✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

फ्रॅक्चरवरचे धनगराचे आयुर्वेदिक औषध :

J
JAGOMOHANPYARE यांनी
Sat, 11/05/2011 - 14:49  ·  लेख
लेख
फ्रॅक्चरवरचे धनगराचे आयुर्वेदिक औषध : यावर्षीच्या २०११ मधील एप्रिलमधील गुढी पाडव्याला आमचा 'पाडवा' झाला. म्हणजे मला अ‍ॅक्सिडेंट झाला आणि पाय मोडला. :) डाव्या पायातील पटेला ( गुढग्याची वाटी) , टिबिया, फिब्युला, ( लेग बोन्स) आणि तळपायामधील एक लहान हाड एवढे सगळे मोडले. त्यानंतर ऑपरेशन झाले. प्लेट, मोळे, तारा.. काय काय बसवले. मग हळूहळू वॉकर, काठी घेऊन आणि आता तसेच चालायला लागलो. गेल्या आठवड्यात सहज नरसोबावाडीला गेलो. तिथे अन्नछत्रात प्रसादाला जात होतो. स्टँडवरुन उतरून अन्नछत्राकडे जात होतो. मी थोडा लंगडत जात होतो. अचानक एक माणूस माझ्याजवळ आला आणि म्हणाला, लंगडताय का? पाय फ्रॅक्चर झाला आहे का? मी होय म्हणताच त्याने सांगितले त्यांच्या भावाला फृएक्चर झाले होते, तेंव्हा एका धनगराने एक औषध लावायला सांगितले होते. तुमचा नंबर द्या आम्ही तुम्हाला त्याची माहिती सांगू. दुसर्‍या दिवशी त्याच्या बहिणीचा फोन आला. त्यानी औषधाची कृती सांगितली. ती खालीलप्रमाणे.. साहित्य : २ नारळाचे पाणी ११ गुलाबाची फुले १०० ग्रॅम बदाम ५० ग्रॅम वेलदोडा घेऊन सोलून बिया घेणे. २ चमचे हळद. २ मुठी तुळशीचा पाला सव्वा किलो खोबरेल तेल प्रथम मिक्सरमधून वेलदोडा आणि बदाम बरीक पूड करावी. मग त्याच्यात गुलाबाच्या पाकळ्या, तुळशीचा पाला चुरुन घालून पुन्हा बारीक करावे. त्यात २ नारळाचे पाणी घालून पुन्हा मिक्सर फिरवून लगदा करुन घेणे. नंतर तेलामध्ये हा लगदा आणि हळद घालून ढवळावे. आणि १५ मिनिटे उकळू द्यावे. मिश्रण ढवळत रहावे आणि मोठ्या पातेल्यात कृती करावी. कारण हळद घातली की उतू जाते. नंतर गार करुन फडक्याने गाळून घ्यावे. आयुर्वेदिक भांडारातून खालील औषधे आणावीत आणि त्यात मिसळावीत. १. जंगल पपिता तेल ५० मिली २. रत्नज्योत तेल ५० मिली ३. वातचिंतामणी रस ५ ग्रॅम ४. योगेंद्र रस ५ ग्रॅम ५. कुमार कल्याण रस ५ ग्रॅम ६. पंचरत्न अनमोल रस ५ ग्रॅम ७. सुवर्ण भस्म ५ ग्रॅम ८. हिरा भस्म ५ ग्रॅम ( शेवटची दोन औषधे प्रचंड महाग आहेत. माझ्या सर्जरीलाही इतका खर्च आला नव्हता ! :) ) मिश्रण बाटली हलवून ढवळावे. एक दिवस तसेच ठेवावे. त्यानंतर दररोज रात्री फ्रॅक्चर झालेल्या हाताला/ पायाला चोळून लावून मुरवावे. यामुळे ... हाड जुळायला मदत होते. स्नायुंची पुष्टी होते. दुखावलेल्या शिरा पुन्हा कार्यक्षम होतात. औषध तीन महिने वापरावे. हे औषध फक्त इजेमुळे झालेल्या (अपघाती) फ्रॅक्चरला वापरावे. फृएक्चर अन्य कारणाने, उदा कॅन्सर, टीबी वगैरे असेल किंवा त्वचेवर ओली जखम असेल तर हे औषध वापरू नये. औषध फक्त बाह्योपचारासाठी आहे. पिऊ नये. :) -------------------------------
या लेखातील मते लेखकाची स्वतःची आहेत. मिसळपाव संस्थळाची अधिकृत मते नाहीत. लेखात दिलेल्या उपायांबद्दल काही शास्त्रशुद्ध आधार असल्यास त्याचा लेखकाने उल्लेख केलेला नाही. तसेच औषधाचा परिणाम काय झाला याबद्दल काही निरीक्षण्/निष्कर्ष यांचाही उल्लेख केलेला नाही. कोणा वाचकाला या लेखातील उपचार करायचे असतील तर आपल्या जबाबदारीवर करावेत. -संपादक मंडळ
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
औषधोपचार
लेखनप्रकार (Writing Type)
मत
शिफारस
माहिती

प्रतिक्रिया द्या
35566 वाचन

💬 प्रतिसाद (64)

प्रतिक्रिया

आता बघा

प्रास
Wed, 11/09/2011 - 12:38 नवीन
कसं आहे गविभाऊ, कोणताही शास्त्रीय संदर्भ नसलेलं औषध जामोप्यांनी बनवलेलं तर आहेच. त्यासाठी पैसेही खर्च केलेत. मग युयुत्सुरावांच्या
यस्य कस्य तरोर्मूलं येन केनापि मर्दितम् | यस्मै कस्मै प्रदातव्यं यद्वा तद्वा भविष्यति || - कोणत्यातरी झाडाची मुळे घ्यावीत, ती कशाने तरी ठेचावित, कुणालाही द्यावित, काहीतरी नक्की होईल.
या स्वाक्षरीनुसार हवा तो परिणाम होणार नाही पण हात-पाय तेलकट होणे, आपण आपले पैसे खर्चून बनवलेलं औषध आपल्याच अंगाला लागल्याचे समाधान मिळणे इ. इ. काहीतरी परिणाम होतीलच की! त्याचहेतुने सदर वाक्ये आलेली आहेत. सोप्या भाषेत, बनवलेलंच आहे औषध तर निश्चिंत मनाने रगडा शरीराला, येवढंच. :-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

- कोणत्यातरी झाडाची मुळे

गवि
Wed, 11/09/2011 - 12:48 नवीन
- कोणत्यातरी झाडाची मुळे घ्यावीत, ती कशाने तरी ठेचावित, कुणालाही द्यावित, काहीतरी नक्की होईल. यात पहिला कृत्यक्रम पाळला तर शेवटी काहीतरी नक्की होईल पेक्षा काहीच्याकाही होईल असं म्हणावंसं वाटतं.. उदा रामेठा झाडाचे मूळ ठेचले आणि कुणाला दिले तर काही होणार नाही पण त्याने ते कुठेसे चोळले तर सुजण्याची शक्यता जास्त.. म्हणजे "काहीतरी" तरी झाले असंच ना? शिवाय यापैकी काहीही घेतले / ठेचले नाही आणि बाजेवर शांत बसून राहिले तरी श्रीहरीकृपेने तसेही "काहीतरी" नक्की होईलच.. "काहीतरी" व्हावे हाच एवढाच उद्देश असेल तरसाठी म्हणतोय..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रास

म्हणूनच जामोप्यांनी केलेल्या

प्रास
Wed, 11/09/2011 - 12:52 नवीन
म्हणूनच जामोप्यांनी केलेल्या कृतिसंदर्भात काहीतरी म्हणण्याऐवजी
हात-पाय तेलकट होणे, आपण आपले पैसे खर्चून बनवलेलं औषध आपल्याच अंगाला लागल्याचे समाधान मिळणे इ. इ. काहीतरी परिणाम
अशी स्पेसिफिक परिणामांची जंत्री देण्याचा प्रयत्न केलाय. :-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

समजलेय हो.. आमचा असाच

गवि
Wed, 11/09/2011 - 13:00 नवीन
समजलेय हो.. :) आमचा असाच टाईम्पास चाललाय.. दादरला मामा काणे किंवा सुजाता कट्टा कधी?? बोला..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रास

केव्हाही बोला, दादरात आम्ही

प्रास
Wed, 11/09/2011 - 13:16 नवीन
केव्हाही बोला, दादरात आम्ही एव्हररेडी...... :-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

नेकी और पुछ पुछ ?? दादरात

विश्वनाथ मेहेंदळे
Wed, 11/09/2011 - 18:39 नवीन
नेकी और पुछ पुछ ?? दादरात कधीपण चालतंय बघा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रास

आज प्रतिसाद दिला नसतात तर मी

विश्वनाथ मेहेंदळे
Wed, 11/09/2011 - 12:39 नवीन
आज प्रतिसाद दिला नसतात तर मी फोनच करणार होतो :-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रास

मस्त

परिकथेतील राजकुमार
Sat, 11/12/2011 - 11:54 नवीन
Image removed. प्रासभौंचा संतुलीत प्रतिसाद आवडेश.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रास

औषधे घ्यायची वेळ येऊ म्हणून

आयुर्हित
Tue, 01/07/2014 - 15:55 नवीन
अशी महाग औषधे घ्यायची वेळ येऊ म्हणून दररोजच्या जेवणात भरपूर कॅल्शीयम पोटात जाईल याची काळजी आधीच घ्यावी. आपला लाडका: आयुर्हीत
  • Log in or register to post comments

जनहितार्थ पायासुप ची रेशिपी !

आयुर्हित
Wed, 01/08/2014 - 16:20 नवीन
श्रीमान कपिलमुनीच्या शोधसहकार्याने पाया सूप कळावे, लोभ असावा. आपला लाडका: आयुर्हीत
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आयुर्हित

आयच्या गावात.....आणी बाराच्या भावात.....

बाबा पाटील
Tue, 01/07/2014 - 18:58 नवीन
सांगणारा एकपट वाय झेड आणी ते एकुन तशी कृती करणारा दहापट वाय झेड..... यापेक्षा दुसरे शब्दच नाहीत माझ्याकडे.
  • Log in or register to post comments

BBM

सुबोध खरे
Wed, 01/08/2014 - 09:51 नवीन
BBM बेवकूफ बनाने का मशीन बढीया है *ऑ़़*
  • Log in or register to post comments

"सांधरुख" नावाचे एक झाड आहे

भ ट क्या खे ड वा ला
Wed, 01/08/2014 - 11:17 नवीन
या झाडाच्या साली ठेचून त्याचा लगदा मोडलेल्या हाडावर बांधत असत. जेव्हा आधुनिक उपचार उपलब्ध नव्हते तेव्हा हे सर्व उपाय करून धड धाकट राहणाऱ्या पूर्वजांना सलाम पण आजच्या जगात असे काही करणे म्हणजे ....... जाऊदे आयुर्वेदाला उगाच बदनाम करण्याचा प्रकार आहे हा कोणत्याही पथीचा आग्रह /दुराग्रह न बाळगता आरोग्यपूर्ण जीवन जगू इच्छिणारा
  • Log in or register to post comments

"सांधरुख" नावाचे एक झाड

आयुर्हित
Wed, 01/08/2014 - 13:36 नवीन
भटक्या खेडवालाजी, नमस्कार. अतिशय मोलाची माहिती पुरवली आपण. आयुर्वेदालाच काय/कुठल्याही चिकित्सा विज्ञानाला कोणी(मुर्खान्नी)उगाच बदनाम केले म्हणून मुळीच नाराज होऊ नका. तूम्हीच व्हा शिल्पकार आधुनिक आयुर्वेदाचे/चिकित्सा विज्ञानाचे.आम्ही सर्व मिपाकार आहोतच आपल्या बरोबर. काय मिपाकार हो, बरोबर ना! ०रुख पु. एक झाड . अस्थिभंगावर औषधी . याचें लाकूड चिरलें तरी पुन्हां सांधलें जातें. अव्वल प्रकारच्या झाडाला लवंगी सांधरुख म्हणतात. "सांधरुख ह्या झाडाची ची अधिक माहिती,फोटो पोस्ट करा. कसे व किती दिवस वापरले जाते हेही महत्त्वाचे. सालीचे sample किंवा झाडाचे रोप/बिया/कलम कुठे मिळेल ते हि सांगा. कोणा कोणाला याचा फायदा झाला त्याचे अनुभव हि धाग्यावर टाका. जास्तीत जास्त माहिती मिळाल्यास फार उपकार होतील आपले. उरलेली माहिती शोधून काढायला आपण सर्व मिपाकार आहोतच. आजच्या जगात काय काय केले जाते, आपणास ठाऊक नाही!!! भारतात जर्मन लोक येऊन "बिब्बा/भिलावा आणि बिब्बा/भिलावा_इंग्लिश पासून कर्करोगावर औषधं बनवतील व १००/-चा माल १० लाखाचा होइल, तेव्हाच आपली सुज्ञ व तज्ञ ते वापरायचा सल्ला देतील. "कोणत्याही पथीचा आग्रह /दुराग्रह न बाळगता आरोग्यपूर्ण जीवन जगू इच्छिणारा" हे वाक्य खूप काही सांगून जाते. १००% सहमत. कळावे, लोभ असावा आपला लाडका, आयुर्हीत
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भ ट क्या खे ड वा ला
  • «
  • ‹
  • 1
  • 2

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा