बत्तीस तारखेला
भलत्याच ऐनवेळी, हटकून तोल गेला
नादान सद्गुणांनी अवसानघात केला
जागून रात्र सारी, उपयोग काय झाला?
सावज रणात येता, कुत्रा पळून गेला
सांगू नकोस भलते सलतेच तू बहाणे
उरलाय शब्द केवळ, का ओल आटलेला?
नेमून लक्ष्य केले साधेपणास माझ्या
झालीय तीच राणी, माझा गुलाम केला
समजायला हवे ते, समजून आज आले
काही इलाज नाही, पोटातल्या भुकेला
लोंढेच घोषणांचे दिल्लीवरून आले
येणार वित्त आहे, बत्तीस तारखेला
त्याचे रडून झाले, रडतोय मी अजूनी
हिसकून का बरे मग, माझा रुमाल नेला?
राज्यात भेकडांच्या, जनतेस अभय नाही
सोकावलाय मृत्यू तो रक्त चाखलेला
- गंगाधर मुटे
---------------------------------------------------------
वाचने
1855
प्रतिक्रिया
10
मिसळपाव
प्रतिक्रिया
सुरेख कविता!
समजायला हवे ते, समजून आज आले
काही इलाज नाही, पोटातल्या भुकेला
लोंढेच घोषणांचे दिल्लीवरून आले
येणार वित्त आहे, बत्तीस तारखेला
आणि
राज्यात भेकडांच्या, जनतेस अभय नाही
सोकावलाय मृत्यू तो रक्त चाखलेला
अगदी वास्तविक ...
मस्तच ..वा..!! नेमून लक्ष्य
मस्तच ..वा..!!
नेमून लक्ष्य केले साधेपणास माझ्या
झालीय तीच राणी, माझा गुलाम केला
समजायला हवे ते, समजून आज आले
काही इलाज नाही, पोटातल्या भुकेला
एकन एक ओळ प्रचंड आवडलेली आहे.
एकन एक ओळ प्रचंड आवडलेली आहे. तुमच्या प्रतिभेला सलाम.
गझल आवडली
चांगली गझल.. आवडली
शेवटचा शेर (पहिली ओळ) वृत्तात गडबड आहे का? म्हणताना 'अभय' वर ठेका चुकतोय
वृत्तात गडबड नाही.
In reply to गझल आवडली by ऋषिकेश
वृत्तात गडबड नाही.
पण दोन र्हस्व अक्षर मिळून एक दिर्घ बनविल्याने ठेका किंचितसा चुकतो, हे खरे आहे.
पण "अभय" हे उपनाम वापरत असल्याने, तसे करावे लागले.
राज्यात भेकडांच्या, लोकांस न्याय नाही
असे असते तर ते ठेका धरून असते. :)
मस्त!
सगळ्या द्विपदी खूपच छान.
समजायला हवे ते, समजून आज आले
काही इलाज नाही, पोटातल्या भुकेला
लोंढेच घोषणांचे दिल्लीवरून आले
येणार वित्त आहे, बत्तीस तारखेला
या दोन मनाला विशेष भिडल्या
आणि
नेमून लक्ष्य केले साधेपणास माझ्या
झालीय तीच राणी, माझा गुलाम केला
ही द्विपदी वाचून अं.ह. झालो.
अप्रतिम...
अप्रतिम... :)
सुरेख कविता आवडली
सुरेख
कविता आवडली
धन्यवाद
प्रतिसादाबद्दल सर्वांचा आभारी आहे. :)
अभय
अभय, सगळ्याच द्विपदी आवडल्या.
मतला विशेष आवडला.