मध्यरेल्वे सांगे तुम्ही काळजी घ्या
काळजी घ्या काळजी घ्या मध्यरेल्वे सांगे तुम्ही काळजी घ्या
काळजी घ्या काळजी घ्या तुम्ही काळजी घ्या
चौकीदार नाही त्या रेल्वेफाटकावर काळजी घ्या ||धृ||
नका भानात वाहन चालवू
नका जरा तेथे कधी थांबू
दिसली नाही आगगाडी जरी
जरा वेगात चलावं रुळावरी
सांगतो तुम्हा काळजीनं पुन्हा
दोन्ही बाजूला डोळे उघडून पहा ||१||
लाल सिग्नल तुम्हा नाही दिसला
जरी हिरवा दिवा लागलेला नसला
नका घालू तुम्ही तेथे तुमची गाडी
घातली तर होतील बारा भानगडी
अपघात होईल जीव तुमचा जाईल
कशाला मध्यरेल्वेला धडकता? ||२||
दोन्ही बाजूला तुम्ही पहा
आजूबाजूचा कानोसा घ्या
रेल्वेगाडीची शिट्टी ऐका
त्याशिवाय पुढे जावू नका
सुरक्षेचा हा मंत्र ध्यानी ठेवूनी
मध्यरेल्वेचा नियम तुम्ही पाळा ||३||
काळजी घ्या काळजी घ्या मध्यरेल्वे सांगे तुम्ही काळजी घ्या
काळजी घ्या काळजी घ्या तुम्ही काळजी घ्या
चौकीदार नाही त्या रेल्वेफाटकावर काळजी घ्या ||धृ||
मध्यरेल्वेसाठी जनहितार्थ प्रकाशीत
- पाषाणभेद (दगडफोड्या)
०९/१०/२०११
वाचने
3307
प्रतिक्रिया
9
मिसळपाव
प्रतिक्रिया
मध्यरेल्वे सांगे तुम्ही काळजी
ओसंडून वहाते आहे आगगाडी
In reply to मध्यरेल्वे सांगे तुम्ही काळजी by अविनाशकुलकर्णी
पण
In reply to ओसंडून वहाते आहे आगगाडी by वाहीदा
तेच म्हणतोय..
In reply to पण by पैसा
जरी हा फोटो मध्यरेल्वेचा नसला
In reply to तेच म्हणतोय.. by किसन शिंदे
पा. भे. हे गाणं दुरदर्शनकडे
आवडली
लाल सिग्नल तुम्हा नाही
आयला दादाने अभंग म्हणला तरी
In reply to लाल सिग्नल तुम्हा नाही by मितभाषी