कालच आई स्वप्नात येऊन गेली ..!!
कालच आई स्वप्नात येऊन गेली
माझ्या केसात हात फिरवून
हलकेच मला म्हणाली
किती राब राबतोसरे तू
थोडासा आराम करीत जारे बाळा
काम काम नि अविरत काम
मग आराम कधी करशील बाळा ...?
कसा जीव माझा व्याकुळ होऊन गेला
तिच्या आठवणीने जीव ओला ओला झाला
सतत काळजी तिची सवय होती
पोरांच्या सुखासाठी ती राब राब राबत होती
देवाजवळ दिवा नि हात जोडून प्रार्थना
सुखाची याचना फक्त पोरासाठी
स्वप्नात येऊन ती काय म्हणाली ..?
भूक लागली असेल नारे तुला
थांब जरासा
आपला जुना तवा लोखंडाचा
मी शोधून काढते
आणि तुझ्यासाठी छान पिठले टाकते
असे म्हणून ती आत गेली
तिची वाट बघता बघता
मला कशी जाग आली ...?
मी तिची वाट बघत बसलो
नि जाणीव झाली
आई तर कधीच हरवून गेली
निळ्या निळ्या आभाळात
कधीच ती निघून गेली
आई कालच स्वप्नामध्ये येऊन गेली
वाचने
2731
वाचनखूण
प्रतिक्रिया
14
...
.....
निशब्द
भावपूर्ण....
In reply to भावपूर्ण.... by प्रभाकर पेठकर
+१
+२
.
मात्रुदेवो भव।
.....
अप्रतिम
आवडली...
खूप करुण.. कसेतरीच झाले.
काळजाचा ठाव घेणारी कविता !
(No subject)