हातपंप
हातपंप
ह्या दुष्काळानं लई ताण दिला ग बया
मला हातपंपाचा आधार हाय ग बया ||धृ||
घरचा नळ नाय कामाचा
सार्वजनीक हाय नळ गर्दीचा
वाही रातंदिस पानकाळ्याचा
त्याला उन्हाळ्यात पानी काही येईना ग बया
मला हातपंपानं आधार दिला ग बया ||१||
खालीवर दांडा करावा बरं
थोडं कष्टांचं काम हाय सारं
पानी येतंयं हापसून न्यारं
बाकी ठिकाणी माझी घागर रिकामी र्हाती ग बया
मला हातपंपानं पानी दिलं ग बया ||२||
सार्या बायांनी याची चव घेतली
एकजात सार्यांनी पसंती दिली
हंडेगुंडेकळशांची रांग मोठी लागली
त्यांनी हातपंपाचा ताबा घेतला ग बया
मला हातपंपानं पानी दिलं ग बया ||३||
- पाषाणभेद
०७/११/२०११
लेखनविषय:
याद्या
3405
प्रतिक्रिया
19
मिसळपाव
छान कविता
हाण्ण.....
_/\_
औंदा नारायनगावातल्या मौसमातली
In reply to _/\_ by धमाल मुलगा
काय ओ शाहिर ... तुम्ही तर
हातपंप -
वावा!
सार्या बायांनी याची चव
पाभे.... क ड क
_/\_
छान
सफोरावांनी बरच पाणी हापसुन
धम्माल! भारीच रंग चढलाय!
लै भारी!!
लय भारी !!!
पाभे, लई भारी!!
शाहीर कवन चालू ठेवा.
हा हा हा!
In reply to शाहीर कवन चालू ठेवा. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
एकदम भन्नाट .. घरचा नळ नाय