✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

हवेतल्या गोष्टी - ४ - उरले ते मोती

अ
अर्धवट यांनी
गुरुवार, 10/27/2011 - 20:38  ·  लेख
लेख
हवेतल्या गोष्टी - १ हवेतल्या गोष्टी - २ : ती हवेतल्या गोष्टी - ३ - पिंजर्‍याचे दार उघडावे.. पावसाळ्यातील अशीच एक फ्लाईट, अगदी पहाटे पहाटे निघालो होतो. वास्तविक पहाटेची फ्लाईट म्हणजे माझी अगदी आवडती. आजूबाजूची रात्रीबेरात्री उठून विमानतळावर आलेली मंडळी, पुन्हा झोपेच्या आधीन होत असताना, मी टक्क जागा असतो. ढगांच्या पांढऱ्या समुद्रावर जाऊन शांतपणे उगवता सूर्य पाहणं मोठं लोभसवाण असतं. अजून दिवसाच्या ट्राफिकनं रविराज कावलेले नसतात, नुकतेच क्षितिजावरुन बाहेर येत ढगांच्या मऊशार पाठीवर आपली किरणं आजमावून पहात असतात. तो सगळा सोनेरी सोहळा माझ्याही कोत्या मनात भव्यतेची, मंगलाची छाप दिवसभराकरता ठेऊन जातो. पण आज मात्र सुर्यादेवांना सुट्टी, करड्या काळ्या ढगांचीच सत्ता आकाशात. आज दिवसभरात काही चांगलं घडूच शकणार नाही असा माहौल.. खराब हवामानाची नेहेमीची सूचना देऊन झाली आहे. मंडळींच्या चेहेऱ्यावर चिंतेच्या छटा चढू लागल्यात. विमान ढगात शिरतं. हादरु लागतं. लोकांच्या नेहेमीच्याच प्रतिक्रिया मी जरा वैतागूनच पहात राहतो. माझ्या शेजारच्या जागेवर एक आजोबा, ते एकट्यानं प्रवास कसे करतायत ह्याचं मला आश्चर्य वाटलं होतंच. मी त्यांच्याकडे त्यांच्या नकळत निरखून पाहू लागतो. सुरकुतलेला चेहेरा. अंगात स्वेटर, हाफशर्ट. वय साधारण पासष्ठ ते सत्तरच्या आसपास. पण चेहऱ्यावर, डोळ्यात काहीतरी विलक्षण गोड भाव.. काही लोकांच्या चेहेर्यावरच एक तृप्त, समाधानी भाव कोरलेला असतो, म्हणजे बघा.. चंद्रकांत गोखले यांचा चेहेरा आठवतोय, तसा काहीसा भाव... माझ्याकडे बघून एक छानसं कुणालाही जिंकून घेणारं स्मितहास्य.. ते शांत आहेत. विमान हादरु लागल्यावर ते डोळे मिटून घेतात, पण चेहेऱ्यावर एकही जास्तीची सुरकुती उमटत नाही.. तसाच प्रसन्न, शांत चेहेरा.. माझी विचाराश्रुन्खाला नेहेमीप्रमाणे चालूच.. आत्ता या आजोबांच्या मनात काय चालू असेल... मृत्यूची प्रकर्षानं जाणीव होत असेल का इतरांसारखी.. जर तशी जाणीव होत असेल तर नक्की काय विचार उमटत असतील.. खेद असेल कि तृप्तता... काही करायचं राहिलं याची रुखरुख असेल... की एवढं करू शकलो, एवढ्या लांब आलो याचं समाधान असेल.. आप्तांची आठवण येत असेल का... का पैलतीरावर आप्तांचीच भेट होणार म्हणून उत्सुकता असेल.. आत्तापर्यंतच्या वाटचालीचा कोलाज येत असेल का विचारांच्या पटलावर.. की कोरी पाटी असेल नवा अनुभव घ्यायला.. मी असा सामोरा जाऊ शकेन का... नाही जाणार कदाचित... का म्हणून? अजून खूप जगायचंय म्हणून..जगायचय म्हणजे नक्की काय करायचय.. जास्ती दिवस श्वास घेणं म्हणजे आयुष्य का? म्हणजे मृत्यूला सामोरं जाताना वय महत्वाचं कि वृत्ती.. आयुष्य आयुष्य म्हणजे तरी काय, जन्मल्यापासून मरेपर्यंत एखाद्या मांजराच्या पिलासाराखं पायात तडमडत रहातं ते, अडखळायला होतंच पण असतं ही लोभसवाणं.. अजून खूप जगायचंय, खूप पहायचय.. पण तरीही असंच म्हणावसं वाटतं... आता उरले ना दिस; रूसण्याचे-भांडण्याचे, क्षण क्षण हिरे-मोती; शेवटले वेचण्याचे किती काळ रहायचे; मान-अपमानी दंग, पहा लकाके नभात; कसा शेवटला रंग. कोण जाणे कोण्या क्षणी; सारे सोडून जायचे, क्षण क्षण हिरे-मोती; शेवटले वेचण्याचे जरी भांडलो-तंडलो; तरी तुझीया सोबती, दिली दुर्दैवाला पाठ; अन्‌ संकटाला छाती. सारे कठीण; तुझीया सवे मृदूल व्हायचे, क्षण क्षण हिरे-मोती; शेवटले वेचण्याचे काही उणे माझ्यातले; काही दुणे तुझ्यातले, बघ शेवटास सारे; कसे सुखमय झाले. जन्मी पुढल्याही होऊ; अजूनही ओळखीचे, क्षण क्षण हिरे-मोती; शेवटले वेचण्याचे कष्ट, ध्यास, त्रागा, प्रेम, जिद्द, तडजोड, भीती, जे जे झरले ते पाणी; आणि उरले ते मोती. येत्या उद्याने जपावा; असा शिंपला व्हायचे, क्षण क्षण हिरे-मोती; शेवटले वेचण्याचे -संदीप खरे

Book traversal links for हवेतल्या गोष्टी - ४ - उरले ते मोती

  • ‹ हवेतल्या गोष्टी - ३ - पिंजर्‍याचे दार उघडावे..
  • Up
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
मुक्तक
लेखनप्रकार (Writing Type)
विचार

प्रतिक्रिया द्या
4901 वाचन

💬 प्रतिसाद (22)

प्रतिक्रिया

आधीचे भाग पहाता यावेळी अजून

रेवती
गुरुवार, 10/27/2011 - 21:01 नवीन
आधीचे भाग पहाता यावेळी अजून लेखनाची अपेक्षा होती. (अपेक्षा तुम्हीच वाढवून ठेवल्या आहेत.) संदीप खरेची कविता चांगली आहे.
  • Log in or register to post comments

+ १

मेघवेडा
गुरुवार, 10/27/2011 - 21:24 नवीन
तंतोतंत. पण जितकं लिहिलंय ते मस्तच. :) खरेंची कवितासुद्धा छानच आहे, शेवटचं कडवं फार सुंदर लिहिलंय. >> अजून खूप जगायचंय, खूप पहायचय यावरून ’इतुक्या लवकर येई न मरणा’ आठवली! :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती

मलाही तीच आठवली होती रे

अर्धवट
गुरुवार, 10/27/2011 - 21:28 नवीन
मलाही तीच आठवली होती रे मेव्या पण दिवाळीत 'मासळीचा सेवीत स्वाद दुणा' नको म्हणून ही घेतली. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मेघवेडा

हा हा हा!

मेघवेडा
Fri, 10/28/2011 - 13:40 नवीन
हा हा हा. अरे अस्सल मासेखाऊ गोंयकार असतो ना त्याला दिवाळी बिवाळीचं सुतक नसतं म्हणे. सुरमई, सोलकढी आणि साहित्य एकत्र असल्यावर बाकी कसलं भान उरत नाही रे असं आमचे नंदूबाब स्यॅन्डियेगोकर म्हणून गेलेत! ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अर्धवट

>>नंदूबाब स्यॅन्डियेगोकर

प्रभो
Sat, 10/29/2011 - 00:35 नवीन
>>नंदूबाब स्यॅन्डियेगोकर म्हणून गेलेत! असतील हो...तुम्हाला(वरणभात वाल्याला) काय उपयोग??
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मेघवेडा

हॅ हॅ हॅ

नंदन
Sun, 10/30/2011 - 12:27 नवीन
'स'कारात्मक विचार करतोय रे तो ;). बाकी सुदैवाने हा त्रिवेणी संगम इथे कट्ट्याच्या निमित्ताने दोन-तीन महिन्यांतून एकदा घडत असतो :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभो

+१

इंटरनेटस्नेही
Fri, 10/28/2011 - 01:55 नवीन
एक्झॅक्टली.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती

आयुष्य आयुष्य म्हणजे तरी काय,

गणपा
गुरुवार, 10/27/2011 - 21:05 नवीन
आयुष्य आयुष्य म्हणजे तरी काय, जन्मल्यापासून मरेपर्यंत एखाद्या मांजराच्या पिलासाराखं पायात तडमडत रहातं ते, अडखळायला होतंच पण असतं ही लोभसवाणं..
वाह !!! अर्धवटा काय झकास उपमा दिली आहेस आयुष्याला. हा भागही ईतर भागांसारखाच वाचनीय झाला आहे. शेवट एका छान समर्पक कवितेन करण्याची कल्पनाही एकदम भारीच.
  • Log in or register to post comments

छान!

बिपिन कार्यकर्ते
गुरुवार, 10/27/2011 - 21:16 नवीन
छान!
  • Log in or register to post comments

लेख छानच. बाकी आमच्या गवर्‍या

शिल्पा ब
Fri, 10/28/2011 - 02:05 नवीन
लेख छानच. बाकी आमच्या गवर्‍या स्मशानात गेल्यात त्यामुळे कश्शाची भिती वाटत नै आता...फक्त वाट पहायची. असो.
  • Log in or register to post comments

हे अस्सं बोलणं

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Fri, 10/28/2011 - 09:32 नवीन
फक्त वाट पहायची. येसो नै बोलबेको...!!! हे अस्सं बोलणं म्हणजे अजून खूप जगायचं आहे, असेच ना ? :) -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शिल्पा ब

छान लेखन.

नगरीनिरंजन
Fri, 10/28/2011 - 09:23 नवीन
आणि शेवटची कविताही आवडली. जगण्याचं, जिवंतपणाचं फाजील स्तोम आता आता लक्षात येऊ लागल्याने लेखातल्या भावनेशी मात्र समरस होऊ शकलो नाही.
  • Log in or register to post comments

>>जिवंतपणाचं फाजील स्तोम

अर्धवट
Fri, 10/28/2011 - 09:40 नवीन
>>जिवंतपणाचं फाजील स्तोम वाह् क्या बात है.. असं काहिसं म्हणायचंय का देवा.. उत्कट-बित्कट होऊ नये, भांडू नये, तंडू नये.. असे वाटते आज-काल, नवे काही मांडू नये नको कुठला नवा भार, जुनेच गुंते शिल्लक फार.. सूर गाठ-नीर गाठ, राहून द्याव्यात, ओढू नये... असे वाटते आज-काल, नवे काही मांडू नये असे वाटते बसून घ्यावे, उरले श्वास मोजत रहावे.. जन्मा-बिन्मा आलो त्याचे, पांग सुद्धा फेडू नये... असे वाटते आज-काल, नवे काही मांडू नये शिंकांसारखे सोपस्कार, मला झालीये सर्दी फार.. असल्या गळक्या जगण्यासाठी, रूमालसुद्धा काढू नये... असे वाटते आज-काल, नवे काही मांडू नये कुठे कधी रमला जीव, खरंच फार दमला जीव.. वजन, ज्ञान, ओळख, पित्त काही-काही वाढू नये... असे वाटते आज-काल, नवे काही मांडू नये कसले प्रहर, कसला काळ, मनात कायम संध्याकाळ.. तिच्या कुशीत मांडली कविता, तेवढी मात्र मोडू नये... असे वाटते आज-काल, नवे काही मांडू नये -संदीप खरे दोन्ही कविता संदीपच्याच ब्लॉगवरून साभार
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नगरीनिरंजन

स्सही

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Fri, 10/28/2011 - 09:49 नवीन
’
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अर्धवट

व्वा!

नगरीनिरंजन
Fri, 10/28/2011 - 11:34 नवीन
मस्त कविता!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अर्धवट

छान.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Fri, 10/28/2011 - 09:30 नवीन
वाचतोय. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

संपूर्ण धागा, कविता, पायात

गवि
Fri, 10/28/2011 - 12:02 नवीन
संपूर्ण धागा, कविता, पायात येणार्‍या मांजराच्या पिल्लाची उपमा आणि सर्व प्रतिसाद, सगळंच सुंदर. एकदम ए-वन..
  • Log in or register to post comments

मस्त लिहीलय

जाई.
Fri, 10/28/2011 - 13:33 नवीन
मस्त लिहीलय
  • Log in or register to post comments

हवेतले अनुभव आवडतायत

पैसा
Fri, 10/28/2011 - 13:41 नवीन
असेच आणखी "हवामहल" बांधा. आणि सोबतच्या दोन्ही कविता खूपच आवडल्या.
  • Log in or register to post comments

ह्म्म्म.

प्रभो
Sat, 10/29/2011 - 00:36 नवीन
ह्म्म्म...लिहित रहा रे भौ....
  • Log in or register to post comments

छान

नंदन
Sun, 10/30/2011 - 12:06 नवीन
हाही भाग उत्तम.
खेद असेल कि तृप्तता... काही करायचं राहिलं याची रुखरुख असेल... की एवढं करू शकलो, एवढ्या लांब आलो याचं समाधान असेल.. आप्तांची आठवण येत असेल का... का पैलतीरावर आप्तांचीच भेट होणार म्हणून उत्सुकता असेल.. आत्तापर्यंतच्या वाटचालीचा कोलाज येत असेल का विचारांच्या पटलावर.. की कोरी पाटी असेल नवा अनुभव घ्यायला..
"आप्त सारे भेटती जे जे तिथे वस्तीस गेले, सांगतो मी त्यांस किस्से पाहिलेले ऐकिलेले मी खरा तेथील वासी हा न वाडा ही सराई, पाहुणा येथे जरी मी जायची मातें न घाई" ह्या ओळींची आठवण करून देणारं लेखन.
  • Log in or register to post comments

रेवतीताईंच्या वरील

किसन शिंदे
Mon, 10/31/2011 - 10:12 नवीन
रेवतीताईंच्या वरील प्रतिसादाशी सहमत... आधीच्या भागाच्या तुलनेत हा भाग तितका जास्त लिहला नाहीये, पण लेखन मात्र नेहमीप्रमाणेच बहारदार. पुढिल मोठ्या भागाच्या प्रतिक्षेत...... :)
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा