मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

वार्धक्याला शाप असतो जगण्याचा ...!!

प्रकाश१११ · · जे न देखे रवी...
हळूहळू दिवस संपून जातात तारुण्याचे नि अलगद येतात दिवस वार्धक्याचे जात नाहीत दिवस ठाम थांबून राहतात बंद पडलेल्या घड्याळासारखे ...!! तो पक्षासारखा अलगद उतरलाय ह्यां परक्या अनोळखी शहरात नि बघत बसलाय ह्या निसर्गाची झिम्म बरसात येथे नाहीत कोमेजत फुले टांगून ठेवतात फुलांचे ताटवे सुबक सुंदर खांबावर तसेच हे म्हातारपण लोंबत असते आयुष्याला झिजलेले हाडे सांभाळीत ...... ह्यांच्या साठी असतात छोट्या बाबा गाड्या हलके हलके धावत असतात मागे झेंडा लावून म्हातारपण गोंजारीत बसतात ...! तो बघत बसतोय ही म्हातारी माणसे गोर्या कातडीची घार्या डोळ्याची ह्यांची सिनियर सिटीझंसची घरे सकाळी ,संध्याकाळी शून्य नजरेने बघत बसतात हे लॉन ही झाडे , हे शांत पक्षी ..! नि हलकी रेंगाळत जाणारी वाहने शून्य नजरेने ....!! आभाळात नजर लावून बसतात वरच्या आभाळातील बाप्पाची आज किंवा उद्या येणार्या त्याच्या निरोपाची . त्या घोळक्यात तो सामील झालाय मोकळ्या मनाने शांतपणे ..येणार्या निरोपाची ....!!

वाचने 2677 वाचनखूण प्रतिक्रिया 11

प्रतिक्रिया

छान आहे.. पण आभाळात नजर लावून बसतात वरच्या आभाळातील बाप्पाची आज किंवा उद्या येणार्या त्याच्या निरोपाची . त्या घोळक्यात तो सामील झालाय मोकळ्या मनाने शांतपणे ..येणार्या निरोपाची ....!! या भागात काहीतरी मिसिंग आहे का? वाट पाहणे किंवा असा काही शब्द गळलेला वाटतो.
अतिशय सुंदर रचना. भट साहेबांची एक ओळ आठवली, "मरणाने केली सुटका, जगण्याने छळले होते" @गवि, माझ्या मते ते जाणून बुजून मिसिंग ठेवले आहे.
आभाळात नजर लावून बसतात वरच्या आभाळातील बाप्पाची आज किंवा उद्या येणार्या त्याच्या निरोपाची .
या ओळी त्याचे उत्तर आहे, आणि कवितेतील नायकाच्या मनातील संभ्रम नंतरच्या ओळींमध्ये
त्या घोळक्यात तो सामील झालाय मोकळ्या मनाने शांतपणे ..येणार्या निरोपाची
आणि नंतर येणारे "...!!" हे त्या वाट पाहण्याची तीव्रता दाखवते.
अनारोग्य.. निर्धनता.. न पुर्ण झालेल्या जबाब दा~या.. न फिटलेले कर्ज..कोर्ट कचे~या....सथिदाराचा मृत्यु.. असेल तर हा शाप आणखिनच भयावह वाटतो
येथे परदेशात मी बघतोय सिनियर सिटीझनची घरे ,ईमारती बिल्डीगच्या आवारात १०-१२ खुर्च्यावर ही सकाळ संध्याकाळ बसलेली असतात . वय जवळ जवळ ७५-८० च्या आसपास .शांत बसलेली असतात . फूटपाथवर एखादा म्हातारा छोट्या गाडीवर बसून फिरताना दिसतो. हे सगळे बघून हे सुचून गेले. आपणा सर्वांचे मनापासून आभार .!!