✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

कोण येथे गुरुवर्य ?

ग — गणेशा, Tue, 10/04/2011 - 22:10
कोण येथे गुरुवर्य ? खितपत पडले शौर्य अहिंसेचे पुतळे मानतो मौनात दडले क्रौर्य झाकोळला स्पष्ट अंधार मुखवट्यात गळले धैर्य स्त्रीत्वाची ताकद जाणतो खुऱाड्यात लुटले कौमार्य घुंगूरपाण्यात डुबले नेत्र कळले कोणास सूरगांभिर्य दगडात ईश्वर जाणतो देवत्व शोधतो सूर्य भावनांचा गच्च बाजार मनात हरवले माधुर्य वैराग्यात निरपेक्षता मानतो अहंकारातून घडते कार्य ---- शब्दमेघ (कविता पुन:प्रकाशित)

प्रतिक्रिया द्या
4294 वाचन

💬 प्रतिसाद (18)

चांगली कविता.

इंटरनेटस्नेही
Tue, 10/04/2011 - 22:13 नवीन
चांगली कविता.
  • Log in or register to post comments

छान व अर्थपूर्ण ! मी रसग्रहणच

जयंत कुलकर्णी
Tue, 10/04/2011 - 22:14 नवीन
छान व अर्थपूर्ण ! मी रसग्रहणच करणार होतो पण आत्ता शक्य नाही. कविता मला आवडली.
  • Log in or register to post comments

वैराग्यात निरपेक्षता

अत्रुप्त आत्मा
Tue, 10/04/2011 - 22:22 नवीन
वैराग्यात निरपेक्षता मानतो अहंकारातून घडते कार्य............... अर्थपूर्ण... कविता तर खुपच अवडली.....
  • Log in or register to post comments

प्रभावी आणि अर्थपूर्ण कविता

जाई.
Tue, 10/04/2011 - 22:26 नवीन
प्रभावी आणि अर्थपूर्ण कविता
  • Log in or register to post comments

सुरेख

प्रचेतस
Tue, 10/04/2011 - 22:29 नवीन
मिपावरच्या सध्याच्या घडामोडींना पण साजेशीच आहे.
  • Log in or register to post comments

जबरदस्त रे. मानलं.... राव.

आत्मशून्य
Tue, 10/04/2011 - 22:32 नवीन
अवांतर :- "खितपत पडले शौर्य" च्या जागी चूकून भलतंच वाचलं ना बे... ;)
  • Log in or register to post comments

गणेशा -खूपच छान . झाकोळला

प्रकाश१११
Tue, 10/04/2011 - 22:32 नवीन
गणेशा -खूपच छान . झाकोळला स्पष्ट अंधार मुखवट्यात गळले धैर्य स्त्रीत्वाची ताकद जाणतो खुऱाड्यात लुटले कौमार्य आवडली ....
  • Log in or register to post comments

आवडली

राजेश घासकडवी
Wed, 10/05/2011 - 00:32 नवीन
कविता आवडली. कोणाकडून काय घ्यावे च्या विरुद्ध अर्थाची आहे. तत्वं सगळीकडे ऐकू येतात पण प्रत्यक्षात मात्र विपरित घडताना दिसतं हे अधोरेखित केलेलं आहे. कडव्यांची रचना थोडी अभिनव आहे, त्यामुळे सुरूवातीला कोड्यात पडलो होतो.
  • Log in or register to post comments

मस्त रे छान कविता आवडली,

५० फक्त
Wed, 10/05/2011 - 09:09 नवीन
मस्त रे छान कविता आवडली,
  • Log in or register to post comments

कविता आवडली. सद्गुणांचा

नगरीनिरंजन
Wed, 10/05/2011 - 09:22 नवीन
कविता आवडली. सद्गुणांचा उदोउदो आणि भावभावनांचे अवडंबर यात प्रत्येक गोष्टीचा झालेला विपर्यास छान मांडला आहे.
  • Log in or register to post comments

सुंदर कविता.

धन्या
Wed, 10/05/2011 - 10:43 नवीन
सुंदर कविता.
  • Log in or register to post comments

अखेर

मिसळलेला काव्यप्रेमी
Wed, 10/05/2011 - 11:28 नवीन
अखेर हि कविता आलीच. खुप सुंदर आहे.
घुंगूरपाण्यात डुबले नेत्र कळले कोणास सूरगांभिर्य दगडात ईश्वर जाणतो देवत्व शोधतो सूर्य
हे तर बिनतोड!!
  • Log in or register to post comments

अप्रतिम

ज्ञानराम
Wed, 10/05/2011 - 14:41 नवीन
अप्रतिम.......
  • Log in or register to post comments

सर्वांच्या इतक्या छान

गणेशा
Wed, 10/05/2011 - 20:14 नवीन
सर्वांच्या इतक्या छान प्रतिक्रिया वाचुन छान वाटले... मनापासुन धन्यवाद ...
  • Log in or register to post comments

मस्त रे!

पैसा
Wed, 10/05/2011 - 20:21 नवीन
नेहमीपेक्षा वेगळाच विषय घेतलास. छान!
  • Log in or register to post comments

कोणीतरी रसग्रहण करा याचे.

शिल्पा ब
Wed, 10/05/2011 - 21:55 नवीन
कोणीतरी रसग्रहण करा याचे. कविता आवडली पण फारशी समजली नै...नेहमीप्रमाणेच. :(
  • Log in or register to post comments

आवडली

तिमा
गुरुवार, 10/06/2011 - 17:28 नवीन
कविता आवडली. उच्च दर्जाची !!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शिल्पा ब

+१

मी-सौरभ
Sun, 10/09/2011 - 10:12 नवीन
कळतयं कळतयं असे वाटत असताना शेवटी पार गुंता होऊन जातो ती कविता उच्च दर्जाचीच असतेच... कोणीतरी रसग्रहण करा ना............
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तिमा

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा