हळूहळू दिवस संपून जातात तारुण्याचे
नि अलगद येतात दिवस वार्धक्याचे
जात नाहीत दिवस
ठाम थांबून राहतात
बंद पडलेल्या घड्याळासारखे ...!!
तो पक्षासारखा
अलगद उतरलाय ह्यां परक्या
अनोळखी शहरात
नि बघत बसलाय
ह्या निसर्गाची झिम्म बरसात
येथे नाहीत कोमेजत फुले
टांगून ठेवतात फुलांचे ताटवे
सुबक सुंदर खांबावर
तसेच हे म्हातारपण
लोंबत असते आयुष्याला
झिजलेले हाडे सांभाळीत ......
ह्यांच्या साठी असतात छोट्या बाबा गाड्या
हलके हलके धावत असतात
मागे झेंडा लावून
म्हातारपण गोंजारीत बसतात ...!
तो बघत बसतोय ही म्हातारी माणसे
गोर्या कातडीची घार्या डोळ्याची
ह्यांची सिनियर सिटीझंसची घरे
सकाळी ,संध्याकाळी
शून्य नजरेने बघत बसतात
हे लॉन
ही झाडे ,
हे शांत पक्षी ..!
नि हलकी रेंगाळत जाणारी वाहने
शून्य नजरेने ....!!
आभाळात नजर लावून बसतात
वरच्या आभाळातील बाप्पाची
आज किंवा उद्या येणार्या त्याच्या निरोपाची .
त्या घोळक्यात तो सामील झालाय
मोकळ्या मनाने
शांतपणे ..येणार्या निरोपाची ....!!
काव्यरस
| लेखनविषय: |
|---|
वाचने
2678
प्रतिक्रिया
11
मिसळपाव
प्रतिक्रिया
वाचले. टोचले. पण...
खूप भिडणारी कविता आहे.
In reply to वाचले. टोचले. पण... by मन१
छान कविता चांगली जमलिये
छान कविता... म्हातारपण म्हणजे
छान आहे.. पण आभाळात नजर
संध्या छाया भिवविती हृदया
वाह!!
अच्छा.. असं.. धन्यवाद मिका..
In reply to वाह!! by मिसळलेला काव्यप्रेमी
मस्त हो प्रकाशजी
अनारोग्य.. निर्धनता.. न पुर्ण
येथे परदेशात मी बघतोय सिनियर