✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

(Sonar Of Thoughts)

ध
धन्या यांनी
Sat, 11/05/2011 - 14:57  ·  लेख
लेख
Sonar of Thoughts ! जसे समुद्राची खोली सोनार नावाचे उपकरण शोधते तशी मनाची खोली आपले विचार शोधतात. म्हणून या फोटोला असे नाव दिले आहे. समोर अथांग समूद्र, काठावर मनाचा अथांग सागर आणि हे सगळं पाहायचं, अनुभवायचं सोडून बावळटपणे आपला फोटो काढणार्‍याकडे निर्विकार वृत्तीने पाहणारा हा बैल. मी काढलेला एक फोटो, शेखाडीला*. याच्यावर काही ओळी लिहिता आल्या तर बघा. सगळ्यात उत्तम कवितेला एक छोटेसे बक्षीस (बाकी शुन्य हे पुस्तक**).....पुढच्या कट्याला...... अर्थात कमीत कमी १० लोकांनी लिहीले तर नाहीतर....नाही. *हरीहरेश्वरहून दिवेआगरला (किंवा उलट) समुद्र किनार्‍यावरील रस्त्याने जाताना वाटेत हे शेखाडी गांव लागतं. ब्याण्णवच्या बॉम्ब स्फोटात वापरलेले आरडीएक्स याच किनार्‍यावर उतरले होते. कधी हरीहरेश्वरला किंवा दिवेआगरला गेलात तर या रस्त्याने नक्की जा. डोळ्याचे पारणे फीटेल. ** हे पुस्तक छान आहे (असं डान्राव म्हणतात ;) ) पुस्तक सध्या आउट ऑफ प्रिंट आहे. प्रिंटला गेले आहे असे गेले चार महिने अबक मधल्या पुस्तक दुकानदारांकडून ऐकतोय. त्यामुळे पुस्तक जर बाजारात आले तरच बक्षिस म्हणून देण्यात येईल. (डान्रावरावांकडे असलेली कॉपी वाचायला म्हणून आणून नंतर ती ढापून बक्षिस म्हणून दयायला आमचा जीव काही वर आलेला नाही.)
  • (Sonar Of Thoughts) - निकाल

Book traversal links for (Sonar Of Thoughts)

  • (Sonar Of Thoughts) - निकाल ›
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
स्थिरचित्र
लेखनप्रकार (Writing Type)
आस्वाद
विरंगुळा

प्रतिक्रिया द्या
24233 वाचन

💬 प्रतिसाद (113)

प्रतिक्रिया

बाणा तुझे काही खरे नाही

वाहीदा
Sat, 11/12/2011 - 22:06 नवीन
तुला फोटो दिसत नाही म्हणजे कम्माल आहे असो, अवांतर : तुला haifa weh(e)be कधी पासून आवडायला लागली म्हणजे तीची स्टाईल मारु डुप्लीकेट राखी सावंत पण तुझी चॉईस आहे तर ...(येथे कपाळावरील घाम पुसण्याची स्माईली समजावी)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण

तुला फोटो दिसत नाही म्हणजे

मदनबाण
Mon, 11/14/2011 - 09:32 नवीन
तुला फोटो दिसत नाही म्हणजे कम्माल आहे त्यात कमाल ती काय ? अजुन माझ्याकडे मि.इंडियाचा चष्मा आला नाहीये ! त्यामुळे बॅन असलेल्या साईटी दिसणे अंमळ कठीणच आहे हो... ;) तुला haifa weh(e)be कधी पासून आवडायला लागली म्हणजे तीची स्टाईल मारु डुप्लीकेट राखी सावंत पण तुझी चॉईस आहे तर ...(येथे कपाळावरील घाम पुसण्याची स्माईली समजावी) मला हायफा वाहेबी आवडण्या पेक्षा तीचे गाणे आवडले, तिचे मी पाहिलेले पहिले गाणे होते:--- Mosh Adra Astana त्यानंतर Salem Halak" (Give Yourself Up) हे आवडले होते.त्यात आता लिंक मधे अडकवलेले गाण्याची भर पडली... बाकी तिची तुलना राखी सावंतशी ? छ्या ! काहीतरीच काय ! ;) बाकी yalla habibi हे गाणं ऐक जरा... ;) आणि चॉईसचं म्हणशील तर सध्या पुर्वी भावे (poorvi bhave). ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वाहीदा

तुला कधीच फटु दिसत नाहीत ना !!!

वपाडाव
Fri, 11/11/2011 - 12:28 नवीन
मित्रा, तु एक काम कर...जेव्हा Accenture मध्ये जॉइन होशील ना तेव्हाच मिसळपाव उघड... कदाचित तिथं तरी तुला फटु दिसतील....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणेशा

कुछ जम्या नही. मजा आली नाही.

नगरीनिरंजन
Fri, 11/11/2011 - 12:52 नवीन
कुछ जम्या नही. मजा आली नाही. धनाजीरावांकडून अपेक्षा जास्त आहेत. फोटोतरी जरा आकर्षक लावायचा ना राव.
  • Log in or register to post comments

किती पाहू वाट समुद्राच्या

रेवती
Fri, 11/11/2011 - 22:47 नवीन
किती पाहू वाट समुद्राच्या तटी कधी होई भेटी, तुझी माझी.||१|| मनी येई शंका जरी असे लघु आवडे का राघू, दुसर्‍यांचा.||२|| वर निळे स्काय, खालती वॉटर आवडे पिटर, का गं तुला.||३|| दृष्टी झाली क्षीण, जग हे कनिंग डोळा येई भिंग, आता माझ्या.||४||
  • Log in or register to post comments

हम्माऽऽ

पैसा
Fri, 11/11/2011 - 23:38 नवीन
कविता जमली बर्का! पण बक्षीस खरंच मिळणार आहे का ते आधी विचार! नाहीतर तुझे कष्ट फुकटच!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती

अगं आता ७ झाल्यात. अजून ३

रेवती
Fri, 11/11/2011 - 23:49 नवीन
अगं आता ७ झाल्यात. अजून ३ आल्या की निक्काल आहे ना स्पर्धेचा!;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

कविता झक्कास जमलीये बरं का

धन्या
Sat, 11/12/2011 - 00:32 नवीन
कविता झक्कास जमलीये बरं का रेवतीआज्जी. बाकी तुम्ही कविता मोजत आहात हे वाचून अंमळ मौज वाटली. :) असो. दहा कविता झाल्या की त्यातली एक चांगली कविता निवडून नक्की बक्षिस देण्यात येईल. अर्थात ते पुस्तक "बाकी शुन्य" नसेल. पुस्तक आउट ऑफ प्रिंट आहे तर देणार कुठून. ;) एक कल्पना सुचलीये. विजेत्यालाच पुस्तक कुठलं हवं हे विचारलं तर? :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती

शांताराम किंवा चित्रमय स्वगत

चेतन सुभाष गुगळे
Sat, 11/12/2011 - 16:58 नवीन
<< विजेत्यालाच पुस्तक कुठलं हवं हे विचारलं तर? >> आणि विजेत्यानं शांताराम किंवा चित्रमय स्वगत मागितलं तर?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धन्या

आणि विजेत्यानं शांताराम किंवा

धन्या
Sat, 11/12/2011 - 21:49 नवीन
आणि विजेत्यानं शांताराम किंवा चित्रमय स्वगत मागितलं तर?
हाच तर तुमच्यातला आणि आमच्यातला फरक आहे. तसं नसतं तर तुम्ही हा प्रश्न विचारलाच नसता. वयाची पहिली तेविस वर्ष पैसा कधी दिसलाच नाही. आणि चोविसाव्या वर्षापासून इतका पैसा मिळू लागला की आमच्या दृष्टीने तो पैशाचा पाउस आहे. गरज पडल्यास आणि शक्य असल्यास आम्ही अ‍ॅमेझॉन डॉट कॉमकडून इंटरनॅशनल शिपिंग करुन पुस्तक मागवू. त्याची काळजी तुम्हास नसावी. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चेतन सुभाष गुगळे

तुम्ही जर मला पैला लंबर दिलात

रेवती
Sat, 11/12/2011 - 21:54 नवीन
तुम्ही जर मला पैला लंबर दिलात तर मी अगदी स्वस्तातलं पुस्तक मागीन याची खात्री बाळगा. उदा. ११ विविध कोशिंबीरी, खोबर्‍याच्या चटणीचे ५ प्रकार इ.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धन्या

हाहा... तशीही तुमची कविता या

धन्या
Sat, 11/12/2011 - 21:57 नवीन
हाहा... तशीही तुमची कविता या स्पर्धेत विजेतेपदाची प्रमुख दावेदार आहेच की. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती

ही घ्या आठवी

पैसा
Sat, 11/12/2011 - 16:39 नवीन
फक्त दहा कविता व्हायला पाहिजेत या उदात्त हेतूने ही कविता पाडलेली आहे. "जिथे सागरा" या गाण्याबरोबर साम्य आढळल्यास मी जबाबदार नाही. जिथे वाळूला सागर मिळतो, तिथे तुझी मी वाट पहातो|| गोठ्यात सरकी पेंड खाऊन लोकांच्या शेतात रोज चरून रस्त्यात धावून, माती उडवून मी, दावे गळ्यातील फेकून येतो || बघुनी नभीची चंद्रकोर ती कुत्र्याना भुंकाया येते स्फूर्ती कुत्र्यांना पळवूनी, बैलांशी झुंजूनी गायींच्या कळपाला साद घालतो||
  • Log in or register to post comments

बघुनी नभीची चंद्रकोर

रेवती
Sat, 11/12/2011 - 21:47 नवीन
बघुनी नभीची चंद्रकोर ती कुत्र्याना भुंकाया येते स्फूर्ती ख्या ख्या ख्या मूळ गाण्यात बघुनी नभीची चंद्रकोर ती हे किती सोज्वळ आवाजात म्हटलय, त्यानंतर कुत्रांचा सदर्भ म्हणजे......
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

खरंच... पैसातैंची कल्पना

धन्या
Sat, 11/12/2011 - 21:53 नवीन
खरंच... पैसातैंची कल्पना भारीच आहे... रेवती आज्जी... दहा कविता झाल्या की सांगा बरं :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती

सांगते सांगते. जिंकायचं

रेवती
Sun, 11/13/2011 - 04:12 नवीन
सांगते सांगते. जिंकायचं म्हटलं की एवढे कष्ट आलेच ना! काहीही झालं तरी 'फोडणी करण्याचे साडेतीन प्रकार' हे पाकृ पुस्तक हवंच आहे मला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धन्या

अजुन दोन कविता येउद्यात !!!

प्रीत-मोहर
Sun, 11/13/2011 - 13:03 नवीन
अजुन दोन कविता येउद्यात !!!
  • Log in or register to post comments

माझीही एक कविता!!

मोहनराव
Sun, 11/13/2011 - 16:00 नवीन
मी कधीच कविता केल्या नाहीत, पण धनाजीरावांचा धागा पाहुन राहवले नाही. जमली आहे का ते सांगा. तुम्हीहि बदल सुचवु शकता!! चाल- हम्मा हम्मा (बॉम्बे सिनेमा) हम्मा हम्मा तु दिसलास मला समुद्र किनाऱ्यावरी, माझी झोप उडाली अन गळ्यातली घंटा माझी किण किण वाजू लागली ||धृ|| हम्मा हम्मा हम्मा हम्मा हम्मा हम्मा हम्मा हम्मा हम्मा हम्मा हम्मा हम्मा हि पहिली भेट आपली, तुझ्यावर जीव जडला अरे प्रियतमा मी तुझ्यावर, माझा जीव उधळला हम्मा हम्मा हम्मा हम्मा हम्मा हे हम्मा हम्मा हम्मा हम्मा हम्मा काळीभोर तगडी जवानी, तुला मिळाली सखया तुझे रुपडे हे बघून मी तर घायाळ झाले सखया शेपटी झोकदार तुझी शिंगे धारदार तुझी हरपून गेले मी तुझ्यावर राया हम्मा हम्मा हम्मा हम्मा हम्मा हे हम्मा हम्मा हम्मा हम्मा हम्मा तु दिसलास मला समुद्र किनाऱ्यावरी, माझी झोप उडाली अन गळ्यातली घंटा माझी किण किण वाजू लागली हम्मा हम्मा हम्मा हम्मा हम्मा हे हम्मा हम्मा हम्मा हम्मा हम्मा शेखाडी गावचा नयनरम्य हा किनारा तुला पाहून मी विसरले दिलबरा मालक आणाया गेलाय चारा दावण सोडून मी आलेय भराभरा म्हणून सोडून तुझा हा रागीट तोरा चल आपण होऊन जाऊ नौ दो ग्यारा हम्मा हम्मा हम्मा हम्मा हम्मा हे हम्मा हम्मा हम्मा हम्मा हम्मा तु दिसलास मला समुद्र किनाऱ्यावरी, माझी झोप उडाली अन गळ्यातली घंटा माझी किण किण वाजू लागली हम्मा हम्मा हम्मा हम्मा हम्मा हम्मा हम्मा हम्मा हम्मा हम्मा हम्मा हम्मा (नवखा कवी) मोहन.
  • Log in or register to post comments

हेहेहे!

पैसा
Sun, 11/13/2011 - 16:38 नवीन
ते राया, दिलबरा वगैरे भारी आवडलं!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोहनराव

जबरा कविता... मालक आणाया

धन्या
Sun, 11/13/2011 - 16:50 नवीन
जबरा कविता...
मालक आणाया गेलाय चारा दावण सोडून मी आलेय भराभरा म्हणून सोडून तुझा हा रागीट तोरा चल आपण होऊन जाऊ नौ दो ग्यारा
लय भारी मोहनराव !!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोहनराव

धन्यवाद धनाजीराव व पैसातै!!

मोहनराव
Sun, 11/13/2011 - 16:57 नवीन
धन्यवाद धनाजीराव व पैसातै!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धन्या

जबरी मोहन प्यारे !!

दीप्स
Tue, 11/22/2011 - 11:25 नवीन
साष्टांग -------- /\ -------- तुमच्या हम्मा हम्माला !!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोहनराव

कुणीतरी एकच कविता लिहा

रेवती
Wed, 11/16/2011 - 19:22 नवीन
कुणीतरी एकच कविता लिहा की. त्याशिवाय स्पर्धेचा निकाल लागू शकत नाही.
  • Log in or register to post comments

फक्त निकाल लागावा याकरिताच

चेतन सुभाष गुगळे
Wed, 11/16/2011 - 21:06 नवीन
रेवतीजी, तुमच्या वरील आवाहनास अनुसरून केवळ स्पर्धेचा निकाल लागावा या उद्देशाने माझ्या मनात आल्या तशा काही ओळी इथे मांडत आहे. तुला माझ्याविषयी नेमकं काय वाटतं तेच मला समजत नाही. माझ्या प्रियेला तू माता म्हणतोस मग मला पिता का मानत नाही? माझ्या वाटचं दूध पळवून मला शेतात राबायला लावतोस, आणि वर्षातून एक दिवस मला सूटी देऊन माझी पुजा करतोस. बिनडोक कष्ट करणार्‍यालाही माझीच उपमा देतोस आणि ऐतं खात बसून राहणार्‍यालाही बैलोबा म्हणतोस हे कोडं काही सुटत नाही. बरं मला डोकं नाही असं मानतोस तर जिथे बुद्धी पणाला लागते तिथे माझा पुतळा लावुन सट्टा तरी कसा काय खेळतोस? काय असेल ते असो पण मला रिकामा बसव रे कधी तरी कारण त्याशिवाय तुला कोणी अतिशहाणा जाणत नाही. मला वाटते मी स्पर्धेसाठी आवश्यक ती तांत्रिक गरज पूर्ण केली आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती

धन्यवाद गुगळेसाहेब! आता धनाजी

रेवती
Wed, 11/16/2011 - 21:15 नवीन
धन्यवाद गुगळेसाहेब! आता धनाजी वाकडे या जरा इकडे लावा निक्काल धाग्याचा. धाग्याचा बै धाग्याचा. पुरस्कार द्या लाखमोलाचा.;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चेतन सुभाष गुगळे

धन्यवाद मंडळी. गमती गमतीत

धन्या
Wed, 11/16/2011 - 22:18 नवीन
धन्यवाद मंडळी. गमती गमतीत सुरु केलेल्या या धाग्याला उस्फुर्त प्रतिसाद मिळाला. लवकरच परीक्षक शोधून निकाल लावण्यात येईल. आणि मी आधी म्हटल्याप्रमाणे विजेत्यास त्याला हवे ते पुस्तक बक्षिस देण्यात येईल. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती

ओ ध रा वाकडे!!

मी-सौरभ
Fri, 11/18/2011 - 10:04 नवीन
याच धाग्यावर कौल घेता का? ज्याला सर्वात जास्त मतं तो विजेता!! कवितेची प्रेरणा आणि पाडलेल्या कविता बघता एखादा नवखा कवीच परीक्षक व्हायला तयार होईल अशी खात्री वाटत आहे ;)
  • Log in or register to post comments

कवितेची प्रेरणा आणि पाडलेल्या

धन्या
Fri, 11/18/2011 - 12:10 नवीन
कवितेची प्रेरणा आणि पाडलेल्या कविता बघता एखादा नवखा कवीच परीक्षक व्हायला तयार होईल अशी खात्री वाटत आहे
घोडं इथंच अडलं आहे साहेब. :) दोन चार नावं नजरेसमोर आहेत पण ते तयार होतील की नाही याबाबत शंका आहे. आणि जे आमच्या दोस्तीखातर तयार झाले असते त्या सार्‍यांनी या धाग्यावर कविता पाडल्या आहेत. त्यामुळे ती ही शक्यता उरली नाही . ;) असो. काहीतरी मार्ग निघेलच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मी-सौरभ

ओ साहेब, ते आजकाल एसएमएस ची

रेवती
Fri, 11/18/2011 - 19:03 नवीन
ओ साहेब, ते आजकाल एसएमएस ची फ्याशन आलिये तसं काही कर्ता का? आम्हाला किती दिवस बक्षिसाच्या आशेला लावणार. हे प्रकरण संपवून दुसरा फोटू टाका राव!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धन्या

+१

मोहनराव
Sat, 11/19/2011 - 16:09 नवीन
आणखी किती वेळ लावणार धनाजीराव?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती

सहमत. फसवणूक! घोर फसवणूक

रेवती
Sat, 11/19/2011 - 19:17 नवीन
सहमत. फसवणूक! घोर फसवणूक होतिये स्पर्धकांची!;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोहनराव

बघा जमते आहे का .....

जयंत कुलकर्णी
Mon, 11/21/2011 - 08:59 नवीन
मी परिक्षक म्हणून काम केले तर चालेल का ? विडंबनात्मक परीक्षण करतो. :-)
  • Log in or register to post comments

जरूर! काय म्हणता

रेवती
Mon, 11/21/2011 - 09:30 नवीन
जरूर! काय म्हणता ध.वा.? जयंतराव आपणहून आलेत म्हणजे मानधनाचा प्रश्न नाही.;) कृपया निकाल जाहीर करून मला विजेती घोषित करावं अशी विनंती करते.;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जयंत कुलकर्णी

तरीपण वाकडेसो उदार मनाने मला

जयंत कुलकर्णी
Mon, 11/21/2011 - 16:26 नवीन
तरीपण वाकडेसो उदार मनाने मला त्याच पुस्तकाची एक प्रत बहाल करतील अशी आशा करतो :-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती

तुम्ही हे काम कराल तर

धन्या
Mon, 11/21/2011 - 22:29 नवीन
तुम्ही हे काम कराल तर सोन्याहून पिवळं होईल काका. :) जो कुणी विजेता तुम्ही निवडाल त्या विजेत्याला (आणि तुम्हालाही - मानधन म्हणून ;) ) त्याला हवे ते पुस्तक बक्षिस म्हणून देण्यात येईल. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जयंत कुलकर्णी

>>विडंबनात्मक परीक्षण करतो ते

अन्या दातार
Mon, 11/21/2011 - 09:42 नवीन
>>विडंबनात्मक परीक्षण करतो ते ठिक आहे; पण नंतर परीक्षणाचे कोणी विडंबन केले नाही म्हणजे मिळवले ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जयंत कुलकर्णी

चालेल ! त्याचेही विडंबन

जयंत कुलकर्णी
Mon, 11/21/2011 - 16:41 नवीन
चालेल ! त्याचेही विडंबन करण्याची क्षमता मी बाळगून आहे..... :-) @ वाकडेसो, गंमत केली आहे हे कृ ल घे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अन्या दातार

नही

मी-सौरभ
Mon, 11/21/2011 - 17:42 नवीन
ज कु तुमच्यासारख्या शिनेर माणसाने हे काम करणे पटत नाही... मा. श्री. अन्या दातार यांना ही काम देता येइल का???
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जयंत कुलकर्णी

बरं, नेमके काय झाले

सोत्रि
Mon, 11/21/2011 - 22:55 नवीन
बरं, नेमके काय झाले निकालाचे? रेवती आज्जी, तुम्हालाच पुस्तक मिळाले का? - (मनाची खोली तपासण्यासाठी Sonar शोधणारा) सोकाजी
  • Log in or register to post comments

इथे अजुन परीक्षक फिक्स

अन्या दातार
Mon, 11/21/2011 - 23:10 नवीन
इथे अजुन परीक्षक फिक्स (म्हणजे ठरलेला) नाही, अन तुम्हाला निकालाचे डोहाळे लागलेत ;) (सबुरीने घेणारा) अन्या
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सोत्रि

या धाग्यावर दोन नवीन प्रतिसाद

रेवती
Tue, 11/22/2011 - 00:39 नवीन
या धाग्यावर दोन नवीन प्रतिसाद पाहून त्यातला एक निकाल जाहीर करणारा (मला विजेती घोषित करणारा) तर दुसरा माझे अभिनंदन करणारा असेल असे वाटले आणि आले तर अजून जयंतराव आणि ध. वा कुणाचाच पत्ता नाही. त्यात तुम्ही येऊन सारखे विचारून माझा ताण वाढवताय. तुम्हा सगळ्यांनाच मह्त्वाच्या स्पर्धेच्या निकालाची उत्सुकता असणे स्वाभाविक आहे हे समजून घेते आणि माझे भाषण संपवते. जय बैलोबा!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सोत्रि

आज्जी... तुमची तळमळ कळते

धन्या
Tue, 11/22/2011 - 10:38 नवीन
आज्जी... तुमची तळमळ कळते हो... पण कुणी परीक्षकच मिळत नाही... तांत्रिकदृष्टया या धाग्यावर कविता दिलेल्यांना परीक्षक म्हणून घेता येणार नाही. वर एका प्रतिसादात जकु काकांना (मुळ सोनारवाले) गळ घातली आहे. त्यांचाही काही प्रतिसाद नाही. आता तुम्हीच एक परीक्षक पकडून आणा. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती

ह्या धन्याचा ह्या ह्या

पाषाणभेद
Tue, 11/22/2011 - 01:49 नवीन
ह्या धन्याचा ह्या ह्या धन्याचा ह्या धन्याचा वळू पुढे लागलाय पळू मागे त्याच्याच लागे मी कसं सांगू तुला सखे गाई ग पुष्ट उभार त्याचा खांदा पाहून झाला माझा वांधा बघून लागावी नजर असलीच काया त्याची कसं सांगू तुला सखे गाई ग मी आहे दुधाळ गाय माझ्या दुधाची मधाळ साय पंचक्रोशीत माझं लई नाव माझंच गुणगान किती कसं सांगू तुला सखे गाई ग मालक त्याचा बेरका वाकडेवाडीचा आहे धन्याशेट नावाचा त्याला पुढे करून मला पळविण्याचा त्याचा विचार कसं सांगू तुला सखे गाई ग
  • Log in or register to post comments

आता आलेल्या एन्ट्र्या

रेवती
Tue, 11/22/2011 - 02:00 नवीन
आता आलेल्या एन्ट्र्या स्विकारल्या जाणार नाहीत.;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पाषाणभेद

कविता छान आहे हे सांगायचं

धन्या
Tue, 11/22/2011 - 10:42 नवीन
कविता छान आहे हे सांगायचं विसरलात काय? ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती

आता..

मी-सौरभ
Wed, 11/23/2011 - 20:31 नवीन
पाभे ना वि४ परीक्षक होता का म्हणून.... म्हंजे आजीना एक स्पर्धक पण कमी होईल... ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धन्या

सगळ्यांच्या आवाहनामुळे हा पहा..

मस्त कलंदर
Tue, 11/22/2011 - 10:17 नवीन
आख्खा कळपच भेटीला आलाय. Image removed. बाकी, या नितांत सुंदर किनार्‍यावर नेहमी जनावरेच असतात का?
  • Log in or register to post comments

होय... झक्कास... तो किनारा

धन्या
Tue, 11/22/2011 - 10:41 नवीन
होय... झक्कास... तो किनारा गाई-बैल आणि वासरांनी गजबजलेला असतो. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मस्त कलंदर

बरं

मी-सौरभ
Wed, 11/23/2011 - 20:33 नवीन
या किनार्‍याच्या जवळपास माण्सं असणारा एखादा किनारा आहे का रे??
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धन्या

कारे बैला कंटाळलास का तिथे

मोहनराव
Wed, 11/23/2011 - 20:44 नवीन
कारे बैला कंटाळलास का तिथे फिरुन? ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मी-सौरभ
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • ›
  • »

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा