Skip to main content

माळरान अन् ते दोघे!! -- ३

लेखक मिसळलेला काव्यप्रेमी यांनी शुक्रवार, 07/10/2011 10:37 या दिवशी प्रकाशित केले.
माळरान अन् ते दोघे!! -- २ आज वारा जरा वेगळ्याच दिशेने वाहत होता हिरव्या झाडातून आनंदाचे धुमारे फुटत होते आज त्याच्या फांद्यांना लय सापडली होती . हाच वारा, जेव्हा वठलेल्या झाडातून फिरायचा एक शिळ घुमायची काय म्हणतात बरे त्याला . . हम्म... हृदयद्रावक . तिकडे हिरवे झाड मात्र आज खूप खुश होते चार नविन कळ्या उमलत होत्या त्याच्या दोन काहीश्या मोठ्या अन् दोन अगदीच अल्लड, नाजूक . त्या मोठ्या कळ्या जरा उदासच होत्या . . बहुदा त्यांना फक्त त्या उजाड माळरानावरचे वठलेले झाडच दिसत होते . अन् दुसर्‍या दोन अल्लड कळ्या त्या खुश होत्या त्यांना मोठ्या उमलणार्‍या कळ्या दिसत होत्या उमलणार्‍या . . दृष्टीचा हा खेळ अजबच (क्रमशः) |- मिसळलेला काव्यप्रेमी -| (०७/१०/२०११)
काव्यरस
लेखनविषय:

वाचने 2164
प्रतिक्रिया 4

प्रतिक्रिया

अच्छा चल रहा है... लगे रहो... अवांतर- हे क्रमशः काव्य नसुन दीर्घ काव्य आहे...असे आंम्ही म्हणु का? ;-)

५० राव, काव्यमालिका म्हणा पायजे तर!