सिंघम - परीक्षण

फारएन्ड's picture
फारएन्ड in जनातलं, मनातलं
31 Jul 2011 - 11:26 pm

बाजीराव सिंघम लै पावरफुल आहे. तो नुसता स्क्रीनवर एन्ट्री मारतो तेव्हा ढोल वाजतात. मारामारी करायला जातो तेव्हा वीररसातील श्लोक मागे वाजतात. तो त्याच्या गाडीला किक मारतो तेव्हा सिंहगर्जना होते. पूर्वी एखाद्याला वरून मारले की ते खाली पडत, किंवा फार फार तर सरळ जमिनीत आत जात. सिंघम एखाद्याच्या डोक्यावर हात मारतो तेव्हा न्यूटनला तिसरा नियम थोडा बदलावा लागेल (some thing like "every action has opposite and sometime ridiculously bigger reaction") एवढा तो माणूस पृथ्वीवरून रिबाउंड होउन दुप्पट तिप्पट अंतर आकाशात उडतो. सिंघम ने आडवा फटका मारला तर माणूस हवेतल्या हवेत स्वतःभोवती गरागरा फिरत राहतो. पण पृथ्वीला एखादा नवीन उपग्रह मिळतो की काय अशी शंका आपल्याला यायच्या आत सिंघम त्यांच्या अंगावर उडी मारून तिसर्‍यालाच तो सुमारे ५०-६० फूट लांब फेकला जाईल व while he is going there वाटेतील दोन चार जीप ची हुडे, सळया, काचा तोडत जाईल एवढी फाईट मारतो.

एवढ्या पावर्फुल माणसाला सर्व व्हिलन्स ना संपवायला तीन तास लागतात हेच आश्चर्य आहे. पण लगे हाथो पोलिस फोर्स चे डोळे उघडणे (झोपेतून नव्हे) ई. समाजोपयोगी कामे व "काव्या" हे "सिंघम" इतकेच अस्सल मराठी नाव असलेल्या हीरॉइन बरोबर "मौला मेरे मौला, शुकरन, सजदे करू" इत्यादी,शुद्ध मराठी भाषेत रोम्यांटिक गाणी म्हणणे ही खाजगी कामेही त्याला करायची असतात.

हा पिक्चर इतका अचाट आणि अतर्क्य आहे हे आत्ता कळते. पण खरे सांगायचे तर बघताना फुल टाईमपास झाला. काही पिक्चर बघताना आपण एन्जॉय करतो पण आवडला हे नंतर सांगायला जरा अवघड वाटते असे काही असेल तर हा त्यातलाच.

थिएटर मधे मित्रांबरोबर जाऊन तेथील माहौल मधे हा बघणे आणि घरी व्हिडीओ वर बघणे यात जमीनअस्मानाचा फरक आहे. त्यामुळे हा बहुतेकांना प्रचंड आवडेल किंवा एकदम प्रचंड अतर्क्य वाटेल.

सुरूवातीपासून एवढा वेग आहे की आपण पूर्ण एंगेज होतो. त्या एन्ट्री-ढोलांचा ताल एकदम मस्त आहे. पब्लिक जाम रिस्पॉन्स देते. अनेक शॉट्सला टाळ्या पडत होत्या. शेवटी एकदा मंत्री (अनंत जोग) च्या "खुर्चीवर बसताना आठवण यावी" म्हणून मारलेल्या लाथांना जो पब्लिक रिस्पॉन्स मिळतो तो सर्वांनी पाहावा.

बाकी सगळे सरधोपट आहे. मंत्री भ्रष्टाचारी म्हणजे सरळ खुर्चीवर बसून उघडपणे सर्व बोलणारा. राजकारणात मुरलेली व्यक्ती कशी वागेल/बोलेल यात खोल जाण्याचे कारणच नाही. भ्रष्ट पोलिस, नियमाने वागणारे पोलिस हे एकाच शॉट मधे क्लिअर होता. नो ग्रे एरिया. व्हिलन भाषणात बोबडी वळून सुद्धा निवडून येतो हे सध्या अशक्य वाटणार नाही पण तो आमदार की खासदार याचा पत्ता नसताना आपण मंत्री होणार हे त्याला नक्की माहीत असते.

बरेच सहकलाकार मराठी आहेत, जे प्रत्यक्षात मराठी नाहीत त्यांच्या व्यक्तिरेखांची नावे मराठी आहेत आणि संवादांत ही मराठीचा भरपूर वापर आहे. गोव्यात शूटिंग खरोखर झाले असावे. गाणे एकही नीट कळत नाही पण प्रभाव सर्व दाक्षिणात्य आहे. अशोक सराफ हिंदीत त्याच्या दहा टक्के कुवत नसलेल्या हीरोंपुढे दुय्यम रोल का करतो याचा मला नेहमी राग येतो, पण येथे निदान त्याला काही चांगले शॉट्स आहेत, थोडेफार त्याचे अस्सल विनोदी कौशल्य दाखवणारेही.

तर रेकमेण्ड करावा का नाही? बघा, हरकत नाही, शक्यतो ग्रूप मधे. दबंग, सनीचे ढाई किलो का हाथ वाले पिक्चर्स या पठतीतील कलाकृती आपण बघत आहोत याची कल्पना ठेवून जा.

चित्रपटआस्वादसमीक्षा

प्रतिक्रिया

मी-सौरभ's picture

31 Jul 2011 - 11:32 pm | मी-सौरभ

हे खरं परीक्षण :)

निर्णय तुमचा कारण पैसा आहे तुमचा!!!

प्रियाली's picture

31 Jul 2011 - 11:58 pm | प्रियाली

प्रोमोमधलं सिंघम सिंघम ऐकून चिंगम (पक्षी: च्युइंग गम)ची आठवण येते.

बाकी, दबंग पाहिला तर हा कशाला सोडणार? बघेनच. डिविडी आली की.

बिपिन कार्यकर्ते's picture

1 Aug 2011 - 12:05 am | बिपिन कार्यकर्ते

हाहाहा!!! आता तुम्ही रेकमेंडच करून र्‍ह्यायले तर बघावाच लागते ना बाप्पा!

शुचि's picture

1 Aug 2011 - 12:15 am | शुचि

every action has opposite and sometime ridiculously bigger reaction

तो संपूर्ण पॅरा वाचताना फुट्ले.

धन्या's picture

1 Aug 2011 - 1:34 am | धन्या

कुठल्याही भावनावेशात न येता चित्रपटाच्या चांगल्या वाईट बाजू अतिशय उत्तम मांडल्या आहेत.

पूर्वी एखाद्याला वरून मारले की ते खाली पडत, किंवा फार फार तर सरळ जमिनीत आत जात. सिंघम एखाद्याच्या डोक्यावर हात मारतो तेव्हा न्यूटनला तिसरा नियम थोडा बदलावा लागेल (some thing like "every action has opposite and sometime ridiculously bigger reaction") एवढा तो माणूस पृथ्वीवरून रिबाउंड होउन दुप्पट तिप्पट अंतर आकाशात उडतो. सिंघम ने आडवा फटका मारला तर माणूस हवेतल्या हवेत स्वतःभोवती गरागरा फिरत राहतो. पण पृथ्वीला एखादा नवीन उपग्रह मिळतो की काय अशी शंका आपल्याला यायच्या आत सिंघम त्यांच्या अंगावर उडी मारून तिसर्‍यालाच तो सुमारे ५०-६० फूट लांब फेकला जाईल व while he is going there वाटेतील दोन चार जीप ची हुडे, सळया, काचा तोडत जाईल एवढी फाईट मारतो.

हा दक्षिणेच्या चित्रपटाचा रिमेक असल्याचा परीणाम. त्यांच्या अ‍ॅक्शनपटांचे नायक अशा अतर्क्य गोष्टी अगदी लिलया करतात. साऊथचा कुठलाही अ‍ॅकशनपट घ्या, भाषा तमिळ, तेलुगू वगैरे कुठलीही असो, नायकाच्या भुमिकेत विजय, महेश बाबू वगैरे कुणीही असो, अशा अतर्क्य गोष्टींना तोटा नसतो.

एक काळ असा होता की दक्षिणेच्या चित्रपटांना यंडूगंडू म्हणून हिणवले जायचे. त्यांच्या स्टंट्सची खिल्ली उडवली जायची. पण आज मात्र त्याच दक्षिणेकडचे चित्रपट सर्रास हिंदीत रिमेक केले जात आहेत. दिडेक वर्षांपूर्वी आपल्या मुळ नावाने आलेला गजनी (किंवा गझनी?), त्यानंतर वाँटेड या नावाने आलेला पोकिरी आणि हा आताचा सिंघम. हे साउथच्या अ‍ॅक्शनपटांचं रिमेक प्रकरण असंच चालू राहणार. एकतर हिंदीमध्ये चांगल्या (?) स्क्रिप्टसची वानवा भासू लागली आहे, किंवा मग दक्षिणी मारधाडपटांच्या रिमेकना मिळत असलेले यश पाहून मुंबैकराना झटपट यशाचा नवा फॉर्म्युला सापडला आहे.

ज्यांनी मुळ तमिळ गझनी (किंवा डब केलेला तेलुगू गझनी) पाहीलेला नाही, त्यांना आमिर खानचा हिंदी गझनीमधील अभिनय अफलातून वाटेल. परंतू तमिळ किंवा तेलुगू गझनी पाहिलेल्यांना आमिर खानचा अभिनय सुर्याच्या अभिनयापुढे अगदीच सपक वाटल्याशिवाय राहणार नाही.

सलमान खानचा वाँटेड पाहिल्यानंतर तर पोकिरी सारख्या सुंदर चित्रपटाच्या रिमेकमध्ये पांचट संवाद टाकून पार वाट लावली हे पाहून हळहळलो. आपल्या भावना कमीत कमी शब्दांत, देहबोलीतून पोहचवत केलेला महेशबाबूचा पोकिरीमधील अभिनय निव्वळ अप्रतिम आहे. वाँटेडमध्ये सलमानने अभिनय केला होता का ईथपासुनच सुरुवात आहे.

सिंघमच्या निमित्ताने प्रकाश राज या अमरीश पुरीच्या तोडीस तोड असणार्‍या दमदार अभिनेत्याला पुन्हा एकदा हिंदी पडदयावर पाहायला मिळालं. पण त्याचा अभिनय या चित्रपटात तितकासा प्रभावी वाटत नाही. तमिळ आणि तेलुगू चित्रपटांचा पडदा आपल्या अप्रतिम अभिनयानं व्यापून टाकणारा हा खलनायक आणि चरित्रनायक हिंदीत मात्र फिका पडतो.

सिंघमच्या नायिकेला नायकाबरोबर नाचगाणं करणं आणि मारधाडीच्या वेळी त्याचं सर्विस रिव्हॉल्वर सांभाळणं यापलिकडे काहीच काम नाही. त्यामुळे तिच्या अभिनयाबद्दल न बोलणंच योग्य. परंतू पोर मोठी झालीये हो आता. चंदामामा मध्ये खुपच लहान वाटत होती. :)

व "काव्या" हे "सिंघम" इतकेच अस्सल मराठी नाव असलेल्या हीरॉइन बरोबर "मौला मेरे मौला, शुकरन, सजदे करू" इत्यादी,शुद्ध मराठी भाषेत रोम्यांटिक गाणी म्हणणे ही खाजगी कामेही त्याला करायची असतात.

आयच्या गावात... खरंतर हे असलं मराठीकरण पाहून माझी सटकली आहे. :P

हा पिक्चर इतका अचाट आणि अतर्क्य आहे हे आत्ता कळते. पण खरे सांगायचे तर बघताना फुल टाईमपास झाला. काही पिक्चर बघताना आपण एन्जॉय करतो पण आवडला हे नंतर सांगायला जरा अवघड वाटते असे काही असेल तर हा त्यातलाच.

हे बाकी अगदी खरं :D

बरेच सहकलाकार मराठी आहेत, जे प्रत्यक्षात मराठी नाहीत त्यांच्या व्यक्तिरेखांची नावे मराठी आहेत आणि संवादांत ही मराठीचा भरपूर वापर आहे. गोव्यात शूटिंग खरोखर झाले असावे. गाणे एकही नीट कळत नाही पण प्रभाव सर्व दाक्षिणात्य आहे.

या चित्रपटात मराठी कलाकार भरभरुन आहेत या गोष्टीमुळेच तर हा चित्रपट पाहायला तयार झालो. :)

अशोक सराफ हिंदीत त्याच्या दहा टक्के कुवत नसलेल्या हीरोंपुढे दुय्यम रोल का करतो याचा मला नेहमी राग येतो, पण येथे निदान त्याला काही चांगले शॉट्स आहेत, थोडेफार त्याचे अस्सल विनोदी कौशल्य दाखवणारेही.

आमच्या दुखर्‍या नशीवर हात ठेवलात राव. अगदी खरं आहे. दहा बारा वर्षांपूर्वी आम्ही अकरावीला असताना पाहिलेल्या सलमान खान आणि काजोलच्या प्यार किया तो डरना क्या मध्ये अशोक सराफने केलेला तडकालाल नावाचा नोकराचा चिंधी रोल अजून विसरला जात नाहिये. :(

असो. ऑन अ सिरीयस नोट, उत्तम चित्रपटांचे रिमेक व्हायलाच हवेत मग मुळ चित्रपट इंग्रजी, तेलुगू, तमिळ किंवा जगातील ईतर कुठल्याही भाषेतला असो. रिमेकमुळे आपल्याला न समजणार्‍या ईतर भाषांतील अभिजात चित्रकृतींचा रसिकांना आस्वाद घेता येतो. परंतू हे करताना आपण मुळ चित्रकृतीच्या सौंदर्याला धक्का लावत नाही ना याचीही काळजी रिमेककर्त्यांनी घ्यायला हवी.

उत्तम रिमेक कसा असावा याचं उदाहरण म्हणजे डॉ. श्रीराम लागू आणि निळू फुले या अभिनयाच्या बादशहांनी अजरामर करुन ठेवलेला पिंजरा हा मराठी चित्रपट. हा चित्रपट द ब्ल्यू अँजेल या जर्मन/इंग्रजी चित्रपटाचा रिमेक आहे.

हिंदी चित्रपट सृष्टीच्या रिमेक बद्दल बोलायचं झालं तर त्यांना जगातील ईतर भाषांमधील अभिजात चित्रकृती वगैरे गोष्टींशी काही घेणं देणं नाही. त्यांना फक्त गल्ला जमवायचा आहे. दक्षिणी मारधाडपटांचा रिमेक ही त्यांच्यासाठी झटपट लॉटरी किंवा हमखास यशाचा फॉर्म्यूला आहे. तसं नसतं तर फक्त आणि फक्त मारधाडपटांचे रिमेक नसते झाले.

बोमरीलू नावाचा एक नितांत सुंदर तेलुगू चित्रपट आहे. एक हळूवार प्रेमकहाणी, बाल्यावस्था, पौंगडावस्था आणि युवावस्था यामध्ये मुलाचा आपल्या वडीलांशी होणार्‍या वैचारीक संघर्षाची ही सुंदर कथा. प्रत्येक भारतीयाने आवर्जून पाहावा असा हा भाषेच्याही पलिकडे जाणारा चित्रपट आहे. या चित्रपटात नायकाची भुमिका करणारा सिद्धार्थ नारायण, नायिकेची भुमिका करणारी जेनेलिया हिंदीत बर्‍यापैकी स्थिरावलेत. चित्रपटात वडीलांची भुमिका करणारा दमदार अभिनेता प्रकाश राजही आता पोकिरी, सिंघमच्या रिमेकच्या माध्यमातून हिंदीत आला आहे. चित्रपट यापूर्वीच तमिळमध्ये संतोष सुब्रमण्यम
, बंगालीमध्ये भालोबासा भालोबासा तर उडीया भाषेत ड्रीम गर्ल अशा तीन भाषांमध्ये रिमेक झाला आहे.

हिंदीतही हा चित्रपट ईटस माय लाईफ येणार येणार म्हणून गेली तीन वर्ष ऐकायला येतंय. तशी घोषणा तर झाली आहे. परंतू विकिवर त्यांनी दिलेली स्टारकास्ट पाहता हा चित्रपट बोमरीलूच्या तुलनेत कितपत चांगला असेल याची शंका येऊ लागली आहे. बंगाली आणि ऊडीया रिमेकबद्दल काही माहिती नाही परंतू तमिळ रिमेक संतोष सुब्रमण्यम चांगला असला तरी तो बोमरीलूपुढे फिकाच पडतो. हिंदीतील रिमेकबद्दल आताच काही बोलणं योग्य नाही परंतू सिद्धार्थ नारायण आणि प्रकाश राज यांची बापलेकाच्या भुमिकेमधली अभिनयाची जुगलबंदी हिंदी रिमेकची स्टारकास्ट दाखवू शकेल की नाही याबद्दल शंका आहे.

बोमरिलू ईज बोमरिलू...

आपुडो ईपुडो एपुडो कलगन्नाने चेली
आकडो ईकडो एकडो मनसिच्चाने मरी

- धनाजीराव वाकडे

Nile's picture

1 Aug 2011 - 3:44 am | Nile

सिनेमाच्या आवडीनिवडींबद्दल वाद घालण्यात पाँईट नाही, पण,

पोकिरी सारख्या सुंदर चित्रपटाच्या रिमेकमध्ये पांचट संवाद टाकून पार वाट लावली हे पाहून हळहळलो.

पोकिरी अन सुंदर!! यु लॉस्ट मी देअर.

पोकिरी सिनेमा मी पाहीला नाही. त्यामुळे नो कमेंट्स पण एक असू शकते की तो सिनेमा कोणाबरोबर एंजॉय करतो यावर त्या सिनेमाचा ठसा आपल्या स्मरणात दीर्घकाळ रहातो.

उदाहरणार्थ "दिल चाहता है" सारखा सुंदर सिनेमा मी पाश्चात्याळलेल्या आणि हिंदी चित्रपटाचा तिटकारा असणार्‍या व्यक्तीबरोबर पाहीला. आत्ता उठतो की मग अशा अवस्थेत कसाबसा तो सिनेमा संपवला आणि माझ्यावर छाप होती "बकवास आहे/फालतू आहे"
पण ......... तोच मी नंतर एकटीने काँप्युटरवर पाहीला आणि मला फारच आवडला. तारुण्य, जोश, मस्ती थोडा सिरीअसनेस आणि सिडचा हळवेपणा, सुमधुर गाणी ........ मला फार फार आवडला.

धन्या's picture

1 Aug 2011 - 8:50 am | धन्या

शुचिताई, तुम्ही "जिंदगी ना मिले दोबारा" पाहीला आहे का हो?

काहीजण (बहुधा फिल्मकर्तेच) म्हणतात ईट इज ट्रिब्यूट टू "दिल चाहता हैं". ईतका बेक्कार पीजे याआधी कधी ऐकला नाही. "दिल चाहता हैं" चे नाव वापरून गर्दी खेचण्याचा प्रयत्न आहे हा.

बाकी या "जिंदगी..." मध्ये तीन नायक जसे स्पेनमध्ये तिथल्या नागरीकांची मस्करी करतात तशी परक्या देशात नसत्या उंगल्या करायची उर्मी आपल्या देशातील तरुणांमध्ये असते या गोष्टीशी पुर्णतः सहमत आहे. लॉस एंजेलिसच्या रस्त्यावर शू करणारा महाभाग मराठी तरुण आम्ही याची देही याची डोळा पाहीला आहे. :)

कसलं ट्रीब्युट अन् काय.
जास्त डोकं चालवायला नको म्हणून त्या सिनेमासारखं काहीतरी केलय.
उगीच ३ मित्र आणि ती कॅटरिना दंगा करत फिरत असतात असं वाटलं.
आपल्या देशातील तरुणांमध्ये
असहमत.;)
माझ्या अभारतीय मैत्रिणीच्या अभारतीय शेजारणीने तक्रार केली तीही एका भारतीय (अमराठी) आजोबांबद्दल.
भल्या सकाळी वॉकला गेलेल्या आजोबांनी आजूबाजूला कोणी नाही असे पाहून एका झुडुपाचा आश्रय घेतला.
या बाईनं ते पाहिलं. पोलिसात तक्रार केली आणि आजोबांच्या मुलाला शेकड्यात दंड भरावा लागला.
सिनियर सिटीझन्सनाही तेवढीच उर्मी असते.;)

अप्पा जोगळेकर's picture

2 Aug 2011 - 8:39 pm | अप्पा जोगळेकर

सिनियर सिटीझन्सनाही तेवढीच उर्मी असते.
'ऊर्मी' हा शब्द वापरला गेल्यामुळे झुडुपाचा आश्रय नक्की कोणत्या क्रियेसाठी घेतला गेला असावा असा आगंतुक विचार डोक्यात आला. पु.ल. देशपांडेंच्या भाषेत बोलायचं तर वॉकच्या वेळी सूर्यालासुद्धा आव्हान देणार्‍या गर्दीचा परिणाम असेल कदाचित. :)

धन्या's picture

1 Aug 2011 - 7:50 am | धन्या

पोकिरी अन सुंदर!! यु लॉस्ट मी देअर.

पोकिरीला सुंदर म्हणताना मी महेशबाबूची या चित्रपटातील देहबोली एव्ह्ढीच गोष्ट विचारात घेतली आहे. खरंच सुंदर आहे. :)

सिनेमाच्या आवडीनिवडींबद्दल वाद घालण्यात पाँईट नाही,

यू सेड इट सर !!!

आयला...आम्ही तर कमनीय आणी सुंदर अशा इलियानाला बघितलं बाबा तेलुगु पिच्चर मधे. ;)
बाकी, दोन्ही पिच्चर पैसा वसूल आहेतच.

धन्या's picture

1 Aug 2011 - 10:04 am | धन्या

आयला...आम्ही तर कमनीय आणी सुंदर अशा इलियानाला बघितलं बाबा तेलुगु पिच्चर मधे.

इलियानाचं सौंदर्य आम्हीही पाहिलं, विशेषतः गल गल पाडतुन्ना हे समुद्र्किनार्‍यावरचं गीत तर आम्ही कितीतरी वेळा रिवाइंड आणि फॉरवर्ड करुन पाहिलं.

बाकी इलियानाला पाहिल्यावर मुलीच्या सौंदर्याच्या वर्णनांमध्ये "चवळीच्या शेंगेसारखी" असे शब्द का वापरतात हे लगेच कळते. :)

अन्या दातार's picture

1 Aug 2011 - 12:00 pm | अन्या दातार

धनाजीराव वाकडे, तुम्ही किक बघा. तुमचे मत अजुन स्ट्राँग होईल :)

तेलुगु पिक्चर प्रेमी
अनिरुद्ध

वपाडाव's picture

1 Aug 2011 - 5:42 pm | वपाडाव

तुमच्या आयला....
वैनीबद्दल असं बोलताना लाज काय इकुन खाल्ली काय रं, भाडेहो.... (हलक्यात घेउ नका..)
आता राखी चित्रपटातलं जरा जरा ह्ये गाणं बघा अन शांत व्हा....
- तेलुगु पिच्चर बगणार्‍याईचा बाप
वपाडाव

अत्रुप्त आत्मा's picture

1 Aug 2011 - 1:22 pm | अत्रुप्त आत्मा

खरच चवळीची शेंग आहे राव...!...आम्ही सेव्ह केली...

नन्दादीप's picture

2 Aug 2011 - 4:03 pm | नन्दादीप

खरच चवळीची शेंग आहे राव......+१

सोमवरचा फ्री पास मिळालाय, पण सिंघम सारखे सिनेमे, तेही ट्रेलर पाहिल्यानंतर, पाहणे माझ्यासाठी तरी अशक्यच.

धन्या's picture

1 Aug 2011 - 8:58 am | धन्या

सोमवरचा फ्री पास मिळालाय

अच्छा, तुम्हाला चित्रपटांचे फ्री पासेस मिळतात तर :P

सिंघम सारखे सिनेमे, तेही ट्रेलर पाहिल्यानंतर, पाहणे माझ्यासाठी तरी अशक्यच.

तुम्ही पोकिरी आणि वाँटेड बहुतेक पाहिले असावेत. सिंघमही पाहू शकाल. "एंटरटेनमेंट व्हॅल्यू"च्या बाबतीत हा चित्रपट वाँटेडपेक्षा खुपच उजवा आहे.

फारएन्डचं "सुरूवातीपासून एवढा वेग आहे की आपण पूर्ण एंगेज होतो." हे वाक्य अक्षरशः खरं आहे. फक्त एक करायचं, चित्रपट पाहताना किंवा पाहून झाल्यावर चित्रपटाती दृश्यांना न्युटनच्या गतिविषयक नियमांची फुटपट्टी नाही लावायची. :)

तुम्हाला चित्रपटांचे फ्री पासेस मिळतात तर

मिळतात कधी कधी, नायतर गरिबाला ही चैन कसली परवडणार हो! ;-)

तुम्ही पोकिरी आणि वाँटेड बहुतेक पाहिले असावेत

पोकेरी पाहिला, पाहिला म्हणजे काय अहो जुलुमच हो.

प्राजु's picture

1 Aug 2011 - 3:57 am | प्राजु

कालच पाहिला.
हसून हसून पुरेवाट झाली.

जिसमे है दम.... वो खाये चिंगम ...!

इंटरनेटस्नेही's picture

1 Aug 2011 - 4:03 am | इंटरनेटस्नेही

उत्तम चित्रपट परिक्षण. डाऊनलोडिंगला टाकल्या गेल्या आहे.
-
(ट्रायबँड) इंट्या.

मीही अगदी 'चिंगम' म्हणतच हा सिनेमा पाहिला.
सिनेमा संपला तरी नक्की काय झाले ते समजले नाही.
सगळे पोलीस असे एखाद्या मिंटाच्या लेक्चरबाजीनंतर लग्गेच सुधारले हेच चिंगमचं यश!;)
हिरवीन तर हिरोला म्हणजे होणार्‍या नवर्‍याला त्याच्या आडनावाने हाक मारते हे बघून हसत सुटले.
बाजीराव हे नाव तर सिंघम हे आडनाव आहे असे येथे गृहित धरले आहे.
सिनेमा बघुनही न बघितल्यासारखा वाटतो.
अजय अतुलने संगीत फार ग्रेट दिलेले नाही पण वाईटही नाही.
अशी बरीच गाणी आधीच ऐकून झालीयेत.
एका गाण्यात गोग्गोड असलेला हिरविनीचा आवाज पुढच्याच गाण्याला बसका कसा? हा प्रश्न पडू दिलेला नाही.
उदा. 'साथिया' आणि 'मौला' ही गाणी
बरेच मराठी कलाकार बघून आनंद वगैरे झाला नाही.

सहज's picture

1 Aug 2011 - 6:14 am | सहज

आख्खा सिनेमा मनमोहन सिंघम मधे मॉर्फ झाला तरच पाहील्या जाईल.

मदनबाण's picture

1 Aug 2011 - 6:43 am | मदनबाण

आरारा...
चला गाणी पाहुनच समाधान करुन घ्यायला पाहिजे तर !!! ;)

मराठी_माणूस's picture

1 Aug 2011 - 12:24 pm | मराठी_माणूस

अशोक सराफ हिंदीत त्याच्या दहा टक्के कुवत नसलेल्या हीरोंपुढे दुय्यम रोल का करतो याचा मला नेहमी राग येतो,

सहमत
(अवांतरः एकटा अशोक सराफ नाही , अजुन काही मराठी कलाकार आहेत.)

परिकथेतील राजकुमार's picture

1 Aug 2011 - 12:54 pm | परिकथेतील राजकुमार

परिक्षण आवडल्या गेले आहे.

डाउनलोडवून बघितला जाईलच.

गजा गाजरे's picture

1 Aug 2011 - 2:18 pm | गजा गाजरे

बाकि शिव्या मात्र झकास ........आणि त्यातहि मराथि ......

सुनील's picture

1 Aug 2011 - 2:59 pm | सुनील

चित्रपट अद्याप पाहिला नाही आणि (परीक्षण) वाचून यापुढे कधी (स्वखर्चाने) पाहीन असे वाटत नाही!

मध्यंतरी सदर चित्रपटातील काही कन्नड-विरोधी संवादांवरून कर्नाटकात गदारोळ उठला होता. त्या बाबत अधिक माहिती मिळवण्याचे कुतुहल मात्र आहे. अर्थात, त्यासाठी (स्वखर्चाने) चित्रपट पाहण्याची तसदी मी घेणार नाही!

फारएन्ड यांचे परीक्षण त्यांच्या आजवरच्या लौकिकाला साजेसे!

आत्मशून्य's picture

1 Aug 2011 - 3:02 pm | आत्मशून्य

आज मराठी चित्रपट कसे निघाले पाहीजेत याचं उत्तम उदाहरण म्हणजे सिंघम हा चित्रपट होय. कोणतीही फॉरेन लोकेशन्स नाही चकचकाट नाही की भले मोठे सेट्स नाहीत, अत्यंत लो बजेट असून सूध्दा संपूर्ण पैसा वसूल असा चित्रपट सर्वांनी एकदा बघावाचं.

गेल्याच आठवड्यात आधी दबंग आणि मग सिंघम लगोपाठ पाहिले. (चकटफु. प्रिंट पण एकदम क्लियर)
आपण तर लै एंजॉय केले दोन्ही.
साला डोस्क्याला ताप नाय दिला बिल्कुल.

आज मराठी चित्रपट कसे निघाले पाहीजेत याचं उत्तम उदाहरण म्हणजे सिंघम हा चित्रपट होय. कोणतीही फॉरेन लोकेशन्स नाही चकचकाट नाही की भले मोठे सेट्स नाहीत, अत्यंत लो बजेट असून सूध्दा संपूर्ण पैसा वसूल असा चित्रपट सर्वांनी एकदा बघावाचं. सहमत...

हुप्प्या's picture

1 Aug 2011 - 4:00 pm | हुप्प्या

ह्या अचाट आणि अतर्क्य सिनेमात एक गोष्ट चांगली आहे की मराठी नाव असणारा नायक निदान काही वाक्ये तरी मराठीत बोलतो. तीच गोष्ट त्याच्या आजूबाजूच्या लोकांबाबतही. व्हिलन, नायिकेच्या घरचे लोक, बाजीरावाचे शेजार पाजार हे एखाद दोन वाक्ये मराठी बोलतात. केवळ उपकार म्हणून मराठी नाव बाळगायचे असा प्रकार नाही. (अर्थात सिंघम हे आडनाव मराठी असल्याचा शोध कुण्या विद्वानाने लावला देव(गण) जाणे! पण एक कवीकल्पना म्हणून सोडून देऊ). पण हे एक योग्य दिशेने उचललेले पाऊल आहे. आठवा अर्जुन, तेजाब, गुलाम, गर्दिश, वास्तव असे अनेक सिनेमे येऊन गेले ज्यात हिरो मंडळी मराठी नाव बाळगून होती पण मराठीपण औषधालाही नव्हते. अजय देवगणला काजोलकडून का होईना मराठी शिकावेसे वाटले ह्यावरुन मराठीला थोडीशी प्रतिष्ठा मिळते आहे की काय अशी शंका येते आहे!

सचिन खेडेकरचे पात्र आणि त्याचा तो विचित्र रिंगटोनचा मोबाईल हे मलातरी नवीन, गंमतीशीर वाटले. बाकी टाईमपास.

प्यारे१'s picture

1 Aug 2011 - 4:58 pm | प्यारे१

'शिंगम' आसंल तसा असूंदे... पन हुप्प्याची स्वाक्षची????

>>>>काय आज तुम्ही काँग्रेसचा उदोउदो केला नाहीत? निधर्मी सरकारच्या स्वच्छ प्रभावी कारभाराने हुरळून गेला नाहीत? निव्वळ कर्तृत्वावर पुढे आलेल्या गांधी पिलावळीचे स्तुतीपाठ गायले नाहीत?
फारच प्रतिगामी बाबा तुम्ही! <<<<

'आसनस्त व्हा' आपलं हे 'आसं नसतं बोलाचं' बाब्बो.... ;)
'सूतक ताई केंद्र'वाल्यांना राग येतो ना बाप्पा.

मुलूखावेगळी's picture

1 Aug 2011 - 4:48 pm | मुलूखावेगळी

छान परीक्षण
अतर्क्य असुनही

सुरूवातीपासून एवढा वेग आहे की आपण पूर्ण एंगेज होतो.

+१
दबंग पेक्षा बरा वाटला

गणेशा's picture

1 Aug 2011 - 5:11 pm | गणेशा

कालच सिंघम पाहिला,
एकदा बघण्यासारखा सिनेमा नक्कीच आहे,
अजय अतुल चे संगित उत्तम.
खलनायकाचे काम सर्वात भारी झाले आहे.
बाकी साउथ चा सिनेमा रिमेक केला आहे म्हंटल्यावर तश्याच अ‍ॅक्शन येणार हे गृहित आहेच.

एकंदरीत ५ पैकी साडेतीन स्टार द्यायला काही हरकत नाहि..

जिसमे हे दम.. वो बाजिराव सिंघम

अवांतर : वरती एका रिप्लाय मध्ये असे आहे की सिंघम हे नाव मराठी आहे, हा शोध कोणी लावला, मला असे वाटते, मराठी ओरिजनल नाव घेताना समाजिक किंवा राजकिय काही तरी प्रॉब्लेम झाला असणार.. सिंघम हे कदम (गोव्यातील कदंब) या नावावरुन सुचले असणार आहे (आणि ज्यात सिंहाच्या नावाची पण स्टार्ट वाटते आहे,)
जेथे बर्याच मुख्य पात्रांची नावे अस्सल मराठीत आहे , म्हंटल्यावर मेन हिरोचे नाव पण अस्स्सल ठेवायचा प्रयत्न झालाच असेन असे वाटते.

असो ..

एकदा पहावा असा सिनेमा.

पुढच्या रविवारी "जिंदगी ना मिले दोबारा" पाहणार आहे,
कसा का असेना, आपला अनुभव आपुनच लेनेका ..

वपाडाव's picture

1 Aug 2011 - 5:54 pm | वपाडाव

हे नाव तद्दन तमिळ (साउथ इंडियन) आहे...
याचा मराठीशी अर्थाअर्थीही संबंध नाहीये....
पण गणेशाने ह्याला दुजोरा का दिला असावा हे वाचुन अंमळ ड्वॉले पाणावले...
कदाचित गोव्याविषयीचं प्रेम लेखणीद्वारे उमटलं असावं....

बाकी :: तमिळ सिंघमच (तेलुगु डब यमुडु) पहावा या मताचा....

ओके . असेल तमिळ मग नाव. मी कधी एकले नव्हते.

पण मग बाकीची नावे मराठी का? आणि तमिळ आडनाव आणि मराठी ' बाजीराव' नाव ?
म्हणुन तर्क .
तरीही सिनेमा परिक्षणात आलाय तितका टुकार नक्कीच नाही.
निदान उगाच हिरोईन ला किडनेप केले आहे, मग पोलिस असलेला हिरो तिला सोडवतो आहे ..
उगाच तो हिरोइन पोलिस हिरो ला मुद्दम त्याच्या जॉब मध्ये जावुन प्रेमासाठी फिरायचे धंधे शिकवत आहे असले काही यात नाहि..
फक्त डोळ्याच्या एका जरबेने घायाल करणारा अजय देवगण, एकदम साजेसा साकारलेला व्हिलन ( बर्याच दिवसानी व्हिलन मस्त वाटला एकदम्)आणि आपल्या अजय अतुल चे संगित म्हणुन पहावा.

प्रत्येकाचा बघण्याचा दृष्टिकोन वेगळा असतो, त्यामुळॅ तसे परिक्षण येते, मात्र ज्यांना साउथ इंडियन मारामारीच्या फिल्मचे रिमेक ला जावुन त्या फायटींग बद्दल अवास्थव बोलायचे असेल तर मग पिक्चर ला आधीच न जाने चांगले.
आधीच माहिती असणार की हे असेच आहे.

असो सिनेमा फार भारी नाही.. पण टुकार पण नाही.

निदान उगाच हिरोईन ला किडनेप केले आहे, मग पोलिस असलेला हिरो तिला सोडवतो आहे ..
उगाच ती हिरोइन पोलिस हिरोला मुद्दाम त्याच्या जॉब मध्ये जावुन प्रेमासाठी फिरायचे धंधे शिकवत आहे असले काही यात नाहि..

अरेरे, हे तर येत्या "फोर्स (force)" एकेकाळचा घर्षणा नावाच्या चित्रपटात आहे...

अप्पा जोगळेकर's picture

2 Aug 2011 - 8:18 pm | अप्पा जोगळेकर

भन्नाट सिनेमा आहे. दे दणादण मारामार्‍या, पूर्ण कप्डे घालणारी तरीसुद्धा आकारबाज हिरॉईन, ढोल-ताशांचा गजर आणि ठीकठाक गाणी. प्रकाश राज ने सगळ्यांवर कडी केली आहे. अजय देवगणवर्सुद्धा.
'आली रे आली, तुझी बारी आली' किंवा शेवती तेलिफोन बूथवर हताश होऊन झोपुन जाण्याचा प्रसंग अफलातूनच.
फूल्टू लार्जर दॅन लाईफ सिनेमा.

शेवती तेलिफोन बूथवर हताश होऊन झोपुन जाण्याचा प्रसंग अफलातूनच.

बेक्कार हसु आल आपल्याला पण त्या सीन मध्ये. =))