Skip to main content

मिसळपाव प्रतिष्ठान..!

लेखक विसोबा खेचर यांनी मंगळवार, 26/05/2009 14:18 या दिवशी प्रकाशित केले.
राम राम मंडळी, संगीत, साहित्य, व कला आदींना वाहिलेली 'मिसळपाव प्रतिष्ठान' या विश्वस्त संस्थेची आम्ही नोंदणी केली आहे. आई अंबाबाई, पंढरीचा विठोबा आणि लालबागचा राजा यांच्या कृपाशीर्वादामुळे येत्या गणेश चतुर्थीच्या दिवशी आम्ही 'मिसळपाव प्रतिष्ठान' या संस्थेचा शुभारंभ करत आहोत! वरील देवतांच्या कृपेमुळे जगभरातून अनेकानेक दानशूर मराठमोळ्या मंडळींचे मदतीचे हात पुढे आले आहेत, येताहेत, त्यातूनच मिसळपाव प्रतिष्ठान ही संस्था उभी राहणार आहे! मिसळपाव प्रतिष्ठानची ध्येयधोरणे व उद्दिष्टे - १) संगीत, साहित्य व कला यांच्याशी निगडीत नानाविध कार्यक्रम प्रामुख्याने मुबै-पुण्यात व कोणी जबाबदारी घेणार असल्यास जमल्यास जगभरातदेखील करणे. मिसळपाव प्रतिष्ठानला योग्य वाटल्यास संगीत, साहित्य व कला यांच्याशी निगडीत इतर काही कार्यक्रमही प्रायोजित करणे, २) दरवर्षी संगीत-साहित्य व कला या क्षेत्रातील एखाद्या बुजूर्ग व्यक्तिमत्वाची निवड करून त्याच्या यथोचित सत्कार-समारंभाचा एखादा देखणा कार्यक्रम करणे, प्रतिष्ठानच्या ऐपतीप्रमाणे त्यांना थैली देणे व अधिकारी व्यक्तिकडून त्यांना मिसळपाव प्रतिष्ठानचे मानपत्र देणे, ३) मिसळपाव डॉट कॉम वरील साहित्याला, लेखांना, कलादालनाला, पाककृतींना संबंधित लेखकांच्या परवानगीने मासिक रुपात प्रसिद्धी देणे. ४) मिसळपाव प्रतिष्ठान तर्फे दरवर्षी एक ठराविक रक्कम भारयीत सैन्य दलाला देणे, ५) मिसळपाव प्रतिष्ठान तर्फे दरवर्षी एक ठराविक रक्कम पुण्यातील महर्षी कर्वे स्त्रीशिक्षण संस्था आणि इंडियन कॅन्सर सोसायटी या संस्थांना देणे. मिसळपाव डॉट कॉम ज्या प्रमाणे आंतरजालावर मराठी भाषेचा प्रसार आणि प्रचार करत आहे, त्याचप्रमाणे मिसळपाव प्रतिष्ठान ही संस्था नुसती आभासी किंवा ऑनलाईन न राहता संगीत, साहित्य, कला आणि सामाजिक क्षेत्रात प्रत्यक्ष कार्य करेल. आदिशक्ति आई अंबाबाई, पंढरीचा विठोबा आणि लालबागचा राजा कार्य सिद्धीस नेण्यास समर्थ आहेतच, परंतु मिसळपाव डॉट कॉमच्या सभासदांचाही आशीर्वाद हवा म्हणून हे निवेदन..! मिसळपाव धर्म वाढावा मिसळपाव धर्म जागवा..! आपला नम्र, तात्या अभ्यंकर, १) मालक, मुख्य व्यवस्थापकीय अधिकारी, मिसळपाव डॉट कॉम २) प्रमूख कार्यकारी विश्वस्त (संकल्पित), मिसळपाव प्रतिष्ठान.

वाचने 23466
प्रतिक्रिया 75

प्रतिक्रिया

तूर्तास तरी माझ्याकडून प्रतिष्ठानबद्दल काहीही होण्यासारखे नाही. परंतु आज ना उद्या होईल हेही तेवढेच निश्चित..! हा धागा मुख्य पटलावर आल्यामुळे हा खुलासा.. तात्या.

नमस्कार तात्या बरेच दिवसांनी लेखन भेट होते आहे. फार वर्षापूर्वीपासून मी तुमचे लिखाण वाचतो आहे. बर्‍याच वर्षांपूर्वी तुम्ही माझ्या एका प्रश्नाला माहितीपूर्ण उत्तर देखील दिले होते. (मिसळपाववर नक्कीच नाही कुठे ते नंतर सविस्तर लिहिन) असो गेले ते दिवस