Skip to main content

हातपंप

हातपंप

Published on 07/11/2011 - 18:49 प्रकाशित मुखपृष्ठ
हातपंप
ह्या दुष्काळानं लई ताण दिला ग बया मला हातपंपाचा आधार हाय ग बया ||धृ|| घरचा नळ नाय कामाचा सार्वजनीक हाय नळ गर्दीचा वाही रातंदिस पानकाळ्याचा त्याला उन्हाळ्यात पानी काही येईना ग बया मला हातपंपानं आधार दिला ग बया ||१|| खालीवर दांडा करावा बरं थोडं कष्टांचं काम हाय सारं पानी येतंयं हापसून न्यारं बाकी ठिकाणी माझी घागर रिकामी र्‍हाती ग बया मला हातपंपानं पानी दिलं ग बया ||२|| सार्‍या बायांनी याची चव घेतली एकजात सार्‍यांनी पसंती दिली हंडेगुंडेकळशांची रांग मोठी लागली त्यांनी हातपंपाचा ताबा घेतला ग बया मला हातपंपानं पानी दिलं ग बया ||३|| - पाषाणभेद ०७/११/२०११

याद्या 3405
प्रतिक्रिया 19

हातपंपाचे महत्व पटवून देणारी कविता. दुष्काळग्रस्त भागांमधे गृहिणींना ह्याचाच आधार असतो. सगळे नळ कोरडे झाल्यावर काय बरे करावे ह्या मातांनी! फक्त सहकाराचे महत्व देखील विशद करावयास हवे होते असे वाटते. पहिलीने पंप मारावा व दुसरीने आपली घागर भरावी, मग दुसरीने पहिलीला मदत करावी. खूपच आवडली बॉ -चंबा

शाहीऽऽर........ औंदा नारायनगावातल्या मौसमातली पयली सुपारी तुमास्नीच भेटनार बगा. :D

In reply to by धमाल मुलगा

औंदा नारायनगावातल्या मौसमातली पयली सुपारी तुमास्नीच भेटनार बगा.
हेच! धम्माल गीत! लै मजा आली हो इष्टोनबिरेकर! ;)

मी एकटीच निजले.. रात्रीच्या अंधारात.. नको तिथंच पडला अवचित माझा हात.. हाताखाली नांगा काढून, वैरिण ती बसली... ग बाई मला इश्काची इंगळी डसली! अग बाई मला.. इश्काची इंगळी डसली... वा! काय सुंदर रचना होती ती!! बाई ग.. बाई ग!!! --(हातपंपाने आनंदी झालेला) गोपाळ

सार्‍या बायांनी याची चव घेतली..... कहर. ;-) एकजात सार्‍यांनी पसंती दिली हंडेगुंडेकळशांची रांग मोठी लागली त्यांनी हातपंपाचा ताबा घेतला ग बया मला हातपंपानं पानी दिलं ग बया ||३||.... --^-- धन्य धन्य हो पाभे तुमच्या परतिभेची....आंम्ही मागे दिलेली उपाधी अगदी सार्थ करताय हो....भेदकपाषाण ;-)

फक्त सहकाराचे महत्व देखील विशद करावयास हवे होते असे वाटते.
आपल्या विनंती खातर..... मी हापसते लाव तुझी घागर, गंगे, सखे या गं जरा लौकर, नंतर तु पण मदत मला कर, आमा सार्‍याची तहान भागती ग बया, मला हातपंपानं पानी दिलं ग बया ||४||

च्यामारी, संस्कृती रक्षक कुठे र्‍हायले म्हनायचे? ;)

घरचा नळ नाय कामाचा सार्वजनीक हाय नळ गर्दीचा वाही रातंदिस पानकाळ्याचा त्याला उन्हाळ्यात पानी काही येईना ग बया मला हातपंपानं आधार दिला ग बया ||१|| शाहीर पहिल्या दोन ओळींचा अर्थ सरळ घेतलेलाच बरा नाय का ! :) -दिलीप बिरुटे

एकदम भन्नाट .. घरचा नळ नाय कामाचा सार्वजनीक हाय नळ गर्दीचा वाही रातंदिस पानकाळ्याचा त्याला उन्हाळ्यात पानी काही येईना ग बया मला हातपंपानं आधार दिला ग बया ||१|| मी संगीतकार असतो तर ....???