ऋणनिर्देशः तात्या अभ्यंकर,विकास यांच्यातील संकेतस्थळाचे उपयोग याविषयीच्या चर्चेनंतर आणि तेथे दिलेल्या माझ्या प्रतिसादातील प्रस्तावित दोन योजनांपैकी अपत्य दत्तक योजनेचा (अति)कच्चा आरंभिक आराखडा येथे टंकित करत आहे. अशा विधायक कार्यासंबंधीची मूळ कल्पना पुढे आणल्याबदल तात्या आणि विकासरावांचे मनःपूर्वक आभार व हार्दिक अभिनंदन. तसेच या योजनेत सहभागी होण्याबद्दल स्वारस्य दाखवल्याबद्दल आणि सतत पाठपुरावा करून हा मुद्दा आज येथे टंकित स्वरूपात आणल्याबद्दल इनोबा व ऋषिकेश यांचे अनेक आभार.
अपत्य दत्तक योजना
योजनेचे उद्दिष्ट -
- सध्या अनाथालयांमध्ये वाढत असलेल्या अधिकधिक मुलांना पालक मिळवून देणे,त्यायोगे त्यांची सामाजिक व शैक्षणिक वाढ,भावनिक स्थिरता आणि कौटुंबिक अनुभव,त्यांचे न्यूनगंडनिवारण
- येनकेनप्रकारेण स्वापत्यसुखापासून वंचित राहिलेल्या,कुटुंब नियोजनासाठी तयारी करीत असलेल्या किंवा उत्सुक असलेल्या दांपत्यांस अपत्यसुखाचा आजीवन अनुभव मिळवून देणे
- यापुढील मिपा कट्ट्याच्या वेळी अपत्य दत्तक देणार्या सामाजिक संस्था,स्थानिक अनाथालये यांचे संचालक,संबंधित पदाधिकारी किंवा कार्यकर्ते यांचे आटोपशीर माहितीपर व्याख्यान कट्ट्याचा अधिकृत कार्यक्रम म्हणून समाविष्ट केले जावे.
- अशा व्याख्यानात दत्तक दिलेघेतले जाण्यामागची सामाजिक गरज,दत्तक प्रक्रिया,आर्थिक बाजू,कायदेशीर बाबी यांबाबत समुपदेशन व्हावे.
- ही माहिती संग्रहित स्वरूपात रचून मिपावर संदर्भासाठी प्रसिद्ध केली जावी. मिपाच्या सदस्यांनी या माहितीचा मौखिक प्रसार करावा.
- विवाहोत्सुक उपवर तरुण-तरुणी तसेच नवविवाहित जोडपी आणि मूल दत्तक घेण्यास उत्सुक असणार्या जोडप्यांस या योजनेबद्दल माहिती द्यावी.संग्रहित माहिती त्यांच्यापर्यंत पोचेल,हे पहावे.
- स्वतः मूल दत्तक घेतलेल्या दांपत्यास भेटून त्यांचे मूल दत्तक घेतानाचे अनुभव,मुलाचे पालनपोषण - खाणेपिणे,दैनंदिन व्यवहार,शिक्षण,मौजमजा इ. - करतानाचे अनुभव म्हणजे आलेल्या अडचणी,त्यांच्या निवारणासाठी त्यांनी अनुसरलेले मार्ग इ. बाबत मुलाखतवजा कार्यक्रम कट्ट्याच्या वेळी करता येईल.त्यातून मिळालेल्या माहितीचा प्रसार वर सांगितल्याप्रमाणे करता येईल.
- जमेल तितक्या माहितीचा संग्रह आणि पुरवठा
- संबंधित संस्था व पदाधिकारी,कार्यकर्ते यांचे संपर्क पत्ते पुरविणे;गरज पडल्यास त्यांच्याशी स्वतः थेट संपर्क साधणे
- जी दांपत्ये दत्तकप्रक्रियेतून गेली आहेत,त्यांना त्यांचे अनुभव सांगण्यासाठी व माहिती देण्यासाठी आमंत्रित करणे - त्यांचे संपर्क पत्ते पुरविणे
- शक्य ती/शक्य तेवढी आर्थिक मदत
- या (अति)कच्च्या मसुद्यात वेळोवेळी,गरज पडेल तशी सुधारणा आणि तो राबवण्याबद्दलच्या अधिकाधिक उपयुक्त कल्पना व त्यांची अंमलबजावणी
वाचने
12356
प्रतिक्रिया
19
मिसळपाव
प्रतिक्रिया
>>शक्य
पर्याय
In reply to >>शक्य by यशोधरा
- संबंधित संस्थेला आर्थिक मदत देणगी स्वरूपाने - आपल्या घरी वाढदिवस,सणवार अशा प्रसंगी किंवा मागेच कोणीतरी सुचविल्याप्रमाणे मिपाचा कट्टा भरेल तेव्हा इ.
- संबंधित संस्थेत वाढणार्या मुलाचा शाळेच्या फीचा,वह्यापुस्तकांचा किंवा कपड्याचा सगळा किंवा काही खर्च वर्षभरासाठी उचलणे
- शक्य असेल तेथे/तेव्हा अशा संस्थेस प्रत्यक्ष भेट देऊन,तेथील कार्याची पडताळणी करून संस्थेचे सभासदत्त्व घेणे,नियमित देणगीदार होणे
- मूल दत्तक घेताना करावयाच्या सर्व संबंधित कायदेशीर सोपस्कारांचा खर्च दत्तक पालकांच्या बरोबरीने किंवा पूर्णपणे स्वतःहून उचलणे
(पर्यायी)बेसनलाडू यांव्यतिरिक्त तुम्हांला स्वतःला काही सुचत असेल,तर तेही करू शकता व येथे सुचवू शकता. (सूचक)बेसनलाडूआरंभिक आराखडा
फादर ऍग्नेल
In reply to आरंभिक आराखडा by इनोबा म्हणे
उत्तम
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी
आणखी एक संस्था
चांगली चर्चा/माहीती
उत्तम उपक्रम...
आभार!
अतिशय स्तुत्य उपक्रम हाती घेतल्याबद्दल प्रथम अभिनंदन!
सहमत आहे
In reply to अतिशय स्तुत्य उपक्रम हाती घेतल्याबद्दल प्रथम अभिनंदन! by चतुरंग
अगदी!
In reply to अतिशय स्तुत्य उपक्रम हाती घेतल्याबद्दल प्रथम अभिनंदन! by चतुरंग
खुलासा
In reply to अतिशय स्तुत्य उपक्रम हाती घेतल्याबद्दल प्रथम अभिनंदन! by चतुरंग
सहमत
In reply to अतिशय स्तुत्य उपक्रम हाती घेतल्याबद्दल प्रथम अभिनंदन! by चतुरंग
उत्तम प्रकल्प
+१
In reply to उत्तम प्रकल्प by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)
हेच म्हणते..
In reply to +१ by मुक्तसुनीत
+१
In reply to हेच म्हणते.. by प्राजु
आपले घर, पुणे