✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

ती... धूंद

अ — अत्रुप्त आत्मा, गुरुवार, 10/13/2011 - 14:33
काल पासुन ज.कुं.च्या धाग्यावर ती'ची हवा फार पसरली आहे... तिकडं एक कविता टाकलीये,,,हिला पण तिकडेच टाकावी अश्या विचारात होतो,पण हिचं आमच्या मनाशी जुळलेलं चित्र पहाता,हे त्या चित्राशी जरा विसंगत होइल हे भय वाटल्यानी हिला अता इकडे सोडतोय,,,आणी असाही हिचा छंद तिच्या छंदाशी जुळणारा नाहीच... मग म्हटलं मिटर गेजची गाडी ब्रॉड गेजवर कशाला सोडा...म्हनुनच हीला या ठेसनात आनलीये...बगा जमलीये का ते जरा... हो..येक ह्रायलच ... ही जिच्या चालीवरनं सुचली ते ह्रायलच की--- ''नसतेस घरी तु जेंव्हा'' ती आहे ऐशी धुंद,अन चाल किती स्वच्छंद, किती नितळ तिची ही काया,नि:श्वास कसे ते मंद। त्या वेळी ती हळुवार,केश ही मुक्त संभार, ती ल्याली खोचुन शालू,जणु यौवना वरी वार। कांतीचा स्पर्श असा की,अंगात फुले रोमांच, कायाही अशी सुडौल,शालुही हिरवा कंच। स्पर्शानी मनात माझ्या,किती उठल्या मोहक लाटा, कोंदटल्या भाव फुलांच्या,त्या मुक्त मोकळ्या वाटा। मज सुटका नकोच यातुन, राहु दे असा स्वच्छंद, राहू दे नशाच सारी,का घालु तिथे मी बांध। तुम्ही म्हणाल गेला वाया,किती जाउन बसला लांब, परतीची आस नसे रे,आहेस तिथे तु थांब। मग मी ही म्हणेन तुंम्हा,ती अप्सरा अशी आहे, सहवास तिचा तो...हाय!उरलो तरी तिचाच आहे। तरि पुन्न्हा मी येइन,टाकण्यास पुढचे पत्र, तोवरी रंगवुनी ठेवा,त्या पुढले मानस चित्र।

प्रतिक्रिया द्या
7583 वाचन

💬 प्रतिसाद (32)

जल्ला ह्या भटाचो खय खरा

प्यारे१
गुरुवार, 10/13/2011 - 15:59 नवीन
जल्ला ह्या भटाचो खय खरा लक्षाण दिसत नाय.... ;) (धेडगुजरी लिहिल्याबद्दल त्या त्या भाषेच्या वाचकांनी अंगावर येऊ नये ही नम्र धमकी :P )
  • Log in or register to post comments

@-जल्ला ह्या भटाचो खय खरा

अत्रुप्त आत्मा
गुरुवार, 10/13/2011 - 16:25 नवीन
@-जल्ला ह्या भटाचो खय खरा लक्षाण दिसत नाय.... >>> मांजा लक्षन खराच असा,तो मी कवितेतनं मांडता,,, पन तुला जल्ला काय झाला हो,तो असा मांज्याशी भांडता... ;-) @-धेडगुजरी लिहिल्याबद्दल त्या त्या भाषेच्या वाचकांनी अंगावर येऊ नये ही नम्र धमकी नाय हो येनार तुमच्या कुनी अंगाव... ;-)
  • Log in or register to post comments

अतृप्त आत्म्याने पार तृप्त

गणेशा
गुरुवार, 10/13/2011 - 16:41 नवीन
अतृप्त आत्म्याने पार तृप्त करुन टाकले आहे. एक ओळ न ओळ पुन्हा पुन्हा वाचली.. अप्रतिम .. मस्त ... काय काय बोलावे तेच कळेना .. सुंदर
  • Log in or register to post comments

जय गणेश जय गणेश जय गणेश

अत्रुप्त आत्मा
गुरुवार, 10/13/2011 - 18:15 नवीन
जय गणेश जय गणेश जय गणेश देवा... मनापासुनच्या कॉमेंटचा दंडवत घ्यावा...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणेशा

पहिल्या ओळितल्या ऐशी ला ऐंशी

५० फक्त
गुरुवार, 10/13/2011 - 19:54 नवीन
पहिल्या ओळितल्या ऐशी ला ऐंशी - ८० असं केलं ना तर हे फोटो फिट बसतात या वर्णंनाला, फक्त दुसरं कडवं बसणार नाय फिट ही जस्ट मतदानाचा हक्क मिळालेली Image removed. ही जरा खंगरीच आहे Image removed. ही थोडी थोराड आहे खरी पण कुटंबी चालेल Image removed. ही मात्र एकदम फिट सापडली बगा, कसं शालुची न्क्षी बिक्षी एकदम झकास हाय Image removed. जरा शालुचा रंग लाल केला ना तर लईच बहार होईल कविआत्मा, मग काय श्री व सौ. फेरारी यांच्या लेकी अन आमच्या मिंटीच्या चुलत चुलत भैनी निसतं पारणं फेडतील हे असं Image removed. Image removed. ही ५००, यांचीच चुलत बहिण पन लई नखरेल Image removed. आन ह्यो पाठराखणींच्या बरुबरचे एक दोन फोटो शेवट गोड व्हावा म्हनुन Image removed. Image removed.
  • Log in or register to post comments

कडव्या गणिक टाकलीत

अत्रुप्त आत्मा
गुरुवार, 10/13/2011 - 20:16 नवीन
कडव्या गणिक टाकलीत कार कल्पनेला माझ्या दिलात मार ;-) कवितेची केलीत ऐशी तैशी म्हणुन वरच्यातल्या एकीचं उघडतो दार :-p .... ब $$$ ये दार उघड :love: अवांतरः- आमच्या तिच्या शालूचा रंग तर हिरवा आहे,,,तुंम्ही तर पोपटी दिलात...पोपट फार अवडतात वाट्टं ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ५० फक्त

जबराट

मी-सौरभ
गुरुवार, 10/13/2011 - 20:47 नवीन
प्रतिसाद पण अन् उपप्रतिसाद पण
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

कडव्या गणिक टाकलीत

धन्या
गुरुवार, 10/13/2011 - 20:50 नवीन
कडव्या गणिक टाकलीत कार कल्पनेला माझ्या दिलात मार कवितेची केलीत ऐशी तैशी म्हणुन वरच्यातल्या एकीचं उघडतो दार
कसे दार उघडशील भटा आता तू तुझी चावी अडकली की रे आत सुटका नाही सकाळशिवाय तुझी बस शेजारणीकडे तू अंगाई गात
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

@-कसे दार उघडशील भटा आता

अत्रुप्त आत्मा
गुरुवार, 10/13/2011 - 22:46 नवीन
@-कसे दार उघडशील भटा आता तू --तुझी चावी अडकली की रे आत.... :-D --सुटका नाही सकाळशिवाय तुझी --बस शेजारणीकडे तू अंगाई गात... :-D धन्या सैल हा सुटला आणी मला कचकुनी दात लावी तुझे कुलुप तय्यार ठेव ;-) सकाळी घेउन येतो चावी.... :-p
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धन्या

__/\__

प्रचेतस
गुरुवार, 10/13/2011 - 22:51 नवीन
__/\__
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

_/\_ _/\_ _/\_

सुहास झेले
Sat, 10/15/2011 - 13:38 नवीन
जबराट !!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

आम्हाला शेवटची गाडी विशेष

धन्या
गुरुवार, 10/13/2011 - 20:56 नवीन
आम्हाला शेवटची गाडी विशेष आवडली. शेवटून दुसरी गाडी जरा थोराड वाटते. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ५० फक्त

+१

मी-सौरभ
गुरुवार, 10/13/2011 - 21:00 नवीन
सहमत... आधीच्या कश्या वाटल्या त्याबद्दल काही विवेचन करा की ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धन्या

शेवटच्या दोन गाडया वगळता

धन्या
गुरुवार, 10/13/2011 - 21:14 नवीन
शेवटच्या दोन गाडया वगळता बाकीच्या गाडया ठीकठाक आहेत. शेवटच्या दोन गाडयांची मात्र टेस्ट ड्राईव्ह घ्यावीशी वाटते. मला वाटतं आमच्या या मताशी तुम्हीही सहमत असाल. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मी-सौरभ

मी बी

प्रचेतस
गुरुवार, 10/13/2011 - 21:48 नवीन
मी बी सहमत आहे. तशाही तुम्हाला काही अमेरीकन बनावटीच्या गाड्या चालवायचा अणुभव हाय म्हणे. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धन्या

तशाही तुम्हाला काही अमेरीकन

धन्या
गुरुवार, 10/13/2011 - 23:16 नवीन
तशाही तुम्हाला काही अमेरीकन बनावटीच्या गाड्या चालवायचा अणुभव हाय म्हणे.
आहे तर. निसानने मायक्रा नावाची गाडी आता आता भारतात आणली. आम्ही अमेरिकेत निसान मॅक्झिमा चालवलीय. फक्त सॅन फ्रान्सिस्कोच्या रुंद रस्त्यांवरुन किती वेळा सिग्नल जम्प केले तेव्हढं मात्र विचारू नका. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

:)

प्रचेतस
Fri, 10/14/2011 - 07:01 नवीन
किती वेळा सिग्नल जम्प केले तेव्हढं मात्र विचारू नका.
तिकुडच्या पोलीसांनी रट्टे नाय मारले मग? ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धन्या

आमची बी...

धन्या
गुरुवार, 10/13/2011 - 21:04 नवीन
येम ऐंशी... आज बी गावी घरी गेलो की न चुकता एक चक्कर मारतो हिच्यावर.... Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ५० फक्त

आज बी गावी घरी गेलो की न

अत्रुप्त आत्मा
गुरुवार, 10/13/2011 - 22:54 नवीन
आज बी गावी घरी गेलो की न चुकता एक चक्कर मारतो हिच्यावर.... काय वो धनाजीराव...हीतली येक तुमच्या बरबर नेहमी दिसती... अता ही गावची पन कळ्ळी,,, आनी तिच्या वर बी येक चक्कर न चुकता मारता,,,मंजे उरलेल्यांवर चुकन कित्ती मारत असाल...;-) ? चकरा ... जपा हो जपा तुमच्या ह्याला ....मंजी त्ये त्ये अपलं तब्बेतीला ...बिघडन की ती...मंजी तुमची तब्बेत हो ..;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धन्या

काळजी नसावी...

धन्या
गुरुवार, 10/13/2011 - 23:21 नवीन
आम्हाला बैलगाडी, सायकल, एम एटी, हीरो होन्डा पॅशन प्लस/प्रो, आय टेन या गाडया चालवण्याचा अनुभव आहे. :) गरज पडल्यास शेजार्‍यांच्या डिस्कव्हर, अल्टो वगैरे गाडया चालवू शकू असा आत्मविश्वासही आम्हाला आहे. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

या गाडया चालवण्याचा अनुभव

अत्रुप्त आत्मा
गुरुवार, 10/13/2011 - 23:38 नवीन
या गाडया चालवण्याचा अनुभव आहे. बराच दांडगा दिसतोय... तुमचा... हा... तो अपला अनुभव... ;-) ठीक आहे आमची माघार... काळजी सोडली :-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धन्या

कविता एक लंबर.

प्रचेतस
गुरुवार, 10/13/2011 - 21:51 नवीन
कविता एक लंबर.
  • Log in or register to post comments

वरील 'अनुभवी' पण 'विनापरवाना'

प्यारे१
Fri, 10/14/2011 - 09:15 नवीन
वरील 'अनुभवी' पण 'विनापरवाना' 'वाहन''चालकांचे हृद्य संवाद वाचून ड्वाळे पाणावले....
  • Log in or register to post comments

हिहिहि..

किसन शिंदे
Fri, 10/14/2011 - 09:20 नवीन
:D प्यारे मस्तच चौका हाणलाय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१

@वरील 'अनुभवी' पण

अत्रुप्त आत्मा
Sat, 10/15/2011 - 23:03 नवीन
@वरील 'अनुभवी' पण 'विनापरवाना' 'वाहन''चालकांचे हृद्य संवाद वाचून ड्वाळे पाणावले.... आंम्ही परवाना धारक 'वाहन''चालकांचे हृद्य गद्य पद्य असे सर्व संवाद ऐकुन कित्येकदा ओक्सा-बोक्शी रडलेलो आहे... ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१

@ प्यारे धन्यवाद @ कअआ - हे

५० फक्त
Fri, 10/14/2011 - 10:06 नवीन
@ प्यारे धन्यवाद @ कअआ - हे काही हिरवे सँपल आता खुश का ? Image removed. Image removed. Image removed.
  • Log in or register to post comments

@-कअआ - हे काही हिरवे सँपल

अत्रुप्त आत्मा
Fri, 10/14/2011 - 22:16 नवीन
@-कअआ - हे काही हिरवे सँपल आता खुश का ? हाहाहाहा आता कसं थंडगार वाटलं बगा काळजाला... :-) तिघींना बी पसंती कळवा ब्वा आपली,,, पयली फॉरेनची पाटलीण ;-) दुसरी आय टी तली गोजीरी :-) अनी तिसरी कोनच्या तरी जुन्या खालसा संस्थानची राजकन्या :love: असच पायजेल हुत बगा आमास्नी पण्णासराव ... ठेंक्यु अगेन ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ५० फक्त

दुसरी आय टी तली

धन्या
Fri, 10/14/2011 - 23:57 नवीन
दुसरी आय टी तली गोजीरी
आयटीवाल्यांना चांगलंच ओळखायला लागलात तुम्ही. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

@आयटीवाल्यांना चांगलंच

अत्रुप्त आत्मा
Sat, 10/15/2011 - 13:10 नवीन
@आयटीवाल्यांना चांगलंच ओळखायला लागलात तुम्ही आय टी वाल्यांना चांगलेच ओळखुन आहोत आंम्ही.... ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धन्या

एकदम धुंद फुंद करणारी कविता.

प्रचेतस
गुरुवार, 07/24/2014 - 12:33 नवीन
एकदम धुंद फुंद करणारी कविता.
  • Log in or register to post comments

ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्हाआ

अत्रुप्त आत्मा
गुरुवार, 07/24/2014 - 12:42 नवीन
ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्हाआआआआआअ.......... हल्लीच दणकून पडणार्‍या पावसानी..आणि हिरवाईनी हे असलच काहितरी मनात गुंजत असतं..नित्यगीता प्रमाणे! त्यात आगोबानी हीला वर आणली. *i-m_so_happy* बहुत खुषी हुवी! धण्णेवाद्स! *ok*
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

सुंदर !!!

धन्या
गुरुवार, 07/24/2014 - 13:09 नवीन
सुंदर !!! वाचून पुनःप्रत्ययाचा आनंद मिळाला.
  • Log in or register to post comments

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा