आली आली हो दिवाळी-
आली आली हो दिवाळी
सांगे दारी ही रांगोळी
स्वागतास सज्ज राहू
प्रकाशात घरोघरी !
सुसंवादी भेटीत त्या
काव्य शास्त्र विनोदाच्या -
एकमेकांना देऊ या
शुभकामना मनीच्या !
करू विना आवाजाने
छान दिवाळी साजरी ,
ठेवू प्रदूषणमुक्त
वसुंधरा ही गोजिरी !
गोडधोड चवदार
खमंगशा फराळात-
भूक गोरगरीबांची
नित्य घेऊया ध्यानांत !
वर्गीकरण
योग्य वेळचे काव्य. सर्वांना
छान.
छान हो.
छान