कॉकटेल लाउंज : क्लासिक मार्टीनी / ड्राय मार्टीनी
मोहितो... । व्हाइट रशिअन... । झणझणीत मरीआइ... । अनारीटा... | बी 52...
‘कॉकटेल लाउंज’ मालिकेतील आजचे कॉकटेल आहे “क्लासिक मार्टीनी”
पार्श्वभूमी:
घरात काम चालु असल्यामुळे बार बंद होता. आता काम झाले आणि बार चालु केला. :)
दिवाळीसाठी एक मस्त कडक कॉकटेल टाकावे असा विचार केला आणि समोर जीन दिसली. लगेच कॉकटेल ठरले “मार्टीनी”.
‘लेडीज ड्रिंक’ अशी हेटाळणी केली गेलेल्या ‘जीन’ पासुन बनवलेले हे कॉकटेल आहे. जीन हे लेडीज ड्रिंक असे म्हणणार्यांनी हे कॉकटेल प्यावे आणि मग जीनला लेडीज ड्रिंक असे म्हणण्याची हिंमत करून दाखवाववी. अतिशय जहाल, कडक (Potent) असे कॉकटेल आहे हे.
ऊगाच नाही 007, जेम्स बॉण्डचे आवडते ड्रिंक हे. :) पण त्याचे कॉकटेल जरा वेगळे असते, जेम्स बॉण्ड शेवटी तो, त्यात पुन्हा कट्टर ब्रिटीश, सामान्य माणसाप्रमाणे कसा काय वाग़णार तो ;)
प्रकार: जीन बेस्ड, क्लासिक कॉकटेल
साहित्य:
जीन – 2 औस (60 मिली)
ड्राय वर्मुथ – 15 मिली
बर्फ
3 ग्रीन ऑलिव्ह सजावटीसाठी / 1 टुथपिक
बार स्पुन
Hawthorne strainer किंवा गाळणे
ग्लास: – कॉकटेल (ह्या ग्लासला मार्टीनी ग्लास असेही म्हणतात)
कृती:
कॉकटेल ग्लासमधे बर्फाचे खडे टाकुन त्यात पाणी घालुन ठेवा. ह्यामुळे ग्लास चिल्ड आणि फ्रॉस्टी होइल.
मिक्सिंग ग्लास 3/4 बर्फाने भरून घ्या. आता त्यात जीन आणि ड्राय व्हर्मुथ ओता. बार स्पुनने व्यवस्थित स्टर करून घ्या. व्यवस्थित स्टर झाल्यावर Hawthorne strainer वापरुन कॉकटेल ग्लास मधे गाळुन घ्या.
आता 3 ऑलिव्ह टुथपिकवर अडकवून कॉकटेल ग्लासमधे हळुच सोडा.
क्लासिक मार्टीनी तयार आहे:)
चियर्स!

कृती:
कॉकटेल ग्लासमधे बर्फाचे खडे टाकुन त्यात पाणी घालुन ठेवा. ह्यामुळे ग्लास चिल्ड आणि फ्रॉस्टी होइल.
मिक्सिंग ग्लास 3/4 बर्फाने भरून घ्या. आता त्यात जीन आणि ड्राय व्हर्मुथ ओता. बार स्पुनने व्यवस्थित स्टर करून घ्या. व्यवस्थित स्टर झाल्यावर Hawthorne strainer वापरुन कॉकटेल ग्लास मधे गाळुन घ्या.
आता 3 ऑलिव्ह टुथपिकवर अडकवून कॉकटेल ग्लासमधे हळुच सोडा.
क्लासिक मार्टीनी तयार आहे:)
चियर्स!

वाचने
13922
वाचनखूण
प्रतिक्रिया
32
वाह वा.
चालू द्या.
मस्त मस्त !
सगळ साहित्य आहे घरात. विकांती
.
खल्लास पाकृ!
खल्लास पाकृ!
खल्लास पाकृ!
मला तर लिंबु सरबतच
In reply to मला तर लिंबु सरबतच by विलासराव
खी खी खी ....
In reply to खी खी खी .... by सोत्रि
>>सौ चुहे खाके बिल्ली चली हज
In reply to खी खी खी .... by सोत्रि
..
मला ब्लु लगुन पण आवडते. ही
भारीच!!
झकास
मार्टिनी छान दिसतेय. अर्थात
In reply to मार्टिनी छान दिसतेय. अर्थात by गवि
गवि, काजुची फेणी मी अजुन(ही)
मूड बना दिया. मस्त कॉकटेल.
In reply to मूड बना दिया. मस्त कॉकटेल. by अप्पा जोगळेकर
छान
In reply to छान by सुनील
फोटोत दाखवलेली बाँबे सफायर
सोकाजी राव लेख मस्त झालाय पण
In reply to सोकाजी राव लेख मस्त झालाय पण by निनाद मुक्काम …
तुमच्यासारख्या या विषयातील
लै भारी... चिअर्स
क्लासीक.
मस्त.. चांगली माहिती आहे.
जियो!
In reply to जियो! by धमाल मुलगा
अवांतरः
In reply to अवांतरः by गवि
गवि, बांबु म्हणजे बांबु हाउस
In reply to गवि, बांबु म्हणजे बांबु हाउस by सोत्रि
हो.. मॉडर्न कॅफेलगतचे बांबू
>जेम्स बॉण्ड शेवटी तो, त्यात
>जेम्स बॉण्ड शेवटी तो, त्यात
कॉकटेल मध्ये हलक्या दर्जाचे