फ्रॅक्चरवरचे धनगराचे आयुर्वेदिक औषध :
यावर्षीच्या २०११ मधील एप्रिलमधील गुढी पाडव्याला आमचा 'पाडवा' झाला. म्हणजे मला अॅक्सिडेंट झाला आणि पाय मोडला. :) डाव्या पायातील पटेला ( गुढग्याची वाटी) , टिबिया, फिब्युला, ( लेग बोन्स) आणि तळपायामधील एक लहान हाड एवढे सगळे मोडले. त्यानंतर ऑपरेशन झाले. प्लेट, मोळे, तारा.. काय काय बसवले. मग हळूहळू वॉकर, काठी घेऊन आणि आता तसेच चालायला लागलो.
गेल्या आठवड्यात सहज नरसोबावाडीला गेलो. तिथे अन्नछत्रात प्रसादाला जात होतो. स्टँडवरुन उतरून अन्नछत्राकडे जात होतो. मी थोडा लंगडत जात होतो. अचानक एक माणूस माझ्याजवळ आला आणि म्हणाला, लंगडताय का? पाय फ्रॅक्चर झाला आहे का? मी होय म्हणताच त्याने सांगितले त्यांच्या भावाला फृएक्चर झाले होते, तेंव्हा एका धनगराने एक औषध लावायला सांगितले होते. तुमचा नंबर द्या आम्ही तुम्हाला त्याची माहिती सांगू.
दुसर्या दिवशी त्याच्या बहिणीचा फोन आला. त्यानी औषधाची कृती सांगितली. ती खालीलप्रमाणे..
साहित्य :
२ नारळाचे पाणी
११ गुलाबाची फुले
१०० ग्रॅम बदाम
५० ग्रॅम वेलदोडा घेऊन सोलून बिया घेणे.
२ चमचे हळद.
२ मुठी तुळशीचा पाला
सव्वा किलो खोबरेल तेल
प्रथम मिक्सरमधून वेलदोडा आणि बदाम बरीक पूड करावी. मग त्याच्यात गुलाबाच्या पाकळ्या, तुळशीचा पाला चुरुन घालून पुन्हा बारीक करावे. त्यात २ नारळाचे पाणी घालून पुन्हा मिक्सर फिरवून लगदा करुन घेणे.
नंतर तेलामध्ये हा लगदा आणि हळद घालून ढवळावे. आणि १५ मिनिटे उकळू द्यावे. मिश्रण ढवळत रहावे आणि मोठ्या पातेल्यात कृती करावी. कारण हळद घातली की उतू जाते.
नंतर गार करुन फडक्याने गाळून घ्यावे.
आयुर्वेदिक भांडारातून खालील औषधे आणावीत आणि त्यात मिसळावीत.
१. जंगल पपिता तेल ५० मिली
२. रत्नज्योत तेल ५० मिली
३. वातचिंतामणी रस ५ ग्रॅम
४. योगेंद्र रस ५ ग्रॅम
५. कुमार कल्याण रस ५ ग्रॅम
६. पंचरत्न अनमोल रस ५ ग्रॅम
७. सुवर्ण भस्म ५ ग्रॅम
८. हिरा भस्म ५ ग्रॅम
( शेवटची दोन औषधे प्रचंड महाग आहेत. माझ्या सर्जरीलाही इतका खर्च आला नव्हता ! :) )
मिश्रण बाटली हलवून ढवळावे. एक दिवस तसेच ठेवावे. त्यानंतर दररोज रात्री फ्रॅक्चर झालेल्या हाताला/ पायाला चोळून लावून मुरवावे. यामुळे ...
हाड जुळायला मदत होते.
स्नायुंची पुष्टी होते.
दुखावलेल्या शिरा पुन्हा कार्यक्षम होतात.
औषध तीन महिने वापरावे.
हे औषध फक्त इजेमुळे झालेल्या (अपघाती) फ्रॅक्चरला वापरावे. फृएक्चर अन्य कारणाने, उदा कॅन्सर, टीबी वगैरे असेल किंवा त्वचेवर ओली जखम असेल तर हे औषध वापरू नये.
औषध फक्त बाह्योपचारासाठी आहे. पिऊ नये. :)
-------------------------------
या लेखातील मते लेखकाची स्वतःची आहेत. मिसळपाव संस्थळाची अधिकृत मते नाहीत. लेखात दिलेल्या उपायांबद्दल काही शास्त्रशुद्ध आधार असल्यास त्याचा लेखकाने उल्लेख केलेला नाही. तसेच औषधाचा परिणाम काय झाला याबद्दल काही निरीक्षण्/निष्कर्ष यांचाही उल्लेख केलेला नाही. कोणा वाचकाला या लेखातील उपचार करायचे असतील तर आपल्या जबाबदारीवर करावेत. -संपादक मंडळ
वाचने
35697
प्रतिक्रिया
64
मिसळपाव
प्रतिक्रिया
७. सुवर्ण भस्म ५ ग्रॅम ८.
ओक्के
जंगल पपिता ठीक .. पण.... २.
धनगर कशाला असा उद्योग करतो.
In reply to जंगल पपिता ठीक .. पण.... २. by गवि
धनगर फार तर मेंढ्या बकर्या
In reply to धनगर कशाला असा उद्योग करतो. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
सहमत!
In reply to जंगल पपिता ठीक .. पण.... २. by गवि
आयुर्वेदात गुग्गुळ हे अतिशय
ह्या लेखातील औषधाची सत्यता
वरील लेखातील औषधांपैकी
त्याने हृदयाचे पंपी ग
In reply to वरील लेखातील औषधांपैकी by युयुत्सु
धन्या,
In reply to त्याने हृदयाचे पंपी ग by धन्या
धनगराना हिर्याचे व सोन्याचे
कदाचित तो धनगर समाजातून शिकून
In reply to धनगराना हिर्याचे व सोन्याचे by वेताळ
एवढा खर्च ह्या अस्ल्या औषधावर
अरे जामोप्या तू हे औषध घेतले
मी तयार केले आहे. औषध. शेवाळी
एकूणच तेलप्रकरण किती किंमतीला
In reply to मी तयार केले आहे. औषध. शेवाळी by JAGOMOHANPYARE
या लेखातील मते लेखकाची
औषध (?)
हे पहा माझा बिझनेस चालु
In reply to औषध (?) by राजेश घासकडवी
गुर्जी, तुमचा आक्षेप केवळ याच
In reply to औषध (?) by राजेश घासकडवी
आक्षेप
In reply to गुर्जी, तुमचा आक्षेप केवळ याच by विश्वनाथ मेहेंदळे
एखाद्या पदार्थाचं भस्म म्हणजे
In reply to आक्षेप by राजेश घासकडवी
त्या दुकानदाराला हे ज्ञान
In reply to एखाद्या पदार्थाचं भस्म म्हणजे by यकु
>>त्या दुकानदाराला हे ज्ञान
In reply to त्या दुकानदाराला हे ज्ञान by शिल्पा ब
सरकारमान्य!
In reply to >>त्या दुकानदाराला हे ज्ञान by विश्वनाथ मेहेंदळे
>>मग? जोतिषात सुद्धा
In reply to सरकारमान्य! by Nile
हाहाहा..
In reply to >>मग? जोतिषात सुद्धा by विश्वनाथ मेहेंदळे
दुरुस्ती.
In reply to हाहाहा.. by Nile
नेमकं कोणतं पुस्तक वाचल्याने
In reply to दुरुस्ती. by Nile
मी स्वत: स्वर्ण भस्म अन हिरा
या "औषधावर" सरसकट टीका करण्या
प्राससाहेब.. कुठे आहात...
In reply to या "औषधावर" सरसकट टीका करण्या by युयुत्सु
गुढी पाडव्याला आमचा 'पाडवा'
आरारा!
हात्तेच्या!
In reply to आरारा! by आनंदी गोपाळ
जागो
>>>प्यारे तुम्ही कधी जागे
In reply to जागो by विनायक प्रभू
पुराने जमानेमे ऋषीमुनी
सिक्सर
In reply to पुराने जमानेमे ऋषीमुनी by रेवती
बारकु...
In reply to सिक्सर by इंटरनेटस्नेही
हाड्सांधिचा पाला मिळतो तो
हाड्सांधिचा पाला
In reply to हाड्सांधिचा पाला मिळतो तो by स्पंदना
माझं मत -
अवांतरः गुगलचा उगम आयुर्वेदात
In reply to माझं मत - by प्रास
अभ्यासपूर्ण आणि मुद्देसूद
In reply to माझं मत - by प्रास
खरंय, हा एक मार्ग आहे पण तो
In reply to माझं मत - by प्रास
प्रासभौ, या प्रतिसादाची
In reply to माझं मत - by प्रास
५० फक्त
In reply to प्रासभौ, या प्रतिसादाची by ५० फक्त
हे काय पटलं नाही..
In reply to माझं मत - by प्रास
आता बघा
In reply to हे काय पटलं नाही.. by गवि
- कोणत्यातरी झाडाची मुळे
In reply to आता बघा by प्रास
म्हणूनच जामोप्यांनी केलेल्या
In reply to - कोणत्यातरी झाडाची मुळे by गवि
समजलेय हो.. आमचा असाच
In reply to म्हणूनच जामोप्यांनी केलेल्या by प्रास
केव्हाही बोला, दादरात आम्ही
In reply to समजलेय हो.. आमचा असाच by गवि
नेकी और पुछ पुछ ?? दादरात
In reply to केव्हाही बोला, दादरात आम्ही by प्रास
आज प्रतिसाद दिला नसतात तर मी
In reply to माझं मत - by प्रास
मस्त
In reply to माझं मत - by प्रास
औषधे घ्यायची वेळ येऊ म्हणून
जनहितार्थ पायासुप ची रेशिपी !
In reply to औषधे घ्यायची वेळ येऊ म्हणून by आयुर्हित
आयच्या गावात.....आणी बाराच्या भावात.....
BBM
"सांधरुख" नावाचे एक झाड आहे
"सांधरुख" नावाचे एक झाड
In reply to "सांधरुख" नावाचे एक झाड आहे by भ ट क्या खे ड वा ला