Sonar Of Thoughts - भाग - ३. लिमाउजेट यांचे अभिनंदन. :-)
मित्र/मैत्रिणींनो,
ज्यांनी या धाग्यावरच्या कविता वाचल्या आणि त्यातल्या तीन निवडल्या त्यांनी केलेले विश्लेषण खाली देत आहे. अगोदर पहिल्या तीन कविता.
सर्वांचे अभिनंदन !
१] पाहता खोल डोहात मोती जरी मिळाले - लिमाउजेट
२] आजही तू आला नाहीस - अभिजीत राजवाडे
३-अ} सागरा तव थांग नाही - बहुगुणी
[बहुगुणी यांनी ही कविता वाहिदा यांच्या कवितेचा अनुवाद आहे, असं म्हटलं आहे. पण ही स्वतंत्र कविताच वाटते.]
३-अ} विकाल यांची 'ऐलतीरी करूण किती'
नमस्कार !
कविता निवडायचं काम खरंच खूप अवघड आहे. कारण जवळजवळ सगळ्याच कविता कविता म्हणून चांगल्याच आहेत. पण चित्रावरून लिहिलेली कविता हा निकष लावून मी खालील तीन कविता निवडल्या आहेत.
१] पाहता खोल डोहात मोती जरी मिळाले - लिमाउजेट
२] आजही तू आला नाहीस - अभिजीत राजवाडे
३] सागरा तव थांग नाही - बहुगुणी
[बहुगुणी यांनी ही कविता वाहिदा यांच्या कवितेचा अनुवाद आहे, असं म्हटलं आहे. पण ही स्वतंत्र कविताच वाटते.]
बक्षिस विभागून द्यायचे असेल तर विकाल यांची 'ऐलतीरी करूण किती' ही देखील तिसऱ्या क्रमांकावर घेता येईल.
गवि यांची चारोळी सुंदर आहे, पण शेवटच्या ओळीत खळखळा वाचाळणारा किनारा हे चित्राशी विसंगत आहे.
तसाच वेगळेपणा मनीषा, शब्दमेघ यांच्या कविता वाचताना दिसला.
[उसळत्या तव लाटा -- किरणांची मिरवीत नक्षी |
रोखती मज आता -- मी बंदीवान या किनारी ||
लाटांवर सळसळतो
गर्द केशरी वर्ख
या मनीषाच्या कवितांतल्या ओळी]
नजरेच्या आकाशावरती थरथरलेला भावकल्लोळ ...
भिजलेल्या समुद्रावरती, सैरभैर विचारांची टोळ ...
या शब्दमेघ यांच्या कवितेतील ओळीत टोळ अगदीच ऑड मॅन आऊट वाटतोय. बाकी कविता सुंदर आहे. पण अशा एखाद्या शब्दाने ती जुळवलेली वाटते, भाव कमी होतात असं मला जाणवलं.
शानबा यांची चार ओळींची कविता अगदी सहजपणे आलेली आहे.
ज्ञानेश यांची रचना अप्रतिम आहे, पण चित्राचा विचार करता त्यांच्या रचनेतील तळ्याचा उल्लेख वेगळा वाटला.
अभिजीत यांची दुसरी कविता चांगली आहे, पण ही जास्त समर्पक वाटली चित्रासाठी.
५०फक्त यांची कल्पना नवी आणि चांगली आहे. कविताही नवीन प्रयत्न म्हणून चांगली आहे.
पेठकरांनी लिहिलेल्या दोन्ही कविता उल्लेखनीय आहेत, त्यातही मुलीच्या मनातले विचार चांगले उतरले आहेत.
या स्पर्धेच्या निमित्तानं मला सुंदर कविता वाचायला मिळाल्या, परिक्षण आणि समीक्षा करण्याची संधी मिळाली, त्याबद्दल
धन्यवाद !
सर्वांच्या वतीने मी परिक्षकांचे आभार मानतो.
लिमाउजेट यांनी बक्षिस स्विकारण्यासाठी कुठे भेटायचे हे सांगितल्यास तसे करता येईल. त्यांना पाहिजे असल्यास ते बक्षिस पोस्टानेही पाठवता येईल.
हे मी माझ्या पुण्यातील उत्साही/अनुत्साही मित्रांवर सोडतो. :-)
जयंत कुलकर्णी.
Book traversal links for Sonar Of Thoughts - भाग - ३. लिमाउजेट यांचे अभिनंदन. :-)
वर्गीकरण
प्रतिक्रिया
अभिनंदन
सर्वांचे अभिनदन!
+१
सर्व विजेत्यांचे अभिनंदन
वा !!!
धनाजीरावांना प्रणाम....
हार्दिक अभिनंदन...
अभिनंदन !!
सर्व विजेत्यांचे हार्दिक
माझी काल लिहिलेली प्रतिक्रिया गायब!
काय झालं नेमकं?
अरेच्चा! धन्यवाद!
आभार!!!
झी मराठी स्टाईल
लिमाचिमा चे अभिनंदन !
सर्व स्पर्धक, विजेत्यांचे
माऊतै, बहुगुणी, अभिजीत
सर्व विजेत्यांचे मनपासुन
अभिजित यांची एकही कविता
विजेत्यांचे अभिनंदन,
धन्यवाद!
अरे व्वा !