Skip to main content

मिसळपाव प्रतिष्ठान..!

लेखक विसोबा खेचर यांनी मंगळवार, 26/05/2009 14:18 या दिवशी प्रकाशित केले.
राम राम मंडळी, संगीत, साहित्य, व कला आदींना वाहिलेली 'मिसळपाव प्रतिष्ठान' या विश्वस्त संस्थेची आम्ही नोंदणी केली आहे. आई अंबाबाई, पंढरीचा विठोबा आणि लालबागचा राजा यांच्या कृपाशीर्वादामुळे येत्या गणेश चतुर्थीच्या दिवशी आम्ही 'मिसळपाव प्रतिष्ठान' या संस्थेचा शुभारंभ करत आहोत! वरील देवतांच्या कृपेमुळे जगभरातून अनेकानेक दानशूर मराठमोळ्या मंडळींचे मदतीचे हात पुढे आले आहेत, येताहेत, त्यातूनच मिसळपाव प्रतिष्ठान ही संस्था उभी राहणार आहे! मिसळपाव प्रतिष्ठानची ध्येयधोरणे व उद्दिष्टे - १) संगीत, साहित्य व कला यांच्याशी निगडीत नानाविध कार्यक्रम प्रामुख्याने मुबै-पुण्यात व कोणी जबाबदारी घेणार असल्यास जमल्यास जगभरातदेखील करणे. मिसळपाव प्रतिष्ठानला योग्य वाटल्यास संगीत, साहित्य व कला यांच्याशी निगडीत इतर काही कार्यक्रमही प्रायोजित करणे, २) दरवर्षी संगीत-साहित्य व कला या क्षेत्रातील एखाद्या बुजूर्ग व्यक्तिमत्वाची निवड करून त्याच्या यथोचित सत्कार-समारंभाचा एखादा देखणा कार्यक्रम करणे, प्रतिष्ठानच्या ऐपतीप्रमाणे त्यांना थैली देणे व अधिकारी व्यक्तिकडून त्यांना मिसळपाव प्रतिष्ठानचे मानपत्र देणे, ३) मिसळपाव डॉट कॉम वरील साहित्याला, लेखांना, कलादालनाला, पाककृतींना संबंधित लेखकांच्या परवानगीने मासिक रुपात प्रसिद्धी देणे. ४) मिसळपाव प्रतिष्ठान तर्फे दरवर्षी एक ठराविक रक्कम भारयीत सैन्य दलाला देणे, ५) मिसळपाव प्रतिष्ठान तर्फे दरवर्षी एक ठराविक रक्कम पुण्यातील महर्षी कर्वे स्त्रीशिक्षण संस्था आणि इंडियन कॅन्सर सोसायटी या संस्थांना देणे. मिसळपाव डॉट कॉम ज्या प्रमाणे आंतरजालावर मराठी भाषेचा प्रसार आणि प्रचार करत आहे, त्याचप्रमाणे मिसळपाव प्रतिष्ठान ही संस्था नुसती आभासी किंवा ऑनलाईन न राहता संगीत, साहित्य, कला आणि सामाजिक क्षेत्रात प्रत्यक्ष कार्य करेल. आदिशक्ति आई अंबाबाई, पंढरीचा विठोबा आणि लालबागचा राजा कार्य सिद्धीस नेण्यास समर्थ आहेतच, परंतु मिसळपाव डॉट कॉमच्या सभासदांचाही आशीर्वाद हवा म्हणून हे निवेदन..! मिसळपाव धर्म वाढावा मिसळपाव धर्म जागवा..! आपला नम्र, तात्या अभ्यंकर, १) मालक, मुख्य व्यवस्थापकीय अधिकारी, मिसळपाव डॉट कॉम २) प्रमूख कार्यकारी विश्वस्त (संकल्पित), मिसळपाव प्रतिष्ठान.

वाचने 23466
प्रतिक्रिया 75

प्रतिक्रिया

मदत करायला अवश्य आवडेल! तात्या, तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ है! प्रतिसाद म्हणजे जणू लग्नातले आहेर. एकदा घेतलेत की... बसा आयुष्यभर फेडत. ;)

In reply to by अनंता

व्वा तात्या, अभिनंदन. खुप चांगली संकल्पना आहे. आम्हालाही आपाप्ल्या परीने हातभार लावायला मनापासुन आवडेल. सस्नेह विशाल ************************************************************* "प्रतिसाद पाहुनी मी झालो पसार नाही, मी कोडगा कवी जो विझण्या तयार नाही? गेले अनेक वाचक सांगून रोज मजला, पण बंद लेखणी मी करण्या तयार नाही!" (सौजन्य : माननीय मिपाकर श्री श्री

In reply to by विशाल कुलकर्णी

कोल्हापुर विभागात काम करायला मनापासुन अवडेल स्वार्थाचा लवलेशही नसावा गर्वाचा स्पर्शही नसावा असा जन्म लाभावा कि देहच चंदन व्हावा...... विनायक पाचलग

वा वा तात्या, सुंदर बातमी. मनःपूर्वक शुभेच्छा!

In reply to by मेघना भुस्कुटे

हेच म्हणतो तात्या. अभिनंदन !! चला आता पुण्यातली कामे सांगा.

In reply to by आनंदयात्री

तात्यांचे अभिनंदन असेच म्हणतो. आमच्या करण्यायोग्य काही कामे असल्यास अवश्य कळावावे. संगीत वगैरे आमच्या बस की बात नाही पण कला, साहित्य ह्यात आम्ही जरुर ४ हात मारु शकतो ... जेव्हा केव्हा असे काही येईल तेव्हा जरुर साद घालावी. तुर्तास शुभेच्छा ...!!!! ------ ( शुभेच्छुक ) छोटा डॉन एखादा "प्रण अथवा रिझॉल्युशन" म्हणजे काय ? जास्त काही नाही, मस्त गाजावाजा करुन ८ दिवसातच पहिली पाने पंचावन्न करणे. आता आमचा "लेखन करण्याच्या" प्रतिज्ञेचेच पहा ना ... ;)

तात्या, नविन संकल्पाला मनापासून शुभेच्छा... सवडीने बोलतो. बिपिन कार्यकर्ते

तात्या, बातमी वाचून आनंद झाला, संकल्पाला मनापासून शुभेच्छा! स्वाती

In reply to by स्वाती दिनेश

तात्या, बातमी वाचून आनंद झाला, संकल्पाला मनापासून शुभेच्छा! हेच म्हणतो.. खुप खुप शुभेच्छा मिसळपावची भरभराट होवो :)

तात्या तुमचे व सर्व मिपाकरांचे मनापासुन हार्दिक अभिनंदन. =D> =D> =D> =D> =D> खुप आनंद झाला. त्रिवार अभिनंदन. खुप छान उपक्रम आहे. मला यासाठी काही करता आले तर आनंदच होइल. मार्गदर्शन करावे. माझ्या माहितीप्रमाणे ९ एप्रिल २००९ ला मिपाला अंतर्जालावर २ वर्षे झाली एवढे वृद्धींगत झाले हे संस्थळ. त्यातच भर म्हणुन मिसळपाव प्रतिष्ठान ची स्थापना. हा उपक्रम भरगोस यश प्राप्त करो हीच सदिच्छा!!! पुन्हा एकदा अभिनंदन!!!!!! आपला मराठमोळा. कोणत्याही गोष्टीचा ताप येईपर्यंत ठीक असते, पण तिचा कर्करोग होऊ देऊ नये!!

मिसळपाव डॉट कॉमच्या सभासदांचाही आशीर्वाद हवा म्हणून हे निवेदन..!>>> काय तात्याहे !!!आपण मोठे आहात मानाने ही आणी मनाने. आम्ही काय आशीर्वाद देणार..आपल्या सक॑ल्पाला मनःपूर्वक शुभेच्छा! बाकी मदत करायला अवश्य आवडेल! तात्या, तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ है! हेच म्हणतो......... सुहास पेश॑ट :डॉक्टर, मला अलीकडे स॑डा*ला होत नाही.. डॉक्टर : ठीक आहे ,मग पलीकडे बसत जा....

शुभेच्छा. ध्येयधोरणे आवडली.

तात्या, छान बातमी. नवीन संकल्पाला मनापासून शुभेच्छा! --शाल्मली.

नविन संकल्पाला खुप खुप शुभेच्छा !!! नक्किच या कार्याला हातभार लावायला आवडेल. लवकरच व्यनि करुन तुम्हास कळवितो. सचिन

उत्तम संकल्पना. सक्रीय सहभाग घ्यायला आवडेल. Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

अतिशय स्तुत्य उपक्रम आहे. आवडला. कृपया ह्या कार्यात आम्हाला हातभार कसा लावता येईल ह्याची माहिती द्यावी. ह्या नव्या निर्णयाबद्दल अभिनंदन आणि प्रतिष्ठानास शुभेच्छा! ---------------------------------------------------------------------------------------- ::::हल्ली चालु असलेल्या मराठी-आंतरजालीय-टोळीयुध्दाचा आपण एक भाग नाही आहात? काय सांगता? स्वतःला कर्कवृत्ती मराठी माणुस कसे काय म्हणवता?::::

In reply to by धमाल मुलगा

तात्या मस्तच उपक्रम आहे हा.... कृपया ह्या कार्यात आम्हाला हातभार कसा लावता येईल ह्याची माहिती द्यावी. माझा पण हाच प्रश्न आहे??? बाकी काय भी काम सांगा आपण तयार आहोत करायला ==निखिल

आपल्याला हार्दीक शुभेच्छा -------------------------------------------------- छोट्या दोस्तांसाठी गंमत गाणी इथे वाचा

तात्या मनापासुन शुभेच्छा. मिसळपाव असेच "वाढता वाढता वाढे ... " होवो. मोहन.

वा! सुंदर कल्पना/योजना. सक्रिय पाठिंबा राहिलच तुर्तास अनोकोत्तम शुभेच्छा! ऋषिकेश ------------------ बुद्धीसाठी लोह वाढवणारी औषध घ्यायला लागल्यापासून "डोकं गंजलं तर!" ही भिती वाढली आहे

तात्या अभिनंदन व नवीन संकल्पाला मनापासून शुभेच्छा!

तात्या संकल्पना खुपच आवडली. आणी त्याहुन मुख्य म्हणजे 'आधी केले मग सांगितले' ही आपली कृती जास्ती भावली. ©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º© फिटावीत जरा तरी जगण्याची देणी, एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी... आमचे राज्य

तात्या नविन संकल्पासाठी हार्दिक अभिनंदन आणि मनापासुन शुभेच्छा!

तात्या, नवीन संकल्पाला मनापासून शुभेच्छा!

नविन सकंल्पास हार्दिक शुभेच्छा!

अभिनंदन तात्या! =D> ही सुवार्ता ऐकून खूप आनंद झाला. आमचा सक्रीय सहभाग राहील. "आधी केले मग सांगितले" हे आपण परत एकदा आचरणाने दाखवून दिलेत!

तात्या, नविन संकल्पाला मनापासून शुभेच्छा..!! कृपया ह्या कार्यात आम्हाला हातभार कसा लावता येईल ह्याची माहिती द्यावी. खादाडमाऊ

तात्या, अभिनंदन आणि शुभेच्छा.... -स्मिता

तात्या, नवीन उपक्रमाबद्दल हार्दिक अभिनंदन आणि शुभेच्छा. अभिज्ञ. -------------------------------------------------------- पॉझिटिव्ह थिंकिंग....? अजिबात जमणार नाहि.

मिसळपावसारख्या "काव्यशास्त्रविनोदार्थ" चालवल्या जाणार्‍या संकेतस्थळाला आणि पर्यायाने इथल्या रहिवाशांना/आगंतुकांना "वास्तवात" घेऊन जाणार्‍या तुमचे मनःपूर्वक अभिनंदन! शुभाऽस्ते पंथानः सन्तु! ---- कळप-मनोवृत्तीचा सूक्ष्म अभ्यास करण्यात आम्ही गढलेलो असल्यामुळे कंपूबाजी करायला आमच्याकडे वेळ नाही

वा! मस्त !! मिसळपाव प्रतिष्ठानची ध्येयधोरणे व उद्दिष्टे अतिशय योग्य. नवीन उपक्रमाबद्दल हार्दिक अभिनंदन आणि शुभेच्छा. --अवलिया

मिसळपाव प्रतिष्ठानला मनःपूर्वक शुभेच्छा !!! -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मिसळपाव प्रतिष्ठानला मनःपूर्वक शुभेच्छा !!! :) हाती नाही येणे,हाती नाही जाणे,हसत जगावे,हसत मरावे, हे तर माझे गाणे!

वा ! वा ! एकदम झकास....अतिशय उत्तम संकल्पना.... एच.बी.

तात्या !!!!!! क्या बात है !!!! "लक्ष्मी केशव कार्यालय ठाणे " अशा चांगल्या कार्यक्रमांसाठी नेहमीच विनामूल्य उपलब्ध असेल याची खात्री बाळगा. काही महान व्यक्तींचे पाय त्या निमीत्ताने माझ्या जागेला लागतील तेव्हढं पुरेसं आहे. हे राज्यं व्हावे ये तो श्रींची इच्छा.

छान संकल्प! नवीन उपक्रमाबद्दल हार्दिक अभिनंदन आणि शुभेच्छा.

आता लक्षात आले, गेले काही दिवस तात्या अतिशय कामात होते, ते कोणते! उपक्रम चांगलाच आहे; 'हाती घ्याल ते तडीस न्या' असे साधारणपणे करायला तुम्हाला जमत असल्यामुळे हाही उपक्रम उत्तम पुढे जाईल यात शंका नाही. मी टांझानिया मधे असतो. इथे संगीत विषयक काही कार्यक्रम करण्यासारखा असेल तर जरूर सांगा. कलाप्रेमी शशिधर

हार्दिक अभिनंदन तात्या. या उपक्रमासाठी मदत करणं नक्की आवडेल. सविस्तर नंतर बोलू --------------------------- माझा ब्लॉगः http://atakmatak.blogspot.com

मन:पूर्वक अभिनंदन आणि भरघोस शुभेच्छा! =D> अवांतर: आता माझी ख. व. आणि व्य. नि. कधी सुरु होतात कुणास ठाऊक!:W

छान उपक्रम तात्या! अनेक शुभेच्छा! मदत करायला नक्की आवडेल.

प्रतिष्ठानला हार्दिक शुभेच्छा. ध्येयधोरणे आणि उद्दिष्टांबद्दल काय बोलावे! अत्यंत उच्च अभिरुचीसंपन्न उपक्रमाबद्दल हार्दिक अभिनंदन तात्या. =D> =D> [मदतीसाठी सदैव तत्पर ] क्रान्ति ***मन मृदु नवनीत | मन अभेद्य कातळ मन भरली घागर | मन रिकामी ओंजळ*** अग्निसखा

प्रतिष्ठानाला शुभेच्छा, आणि अभिनंदन!

खूप छान. माझ्या हार्दिक शुभेच्छा! जशी जमेल तशी मदत नक्कीच करेन या प्रतिष्ठानला. :) - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

खरोखरच छान उपक्रम ! पाहिजे ती मदत करण्यास तयार ! सविस्तर नंतर बोलूच !! केशवराव .

अभिनंदन आणि शुभेच्छा!!

मिसळपाव प्रतिष्ठानला आमच्या शुभेच्छा!!!

संकल्प सिद्धीस जावो ही सदिच्छा! :) २) दरवर्षी संगीत-साहित्य व कला या क्षेत्रातील एखाद्या बुजूर्ग व्यक्तिमत्वाची निवड करून त्याच्या यथोचित सत्कार-समारंभाचा एखादा देखणा कार्यक्रम करणे, प्रतिष्ठानच्या ऐपतीप्रमाणे त्यांना थैली देणे व अधिकारी व्यक्तिकडून त्यांना मिसळपाव प्रतिष्ठानचे मानपत्र देणे ह्या बद्दल एक विचार मांडतो -बुजुर्ग व्यक्तिमत्व निवडताना शक्यतोवर ज्यांनी त्यांच्या उमेदीत काही मौलिक देणे दिले आहे पण सध्या ते विस्मरणात गेलेले आहेत (वयाने म्हणा, आता काम करत नसल्याने म्हणा, प्रसिद्धीपराङमुखतेमुळे म्हणा) अशा व्यक्तींची निवड व्हावी. अशी माणसे बर्‍याचदा गेल्यावरच त्यांची ओळख जगाला व्हायची शक्यता असते आणि त्याचा फारसा उपयोग होत नाही. चतुरंग

हार्दिक शुभेच्छा! नक्की मदत करू!

संगीत, साहित्य, व कला आदींना वाहिलेली 'मिसळपाव प्रतिष्ठान' या विश्वस्त संस्थेची आम्ही नोंदणी केली आहे.
नोंदनी कर्मांक आनी पता दीलात त पैसा पन पाटवु. करामधे सवलत मिलल काय. */*\*/*\/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/* हितन २ कोसाव औटपोस्ट नाहि? पोस्तात पोलीस काय करतोय...... मास्तर, दुसर कोन इचारनार?

वा खुप छान उपक्रम. मदत करायला आवडेल. शुभेच्छा.

मलाही आपल्याला ह्या कामात मदत करता आली तर खुप आनंद होईल. काय मदत करता येईल ह्याबद्दल आवश्य कळवा. खविस,हडळ,मुंजा,गोस्ट,डेव्हिल,वेताळ

'मिसळपाव प्रतिष्ठान' ला मनापासून शुभेच्छा. कसली ही मदत करायला तयार, नक्की सांगा. # येत्या गणेश चतुर्थीच्या दिवशी आम्ही 'मिसळपाव प्रतिष्ठान' या संस्थेचा शुभारंभ करत आहोत!# ह्याचा काही समारंभ होणार आहे का होणार असल्यास कुठे होणार आहे हे कळले तर हजर राहायला नक्की आवडेल. सुर तेच छेडीता...... :) Waiting For Good Luck To Come In My Life :)

तात्या, मिसळपाव प्रतिष्ठानच्या संकल्पाला हार्दिक शुभेच्छा. तुमची ध्येयधोरणेही आवडली. त्यासाठी सक्रीय मदत करायलाही नक्की आवडेल. त्यामुळे मदतीसाठी आवर्जून आम्हालाही याद करा. (भोचक) आमचा भोचकपणा इथेही सुरू असतो... http://bhochak.mywebdunia.com/

अभिनंदन आणि शुभेच्छा!! :) प्रश्नच नाही जोरात काम चालू करा. :B :B :B बाकरवडी :B :B :B

हार्दिक अभिनंदन तात्या.

प्रतिष्ठानची ध्येय धोरणे वाचुन समाधान वाटले. केवळ आभासी स्वरुप नाही. मातीशी नाते जोडलय बघुन बरे वाटले. प्रकाश घाटपांडे आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.

>> ३) मिसळपाव डॉट कॉम वरील साहित्याला, लेखांना, कलादालनाला, पाककृतींना संबंधित लेखकांच्या परवानगीने मासिक रुपात प्रसिद्धी देणे अशा दर्जाचे लेख आले तर आनंद होइल. अलिकडे प्रतिसाद तर फारच भन्नाट असतात