Skip to main content

मिसळ

लेखक गणा मास्तर यांनी मंगळवार, 15/07/2008 09:51 या दिवशी प्रकाशित केले.
ही मी पुणे नाशिक महामार्गावर मंचरजवळ कळंबगावी खाल्लेली मिसळ. चव अफाट होती.देव करो आणि मला परत लवकरात लवकर ही मिसळ खायला मिळो. misal

वाचने 3782
प्रतिक्रिया 5

प्रतिक्रिया

मंचर जवळच जुन्नर या गावी 'शिवाजी आश्रम' नावाचे एक उपाहार गृह आहे. तेथील मिसळ खाऊन पहा. केवळ अप्रतिम. शिवाय तेथेच मिळणारा बदामी पेढाही तितकाच अप्रतिम आहे. या पेढ्याला सुमारे सत्तर वर्षांची परंपरा आहे असे म्हणतात.

In reply to by अरुण वडुलेकर

मला हे ठिकाण माहीत आहे, फारच सुंदर मिसळ व पेढा! शिवनेरीच्या पायथ्याशी हे ठिकाण आहे... तात्या.

वरच्या चित्रातली मिसळपण मी शिवनेरीला मित्राबरोबर जातानाच खाल्ली होती. पुढच्यावेळी शिवाजी आश्रमची खाइन.पेढे म्हणाल तर याच भागात आळेफाटयाजवळ घारगाव नावाचे गांव आहे, तिथले बदामी पेढे अप्रतिम. या गावात पुणे नाशिक जाणार्या सगळ्या गाडया पेढ्यांसठी थांबतात.