सुखावलं की लाडात यायचं..
मनोमन हुंदडायचं!
दुखावलं की भुंकायचं..
आतल्या आत गुरगुरायचं!
रस्त्या-रस्त्याच्या किनारी,
ठसे उमटवत जायचं..
एक ठसा ओला!
एक ठसा कोरडा!
एक ठसा मातीतून उठून,
एका मनावर गेला उमटून..
एका ठशात पाणी साठून,
एक डोळ्यात आला भरुन..
'मागे' वळून पाहताना मग..
तळीच डोळ्यात येतात जमून!!
डोळ्यांकाठच्या ओल्या किनारी
'बोरिस'च्या आठवणी रहाती भरुन!
(स्वाती ताईंचे सुंदर काव्य 'ठसे' वाचून एका क्षणात ठशांची गर्दी मनात झाली आणि निरपेक्ष प्रेमात चिंब भिजवणारा माझा लाडका 'बोरिस' जाऊन १० वर्षे झाली त्याच्या आठवणीने मनात उमटलेले ठसे असे बाहेर पडले....)
चतुरंग
(ता.क. सुरुवातीला हे काव्य 'विडंबन' ह्या प्रकाराखाली टाकले होते पण त्यातला गंभीर आशय लक्षात घेता पुनः संपादित करुन काव्य प्रकारात टाकले आहे, त्यामुळे सदस्यांच्या प्रतिक्रिया थोड्या विसंगत वाटतील, क्षमस्व!)
मिसळपाव
प्रतिक्रिया
बोरीसच
बोरीसच फोटोही टाकायचा ना....
टाकीन ना, आत्ता लगेच माझ्या हातात नाहीये!
In reply to बोरीसच by यशोधरा
कविता वेळेची वाट बघत नाही!
चतुरंग
हा हा हा!!!
In reply to टाकीन ना, आत्ता लगेच माझ्या हातात नाहीये! by चतुरंग
कविता वेळेची वाट बघत नाही!
१००% सहमत
(सहमत)केशवसुमार
स्वगतः ह्याला नक्की कविताच म्हणायचे होते का? :W
ह्म्म
रंगाशेठ,
एकदम गंभीर विडंबन..
केशवसुमार
प्रकाटाआ
In reply to ह्म्म by केशवसुमार
प्रतिसाद काढून टाकला आहे.
हेच म्हणते
गंभीर आणि सुंदर विडंबन
"The future belongs to those who believe in the beauty of their dreams" ~ Eleanor Roosevelt
सुरेख...
'मागे' वळून पाहताना मग..
तळीच डोळ्यात येतात जमून!!
डोळ्यांकाठच्या ओल्या किनारी
'बोरिस'च्या आठवणी रहाती भरुन!
वा! अतिशय सुरेख विडंबन रे रंगा!
आपला,
(जुन्या ठशांतच बहुत करून रमणारा!) तात्या.
क्लास!
एक ठसा मातीतून उठून,
एका मनावर गेला उमटून..
एका ठशात पाणी साठून,
एक डोळ्यात आला भरुन..
बाकी केसुजींनी म्हटल्याप्रमाणे हे गंभीर विडंबन!
मस्त एकदम..
विडंबन असली तरी कविता वाचून कालवा कालव झाली मनात..
- (सर्वव्यापी)प्राजु
https://praaju.blogspot.com/
लळा लावून गेला
तुम्हाला तुमचा बोरिस.
असेच म्हणतो
In reply to लळा लावून गेला by धनंजय
(सहमत)बेसनलाडू
मस्त..
हा ठसा पार्ट २ आवडला !!. :)
मदनबाण.....
विडंबन ..काव्य
वा वा