✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

Sonar Of Thoughts - भाग - ३. लिमाउजेट यांचे अभिनंदन. :-)

ज
जयंत कुलकर्णी यांनी
Sat, 10/22/2011 - 16:39  ·  लेख
लेख
मित्र/मैत्रिणींनो, ज्यांनी या धाग्यावरच्या कविता वाचल्या आणि त्यातल्या तीन निवडल्या त्यांनी केलेले विश्लेषण खाली देत आहे. अगोदर पहिल्या तीन कविता. सर्वांचे अभिनंदन ! १] पाहता खोल डोहात मोती जरी मिळाले - लिमाउजेट २] आजही तू आला नाहीस - अभिजीत राजवाडे ३-अ} सागरा तव थांग नाही - बहुगुणी [बहुगुणी यांनी ही कविता वाहिदा यांच्या कवितेचा अनुवाद आहे, असं म्हटलं आहे. पण ही स्वतंत्र कविताच वाटते.] ३-अ} विकाल यांची 'ऐलतीरी करूण किती' नमस्कार ! कविता निवडायचं काम खरंच खूप अवघड आहे. कारण जवळजवळ सगळ्याच कविता कविता म्हणून चांगल्याच आहेत. पण चित्रावरून लिहिलेली कविता हा निकष लावून मी खालील तीन कविता निवडल्या आहेत. १] पाहता खोल डोहात मोती जरी मिळाले - लिमाउजेट २] आजही तू आला नाहीस - अभिजीत राजवाडे ३] सागरा तव थांग नाही - बहुगुणी [बहुगुणी यांनी ही कविता वाहिदा यांच्या कवितेचा अनुवाद आहे, असं म्हटलं आहे. पण ही स्वतंत्र कविताच वाटते.] बक्षिस विभागून द्यायचे असेल तर विकाल यांची 'ऐलतीरी करूण किती' ही देखील तिसऱ्या क्रमांकावर घेता येईल. गवि यांची चारोळी सुंदर आहे, पण शेवटच्या ओळीत खळखळा वाचाळणारा किनारा हे चित्राशी विसंगत आहे. तसाच वेगळेपणा मनीषा, शब्दमेघ यांच्या कविता वाचताना दिसला. [उसळत्या तव लाटा -- किरणांची मिरवीत नक्षी | रोखती मज आता -- मी बंदीवान या किनारी || लाटांवर सळसळतो गर्द केशरी वर्ख या मनीषाच्या कवितांतल्या ओळी] नजरेच्या आकाशावरती थरथरलेला भावकल्लोळ ... भिजलेल्या समुद्रावरती, सैरभैर विचारांची टोळ ... या शब्दमेघ यांच्या कवितेतील ओळीत टोळ अगदीच ऑड मॅन आऊट वाटतोय. बाकी कविता सुंदर आहे. पण अशा एखाद्या शब्दाने ती जुळवलेली वाटते, भाव कमी होतात असं मला जाणवलं. शानबा यांची चार ओळींची कविता अगदी सहजपणे आलेली आहे. ज्ञानेश यांची रचना अप्रतिम आहे, पण चित्राचा विचार करता त्यांच्या रचनेतील तळ्याचा उल्लेख वेगळा वाटला. अभिजीत यांची दुसरी कविता चांगली आहे, पण ही जास्त समर्पक वाटली चित्रासाठी. ५०फक्त यांची कल्पना नवी आणि चांगली आहे. कविताही नवीन प्रयत्न म्हणून चांगली आहे. पेठकरांनी लिहिलेल्या दोन्ही कविता उल्लेखनीय आहेत, त्यातही मुलीच्या मनातले विचार चांगले उतरले आहेत. या स्पर्धेच्या निमित्तानं मला सुंदर कविता वाचायला मिळाल्या, परिक्षण आणि समीक्षा करण्याची संधी मिळाली, त्याबद्दल धन्यवाद ! सर्वांच्या वतीने मी परिक्षकांचे आभार मानतो. लिमाउजेट यांनी बक्षिस स्विकारण्यासाठी कुठे भेटायचे हे सांगितल्यास तसे करता येईल. त्यांना पाहिजे असल्यास ते बक्षिस पोस्टानेही पाठवता येईल. हे मी माझ्या पुण्यातील उत्साही/अनुत्साही मित्रांवर सोडतो. :-) जयंत कुलकर्णी.

Book traversal links for Sonar Of Thoughts - भाग - ३. लिमाउजेट यांचे अभिनंदन. :-)

  • ‹ Sonar Of Thoughts -काय झाले होते त्या दिवशी..........भाग -२...
  • Up
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
कविता
चारोळ्या
प्रेमकाव्य
लेखनप्रकार (Writing Type)
प्रकटन
अभिनंदन
आस्वाद

प्रतिक्रिया द्या
6986 वाचन

💬 प्रतिसाद (22)

प्रतिक्रिया

अभिनंदन

प्रचेतस
Sat, 10/22/2011 - 16:51 नवीन
सर्व विजेत्यांचे हार्दिक अभिनंदन. इतरांच्याही कविता सुरेखच आहेत.
  • Log in or register to post comments

सर्वांचे अभिनदन!

पैसा
Sat, 10/22/2011 - 16:58 नवीन
विजेत्यांबरोबरच भाग घेणार्‍या सर्वांचे अभिनंदन!
  • Log in or register to post comments

+१

जाई.
Sat, 10/22/2011 - 23:21 नवीन
+१
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

सर्व विजेत्यांचे अभिनंदन

मनीषा
Sat, 10/22/2011 - 17:13 नवीन
सर्व विजेत्यांचे अभिनंदन !! फोटो बघून कविता करण्याची कल्पना खरोखरच अभिनव ...
  • Log in or register to post comments

वा !!!

धन्या
Sat, 10/22/2011 - 17:14 नवीन
सर्व विजेत्यांचे अभिनंदन !!! ( हल्ली र ल र आणि ट ला ट जोडावेसेच वाटत नाहीत. नाहीतर कदाचित ओझरता का होईना पण आमचाही उल्लेख इथे झाला असता. ;) )
  • Log in or register to post comments

धनाजीरावांना प्रणाम....

वपाडाव
Tue, 11/01/2011 - 12:42 नवीन
संसाराचा रहाट ओढण्याआधीच हे टाळ वाजविण्याचे विचार ऐकुन मनात कल्लोळ निर्माण न व्हावा तर नवलच....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धन्या

हार्दिक अभिनंदन...

मन१
Sat, 10/22/2011 - 19:44 नवीन
हार्दिक अभिनंदन...
  • Log in or register to post comments

अभिनंदन !!

वाहीदा
Sat, 10/22/2011 - 22:16 नवीन
सर्वांचे हार्दिक अभिनंदन !!
  • Log in or register to post comments

सर्व विजेत्यांचे हार्दिक

पिंगू
Sun, 10/23/2011 - 10:24 नवीन
सर्व विजेत्यांचे हार्दिक अभिनंदन.. बाकी पार्टी कोण देतय.. ;) - पिंगू
  • Log in or register to post comments

माझी काल लिहिलेली प्रतिक्रिया गायब!

बहुगुणी
Sun, 10/23/2011 - 18:46 नवीन
मी काल धनाजीरावांच्या प्रतिक्रियेनंतर माझी प्रतिक्रिया लिहिली होती ती somehow गायब झाली आहे (धनाजीरावांचा यक्कु यच्टीयमेल शिकत असल्याने असं झालं असावं का) ;-) असो. प्रथम सर्वच सन्मानितांचं अभिनंदन. मी लिहिलेल्या ओळी या केवळ वाहीदाच्या सुंदर शब्दांचं मराठी रुपडं होत्या, त्या परीक्षकांना आणि जयंतरावांना आवडल्या, याचं कारण वाहीदाच्या मूळ उर्दू-मिश्रीत हिंदी शब्दांमध्ये (आणि अर्थातच जयंतरावांच्या मूळ प्रकाशचित्रात) ते सामर्थ्य आहे म्हणूनच. तेंव्हा खरा मान त्या दोघांचा. मी केवळ अर्थ'वाही'. जाता जाता, व्यक्तिशः मला गगनविहारींच्या ओळीही आवडल्या.
  • Log in or register to post comments

काय झालं नेमकं?

पैसा
Sun, 10/23/2011 - 20:00 नवीन
तुमची प्रतिक्रिया गायब होण्यात संपादकांचा काही हात नाही हो! :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बहुगुणी

अरेच्चा! धन्यवाद!

कवितानागेश
Sun, 10/23/2011 - 23:08 नवीन
अरेच्चा! :) धन्यवाद!
  • Log in or register to post comments

आभार!!!

अभिजीत राजवाडे
Mon, 10/24/2011 - 02:56 नवीन
जयंत कुलकर्णी आपले हार्दिक आभार!!! सर्व विजेत्यांचे अभिनंदन. माझ्या मते ज्यांनी ज्यांनी प्रयत्न केला ते सर्व मनाने विजेते आहेत. पण या निमित्ताने कविता करण्याची एक वेगळी मजा अनुभवली. असे आणखी उपक्रम इथे यावेत अशी आशा करतो.
  • Log in or register to post comments

झी मराठी स्टाईल

मी-सौरभ
Mon, 10/24/2011 - 11:16 नवीन
विजेत्यांचे अभिनंदन!! मान्यवरांचे आभार!!
  • Log in or register to post comments

लिमाचिमा चे अभिनंदन !

मदनबाण
Mon, 10/24/2011 - 11:20 नवीन
लिमाचिमा चे अभिनंदन ! ;)
  • Log in or register to post comments

सर्व स्पर्धक, विजेत्यांचे

पुष्करिणी
Mon, 10/24/2011 - 14:24 नवीन
सर्व स्पर्धक, विजेत्यांचे अभिनंदन लिमाउजेटकडून पार्टी कधी/कुठे?
  • Log in or register to post comments

माऊतै, बहुगुणी, अभिजीत

रेवती
Tue, 11/01/2011 - 19:28 नवीन
माऊतै, बहुगुणी, अभिजीत राजवाडे, विकाल यांचे अभिनंदन!
  • Log in or register to post comments

सर्व विजेत्यांचे मनपासुन

गणेशा
Tue, 11/01/2011 - 20:25 नवीन
सर्व विजेत्यांचे मनपासुन अभिनंदन !! खुप दिवसानी मनापासुन लिहिले आणि वाचले गेले.. आवडले. सर्व कविता वाचताना खुप छान वाटले.. व्यक्तीशा सर्वात आवडलेली कविता : वहिदा. आणि सर्वात आवडलेली चारोळी : गवि
  • Log in or register to post comments

अभिजित यांची एकही कविता

गणेशा
Tue, 11/01/2011 - 20:26 नवीन
अभिजित यांची एकही कविता वाचायला मिळाली नाहि मला तेथे .. पुन्हा येथे टेक्स्ट मध्ये दिल्यास छान वाटेलच
  • Log in or register to post comments

विजेत्यांचे अभिनंदन,

५० फक्त
Wed, 11/02/2011 - 10:53 नवीन
विजेत्यांचे अभिनंदन, पार्टीच्या प्रतिक्षेत.
  • Log in or register to post comments

धन्यवाद!

कवितानागेश
Sun, 11/13/2011 - 19:30 नवीन
कालच बक्षीस घरी आले. :) श्री. जयंत कुलकर्णी यांचे मनःपूर्वक आभार. अवांतरः अजून कुणाला हे पुस्तक वाचायचे असल्यास माझ्या पाठोपाठ नंबर लावा. ;)
  • Log in or register to post comments

अरे व्वा !

वाहीदा
Mon, 11/14/2011 - 18:42 नवीन
आता त्या पुस्तका बध्द्ल संक्षिप्त स्वरुपात थोडे काही लिहाल तर मस्तच आम्हाला वाचायला आवडेल :-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कवितानागेश

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा