✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

मध्यरेल्वे सांगे तुम्ही काळजी घ्या

प — पाषाणभेद, Sun, 10/09/2011 - 14:22
मध्यरेल्वे सांगे तुम्ही काळजी घ्या
काळजी घ्या काळजी घ्या मध्यरेल्वे सांगे तुम्ही काळजी घ्या काळजी घ्या काळजी घ्या तुम्ही काळजी घ्या चौकीदार नाही त्या रेल्वेफाटकावर काळजी घ्या ||धृ|| नका भानात वाहन चालवू नका जरा तेथे कधी थांबू दिसली नाही आगगाडी जरी जरा वेगात चलावं रुळावरी सांगतो तुम्हा काळजीनं पुन्हा दोन्ही बाजूला डोळे उघडून पहा ||१|| लाल सिग्नल तुम्हा नाही दिसला जरी हिरवा दिवा लागलेला नसला नका घालू तुम्ही तेथे तुमची गाडी घातली तर होतील बारा भानगडी अपघात होईल जीव तुमचा जाईल कशाला मध्यरेल्वेला धडकता? ||२|| दोन्ही बाजूला तुम्ही पहा आजूबाजूचा कानोसा घ्या रेल्वेगाडीची शिट्टी ऐका त्याशिवाय पुढे जावू नका सुरक्षेचा हा मंत्र ध्यानी ठेवूनी मध्यरेल्वेचा नियम तुम्ही पाळा ||३|| काळजी घ्या काळजी घ्या मध्यरेल्वे सांगे तुम्ही काळजी घ्या काळजी घ्या काळजी घ्या तुम्ही काळजी घ्या चौकीदार नाही त्या रेल्वेफाटकावर काळजी घ्या ||धृ|| मध्यरेल्वेसाठी जनहितार्थ प्रकाशीत - पाषाणभेद (दगडफोड्या) ०९/१०/२०११

प्रतिक्रिया द्या
3289 वाचन

💬 प्रतिसाद (9)

मध्यरेल्वे सांगे तुम्ही काळजी

अविनाशकुलकर्णी
Sun, 10/09/2011 - 15:42 नवीन
मध्यरेल्वे सांगे तुम्ही काळजी घ्या Image removed.
  • Log in or register to post comments

ओसंडून वहाते आहे आगगाडी

वाहीदा
Sun, 10/09/2011 - 20:52 नवीन
त्यात बसलेल्या ड्रायव्हर ला तरी पुढचे रुळ दिसत आहेत का ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अविनाशकुलकर्णी

पण

पैसा
Mon, 10/10/2011 - 10:29 नवीन
ही मुंबईतली मध्य रेल्वे वाटत नाही. फेव्हिकोलची जाहिरात नाही ना?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वाहीदा

तेच म्हणतोय..

किसन शिंदे
Mon, 10/10/2011 - 10:42 नवीन
हि मध्य रेल्वे मुळीच नाहीये, एवढा जास्त आगाऊपणा मध्य रेल्वेचे प्रवासी कधीच करत नाहीत. काय हो कुलकर्णी, मध्य रेल्वेच्या नावावर कोणत्याही ऐर्‍यागैर्‍या आगगाडीचे फोटो खपवताय का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

जरी हा फोटो मध्यरेल्वेचा नसला

पाषाणभेद
Mon, 10/10/2011 - 13:44 नवीन
जरी वरील फोटो मध्यरेल्वेचा नसला तरी तो भारतीय रेल्वेचा निश्चितच वाटतो आहे कारण बांग्लादेश रेल्वेपेक्षा थोडी गर्दी कमी दिसते आहे! पुषठ्यर्थ हे पहा: Image removed. A crowded train in Bangladesh on Dual Gauge track Image removed. Passengers crowd atop a train at a railway station in the Bangladeshi capital Dhaka on September 20, 2009. अवांतरः तरीही वरील सर्व फोटो या कवितेच्या दृष्टीने अनाठायी वाटत आहेत. खालील फोटो समर्पक आहेत. Image removed. Image removed. Image removed. फोटोसौजन्यः आंतरजाळं
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: किसन शिंदे

पा. भे. हे गाणं दुरदर्शनकडे

अत्रुप्त आत्मा
Sun, 10/09/2011 - 16:38 नवीन
पा. भे. हे गाणं दुरदर्शनकडे पाठवलं की नाही...? :-) @अविनाश कुलकर्णी> चित्र ''भारी''च जड टाकलत बाकी ... ;-)
  • Log in or register to post comments

आवडली

पप्पु अंकल
Mon, 10/10/2011 - 10:17 नवीन
आणी शेवटच जनहितार्थ जाम भारी
  • Log in or register to post comments

लाल सिग्नल तुम्हा नाही

मितभाषी
Mon, 10/10/2011 - 14:43 नवीन
लाल सिग्नल तुम्हा नाही दिसला जरी हिरवा दिवा लागलेला नसला नका घालू तुम्ही तेथे तुमची गाडी घातली तर होतील बारा भानगडी अपघात होईल जीव तुमचा जाईल कशाला मध्यरेल्वेला धडकता? ||२|| हाहाहा =)) =)) आयला दादाने अभंग म्हणला तरी हसु आल्याशिवाय रहाणार नाही. पाभे वंदन तुमच्या प्रतिभेला........
  • Log in or register to post comments

आयला दादाने अभंग म्हणला तरी

मेघवेडा
Mon, 10/10/2011 - 14:51 नवीन
आयला दादाने अभंग म्हणला तरी हसु आल्याशिवाय रहाणार नाही.
अगदी अगदी! पाभे, गाणं मस्त लिहिलंय.. प.रे. च्या "क्रॉसिंगसाठी पूल वापरा" हा संदेश देणार्‍या गाण्या*ची आठवण झाली. नक्कीच पाठवून द्या मध्य रेल्वेकडेच.. कुणी पंडित सिद्धेस्वरकुमार दुबे वगैरे एक सुंदर चाल लावेल आणि तुमचंही गाणं स्टेशनांवर वाजू लागेल! * प. रे. चं गाणं - "घर पर कोई अपना है जो आपसे करता बेहद प्यार रोज शाम को करता है जो आपका घरपर इंतजार रेल की पटरी .. <टडंगंडंग टडंग> पार ना करे, पुलों का करे इस्तमाल आप रहेंगे सदा सुरक्षित और हमेशा ही खुशहाल" व्हिडिओ मिळाल्यास मागाहून अपलोड करणेत येईल! ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मितभाषी

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा