोफ' म्हणत. ह्या तोफेवर ही तोफ तयार करणार्‍याचे आणि औरंगजेबाचे नाव कोरले आहे. ह्या तोफेच्या तोंडावर कुराणातील एक वचन कोरले आहे. खंदक मेंढा तोफेच्या बुरुजावरून पुर्ण किल्ल्याचे दर्शन करता येते. आणी किल्ल्यात जाण्याच्या मार्गात एक मोठा खंदक आहे. ह्या खंदकात दोन स्तर आहेत. ह्या दोन्ही स्तरांमधे पाणी भरलेले असायचे. नेहमीच्या वेळी फक्त खालचा स्तर भरून पाणी असायचे. त्याने किल्ल्यात जा-ये करण्यासाठी असलेला पुल उघड असायचा. हल्ल्याच्या वेळी पाणी दुसर्‍या स्तरात सोडले जायचे जेणेकरून पुल पाण्याखाली जाउन शत्रु खंदकात पडून खंदकातील मगरींच्या भक्षस्थानी पडायचा. ह्या खंदकातील भिंती विशिष्ट पद्धतीने बांधल्या होत्या ज्याने त्यावर शिडी लावणे अशक्य होते. अंधारी/ भुलभुलय्या हा भुलभुलय्या ह्या किल्ल्याच्या अभेद्य रचनेचा कळस आहे. बालेकिल्ल्यात जाण्यासाठीचा हा मार्ग आहे. बालेकिल्ल्यात जाण्यासाठी हा भुलभुलय्या पार करावा लागतो. ह्याचे प्रवेशद्वार एखाद्या गुहेसारखे आहे. आणि हा पुर्ण मार्ग एकदम अंधारी आहे. अक्षरश: काळोख. काहीही दिसत नाही. भुलभुलय्या अशासाठी म्हणतात की हा पुर्ण मार्ग वर्तुळाकार जिन्याने बनलेला आहे. पायरी पायरी मधील अंतर विषम आहे. एक पायरी एकदम उंच तर एक पायरी एकदम लहान. शत्रुला उल्लु बनवण्याची फुल तजवीज आहे इथे. हवा आणि प्रकाश येण्यासाठी काही झरोके आहेत. त्यात शत्रुने प्रवेश केला रे केला की तो डायरेक्ट खंदकात पोहोचलाच पाहिजे अशी सोय केलेली आहे. शत्रु जरा विचार करत थांबला की वरून दगडांचा मारा करायला छुप्या जागा बनवलेल्या आहेत. बारादरी सध्याला ह्या किल्ल्यावर चांगल्या स्थितीत असणरी ही एकच वास्तु आहे. शहाजहानने बनवलेला हा महाल अष्टकोनी आहे. ह्याच्या बाहेरच्या बाजुला 12 कमानी आहेत त्याने ह्याचे नाव बारादरी असे पडले. बारादरीवरून पुर्ण किल्ल्याचे आणी आजुबाजुच्या परिसराचे सुंदर असे विहंगम दृश्य दिसते. अत्त्युच्च शिखर हा ह्या किल्ल्यावरील अत्त्युच्च बुरुज. इथे एक मोठी तोफ आहे जीचे नाव आहे दुर्गा तोफ. इथे पोहोचे पर्यंत आपली फॅ फॅ होते, तर एवढी वजनदार आणि भव्य तोफ इथे कशी आणली असेल वाटून उगाच जीव दडपून जातो. एवढ्या टोकावर गड चढून गेलो त्याचा हा घ्या पुरावा. :) क्रमश: (पुढे-> बिबी का मकबरा)
  • Log in or register to post comments
  • 30667 views
  • औरंगाबाद परिसर – वेरूळ – अजंठा- पैठण (2) : बीबी का मकबरा आणि पाणचक्की

Book traversal links for औरंगाबाद परिसर - वेरूळ - अजंठा- पैठण (1) : देवगिरी किल्ला

  • औरंगाबाद परिसर – वेरूळ – अजंठा- पैठण (2) : बीबी का मकबरा आणि पाणचक्की ›

प्रतिक्रिया

Submitted by वपाडाव on Mon, 11/14/2011 - 11:29

In reply to मस्त छायाचित्रे.. by प्रभाकर पेठकर

Permalink

मला मधे मधे काळ्या चौकोनात

मला मधे मधे काळ्या चौकोनात पांढर्‍या रंगाचे उद्गारचिन्ह दिसते आहे. ते कशासाठी आहे?
त्या फोटोंच्या लिंका गंडल्या असाव्यात असे वाटते....
  • Log in or register to post comments
Profile picture for user सोत्रि

Submitted by सोत्रि on Mon, 11/14/2011 - 11:45

In reply to मला मधे मधे काळ्या चौकोनात by वपाडाव

Permalink

हो असेच झाले आहे. पण आता

हो असेच झाले आहे. पण आता मिपावर स्वसंपादन करता येत नाहीयेय. :( काही संपादकांना व्यनी पाठवला आहे बदल करण्याबद्दल. - ( :( ) सोकाजी
  • Log in or register to post comments

Submitted by पैसा on Mon, 11/14/2011 - 19:45

In reply to हो असेच झाले आहे. पण आता by सोत्रि

Permalink

ओ भाऊ,

अशी अर्धवट माहिती काय देताय? पिकासावर कोणता फोल्डर आहे, तो शेअर केलाय का, नीट सांगा की जरा!
  • Log in or register to post comments
Profile picture for user सोत्रि

Submitted by सोत्रि on Tue, 11/15/2011 - 10:43

In reply to ओ भाऊ, by पैसा

Permalink

धन्यवाद! - (आभारी) सोकाजी

धन्यवाद! - (आभारी) सोकाजी
  • Log in or register to post comments

Submitted by पैसा on Tue, 11/15/2011 - 10:45

In reply to धन्यवाद! - (आभारी) सोकाजी by सोत्रि

Permalink

कसले?

दुरुस्ती तुम्हीच केलीत, मी फक्त कॉपी पेस्ट केलं!
  • Log in or register to post comments

Submitted by आशु जोग on Sun, 11/13/2011 - 20:45

Permalink

बरे वाटले

या परीसराचे फोटो पाहून बरे वाटले अन्यथा ट्रेकींग वा भटकंती म्हणजे काही ठराविक किल्ल्यांबद्दलच ऐकायला मिळते पुन्हा एकदा इकडे जाऊन यावे अशी इच्छा निर्माण झाली आहे
  • Log in or register to post comments
Profile picture for user आत्मशून्य

Submitted by आत्मशून्य on Mon, 11/14/2011 - 06:05

Permalink

कुल.

.
  • Log in or register to post comments

Submitted by पद्मश्री चित्रे on Mon, 11/14/2011 - 09:56

Permalink

पुन्हा फेरफटका..

गेल्या दिवाळीत आम्ही पण इथेच गेलो होतो.. (पण देवगिरिवर शेवट्पर्यन्त नव्हते गेले..)फोटो मस्त आहेत.. लोणार ला गेला होतात का? जरा दूर आहे, पण अतिशय छान
  • Log in or register to post comments

Submitted by रेवती on Mon, 11/14/2011 - 20:29

Permalink

मला तरी दुरुस्ती जमली नाही.

मला तरी दुरुस्ती जमली नाही.
  • Log in or register to post comments

Submitted by प्रभाकर पेठकर on Tue, 11/15/2011 - 10:57

Permalink

व्वा...

व्वा.... आता सर्व छायाचित्रे मस्त दिसत आहेत. धन्यवाद. शेवटचे, तोफेचा आवाज 'कान देऊन' ऐकतानाचे, छायाचित्र खासच आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by गार्गी_नचिकेत on Tue, 11/15/2011 - 16:58

Permalink

मस्त

फोटो आणि वर्णन दोन्हिही छान आहे. औरंगाबाद जवळच तासाभरच्या अंतरावर (गाडीने) "म्हैसमाळ" नावाची जागा आहे. येथे एक बालाजी चे छानसे मंदिर आणि छोटे तळे आहे. येथूनच सुर्योदय-सुर्यास्त पण छान दिसतो.
  • Log in or register to post comments

Submitted by वपाडाव on Tue, 11/15/2011 - 17:39

In reply to मस्त by गार्गी_नचिकेत

Permalink

सहमत !!

म्हैसमाळ = एकदम छान जागा आहे ही... खास करुन युगुलांकरिता.... कालेजातुन निघुन एका तासात वर अन २ तास तिथे घालवुन एका तासात परत.....पलीकडील टोकावरुन दिसणारी कडा पण सुंदर....
  • Log in or register to post comments
Profile picture for user सोत्रि

Submitted by सोत्रि on Tue, 11/15/2011 - 17:58

In reply to सहमत !! by वपाडाव

Permalink

ह्म्म...

खास करुन युगुलांकरिता
आपला काय अनुभव? 'विशालकाय वडाचं झाड' तिथलच का? ;) - (माळावरचा पण म्हशीच्या नव्हे) सोकाजी
  • Log in or register to post comments

Submitted by आशु जोग on Tue, 01/10/2012 - 00:33

Permalink

देवगिरी किल्ल्याच्या

देवगिरी किल्ल्याच्या 'आर्किटेक्चरची' काही माहिती कुठल्या पुस्तकात मिळेल का ! फिरोझ रानडे यांची अशा प्रकारची पुस्तके प्रसिद्ध आहेत. देवगिरी, जंजिरा लखनौचा इमाम बाडा यांच्या आर्किटेक्चरची माहिती मिळाल्यास आवडेल.
  • Log in or register to post comments

Pagination

  • First page « First
  • Previous page ‹ Previous
  • पान 1
  • पान 2

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com