✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

बत्तीस तारखेला

ग — गंगाधर मुटे, Wed, 09/21/2011 - 05:15
बत्तीस तारखेला


भलत्याच ऐनवेळी, हटकून तोल गेला
नादान सद्गुणांनी अवसानघात केला

जागून रात्र सारी, उपयोग काय झाला?
सावज रणात येता, कुत्रा पळून गेला

सांगू नकोस भलते सलतेच तू बहाणे
उरलाय शब्द केवळ, का ओल आटलेला?

नेमून लक्ष्य केले साधेपणास माझ्या
झालीय तीच राणी, माझा गुलाम केला

समजायला हवे ते, समजून आज आले
काही इलाज नाही, पोटातल्या भुकेला

लोंढेच घोषणांचे दिल्लीवरून आले
येणार वित्त आहे, बत्तीस तारखेला

त्याचे रडून झाले, रडतोय मी अजूनी
हिसकून का बरे मग, माझा रुमाल नेला?

राज्यात भेकडांच्या, जनतेस अभय नाही
सोकावलाय मृत्यू तो रक्त चाखलेला

                                     - गंगाधर मुटे
---------------------------------------------------------

प्रतिक्रिया द्या
1815 वाचन

💬 प्रतिसाद (10)

सुरेख कविता!

मनीषा
Wed, 09/21/2011 - 11:16 नवीन
समजायला हवे ते, समजून आज आले काही इलाज नाही, पोटातल्या भुकेला लोंढेच घोषणांचे दिल्लीवरून आले येणार वित्त आहे, बत्तीस तारखेला आणि राज्यात भेकडांच्या, जनतेस अभय नाही सोकावलाय मृत्यू तो रक्त चाखलेला अगदी वास्तविक ...
  • Log in or register to post comments

मस्तच ..वा..!! नेमून लक्ष्य

प्रकाश१११
गुरुवार, 09/22/2011 - 05:22 नवीन
मस्तच ..वा..!! नेमून लक्ष्य केले साधेपणास माझ्या झालीय तीच राणी, माझा गुलाम केला समजायला हवे ते, समजून आज आले काही इलाज नाही, पोटातल्या भुकेला
  • Log in or register to post comments

एकन एक ओळ प्रचंड आवडलेली आहे.

गवि
गुरुवार, 09/22/2011 - 13:34 नवीन
एकन एक ओळ प्रचंड आवडलेली आहे. तुमच्या प्रतिभेला सलाम.
  • Log in or register to post comments

गझल आवडली

ऋषिकेश
गुरुवार, 09/22/2011 - 13:54 नवीन
चांगली गझल.. आवडली शेवटचा शेर (पहिली ओळ) वृत्तात गडबड आहे का? म्हणताना 'अभय' वर ठेका चुकतोय
  • Log in or register to post comments

वृत्तात गडबड नाही.

गंगाधर मुटे
गुरुवार, 09/22/2011 - 18:16 नवीन
वृत्तात गडबड नाही. पण दोन र्‍हस्व अक्षर मिळून एक दिर्घ बनविल्याने ठेका किंचितसा चुकतो, हे खरे आहे. पण "अभय" हे उपनाम वापरत असल्याने, तसे करावे लागले. राज्यात भेकडांच्या, लोकांस न्याय नाही असे असते तर ते ठेका धरून असते. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ऋषिकेश

मस्त!

नगरीनिरंजन
गुरुवार, 09/22/2011 - 13:59 नवीन
सगळ्या द्विपदी खूपच छान. समजायला हवे ते, समजून आज आले काही इलाज नाही, पोटातल्या भुकेला लोंढेच घोषणांचे दिल्लीवरून आले येणार वित्त आहे, बत्तीस तारखेला या दोन मनाला विशेष भिडल्या आणि नेमून लक्ष्य केले साधेपणास माझ्या झालीय तीच राणी, माझा गुलाम केला ही द्विपदी वाचून अं.ह. झालो.
  • Log in or register to post comments

अप्रतिम...

मदनबाण
गुरुवार, 09/22/2011 - 16:42 नवीन
अप्रतिम... :)
  • Log in or register to post comments

सुरेख कविता आवडली

जाई.
गुरुवार, 09/22/2011 - 16:45 नवीन
सुरेख कविता आवडली
  • Log in or register to post comments

धन्यवाद

गंगाधर मुटे
गुरुवार, 09/22/2011 - 18:05 नवीन
प्रतिसादाबद्दल सर्वांचा आभारी आहे. :)
  • Log in or register to post comments

अभय

साती
Sat, 09/24/2011 - 01:38 नवीन
अभय, सगळ्याच द्विपदी आवडल्या. मतला विशेष आवडला.
  • Log in or register to post comments

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा