Skip to main content

नटरंग

लेखक शिल्पा ब
Published on शनीवार, 05/11/2011
मराठी सिनेमात काय तो अभिनय, काय ती कथा, अन गाणी तर अहाहा!!! यापेक्षा जीव दिलेला बरा...पटकथा, नाविन्य वगैरे तर फार म्हणजे फार्फारच दूरच्या गोष्टी...अशीच काही दशके गेली..नाही का?? मराठी सिनेमात पैसा नाही म्हणून चांगले लेखक, दिग्दर्शक, अभिनेते इकडे फिरकत नाहीत वगैरे आक्षेप तर जुनेच...अरे पण अगदी ऐंशीच्या दशकात सुद्धा मराठी सिनेमा छान होतं...मग अचानक काय झेंडू फुटले? अचानकपणे काहीतरी चमत्कार व्हावा तसं दोन हजार सालापासून जरा नवीन , उत्तम दर्जाचे सिनेमे यायला सुरुवात झाली...चूकभूल द्यावी घ्यावी. दुकानात चांगल्या मराठी सिनेमांच्या सीडी विकत घ्यावा म्हणून गेले अन तिथल्या मुलाने "वळू" सुचवला. म्हंटल काही हरकत नाही, काय होईल फार फार तर १०० रु. वाया जातील...अगदी नवी कल्पना, मस्त अभिनय ..मला खूप आवडला "वळू". मग हळू हळू बरीच नवीन नावं ऐकू यायला लागली रात्र आरंभ, गाभ्रीचा पाऊस, हल्लीच देऊळ त्यातच एक नाव होते नटरंग. विषय वाचला "तमाशा", आधी वटला काय असणार नवीन ? फार फार तर गाणी आणि सजावट. पण विषय बराच वेगळा आहे. कथा, अभिनय अन गाणी सगळेच अप्रतिम. एकाच उणीव ती म्हणजे गावठी हेल काढून बोलणे, गावठी स्क्रिप्ट लिहिणे तितकेसे जमत नाही. सुरुवात होते एका पुरस्कार समारंभाने ज्यात गुणा आपले मुख्य पात्र याला जीवनगौरव पुरस्कार मिळतो. हा एक बायका -पोरं अन म्हातारा बाप असलेला सामान्य शेतमजूर ज्याला तमाशाची आवड / नाद असतो. त्याच्या शेतमालकाने नवीन साधनं आणल्याने त्याची मजुरी सुटते. हा गुणा वाग लिहिण्यात हुशार असतो अन त्याला त्याची खूप आवडही असते. त्याच्यासारख्याच मजुरांना घेऊन तो तमाशाचा फड उभा करू लागतो...त्याचा म्हातारा बाप त्याच्या विरोधात असतो..सासरासुद्धा येतो कि " हवं तर मी तुम्हाला नवीन धंदा उघडून देतो पण तमाशा नको"...गुणा त्याच्या निश्चयावर ठाम असतो. धडपड करून एक एक करत सगळे जमत आलेले असते पण तमाशा म्हंटल्यावर बाई हवीच...तीसुद्धा चांगली नाचणारी, दिसणारी अन गाणारीसुद्धा...ते कसं जमायचं? जमवतात कसंतरी... बरीच धावपळ केल्यावर अन मार खाल्ल्यावर एक तमासगीर मुलगी अन तिची आई तयार होतात पण एका अटीवर "तमाशात नाच्या हवा त्याशिवाय नाचणार नाही". आली का पंचाईत!! इथे सगळे "मर्द" तर नाच्या कोण होणार? सगळं फिसकटतय का काय अशी परिस्थिती येते...शेवटी आपला गुणा तयार होतो. मुख्य नाचणारी त्याला स्त्रीचे हावभाव, चालणे, बोलणे, मुराकणे शिकवते अन एका नव्या आयुष्याला सुरुवात होते. दोन फड लावल्यानंतर लगेच त्यांना सुपाऱ्या मिळायला लागतात...लोकांना फड खूप आवडलेला असतो. इकडे गावातील लोक त्याच्या बायकोला नक्को जीव करून सोडतात...बायका टोमणे मारतात, पुरुष तिचा गैरफायदा घ्यायला बघतात अन लोक त्याच्या मुलाला त्रास देऊ लागतात..काहीबाही बोलू लागतात. खुद्द त्यालासुद्धा त्याच्याच तमाशात नवीन आलेल्या ढोलकीवाल्याकडून अंगचटीला जाणे अन शारीरिक सुखाची मागणी याला सामोरे जावे लागते. दौर्यावर असताना दोन राजकीय गटांमधील सुंदोपसुन्दीत त्याच्या थेटरला आग लावली जाते अन त्याच्यावर बलात्कार होतो. सगळं उन्मळून पडल्यावर तो घराकडे जातो तर घर बंद असते...बायको मुलांसाठी सासरी जातो तर त्याची छी थू करून हाकलला जातो...अगदी त्याच्या मुलाकडूनसुद्धा. आता त्यांना तरी कसा दोष देणार? परत आल्यावर कोणताही साथीदार नवीन सुरुवात करायला तयार होत नाही, एक सोडून ..त्याची नर्तकी. ती त्याची साथ देते अन शेवटी जीवनगौरव पुसार्कारापाशी येऊन सिनेमा थांबतो.
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचन संख्या 6424
प्रतिक्रिया 31

प्रतिक्रिया

मग? वाचलेय नटरंग बद्दल्..मला वाटते मिपावरच. २-३ लेख होते. रसग्रहण थोडे आवरते घेतल्यासारखे वाटले.

'नटरंग' चित्रपट उत्तमच यात काही वाद नाही. आनंद यादवांच्या नटरंग कादंबरीला सदरील चित्रपट दिग्दर्शक आणि कलाकारांनी उत्तम न्याय दिला आहे यात काही वाद नाही. मागे या चित्रपटाबद्दल मिपावर की अन्य ठिकाणी चर्चा झाल्याचे आठवते. अतुल कुलकर्णीला नाच्या जमलाच (गणपत पाटलाच्या तुलनेत) नाही अशी एक चर्चा झाल्याचे आठवते. चित्रपटातील 'खेळ मांडला' हे मला आवडणारं गाणं. बाकी गाणी आणि चित्रपट उत्तमच आहे. अवांतर : जोगवा पाहिला नसेल तर जोगवाची शिफारस करेन. :) -दिलीप बिरुटे

मग काय? मला चांगला सिनेमा वाटला म्हणुन लिहिलं..मी मिपावरचे किंवा इतरही यावरचे लेख वाचले नाहीत म्हणुन लिहिलंय. बाकीच्यांनीपण उगाच टुरटुर करु नये.

In reply to by शिल्पा ब

हे पहा, माझी प्रतिक्रिया एवधिच होती की लेख आवरता घेतल्यासारखा आहे, पुर्वी २-३ लेख इथेच वाचण्यात आले होते याचा अर्थ असा नाही की तुम्ही लेख लिहू नये, फक्त एवधेच की नवीन काही नाही. तुमची प्रतिक्रिया जरा तीव्र(>बाकीच्यांनीपण उगाच टुरटुर करु नये) नाही वाटत?

शिल्पातै, फक्त गोष्ट काय लिहिता? तुम्हाला सिनेमा कसा वाटला, काय आवडले, काय नाही आवडले, ते पण लिहा ना !!! सहज आठवले, नटरंग च्या प्रमोशन च्या वेळेला गुणाचा नाच्याचा लुक सीक्रेट ठेवला होता. ट्रेलर मध्ये बाकी सगळे दाखवायचे, नेमके ते सोडून. मी हा चित्रपट आपलीमराठी वर बघितला होता मिपा ग्रुप बरोबरच.

In reply to by विश्वनाथ मेहेंदळे

लिहिलंय की!! गावठी हेल काढुन बोलणं जमत नाही हे सोडलं तर मला सिनेमा आवडला. मी कै समीक्षा लेखकु नै..खुप वर्षांनी चांगला नविन सिनेमा बघायला मिळाला म्हणुन जरा आनंदले इतकंच. (आधी फक्त वळुच पाहीला होता.)

In reply to by विश्वनाथ मेहेंदळे

सिनेमा कसा वाटला, काय आवडले, काय नाही आवडले, ते पण लिहा ना !!! हम्म, सहमत आहे. मिपावर सापडल्या बॉ दोन चर्चा. नटरंग डोस्क्यामंदी.... आणि नटरंग ने किती पैसे..... -दिलीप बिरुटे

@तुमची प्रतिक्रिया जरा तीव्र(>बाकीच्यांनीपण उगाच टुरटुर करु नये) नाही वाटत? @ अनिता जास्त मनाला लाऊन घेऊ नका .हळू हळू तुम्हाला सवय होईन अश्या पध्ध्तींच्या प्रतिक्रियांची ब ह्यांनी नेहमीच अश्या प्रतिक्रिया , सल्ले माझ्या लेखनात मला दिले आहेत. पण तुम्ही चक्क त्यांच्या लेखात अशी प्रतिक्रिया ................

In reply to by निनाद मुक्काम …

हो ,पण त्यांनी खेळकर पद्धतीने घेउन इ थे प्रतिक्रिया दि लीआहे. तुमचा नुसताच थयथयाट

In reply to by शिल्पा ब

तुम्ही कधीपासून तुमच्या लेखावरील प्रतिक्रिया खेळकर पणे घेणार ? इतरांच्या लेखावर प्रतिसाद देतांना खेळकर पणा ( जो अनिता ह्यांनी ) दाखविला तसा दाखवणार ? माझ्या बाबतीत म्हणाल तर सोकाजी ह्यांचा लेखात तुमची प्रतिक्रिया मी खेळकर पणाने घेतली ( म्हणून त्यावेळी प्रत्युत्तर द्यायचे टाळले )

In reply to by निनाद मुक्काम …

( म्हणून त्यावेळी प्रत्युत्तर द्यायचे टाळले ) म्हणुन इथे? बाकी काय बोलताय याचा नेहमीप्रमाणेच अंदाज लागत नाही.

In reply to by शिल्पा ब

@बाकी काय बोलताय याचा नेहमीप्रमाणेच अंदाज लागत नाही. अंदाज लागला नाही असे लिहायचे . व म्हणून इथे अशी समर्पक प्रतिक्रिया द्यायची .( हा दुट्टपी पणा झाला ) बाकी तुमचा प्रश्न योग्य आहे म्हणून इथे ? हो म्हणूनच इथे कारण इतके दिवस वैचारिक अल्सर सदृश प्रतिक्रिया तुम्ही प्रत्येक वेळी देत होता. त्या दोन ओळीच्या प्रतिक्रिया देतांना दोन तास लेखन करणाऱ्या लेखकाला ह्याचे काय वाटत असेल ह्याची कल्पना कधीही केली नाही आता तुमच्या लेखावर जरा तुमच्या अपेक्षेबाहेरच्या प्रतिक्रिया आल्या तर त्यावर तुम्ही चवताळून उठल्या ( तेव्हा तुमच्यातील लेखिकेचा संताप टूर टूर करणाऱ्यांवर निघाला ) म्हणून प्रतिक्रिया लिहिली .बाकी तुमच्या ह्या लेखाबद्दल म्हणाला तर हे सिनेमाचे धावते समालोचन वाटले .ह्या आधी ह्या सिनेमावरील लेख तुम्ही वाचले नाहीत ह्यात तुमची काहीही चूक नाही. पण ह्यापुढे सिनेमाचे परीक्षण म्हणजे नुसती सत्य नारायणाची कथा न सांगता तुम्हाला तो सिनेमा कसा वाटला ,त्याची बलस्थाने ,कच्चे दुवे सांगितली तर तुमचे शिनेमा परीक्षण तुमच्या आधीच्या लेखासारखे वाचनीय होईल .

In reply to by निनाद मुक्काम …

मी चवताळले? काय सांगता काय? पण मग तुम्हीच लिहिलं होतं ना आधिच्या प्रतिक्रियेत की मी नेहमी असंच लिहिते म्हणुन!! मी नेहमी चवताळलेलीच असते असं माझं मलाच वाटु लागलंय.. आणि मी काही परीक्षण वगैरे लिहायच्या नाही तर मला कथा वेगळी वाटली अन आवडली या हेतुनेच लिहिलं. मी आजच सिंघम नावाचा मराठी लोकं असलेला मराठी संस्कृती दाखवणारा एक अतिशय भन्नाट सिनेमा पाहीला..आग्रहंच असेल तर यावेळेस परीक्षणंच टाकेन. काय? बाकी तुम्ही बरेच मवाळले म्हणायचे? ;)

In reply to by शिल्पा ब

फारेण्डाने या सिणेम्याचं परीक्षण लिहिलं होतं ग! http://www.misalpav.com/node/18678 पण तू आपल्या स्टायलीत समीक्षा लिहिलीस तर वाचू आम्ही! मला पण सिंघम आवडला होता, आणि नटरंग अजून पाहिला नाही पण गाणी आवडली आहेतच!

In reply to by शिल्पा ब

डोकं बाजूला ठेवून असले पिक्चर बघितले की खूप मज्जा येते! त्यातून थिएटरमधे, आणि बरीच पोरं तिथे एंजॉय करतात ना, तेव्हा तर रजनी म्हणजे साक्षात देव वाटायला लागतो! :D (सिंघम हा अजय राक्षसगण याचा रजनी इष्टायल सिनेमा आहे म्हणून मला आवडला!)

In reply to by शिल्पा ब

नै त काय मेलं ! म्हराटी अंतर्जालावरच्या येवड्या प्रथितयश लेखिकेच्या नज्रला या पिच्कुर बद्दल बाकीच्या लोकांनी लिवलेलं नद्रस पडलं न्हायी ह्यो फकस्त आणि फकस्त त्यांचाच दोस हाये. शिल्पा तै तुमी लिवा वो.आमचा तुमास्नी फुल तो सपोर्ट. बा द वे २०११ चा वर्ल्ड कप जिंकल्याबद्दल भारतीय संघाचे अभिनंदन.धोनीच्या खेळीनं डोळ्याचा पारणं फिटलं. प्रतिभाताई पाटील यांची भारतीय संघराज्याच्या राष्ट्रापदी निवड झाल्याबद्दल मिपाकडून त्यांचे जाहीर अभिनंदन.

हा मागल्या वर्षीचा शिनेमा आहे ना? मला वाटलं नवा आलाय की काय! अतुल कुलकर्णी यांचा गुणा आवडला नाही. त्यांनी पूर्ण ताकदीनिशी अभिनय केला असे वाटत नाही. बाकी गाणी, नाच झकास! सोनाली ज्यु. हिचे संवाद दुसर्‍या जरा बर्‍या आवजात डब का करत नाहीत कळत नाही. खरंतर मीच फार अपेक्षा ठेवल्या होत्या सिनेमाकडून!:(

In reply to by रेवती

काय माहीती!! मला हल्लीच माहीत झाला अन अगदी खुप वर्षांनी चांगला मराठी सिनेमा बघितल्याचा आनंद कुठेच मावला नाही म्हणुन इथे सांडला.

नटरंग चांगलाच होता पण वळूसारखे कुलकर्णीटाइप लोकांनी काढलेले ग्रामीण सिनेमे शहरी लोकांनाच आवडतात असे निरीक्षण आहे खेड्यातील लोकांना नाही आवडत

In reply to by आशु जोग

पण वळूसारखे कुलकर्णीटाइप लोकांनी काढलेले ग्रामीण सिनेमे शहरी लोकांनाच आवडतात असे निरीक्षण आहे खेड्यातील लोकांना नाही आवडत
हो ना. काल परवा बिरुटे सरांनी कुठेतरी लिहिल्याप्रमाणे साला बैलाला पकडण्याचं एव्हढं काय कौतुक? या कुलकर्ण्यांना म्हणावं पिक्चर काढायचाच असेल तर माजावर आलेल्या गायीला बैल लावायच्या किंवा माजावर आलेल्या म्हशीला टोणगा लावण्याच्या सोहळ्यावर पिक्चर काढा. (हवं तर कथा आणि पटकथा मी लिहून देतो. ;) )

चार तुटके फुटके मराठी शब्द देवगण बोलला .आणी ढीगभर मराठी लोकांनी ४ ते ५ सीन केले .आणी ओढून ताणून कर्नाटक च्या सीमावादावर एक सीन टाकला .तर मराठी संस्कृती .................. नायिका दाक्षिणात्य, मराठीत कुणी मिळाली नाही का ? ती नेहा पेंडसे ने म्हणे कोणे एकेकाळी दाक्षीणात्य शिनेमात नायिकेचे काम केले होते. ( तिने दिवाने मध्ये अजय च्या छोट्या बहिणेचे सुद्धा काम केले होते ) तिलाच घेतली असती ती तर महाराष्ट्राची एक पेक्षा एक अप्सरा आहे. अवांतर ( इतके दिवसानंतर शिर्या ला फुटकळ भूमिकेत पाहून वाईट वाटले.)

In reply to by निनाद मुक्काम …

>>अवांतर ( इतके दिवसानंतर शिर्या ला फुटकळ भूमिकेत पाहून वाईट वाटले.) याचे कारण म्हणजे तो (विकास कदम) अभिनयात करियर करत नाही आहे. त्याला दिग्दर्शक व्हायचे आहे. तो रोहित शेट्टीचा मुख्य सहाय्यक दिग्दर्शक आहे. "ऑल दी बेस्ट" या MD कॉलेजच्या एकांकिकेत त्याने बहिऱ्याची भूमिका केली होती. नंतर त्याचे व्यवसायिक नाटक करायचे ठरले तेव्हा त्याच्या जागी संजय नार्वेकरला घेण्यात आले. रोहित शेट्टी गोलमाल-१ बनवत असताना तुषार कपूर ला मुक्याचे काम शिकवण्यासाठी विकास कदमला संपर्क साधण्यात आला. तेव्हापासून तो रोहित शेट्टी बरोबर काम करतो आहे. ही भूमिका त्याने ऐनवेळेला आलेल्या अडचणीमुळे केली असे वाचले होते. याने एका हिंदी सिनेमाचे घोस्ट डायरेक्शन (म्हणजे काम आपले, नाव दुसऱ्याचे) पण केले आहे, असे आतल्या गोटातून कळते.

त्याच्या शेतमालकाने नवीन साधनं आणल्याने त्याची मजुरी सुटते. यातला शेतमालक हा याच चित्रपटाचा गीतकार गुरू ठाकूर आहे हे चित्रपट पाहताना आम्हाला माहितच नव्हतं.