Skip to main content

कोण येथे गुरुवर्य ?

लेखक गणेशा यांनी मंगळवार, 04/10/2011 22:10 या दिवशी प्रकाशित केले.
कोण येथे गुरुवर्य ? खितपत पडले शौर्य अहिंसेचे पुतळे मानतो मौनात दडले क्रौर्य झाकोळला स्पष्ट अंधार मुखवट्यात गळले धैर्य स्त्रीत्वाची ताकद जाणतो खुऱाड्यात लुटले कौमार्य घुंगूरपाण्यात डुबले नेत्र कळले कोणास सूरगांभिर्य दगडात ईश्वर जाणतो देवत्व शोधतो सूर्य भावनांचा गच्च बाजार मनात हरवले माधुर्य वैराग्यात निरपेक्षता मानतो अहंकारातून घडते कार्य ---- शब्दमेघ (कविता पुन:प्रकाशित)
काव्यरस
लेखनविषय:

वाचने 4328
प्रतिक्रिया 18

प्रतिक्रिया

वैराग्यात निरपेक्षता मानतो अहंकारातून घडते कार्य............... अर्थपूर्ण... कविता तर खुपच अवडली.....

मिपावरच्या सध्याच्या घडामोडींना पण साजेशीच आहे.

गणेशा -खूपच छान . झाकोळला स्पष्ट अंधार मुखवट्यात गळले धैर्य स्त्रीत्वाची ताकद जाणतो खुऱाड्यात लुटले कौमार्य आवडली ....

कविता आवडली. कोणाकडून काय घ्यावे च्या विरुद्ध अर्थाची आहे. तत्वं सगळीकडे ऐकू येतात पण प्रत्यक्षात मात्र विपरित घडताना दिसतं हे अधोरेखित केलेलं आहे. कडव्यांची रचना थोडी अभिनव आहे, त्यामुळे सुरूवातीला कोड्यात पडलो होतो.

कविता आवडली. सद्गुणांचा उदोउदो आणि भावभावनांचे अवडंबर यात प्रत्येक गोष्टीचा झालेला विपर्यास छान मांडला आहे.

अखेर हि कविता आलीच. खुप सुंदर आहे.
घुंगूरपाण्यात डुबले नेत्र कळले कोणास सूरगांभिर्य दगडात ईश्वर जाणतो देवत्व शोधतो सूर्य
हे तर बिनतोड!!

नेहमीपेक्षा वेगळाच विषय घेतलास. छान!

In reply to by तिमा

कळतयं कळतयं असे वाटत असताना शेवटी पार गुंता होऊन जातो ती कविता उच्च दर्जाची असतेच... कोणीतरी रसग्रहण करा ना............