Skip to main content

(Sonar Of Thoughts)

लेखक धन्या यांनी शनिवार, 05/11/2011 14:57 या दिवशी प्रकाशित केले.
Sonar of Thoughts ! जसे समुद्राची खोली सोनार नावाचे उपकरण शोधते तशी मनाची खोली आपले विचार शोधतात. म्हणून या फोटोला असे नाव दिले आहे. समोर अथांग समूद्र, काठावर मनाचा अथांग सागर आणि हे सगळं पाहायचं, अनुभवायचं सोडून बावळटपणे आपला फोटो काढणार्‍याकडे निर्विकार वृत्तीने पाहणारा हा बैल. मी काढलेला एक फोटो, शेखाडीला*. याच्यावर काही ओळी लिहिता आल्या तर बघा. सगळ्यात उत्तम कवितेला एक छोटेसे बक्षीस (बाकी शुन्य हे पुस्तक**).....पुढच्या कट्याला...... अर्थात कमीत कमी १० लोकांनी लिहीले तर नाहीतर....नाही. *हरीहरेश्वरहून दिवेआगरला (किंवा उलट) समुद्र किनार्‍यावरील रस्त्याने जाताना वाटेत हे शेखाडी गांव लागतं. ब्याण्णवच्या बॉम्ब स्फोटात वापरलेले आरडीएक्स याच किनार्‍यावर उतरले होते. कधी हरीहरेश्वरला किंवा दिवेआगरला गेलात तर या रस्त्याने नक्की जा. डोळ्याचे पारणे फीटेल. ** हे पुस्तक छान आहे (असं डान्राव म्हणतात ;) ) पुस्तक सध्या आउट ऑफ प्रिंट आहे. प्रिंटला गेले आहे असे गेले चार महिने अबक मधल्या पुस्तक दुकानदारांकडून ऐकतोय. त्यामुळे पुस्तक जर बाजारात आले तरच बक्षिस म्हणून देण्यात येईल. (डान्रावरावांकडे असलेली कॉपी वाचायला म्हणून आणून नंतर ती ढापून बक्षिस म्हणून दयायला आमचा जीव काही वर आलेला नाही.)
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 24381
प्रतिक्रिया 113

प्रतिक्रिया

In reply to by यकु

पत्रकारसाहेब, सार्‍याच गोष्टी परफेक्ट करायला आम्ही आमिर खान नाही. काही गोष्टी आम्ही आमच्या आनंदासाठी करतो. ;)

In reply to by धन्या

काही गोष्टी आम्ही आमच्या आनंदासाठी करतो. Wink
हॅ हॅ हॅ करा ना.. उद्या कुणी ऊंटाच्या बुडख्याचा मुका घ्यायला उडी मारील आणि म्हणेल आम्ही हे आम्ही आमच्या आनंदासाठी करतो. ;-) कसं जमायचं ? (ह.घे.)

In reply to by यकु

कसं जमायचं ?
हा उंट आणी मुका घेणार्‍याचा प्रश्न आहे. तुम्ही फक्त आम खाव ना, गुठलिया कायको गिनताव.

In reply to by धन्या

मी म्हणालो पळा आता.. धन्या कुर्‍हाड घेऊन येतंय आता रक्त काढायला.. ;-)

In reply to by यकु

रक्त काढायला*
शीव शीव शीव. आजच्या पीढीला कुठे काय बोलावं हेच कळत नाही. * अधिक माहितीसाठी वपाडाव यांच्याशी संपर्क करा. त्यांच्या लॅपटॉपमध्ये रक्तचरीत्र सिनेमा आहे. ;)

In reply to by धन्या

@-शीव शीव शीव. आजच्या पीढीला कुठे काय बोलावं हेच कळत नाही. .... धनाजीराव परत पेटलेले दिसताय... आजची पिढी हो आजची पिढी,कोणाच्या निखाय्रावर कोणाची बिडी... ;-) असलं काहीतरी गीत लिवा अता... :-D

In reply to by धन्या

आणंद ! कोण आम्ही काय पुसता फोटो काढती वाकडे ते धाकटे आम्ही थोरले आणंदी आम्ही गे.

In reply to by रामजोशी

मिसळपाववर सगळ्यांसाठी खुले व्यासपीठ आहे आणि तुमचे कायम स्वागतंच आहे.

In reply to by शिल्पा ब

सहमत. मिपा खुले व्यासपीठ असल्याने तुम्ही आणंदी आम्ही गे अशा शब्दांत वर्णन केलेला आनंदोत्सव इकडे सुरु करायचा की नाही असा काथ्याकुट जरी केलात तरी तुम्हाला कुणी कुणी काही बोलणार नाही. प्रतिक्रिया हघेवेसांनल. :)

In reply to by धन्या

धना, तु दिलेल्या लिंकवर येणारा एक मेगाबायटी एवंच जार्गनपूर्ण प्रतिसाद सहन करण्याची शक्ती मिळो अशी अ‍ॅडव्हान्स प्रार्थना. ;-)

In reply to by यकु

( पाडगावकर मोड ऑन ) एका होता बैल कर म्हणाला माझी चड्डी सैल पोहत जाईन हजार मैल गाठेन परी तीर पैल. इस्ट कोस्टाला उभी असेल शिंगाला शिंग घासेल आणि थोडी लाजेल माझ्या सवे भिजेल. ( पाडगावकर मोड ऑफ)

वाकडेसाहेब पुस्तक मिळविण्यासाठी बर्‍याच अटी घातल्या आहेत बुवा तुम्ही. म्हणजे , १. कमीत कमी दहा लोकांनी लिहीले पाहीजे, २.पुस्तक बाजारात यायला हवे, ३. पुस्तक पुढच्या कट्ट्याला मिळेल ( म्हणजे कट्टा व्हायला हवा ). लिखाणाच्या दर्जाची पारख ( कारण उत्तम कवितेलाच बक्षिस असल्यामुळे ) कोण करणार ?

In reply to by दत्ता काळे

लिखाणाच्या दर्जाची पारख ( कारण उत्तम कवितेलाच बक्षिस असल्यामुळे ) कोण करणार ?
ते कुणी लिहिलंच तर पाहता येईल. आधीच कशाला डोक्याला शॉट दया ;)

In reply to by दत्ता काळे

'लिखाणाच्या दर्जाची पारख ( कारण उत्तम कवितेलाच बक्षिस असल्यामुळे ) कोण करणार ?' सोपं आहे, सगळ्या कविंतांच्य प्रिंट काढायच्या त्याच बैलापुढं नेउन टाकायच्या जी कविता तो बैल खाणार नाही ती उत्तमा, हाकानाका.

In reply to by ५० फक्त

बैल नाही मिळालाच तर ..... मिपावरच्या वृषभ राशीच्या लोकांचा सल्ला घ्या ;)

आमची प्रेरणा आजही तू आली नाहीस तूही त्या पहिल्या गायीसारखीच झाली आहेस, बेभरवशी. चरण्याची सवय लावून गुडूप होऊन जातेस. पण मग मी वाट पाहात राहतो, तू येण्याआधीच्या इतर गायींची, चरणार्‍या इतर बैलांची, वासरांची वैताग आणणार्‍या शेणाच्या वासांची, कारण मला माहित असते, कि या सर्वांनंतर, तू येणार आहेस, माझ्याबरोबर चरत राहून, माझ्या वाटेचा चारा पण खाउन टाकणार आहेस. आजही तू आली नाहीस, मी मात्र रोजच्या प्रमाणे उद्याही येईन, माझ्या वाटेचा चारा खायला.

या माडबनी झडकरि ये गायगडे.. हे वृषभवृषण पडले तुजवाचुनि कोरडे.. खच्चुनि लाव जोर प्रिये, तोड तुझा कासरा.. भेट माझी म्हणुनि उदरि घेऊनि जा वासरा..

In reply to by यकु

सलाम गविशेठ. समुद्राच्या फेसाळत्या लाटांच्या पार्श्वभूमीवर दोन जीवांचे मिलन... आणि तेही केवळ दुसर्‍या जीवाच्या निर्मीतीच्या उदात्त भावनेनं... वासनारहीत... अहाहा...

In reply to by यकु

कहर कहर.... "अछूत कन्या" मधले अशोक कुमार आणि देविकाराणी अनुक्रमे बैल आणि गाय होऊन ग विंच्या ओळी म्हणताहेत असं दृश्य ड्वाळ्यांसमोर हुबं र्‍हाइलं ! जे पी

In reply to by गवि

गवि, यावरून एक परम अश्लील ब श्रेणीतली कविता आठवली... प्रिये तुजवाचून मंद झाल्या तारका, 'जीव' झाला बारका..आणि झाल्या (वृषभ) वृषणाच्या खारका !!! अतिशयच आक्षेपार्ह आहे...पण मोह अवरालाच नाही :)

In reply to by चतुरंग

याला साष्टांग नमस्काराचा टॉप्/बॉट्म व्यू म्हणायचा का ? वॉव , काय कल्पकता आहे ! तुम्हाला ही ___/\___अन सलाम !!

कविता नको पण बक्षीस आवर! एक करुण रसातली कविता लिहिणार होते, पण "बक्षीस" पाहताच या धाग्यावरून दुप्पट स्पीडने पळून जायचा विचार करते आहे...

कविता नको पण बक्षीस आवर!
तुम्ही पुस्तक वाचलेलं दिसतंय. :) आम्हाला वाचायचं आहे परंतू पुस्तक आउट ऑफ प्रिंट आहे. असो, तरीही तुम्ही कविता करु शकता. पुस्तक तसंही मिळण्याची शक्यता नाहीच. ;)

बैलाचे मनोगत..... सागरतीरी एकदातरी मी असं करणार आहे कॅमेरासमोर कुणाच्या तरी ताठ उभं राहणार आहे वाळुतल्या खेकड्यांचे अन झाडावरच्या कावळ्यांचे भरभरुन फोटो काढणा-या या वेड्या माणसांना माझं मस्तवाल अन राजबिंडं रुप दाखवणार आहे कॅमेरासमोर..... आज तु आलास, मला बरं वाटलं तुझ्या हातात कॅमेरा पाहुन का़ळीज भरुन आलं काढ बिनधास्त फोटो आज मीच तुला घाबरणार आहे कॅमेरासमोर.... जाता जाता एक कर माझा मित्र म्हणुन त्या धनाच्या चंद्रिला हा फोटो दाखव दुरुन उद्यापासुन मि त्याला सॉलिड खुन्नस देणार आहे कॅमेरासमोर....... अवांतर - माझी रास कोणत्याही कोनातुन वृषभ नाही.

In reply to by ५० फक्त

मस्त जमलीये !!!
माझं मस्तवाल अन राजबिंडं रुप दाखवणार आहे
अगदी असाच वाटला मला तेव्हा तो. बालपण गायी, म्हशी आणि बैलांसोबतच गेलेले असल्यामुळे हा बैल अंगावर येईल की काय अशी भीती वाटण्याचा प्रश्नच नव्हता. ;)

रिकामा बैल फोटोच्या कामी फोटो काढण्याची shakkal nami रंग सुंदर kalabhor वयाने to आहे पोर kavita कधी केली नाही वाकड्यात कधी शिरलो नाही आनंद अथांग sagaracha घेण्याला नजर vedhate कुणी milel का जोडीला tumhi kadhalela फोटो mala avadala अनिल आपटे

In reply to by कवितानागेश

हो... येत्या एक - दोन महिन्यात पुस्तक बाजारात उपलब्ध झालं तर नक्कीच. ;)

"धनाजिराव वाकडे हे काय करुन राहिले गडे टाकता गुरा ढोरांचे फोटो वाकडे तिकडे परत असे कराल तर पडतील गालावर जोडे (Sonar Of Thoughts) म्हणुन कवीता करायला.. वाटलो का आम्ही येडे आता जरा चांगले फोटो टाका ईकडे मग मिळतील तुम्हाला गुलाब जामुन आणी पेढे" त. टी. कवीतेला हलकेच घ्यावे सहज सुचले म्हनुन लिहीले आहे.. नो ऑफेंस जर लेखक आणी वाचकांच्या भावना दुखावल्या असल्यास मी जिम्मेदार नाही :)

In reply to by किशोरअहिरे

धनाजिराव वाकडे हे काय करुन राहिले गडे
फोटो काढून र्‍हायलो ना बाप्पा.
टाकता गुरा ढोरांचे फोटो वाकडे तिकडे परत असे कराल तर पडतील गालावर जोडे
तुमच्या भावना पोचल्या. अंमळ चुकलंच आमचं. एखादी अर्धवस्त्रा ललना किंवा गेला बाजार पाठमोरा जॉन अब्राहम यांचे फोटो टाकायला हवे होते.
(Sonar Of Thoughts) म्हणुन कवीता करायला.. वाटलो का आम्ही येडे
वाटायचं काय त्यात. हा प्रतिसाद ढळढळीत पुरावा आहे. :)
आता जरा चांगले फोटो टाका ईकडे मग मिळतील तुम्हाला गुलाब जामुन आणी पेढे"
तुमची "चांगले" शब्दाची व्याख्या सांगा. आम्ही जरुर प्रयत्न करु. आणि हो आम्ही कर्म करताना फळाची अपेक्षा ठेवत नाहीत. त्यामूले आम्हाला तुमचे गुलाब जामून आणि पेढे नकोत. :) जाता जाता, तुमची यत्ता कंची? ;)

In reply to by धन्या

मी पहिल्यांदाच असले काहीतरी लिहीत आहे :) सहज गमतीत सुचले म्हणुन लिहीले आहे.. लोभ असावा

सर्वांनी छान लिहिले आहे.. आमचे परम मित्र वल्ली आनि ५० फक्त यांना आता कवीवर्य या उपाधीनेच संबोधण्यात यावे असे मनोमन वाटते आहे. बाकी धना, अरे तो फोटो काय दिसला नाय राव त्यामुळे पास

In reply to by गणेशा

मालक, तुमच्या हापिसातल्या नेटवर्कवाल्याना पकडून पोकळ बांबूचे फटके दया. हा फोटो पिकासावर होस्ट केलेला नाही. फोटोबकेट म्हणून पोर्टल आहे.

In reply to by धन्या

हा फोटो पिकासावर होस्ट केलेला नाही. फोटोबकेट म्हणून पोर्टल आहे. म्हणुनच मला सुद्धा दिसत नाही... :( बहुतेक कंपन्यात फोटो अपलोडिंग साईट ब्यॅन केलेल्या असतात्,पण गुगल मात्र चालु असते... पिकासा बॅन असले तरी त्यावरचे फोटु मात्र दिसतात बाँ.

In reply to by मदनबाण

तुला फोटो दिसत नाही म्हणजे कम्माल आहे असो, अवांतर : तुला haifa weh(e)be कधी पासून आवडायला लागली म्हणजे तीची स्टाईल मारु डुप्लीकेट राखी सावंत पण तुझी चॉईस आहे तर ...(येथे कपाळावरील घाम पुसण्याची स्माईली समजावी)

In reply to by वाहीदा

तुला फोटो दिसत नाही म्हणजे कम्माल आहे त्यात कमाल ती काय ? अजुन माझ्याकडे मि.इंडियाचा चष्मा आला नाहीये ! त्यामुळे बॅन असलेल्या साईटी दिसणे अंमळ कठीणच आहे हो... ;) तुला haifa weh(e)be कधी पासून आवडायला लागली म्हणजे तीची स्टाईल मारु डुप्लीकेट राखी सावंत पण तुझी चॉईस आहे तर ...(येथे कपाळावरील घाम पुसण्याची स्माईली समजावी) मला हायफा वाहेबी आवडण्या पेक्षा तीचे गाणे आवडले, तिचे मी पाहिलेले पहिले गाणे होते:--- Mosh Adra Astana त्यानंतर Salem Halak" (Give Yourself Up) हे आवडले होते.त्यात आता लिंक मधे अडकवलेले गाण्याची भर पडली... बाकी तिची तुलना राखी सावंतशी ? छ्या ! काहीतरीच काय ! ;) बाकी yalla habibi हे गाणं ऐक जरा... ;) आणि चॉईसचं म्हणशील तर सध्या पुर्वी भावे (poorvi bhave). ;)

In reply to by गणेशा

मित्रा, तु एक काम कर...जेव्हा Accenture मध्ये जॉइन होशील ना तेव्हाच मिसळपाव उघड... कदाचित तिथं तरी तुला फटु दिसतील....

कुछ जम्या नही. मजा आली नाही. धनाजीरावांकडून अपेक्षा जास्त आहेत. फोटोतरी जरा आकर्षक लावायचा ना राव.

किती पाहू वाट समुद्राच्या तटी कधी होई भेटी, तुझी माझी.||१|| मनी येई शंका जरी असे लघु आवडे का राघू, दुसर्‍यांचा.||२|| वर निळे स्काय, खालती वॉटर आवडे पिटर, का गं तुला.||३|| दृष्टी झाली क्षीण, जग हे कनिंग डोळा येई भिंग, आता माझ्या.||४||

In reply to by रेवती

कविता जमली बर्का! पण बक्षीस खरंच मिळणार आहे का ते आधी विचार! नाहीतर तुझे कष्ट फुकटच!

In reply to by रेवती

कविता झक्कास जमलीये बरं का रेवतीआज्जी. बाकी तुम्ही कविता मोजत आहात हे वाचून अंमळ मौज वाटली. :) असो. दहा कविता झाल्या की त्यातली एक चांगली कविता निवडून नक्की बक्षिस देण्यात येईल. अर्थात ते पुस्तक "बाकी शुन्य" नसेल. पुस्तक आउट ऑफ प्रिंट आहे तर देणार कुठून. ;) एक कल्पना सुचलीये. विजेत्यालाच पुस्तक कुठलं हवं हे विचारलं तर? :)

In reply to by धन्या

विजेत्यालाच पुस्तक कुठलं हवं हे विचारलं तर? >> आणि विजेत्यानं शांताराम किंवा चित्रमय स्वगत मागितलं तर?

In reply to by चेतन सुभाष गुगळे

आणि विजेत्यानं शांताराम किंवा चित्रमय स्वगत मागितलं तर?
हाच तर तुमच्यातला आणि आमच्यातला फरक आहे. तसं नसतं तर तुम्ही हा प्रश्न विचारलाच नसता. वयाची पहिली तेविस वर्ष पैसा कधी दिसलाच नाही. आणि चोविसाव्या वर्षापासून इतका पैसा मिळू लागला की आमच्या दृष्टीने तो पैशाचा पाउस आहे. गरज पडल्यास आणि शक्य असल्यास आम्ही अ‍ॅमेझॉन डॉट कॉमकडून इंटरनॅशनल शिपिंग करुन पुस्तक मागवू. त्याची काळजी तुम्हास नसावी. :)

In reply to by धन्या

तुम्ही जर मला पैला लंबर दिलात तर मी अगदी स्वस्तातलं पुस्तक मागीन याची खात्री बाळगा. उदा. ११ विविध कोशिंबीरी, खोबर्‍याच्या चटणीचे ५ प्रकार इ.

In reply to by रेवती

हाहा... तशीही तुमची कविता या स्पर्धेत विजेतेपदाची प्रमुख दावेदार आहेच की. ;)

फक्त दहा कविता व्हायला पाहिजेत या उदात्त हेतूने ही कविता पाडलेली आहे. "जिथे सागरा" या गाण्याबरोबर साम्य आढळल्यास मी जबाबदार नाही. जिथे वाळूला सागर मिळतो, तिथे तुझी मी वाट पहातो|| गोठ्यात सरकी पेंड खाऊन लोकांच्या शेतात रोज चरून रस्त्यात धावून, माती उडवून मी, दावे गळ्यातील फेकून येतो || बघुनी नभीची चंद्रकोर ती कुत्र्याना भुंकाया येते स्फूर्ती कुत्र्यांना पळवूनी, बैलांशी झुंजूनी गायींच्या कळपाला साद घालतो||

In reply to by पैसा

बघुनी नभीची चंद्रकोर ती कुत्र्याना भुंकाया येते स्फूर्ती ख्या ख्या ख्या मूळ गाण्यात बघुनी नभीची चंद्रकोर ती हे किती सोज्वळ आवाजात म्हटलय, त्यानंतर कुत्रांचा सदर्भ म्हणजे......

In reply to by रेवती

खरंच... पैसातैंची कल्पना भारीच आहे... रेवती आज्जी... दहा कविता झाल्या की सांगा बरं :)

In reply to by धन्या

सांगते सांगते. जिंकायचं म्हटलं की एवढे कष्ट आलेच ना! काहीही झालं तरी 'फोडणी करण्याचे साडेतीन प्रकार' हे पाकृ पुस्तक हवंच आहे मला.

मी कधीच कविता केल्या नाहीत, पण धनाजीरावांचा धागा पाहुन राहवले नाही. जमली आहे का ते सांगा. तुम्हीहि बदल सुचवु शकता!! चाल- हम्मा हम्मा (बॉम्बे सिनेमा) हम्मा हम्मा तु दिसलास मला समुद्र किनाऱ्यावरी, माझी झोप उडाली अन गळ्यातली घंटा माझी किण किण वाजू लागली ||धृ|| हम्मा हम्मा हम्मा हम्मा हम्मा हम्मा हम्मा हम्मा हम्मा हम्मा हम्मा हम्मा हि पहिली भेट आपली, तुझ्यावर जीव जडला अरे प्रियतमा मी तुझ्यावर, माझा जीव उधळला हम्मा हम्मा हम्मा हम्मा हम्मा हे हम्मा हम्मा हम्मा हम्मा हम्मा काळीभोर तगडी जवानी, तुला मिळाली सखया तुझे रुपडे हे बघून मी तर घायाळ झाले सखया शेपटी झोकदार तुझी शिंगे धारदार तुझी हरपून गेले मी तुझ्यावर राया हम्मा हम्मा हम्मा हम्मा हम्मा हे हम्मा हम्मा हम्मा हम्मा हम्मा तु दिसलास मला समुद्र किनाऱ्यावरी, माझी झोप उडाली अन गळ्यातली घंटा माझी किण किण वाजू लागली हम्मा हम्मा हम्मा हम्मा हम्मा हे हम्मा हम्मा हम्मा हम्मा हम्मा शेखाडी गावचा नयनरम्य हा किनारा तुला पाहून मी विसरले दिलबरा मालक आणाया गेलाय चारा दावण सोडून मी आलेय भराभरा म्हणून सोडून तुझा हा रागीट तोरा चल आपण होऊन जाऊ नौ दो ग्यारा हम्मा हम्मा हम्मा हम्मा हम्मा हे हम्मा हम्मा हम्मा हम्मा हम्मा तु दिसलास मला समुद्र किनाऱ्यावरी, माझी झोप उडाली अन गळ्यातली घंटा माझी किण किण वाजू लागली हम्मा हम्मा हम्मा हम्मा हम्मा हम्मा हम्मा हम्मा हम्मा हम्मा हम्मा हम्मा (नवखा कवी) मोहन.

In reply to by मोहनराव

जबरा कविता...
मालक आणाया गेलाय चारा दावण सोडून मी आलेय भराभरा म्हणून सोडून तुझा हा रागीट तोरा चल आपण होऊन जाऊ नौ दो ग्यारा
लय भारी मोहनराव !!!