कोण येथे गुरुवर्य ?
खितपत पडले शौर्य
अहिंसेचे पुतळे मानतो
मौनात दडले क्रौर्य
झाकोळला स्पष्ट अंधार
मुखवट्यात गळले धैर्य
स्त्रीत्वाची ताकद जाणतो
खुऱाड्यात लुटले कौमार्य
घुंगूरपाण्यात डुबले नेत्र
कळले कोणास सूरगांभिर्य
दगडात ईश्वर जाणतो
देवत्व शोधतो सूर्य
भावनांचा गच्च बाजार
मनात हरवले माधुर्य
वैराग्यात निरपेक्षता मानतो
अहंकारातून घडते कार्य
---- शब्दमेघ
(कविता पुन:प्रकाशित)
काव्यरस
| लेखनविषय: |
|---|
वाचने
4328
प्रतिक्रिया
18
मिसळपाव
प्रतिक्रिया
चांगली कविता.
छान व अर्थपूर्ण ! मी रसग्रहणच
वैराग्यात निरपेक्षता
प्रभावी आणि अर्थपूर्ण कविता
सुरेख
जबरदस्त रे. मानलं.... राव.
गणेशा -खूपच छान . झाकोळला
आवडली
मस्त रे छान कविता आवडली,
कविता आवडली. सद्गुणांचा
सुंदर कविता.
अखेर
अप्रतिम
सर्वांच्या इतक्या छान
मस्त रे!
कोणीतरी रसग्रहण करा याचे.
आवडली
In reply to कोणीतरी रसग्रहण करा याचे. by शिल्पा ब
+१
In reply to आवडली by तिमा