Skip to main content

(ठसे)

लेखक चतुरंग यांनी शुक्रवार, 11/07/2008 19:39 या दिवशी प्रकाशित केले.
सुखावलं की लाडात यायचं.. मनोमन हुंदडायचं! दुखावलं की भुंकायचं.. आतल्या आत गुरगुरायचं! रस्त्या-रस्त्याच्या किनारी, ठसे उमटवत जायचं.. एक ठसा ओला! एक ठसा कोरडा! एक ठसा मातीतून उठून, एका मनावर गेला उमटून.. एका ठशात पाणी साठून, एक डोळ्यात आला भरुन.. 'मागे' वळून पाहताना मग.. तळीच डोळ्यात येतात जमून!! डोळ्यांकाठच्या ओल्या किनारी 'बोरिस'च्या आठवणी रहाती भरुन! (स्वाती ताईंचे सुंदर काव्य 'ठसे' वाचून एका क्षणात ठशांची गर्दी मनात झाली आणि निरपेक्ष प्रेमात चिंब भिजवणारा माझा लाडका 'बोरिस' जाऊन १० वर्षे झाली त्याच्या आठवणीने मनात उमटलेले ठसे असे बाहेर पडले....) चतुरंग (ता.क. सुरुवातीला हे काव्य 'विडंबन' ह्या प्रकाराखाली टाकले होते पण त्यातला गंभीर आशय लक्षात घेता पुनः संपादित करुन काव्य प्रकारात टाकले आहे, त्यामुळे सदस्यांच्या प्रतिक्रिया थोड्या विसंगत वाटतील, क्षमस्व!)
Taxonomy upgrade extras
लेखनविषय:

वाचने 4045
प्रतिक्रिया 13

प्रतिक्रिया

In reply to by चतुरंग

कविता वेळेची वाट बघत नाही! १००% सहमत (सहमत)केशवसुमार स्वगतः ह्याला नक्की कविताच म्हणायचे होते का? :W

'मागे' वळून पाहताना मग.. तळीच डोळ्यात येतात जमून!! डोळ्यांकाठच्या ओल्या किनारी 'बोरिस'च्या आठवणी रहाती भरुन! वा! अतिशय सुरेख विडंबन रे रंगा! आपला, (जुन्या ठशांतच बहुत करून रमणारा!) तात्या.

एक ठसा मातीतून उठून, एका मनावर गेला उमटून.. एका ठशात पाणी साठून, एक डोळ्यात आला भरुन.. बाकी केसुजींनी म्हटल्याप्रमाणे हे गंभीर विडंबन!