Skip to main content

कालच आई स्वप्नात येऊन गेली ..!!

लेखक प्रकाश१११ यांनी गुरुवार, 13/10/2011 10:29 या दिवशी प्रकाशित केले.
कालच आई स्वप्नात येऊन गेली माझ्या केसात हात फिरवून हलकेच मला म्हणाली किती राब राबतोसरे तू थोडासा आराम करीत जारे बाळा काम काम नि अविरत काम मग आराम कधी करशील बाळा ...? कसा जीव माझा व्याकुळ होऊन गेला तिच्या आठवणीने जीव ओला ओला झाला सतत काळजी तिची सवय होती पोरांच्या सुखासाठी ती राब राब राबत होती देवाजवळ दिवा नि हात जोडून प्रार्थना सुखाची याचना फक्त पोरासाठी स्वप्नात येऊन ती काय म्हणाली ..? भूक लागली असेल नारे तुला थांब जरासा आपला जुना तवा लोखंडाचा मी शोधून काढते आणि तुझ्यासाठी छान पिठले टाकते असे म्हणून ती आत गेली तिची वाट बघता बघता मला कशी जाग आली ...? मी तिची वाट बघत बसलो नि जाणीव झाली आई तर कधीच हरवून गेली निळ्या निळ्या आभाळात कधीच ती निघून गेली आई कालच स्वप्नामध्ये येऊन गेली
काव्यरस
लेखनविषय:

वाचने 2736
प्रतिक्रिया 14

प्रतिक्रिया

...

नि:शब्द!!

अतिशय भावपूर्ण. स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी. शेवटचे कडवे मनाला चटका लावून जाणारे आहे.

In reply to by प्रभाकर पेठकर

>>>> अतिशय भावपूर्ण. असेच म्हणतो. -दिलीप बिरुटे

भावपूर्ण.

साधी आणि सरळ कविता.

.....

आवडली...