✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

प्रिय माधुरीस

स
सोत्रि यांनी
Tue, 09/20/2011 - 18:57  ·  लेख
लेख
प्रिय माधुरीस, तु तेज़ाबमधुन आलीस, वादळासारखी, आणि 1-2-3-4 च्या तालावर सर्वांना वेड लावलसं. मला मात्र 'कह दो के तुम हो मेरे वरना...' ह्या गाण्यात मांडीवर थाप मारुन अनिल कपुरला आर्ततेनं साद घालणारी तु प्रचंड भावलीस आणि चरचर काळीज कापत काळजात खोल रुतुन बसलीस. अजुनही ते गाणे आणि त्यातली तुझी ती थाप काळजात कालवाकालव करते. त्यानंतर त्याच शिनेमात लोठिया पठाणचा अड्डा उध्वस्त करुन मुन्नाबरोबर जाणारी प्रचंड धास्तावलेली, घाबरलेली मोहीनी तु साकारलीस आणि तुझ्या अभिनय क्षमतेची चुणुक दिसली. त्यानंतर तुझे सिनेमे येत गेले आणि तु तुझ्या अभिनय आणि नृत्य क्षमतेने माझ्याच नव्हे तर तमाम चाहत्यांच्या काळजाचा तुकडा बनत गेलीस. दाक्षिणात्य ताराकांच्या दाक्षिणात्य हिन्दी उचारांनी बॉलीवुडमधे बडबड करुन सुपरस्टारपद मिळवण्याच्या मालिकेला सुरुंग लावुन तु बॉलीवुडची अनभिषिक्त साम्राज्ञी बनलीस ते केवळ तुझ्या अभिनय, नृत्य क्षमतेने आणि मधाळ हसण्याने. अनिल कपुर ह्या तगड्या अभिनेत्याबरोबर तु अभिनयाची तितकीच तगडी टक्कर देउन तु राम - लखन, परिंदा, खेल, जिंदगी एक जुआ, बेटा ह्या सारख्या अनेक दर्जेदार चित्रपटांची मेजवानी दिलीस. प्रेम-प्रतिज्ञा, दिल बेटा, दिल तो पागल है, देवदास ह्या चित्रपटांमधुन फिल्मफेअरच्या बाहुलीला जिंकलस! तुझ्या मादकतेने घायाळ करत करत तु असंख्य गाण्यांवर उन्मादक नृत्य करत करोडो लोकांच्या दिल की धडकन बनलीस. तुझ्या ह्या गाण्यांमुळे संस्कृती रक्षकांनी अश्लील - अश्लील म्हणुन तुला आणि तुझ्या नाचाला टीकेचे लक्ष केले. मी आणि करोडो चाहत्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले आणि तुही त्या टीकेला भीक घातली नाहीस. तुझ्या मधाळ हसण्याने, नितांत सुंदर अभिनय आणि नृत्य क्षमतेने माझ्या हृदयावर राज्य करीत असल्यामुळे तुझ्या अनेक प्रमादांकडे डोळेझाक केली. वर्दी सारखा चिल्लर सिनेमा तु केलास. दयावानसारखा चित्रपटात थिल्लर भुमिकाही केलीस. चुकुन तु संजय दत्तच्या प्रेमातही पडलीस (पण त्यातुन सावरुन तु सुखरुप बाहेरही आलीस) हे सगळे मी माफ केले. कह दो के तुम हो मेरे वरना, धक धक करने लगा, हमको आजकल है किसक इंतजार, मुझको चांद लाके दो ह्या आणि अश्या अनेक गाण्यांमधील तुझ्या अदांपुढे हे सगळे प्रमाद काहीच नाही. देवदास तर केवळ तुझ्यामुळे आणि तुझ्या लाजवाब अभिनयामुळे दर्शनिय आणि लक्षणीय झाला. त्यानंतर अचाकन तु श्रियुत नेन्यांना आपले करुन अमेरिकेत निघुन गेलीस. त्याकाळच्या प्रथेप्रमाणे (लग्न करुन अमेरिकेत जाणे) तुही वागलीस. क़ाळजावर दगड ठेउन 'जा मुली जा दिल्या घरी तु सुखी रहा' असा डोळेभरला निरोप तुला दिला. अचानक तु पुन्हा आलीस आणि नच बलिये म्हणालीस. सिनेमा चालला नाही तु परत गेलीस. काळाची पावले ओळखत परत आलीस ती छोट्या पदड्यावर. पण कुठे माशी शिंकली काय माहित. तु आलीस ते तुझा अमेरिकन "अक्सेंट" घेउन. कार्यक्रम नृत्याशी निगडीत होता त्यामुळे तुझा कार्यक्रमाचा चॉइसही बरोबर होता पण अमेरिकन अक्सेंट मात्र नाही झेपला. पण तरीही तुझे अढळपद अजुन शाबुत असल्यामुळे हेही कसेबसे सहन केले. पण आज ही बातमी ऐकली, माधुरी मुंबइला परत येणार आणि बिग बॉस मधे येणार. मग मात्र रहावले नाही. काय झाले आहे तुला? नेन्यांशी काही भांडण - बिंडण? अग होतात भांडणे नवरा बायको मधे त्याचे एवढे काय मनावर घ्यायचे? की नेन्यांची डॉक्टरी नीट चालत नाहीयेय? उगाच परत येउन बिग बॉस सारख्या थिल्लर कार्यक्रम करुन तुझे अढळपद घालवु नकोस ही कळकळीची विनंती. तुला एक उदाहरण देतो. आपली साधना, हो तीच तीच साधना क़ट वाली. तिने जेव्हा चित्रपट संन्यास घेतला त्यानंतर ती कधीही रसिकांसमोर आली नाही. मुलाखती दिल्या पण फोटो काढु दिले नाहीत. कारण तीचे म्हणणे होते की तीची जी छबी रसिकांच्या ह्र्दयात विराजमान आहे ती कायमची तशीच रहावी, तीला तडा जाउ नये. अजुन काय बोलु, सुज्ञास सांगणे न लगे... तुझा, (बातमी वाचुन कळवळुन गेलेला) सोकाजी
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
जीवनमान
लेखनप्रकार (Writing Type)
प्रकटन
विचार
मत
सल्ला
प्रतिक्रिया
विरंगुळा

प्रतिक्रिया द्या
46304 वाचन

💬 प्रतिसाद (144)

प्रतिक्रिया

चुकलो, माती खाल्ली! मार्क

सोत्रि
Wed, 09/21/2011 - 02:20 नवीन
चुकलो, माती खाल्ली! मार्क नाही माइक (http://www.misalpav.com/node/19167) - (वाट चुकलेला) सोकाजी स्वगत: सोक्या, लेका अभ्यास कमी पडतोय, तुर्तास "प्रिय अदितीस" हा धागा काढणे रद्द ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती

ते तर ठीकच, पण तू पत्र लिहीच

३_१४ विक्षिप्त अदिती
Wed, 09/21/2011 - 02:32 नवीन
ते तर ठीकच, पण तू पत्र लिहीच रे. बाकी हिंदीतला अभिनय हा मराठी नाहीतर इंग्लिशपेक्षा वेगळा असतो काय? असो. गेल्याच आठवड्यात परत एकदा 'ओंकारा' पाहिला. त्यातला दीपक डोब्रियाल आणि सैफने केला आहे ना, तो अभिनय. विशेषतः सैफ आरशासमोर उभा राहतो आणि त्याला बाहुबली बनवला नाही म्हणून आरसा फोडतो, तो सीन पहा. हसून, मुरक्या घेत, लाडे-लाडे थोडं सेन्शुअस दिसत नाच करणं ठीक आहे, पण चेहेरा खास नाही, नर्तक म्हणून विशेष प्रावीण्य नाही तरीही 'बीडी' गाण्यात दीपक डोब्रियाल जे काही करतो ना, ते पहा. नाहीतर 'चीनी कम'मधली अमिताभला बागेतल्या बाकावरून उठवून झाडापर्यंत पळवणारी तब्बू पहा, किंवा 'जॉनी गद्दार'मधे धर्मेंद्रला गोळी घालण्याच्या सीनमधली नील नितीन मुकेशची उलघाल पहा ... यातलं काही टक्केसुद्धा माधुरीने केलं आहे का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सोत्रि

१०० डेज मधला ती झोपेत असताना

प्राजु
Wed, 09/21/2011 - 07:55 नवीन
१०० डेज मधला ती झोपेत असताना घाबरते तो सीन बघा, बेटा मध्ये सासूला मात दिल्यावर चेहर्‍यावर येणारी जिंकल्याची गुर्मी बघा, अंजाम मध्ये तुरूंगात मीस केरेज झाल्यावर संताप आणि दु:ख एकाच वेळी चेहर्‍यावर दाखवणारी माधुरी बघा, परिंदा मध्ये तिच्या होणार्‍या नवर्‍याचे प्रेत पाहून धक्का बसलेली माधुरी बघा, दिल तो पागल है मध्ये.. राहुल बद्दलचे तिचे विचार कॅसेट मध्ये रेकॉर्ड करत असताना मध्येच फरिदा जलाल येऊन तिचे (माधुरी)आणि अजय चे लग्न नक्की झाल्याचे सांगितल्यावर चेहर्‍यावरचे बदललेले भाव बघा...एकाच वेळी फरिदा जलाल साठी आनंद आणि राहुलबद्दल दु:ख.. नक्की पहा. दिल सिनेमा मध्ये अनुपम खेरच्या घरी आमिरखान च्या उपचारांसाठी मदत मागायला गेलेली असताना, अनुपम खेरच्या अटी कबूल करत असतानाचं अ‍ॅक्टींग पहा.. आणखी किती उदाहरणे देऊ? उगाच आरशात बघून खुनशी हसलं म्हणजे अभिनय होत नसतो (सैफ अली खान बद्दल बोलतेय). ती अमिताभ ला उठवून पळवणारी तब्बू तर मला आठवतही नाहीये.. इतका तो सुमार अभिनय तिचा. तब्बूचा अभिनय फक्त अस्तित्व आणि दायरा मध्येच आवडला. जॉनी गद्दार पाहिला नसल्याने काही सांगू शकत नाही. असो..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती

प्राजू ताई,

सिद्धार्थ ४
Wed, 09/21/2011 - 09:37 नवीन
एक नंबर .....ह्या हि पेक्षा किती तरी उदाहरणे देता येतील. च्यायला माधुरी, सचिन आणि शिवाजी महाराजान बद्दल कोणी काही बोलले तर समोरच्याचा जीव घ्यावयास वाटतो. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्राजु

अगदी अगदी....

सुहास झेले
Wed, 09/21/2011 - 10:42 नवीन
अगदी अगदी.... :) :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सिद्धार्थ ४

+१

सोत्रि
Wed, 09/21/2011 - 11:02 नवीन
सिद्धु, एक्दम सहमत रे! (म्हणुन तर एका पाशवी आयडी बरोबर पंगा घेण्याची हिंमत करु शकलो) ;) - (माधुरीमय) सोकाजी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सिद्धार्थ ४

सोक्या.....

ढब्बू पैसा
Wed, 09/21/2011 - 11:48 नवीन
सोकाजी , पाशवी आणि पंगा एकाच प्रतिसादात? सांभाळून हां ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सोत्रि

सोक्या, घाबरू नकोस.. आम्ही

बिपिन कार्यकर्ते
Wed, 09/21/2011 - 11:51 नवीन
सोक्या, घाबरू नकोस.. आम्ही सगळे आहोत तुझ्याबरोबर... जॉन अब्राहाम आवडणार्‍यांनी माधुरीच्या अभिनयावर टीका करावी तर ती टीका फाट्यावरच मारावी! काय म्हन्तो? माझ्या माहितीप्रमाणे जॉन अब्राहाम जन्माला आल्यापासून त्याच्या चेहर्‍यावर आत्ता आहेत तसेच भाव आहेत म्हणे... खरे खोटे तो अब्राहामच जाणे! ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ढब्बू पैसा

ठ्या....

सोत्रि
Wed, 09/21/2011 - 12:21 नवीन
माझ्या माहितीप्रमाणे जॉन अब्राहाम जन्माला आल्यापासून त्याच्या चेहर्‍यावर आत्ता आहेत तसेच भाव आहेत म्हणे
फुटलो! मेलो!! वारलो!!! - (तरीही जॉनच्या सिक्स पॅकचा चाहता) सोकाजी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते

सांभाळ

श्रावण मोडक
Wed, 09/21/2011 - 15:08 नवीन
सांभाळ. तुझा अण्णा हजारे होत चालला आहे. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सोत्रि

नक्की कोणाचा?????

चिंतामणी
Wed, 09/21/2011 - 15:20 नवीन
सोकाजी, बिका की ३-१४????????? श्रामो- कोड्यात नका बोलू.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रावण मोडक

मोडक, मी 'अण्णा हजारे' होणार

सोत्रि
Wed, 09/21/2011 - 16:31 नवीन
मोडक, मी 'अण्णा हजारे' होणार हे लक्षात आले होते, त्यामुळेचतर (तरीही जॉनच्या सिक्स पॅकचा चाहता) अशी स्वाक्षरी चाणाक्षपणे टाकली होती. तसा त म्हटले की ताकभात असं थोडाफार समजु लागलय आपल्यासारख्या बर्‍याच चाणाक्ष मिपाकरांच्या संगतीत राहुन. ;) - (चाणाक्ष) सोकाजी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रावण मोडक

हा हा हा ... अहो सोकाजी,

सुहास झेले
Wed, 09/21/2011 - 17:39 नवीन
हा हा हा ... अहो सोकाजी, अण्णा निघाले पाकिस्तानला ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सोत्रि

'अण्णा निघाले पाकिस्तानला'

बिपिन कार्यकर्ते
गुरुवार, 09/22/2011 - 15:11 नवीन
'अण्णा निघाले पाकिस्तानला' वाचल्यावर का कोणास ठाऊक एकदम 'चला मुरारी हिरो बनने' हेच आठवलं!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुहास झेले

हा हा हा

सुहास झेले
Wed, 09/21/2011 - 11:58 नवीन
हा हा हा :D
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ढब्बू पैसा

(-१) जीवघेण्या विधानाशी असहमत

चेतन सुभाष गुगळे
Wed, 09/21/2011 - 22:55 नवीन
<< माधुरी, सचिन आणि शिवाजी महाराजान बद्दल कोणी काही बोलले तर समोरच्याचा जीव घ्यावयास वाटतो. >> या विधानाला आपण सहमती दर्शविलीय हे काही पटलं नाही बुवा. कोणी काही बोलले तर त्याचा जीव घ्यायचा हा न्याय जर लावायचा असे ठरविले तर एखादा कट्टर व्यक्तिपूजक आपल्यालाही हाच न्याय लावू शकतो कारण जेव्हा आपण http://www.misalpav.com/node/10277 हा धागा काढला होता त्या काळात हा पक्ष भलताच फॉर्मात होता. त्याचप्रमाणे पक्षप्रमुखांची लोकप्रियताही दुर्लक्ष करण्याजोगी नव्हती आणि अजुनही नाही. मराठी मनाच्या हळव्या बिंदुंमध्ये (Weak Points) मध्ये यांची गणना केली जाते (हे मी http://www.misalpav.com/node/10095#new या धाग्यातील मजकूर आणि त्याला मिळालेल्या प्रतिसादावरून म्हणतोय). तरीही आपण हे धाडस दाखविले होतेच ना. सबब, माधुरीच्या विरोधात बोलणार्‍याचा जीव घ्यावेसे वाटणे हे काही योग्य नव्हे. स्वत: माधुरी तरी या विधानाचं समर्थन करतील का? (मी मला काय पटलं नाही आणि का? इतकंच इथं मांडलंय. कुणाविषयीही कुठलेही अनुद्गार काढले नाहीत. याची कृपया नोंद घ्यावी)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सोत्रि

भावनाओन्को समझो .

सिद्धार्थ ४
Wed, 09/21/2011 - 22:59 नवीन
शब्दशः अर्थ घ्यायचा नसतो हो गुगळे साहेब.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चेतन सुभाष गुगळे

मग तुम्हीही घेऊ नका शब्दश: अर्थ

चेतन सुभाष गुगळे
Wed, 09/21/2011 - 23:12 नवीन
मला देखील एवढंच म्हणायचं होतं की तुमच्या एखाद्या अतिप्रिय गोष्टी विषयी तुम्ही कितीही हळवे असाल तरी ती गोष्ट (व्यक्ती, पक्ष, वस्तु, इ.) इतरांना आवडेलच असे नाही. त्यांनी जर त्यांची काही विरोधात जाणारी मते मांडली तर तुम्ही ती पुरेसा संयम दाखवून शांतपणे ऐकून घ्यायला हवीत. पिण्डे पिण्डे मतिर्भिन्न: हे सत्य स्वीकारायला हवे की नको? मी तुमच्या भावना जाणून च हे विधान केले होते. तुमच्या मूळ विधानात तुम्ही जीव घ्यावासा वाटतो या शब्दांऐवजी जीव द्यावासा वाटतो अशी सुधारणा कराल काय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सिद्धार्थ ४

परत तेच?

सिद्धार्थ ४
गुरुवार, 09/22/2011 - 00:20 नवीन
मी तुमच्या भावना जाणून च हे विधान केले होते. तुमच्या मूळ विधानात तुम्ही जीव घ्यावासा वाटतो या शब्दांऐवजी जीव द्यावासा वाटतो अशी सुधारणा कराल काय? उत्तर आहे नाही
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चेतन सुभाष गुगळे

प्राजुतै, एवढं सगळं पाहायला न

वपाडाव
Wed, 09/21/2011 - 10:30 नवीन
प्राजुतै, एवढं सगळं पाहायला न सांगता देवदास एकरकमी पहायला सांगा.... त्यातला शारुकला टाकलेला एक दायलॉग..... "आप वोही चुका दिजिये जो हमने आप पे खर्च किया है, आप पे ये दो रातो का कर्ज उधार रहा, देवबाबु..." किंवा, त्या दोघांचा एक सीन, शारुक तिला म्हणतो, "चंद्रमुखी, ये शराब से भरा पैमाना देख रहि हो.... इसमे और शराब डालोगी तो क्या होगा". ती म्हणते, "शराब छलक कर जमीन पर आ जायेगी" शारुक, "इसी तरह पारो के प्यार से भरा हुआ है ये प्याला देवदास, खुद तो गिरेगा ही, तुम्हे भी गिरा देगा" ती अगदी आर्ततेने म्हणते," जमीन पर गिरी हुइ शराब देखकर लोग तो यही कहेंगे ना, देखो पैमाने को छूकर निकली है" ह्या वेळेला तिच्या डोळ्यातली कणव पहा, चेहर्‍यावरचे ओसंडुन वाहणारे प्रेम पहा..... (ह्यानंतर माझ्या चेहर्‍यावरची स्माइल पहा वाटल्यास, सध्या कलीग विस्मयकारकरित्या टवकारुन माझ्याकडे बघतोय)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्राजु

वडापाव, आजपासुन मी तुमचा

सोत्रि
Wed, 09/21/2011 - 10:54 नवीन
वडापाव, आजपासुन मी तुमचा गुलाम ह्या प्रतिक्रियेनंतर _/\__/\__/\_ चंद्रमुखी सारखी तवायफ मी अजुन तरी बघितली नाही (उमरावजान नंतर) . तो ग्रेस, ती अदा उफ्फ..... मार डाला.... मार डाला....अल्लाह मार डाला. - (माधुरीचा देवदास) सोकाजी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वपाडाव

तुमचा प्रतिसाद वाचतानाही

मी ऋचा
Wed, 09/21/2011 - 13:12 नवीन
तुमचा प्रतिसाद वाचतानाही डोळ्यापुढे आलेला तो सीन अंगावर शहारं उभं करून गेला.. माधुरी आणि शाहरुख दोघांनीही जीव ओतला आहे या आणि देवदास मधील इतरही अनेक सीन्स मधे. पारो चंद्रमुखीकडे देवीच्या मुर्तीसाठी माती मागायला येते तो सीन पण आपला एकदम फेवरेट ब्वॉ. लव्ह यु माधुरी!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वपाडाव

बास्स का? घ्या त्यांच्यात

वपाडाव
Wed, 09/21/2011 - 13:45 नवीन
बास्स का? घ्या त्यांच्यात झालेले संवाद..... पारो :: तवायफों की तकदीर मे शौहर नही होते..... चंद्रमुखी :: तवायफों की तो तकदीर ही नही होती ठकुराईन..... अजुनही आहेत पण ते टंकायला लैच वेळ लागेल.... अन भावनांच्या भरात काम करणे विसरुन जाईल म्हणुन हात आखडता घेतोय.....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मी ऋचा

बाबारे विषय जरा बघुन मग

मृत्युन्जय
Wed, 09/21/2011 - 13:48 नवीन
बाबारे विषय जरा बघुन मग प्रतिसाद साठवत जा. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वपाडाव

वप्या, आपलं अ‍ॅक्टींग बद्दल

मी ऋचा
Wed, 09/21/2011 - 14:17 नवीन
वप्या, आपलं अ‍ॅक्टींग बद्दल चाल्लंय ना माधुरीच्या? का संवादलेखनाबद्दल? का असं करतोएस?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वपाडाव

तुम्हाला संवादफेकनाबद्दल

वपाडाव
Wed, 09/21/2011 - 15:15 नवीन
तुम्हाला संवादफेकनाबद्दल म्हणायचंय का??? पण जास्त खाजवु नका हो जखमेतुन रगुत वाहतंय.... भळाभळा अगदी तसंच जसं फुल्यांना थेंब थेंब पाणी गळताना भदाभदा गळ्यालाचे आभास होतात..... - (माधुरीवर सोकाजीपेक्षा जास्त प्रेम करणारा) वपाडाव
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मी ऋचा

>> (माधुरीवर सोकाजीपेक्षा

मी ऋचा
Wed, 09/21/2011 - 15:38 नवीन
>> (माधुरीवर सोकाजीपेक्षा जास्त प्रेम करणारा) वपाडाव तुमचे सोकाजीवर ईतके प्रेम आहे हे माहिती नव्हतं मला. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वपाडाव

ऋचा

चिंतामणी
Wed, 09/21/2011 - 22:30 नवीन
__/\__
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मी ऋचा

ऐकावे ते नवलच !

वाहीदा
गुरुवार, 09/22/2011 - 12:55 नवीन
माधुरीवर सोकाजीपेक्षा जास्त प्रेम करणारा) तु सोकाजीवर प्रेम करतोस :-? वडापाव हे आम्हाला माहीत नव्हते हो , ऐकावे ते नवलच ! ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वपाडाव

डिसक्लेमर : ऍफेडेविट

सोत्रि
गुरुवार, 09/22/2011 - 13:27 नवीन
ओssss उगा माझ्याबद्दल गैरसमज नको म्हणुन हा प्रतिसाद! मला वप्याच्या 'नवाबी' शौकांबद्दल काहीही माहिती नाही म्हणुनच तर मी त्यांचा गुलाम व्हायची तयारी दर्शवली होती. सबब, मी साधा-'सरळ' गृहस्थ आहे, माझे माझ्या बायको मुलांवर फार्फार प्रेम आहे ;). - ( 'स्ट्रेट' ) सोकाजी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वाहीदा

हा हा हा

शाहिर
गुरुवार, 09/22/2011 - 13:36 नवीन
खि खि खि .. किती हसु असा झला आहे .. मॅनेजर बहुतेक येरवड्याला पाठवनार मला
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सोत्रि

वपाडाव

नंदन
Wed, 09/21/2011 - 15:46 नवीन
काय अभ्यास! काय अभ्यास!! दंडवत, मालक
(ह्यानंतर माझ्या चेहर्‍यावरची स्माइल पहा वाटल्यास, सध्या कलीग विस्मयकारकरित्या टवकारुन माझ्याकडे बघतोय)
खी: खी: खी: :) बादवे, माधुरी ही कमर्शियल चित्रपटांतली उत्तम अभिनेत्री आहे असं माझं मत आहे. तिच्या अभिनयाची तुलना स्मिता पाटील, शबाना आझमी इ.शी होणार नाही अर्थात, पण अभिनयाला मर्यादित स्कोप आणि घिसीपिटी कथानकं ह्यातूनही ते जाणवतं. वर वपाडावकाकांनी उदाहरण दिलेलं आहेच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वपाडाव

वर वपाडावकाकांनी उदाहरण

वपाडाव
Wed, 09/21/2011 - 17:27 नवीन
वर वपाडावकाकांनी उदाहरण दिलेलं आहेच.
माझ्या वैनींनी नंदन सारखा पुतण्या प्रसवुन खुपच उपकृत केलेलं आहे.... अन त्याच्या अशा अभ्यासु, सर्वसमावेशक प्रतिक्रिया वाचुन उर, कंठ अन ड्वळे सगळं काही भरुन येतं..... बाळा, सदैव अशीच उत्तमोत्तम प्रगती करत रहावेस इतकेच सांगावे वाटते.... काळजी घे..... - ( सर्व पुतण्यांना काळजी घ्यायला सांगणारा ) वपाडाव
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नंदन

:)

प्रचेतस
Wed, 09/21/2011 - 18:15 नवीन
:)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वपाडाव

;)

मालोजीराव
Wed, 09/21/2011 - 20:06 नवीन
;) - (माधुरीवर नेनेंपेक्षा जास्त प्रेम करणारा) मालोजीराव
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वपाडाव

मी देवदास पूर्ण पाहिलाच

रेवती
Wed, 09/21/2011 - 19:11 नवीन
मी देवदास पूर्ण पाहिलाच नाही. ऐश्वर्या रायच्या केसाला धुरी देण्याच्या प्रसंगाला तोंड देत असताना चक्क झोप लागली. सिनेमाबद्दल काही म्हणायचे नाही. नंतर तूनळीवर डोला रे डोला गाणं पाहिलं. आणि प्राजु तू चांदनी बार मधली तब्बू विसरलीस की काय? पुन्हा तो सिनेमा पाहण्याचं धाडस होणार नाही इतकं दु:ख तब्बूनं हुबेहुब दाखवलय. चांदनी बार सोसवला नाही बुवा! त्यानंतर तब्बुचा चिनी कम पाहिल्यामुळे जरा निराशा झाली एवढेच!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वपाडाव

लज्जा मधे "चारीत्र्यहीन"

विनीत संखे
Wed, 09/21/2011 - 11:55 नवीन
लज्जा मधे "चारीत्र्यहीन" म्हणून लोकं अंगावर आलेली असताना तिच्या वाईट नजर ठेवणार्‍या "पुरूषोत्तम" ची प्रतारणा करणारी आणि तिथेच लोकांनी केलेल्या दंगलीत आपलं बाळ गमवून आक्रोश करणारी "जानकी" पहा... हृदय हेलावून टाकते रे.... पुन्हा कालीबाबूला धारेवर धरणारी चंद्रमुखी.. आग असते तेव्हा तिच्या डोळ्यांत. पुकारमध्ये आधी अगतिक होऊन "जय" कडे असहाय्यपणे प्रेम मागणारी आणि नंतर केलेल्या कृत्यासाठी पश्चातापदग्ध होऊन त्यासाठी आपला जीवपणाला लावणारी अंजली पहा. "प्रेम प्रतिज्ञा" मध्ये आपल्या वजन उचलणार्‍या बाबाच्या पाठीवर तेल चोपून त्याला मसाज देताना एक चेहेर्‍यावर वेगळंच कौतुक असलेली पण बाबाच्या पिण्यावर ताशेरे ओढणारी लक्ष्मी पाहा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्राजु

प्रतारणा करणारी प्रताडना असे

मृत्युन्जय
Wed, 09/21/2011 - 18:19 नवीन
प्रतारणा करणारी प्रताडना असे म्हणायचे आहे काय तुम्हाला?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विनीत संखे

माधुरीच्या अभिनयाचे वेगळेपण

मृत्युन्जय
Wed, 09/21/2011 - 12:01 नवीन
माधुरीच्या अभिनयाचे वेगळेपण आणि महत्व तिच्या सहजपणात आहे. ती जसा अभिनय करु शकते तसा तब्बु करु शकत नाही हे तर सत्यच आहे आणि ते सत्य विजयपथ / साजन चले ससुराल वगैरे चित्रपटात दिसुनही येते. तब्बुनेही अनेक उत्तम चित्रपटात उत्कृष्ट अभिनय केला आहे पण तिच्या अभिनयाची जातकुळी वेगळी आहे. नानाच्या अभिनयातला अंगार अमिर खान किंवा शाहरुख खान दाखवु शकत नाही म्हणुन आगपाखड करण्यात अर्थ नाही. अमिताभ बच्चन सारख एक परिपुर्ण अभिनेता दुसरा कोणीही नाही. पण आमिर त्याच्या परीने योग्य काम करतो आणि दर्जेदार चित्रपट देतो. माधुरीनेही अनेक उत्तम चित्रपटात अभिनय केला आहे. हम आपके है कौन तिने त्याच सहजपणावर ओढला. तिनेदेखील लज्जा, मृत्युदंड वगैरे वेगळ्या धाटणीचे चित्रपटही केले आणी तसा अभिनयही करु शकते हे सिद्ध केले. मला वाटते इथे थोडी गल्लत अश्यामुळे होते आहे की ती इतका सहज अभिनय करते की त्याच्यात नाटकीपणाचा अभिनिवेश नसतो, कृत्रिमता नसते, बोजडपणा नसतो त्यामुळे तिला महान अभिनेत्री म्हणताना कदाचित तु(म्हा)ला त्रास होत असावा. परंतु ज्याप्रमाणे साहित्य हे केवळ दर ३ पानांमागे ४ खुन, ५ भूकबळी, ६ गलिच्छ शिव्या आणि ७ भांडणांमुळे उच्च दर्जाचे आहे असे होत नाही त्याचप्रमाणे अभिनय देखील केवळ अश्रु आणि निराशेचे भाव दाखवुन श्रेष्ठ होत नाही. सहजता हा देखील अभिनयाचा एक सुंदर पैलु असु शकतो. माननीय अध्यक्षा, एवढे बोलुन मी माझे चार शब्द संपवतो. तळटीपः १. माधुरी मलाही फारशी कधी आवडायची नाही. परंतु तिच्या अभिनयक्षमतेबद्दल आणि अभिनयाबद्दल मला कधी प्रश्न पडला नाही. २. माधुरी मला आवडतच नाही असेही नाही. तिचे वर्दी आणि दयावान नावाचे दोने उच्च चित्रपट मला फार्फार आवडतात. ३. एम एफ हुसैन नावाच्या महान कलाकाराला प्रचंड आवडणार्‍या (आणि त्याच्या मुस का पेस्ट्री ते काय असणार्‍या) अभिनेत्रीला आणि त्यांच्या गजगामिनी नावाच्या अत्त्युच्च दर्जाच्या कलाकृतीमध्ये केवळ कंबरेच्या, पार्श्वभागाच्या आणि पाठीच्या सहाय्याने हेवनली (ब्वॉडी) अभिनय करणार्‍या महान नायिकेवर ताशेरे ओढल्याबद्दल तुमच्यावर कायदेशीर कारवाई का करु नये अशी नोटीस तुमच्यावर बजावण्यात येणार आहे असे कळते. तरी तयार असावे. कळावे, लोभ असावा (म्हणजे पाशवी शक्तींना एकत्र करुन आमच्याविरुद्ध आघाडी उघडु नये अशी नम्र विनंती. अश्याही बर्‍याच पाशवी शक्ती या धाग्याबाबत तुमच्या विरोधात आहेत म्हणा) वर्दीप्रेमी दयाकांक्षी मृत्युंजय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती

एम एफ हुसैन नावाच्या महान

विनीत संखे
Wed, 09/21/2011 - 12:15 नवीन
एम एफ हुसैन नावाच्या महान कलाकाराला प्रचंड आवडणार्‍या (आणि त्याच्या मुस का पेस्ट्री ते काय असणार्‍या) अभिनेत्रीला ...
मुस नाही हो "म्युज"
आणि त्यांच्या गजगामिनी नावाच्या अत्त्युच्च दर्जाच्या कलाकृतीमध्ये
इथं फारकत. अत्युच्च की अतार्किक? असो ... पण चित्रपटात कालिदास सायकल घेऊन आला तेव्हा मला विनोदी वाटलेला तो चित्रपट...
केवळ कंबरेच्या, पार्श्वभागाच्या आणि पाठीच्या सहाय्याने हेवनली (ब्वॉडी) अभिनय करणार्‍या महान नायिकेवर ताशेरे ओढल्याबद्दल तुमच्यावर कायदेशीर कारवाई का करु नये अशी नोटीस तुमच्यावर बजावण्यात येणार आहे असे कळते. तरी तयार असावे
हे मात्र खरं हो. तिचं पाठमोरं नृत्य आजही मागल्या काही वर्षांमध्ये हिंदी चित्रपटांत चित्रीत झालेल्या कुठल्याही क्लासिकल नृत्यांपैकी एक अभिजात कलाकृती मानावं इतकं सुरेख आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृत्युन्जय

तिचं पाठमोरं नृत्य आजही

नगरीनिरंजन
गुरुवार, 09/22/2011 - 13:40 नवीन
तिचं पाठमोरं नृत्य आजही मागल्या काही वर्षांमध्ये हिंदी चित्रपटांत चित्रीत झालेल्या कुठल्याही क्लासिकल नृत्यांपैकी एक अभिजात कलाकृती मानावं इतकं सुरेख आहे
'प्रेमग्रंथ'मधल्या तिच्या पाठमोर्‍या नृत्यां(?)बद्दल आपले मत जाणून घ्यायला आवडेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विनीत संखे

मृत्यन्जय, ह्या

सोत्रि
Wed, 09/21/2011 - 12:52 नवीन
मृत्यन्जय, ह्या प्रतिसादाबद्दल एक दिल्खेचक कॉकटेल तु(म्हा)ला माझ्याकडुन :) - (कॉकटेल इतकीच मादक असलेल्या माधुरीचा चाहता) सोकाजी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृत्युन्जय

>>तब्बुनेही अनेक उत्तम

मी ऋचा
Wed, 09/21/2011 - 13:20 नवीन
>>तब्बुनेही अनेक उत्तम चित्रपटात उत्कृष्ट अभिनय केला आहे पण तिच्या अभिनयाची जातकुळी वेगळी आहे. एकदम सहमत. तब्बुचाही अभिनय अतिशय आवडतो. दोघींची तुलना होउ शकत नाही. The two of them belong to different schools of cinema. त्यमुळे ही चांगली ती वाईट असं नाही. दोघीही एकत्रितपणे चांगल्या असू शकतात. तरीही माझं झुकतं माप मात्र माधुरीकडे. क्या करे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृत्युन्जय

तुला

प्रमोद्_पुणे
Wed, 09/21/2011 - 15:57 नवीन
कधी पासून माधुरी आवडायला लागली रे? अहो त्या मृत्युंजयाला कसले काकटेल देताय मला द्या, मी लय वेळा लढलो आहे माधुरी कशी बेस्ट आहे ह्यावरून साहेबांबरोबर.. १. माधुरीचा पुकार मधला सीन (लेक जवळचा) अनिल कपूरबरोबरचा जिथे तो तिला म्हणतो न जाणे त्या सिगारेट्स तूच ओढ्त असशील त्यावर ती म्हणते "और नही तो क्या?" काय सहज अभिनय आहे.. २. आणि संगीत मधला ओ रब्बा गाण्यातला अंध स्त्रीचा अभिनय्..केवळ लाजवाब. ३.लज्जा मधली तिची एंट्री आणि टिनू बरोबरचे सर्व ड्वायलाग एक नं.. आणि मॉबसीन बद्दल तर बोलायलाच नको.. ४.बेटा मधले अरूणा ईराणी बरोबरचे संवाद तर जबरा आहेत. ५.देवदासतर केवळ तिच्यामुळे सुसह्य आहे वपाडाव ने लिहिले आहेच पण त्याच सीन मधे ती शाहरुख ला प्रेम म्हणजे काय ते सांगते तो संवाद आणि त्या आधीचा जॅकीबरोबरचा संवाद (पिंजर्यातल्या पोपटाला उद्देशून म्हणते) "बडा एहसान फरामोश है चुन्निबाबू हमने इसे प्यार किया और इसने हमपे ही वार किया".. माधुरीने बीग बॉस मधे मात्र सहभागी होउ नये. अगदी गेस्ट अपीअरंस सुद्धा नको..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृत्युन्जय

कधी पासून माधुरी आवडायला

मृत्युन्जय
Wed, 09/21/2011 - 16:21 नवीन
कधी पासून माधुरी आवडायला लागली रे? तळटीप वाचा साहेब. बाकी कॉकटेल प्रतिसादासाठी असल्याकारणाने तो मिळणे हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रमोद्_पुणे

तब्बु

संपत
गुरुवार, 09/22/2011 - 00:29 नवीन
तब्बुचे मी विजयपथ, माचीस, चांदनीबार सारखे अनेक चित्रपट पाहिले आहेत.चांदनीबारमध्ये ती अप्रतिम होती. पण अनेक चित्रपटात ती पाट्या टाकते. चीनी कम चित्रपट आवडला तरी तब्बू ने मात्र पूर्ण चित्रपटात पाट्या टाकल्या आहेत. झाडापर्यंत धावण्याच्या सीन मध्ये अमिताभचे काम लाजवाब पण तब्बू मात्र अगदीच ओके.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती

अनिल कपूर बद्दलही शंका आहे वाटतं

आदिजोशी
Wed, 09/21/2011 - 01:10 नवीन
मशाल, साहेब, परिंदा, तेजाब, विरासत बघितलेले दिसत नाहीत तुम्ही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती

माधुरी अभिनय करत नाही हा

पक्या
Wed, 09/21/2011 - 01:37 नवीन
माधुरी अभिनय करत नाही हा अतिभयंकर विनोद झाला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती

ओक्के.

३_१४ विक्षिप्त अदिती
Wed, 09/21/2011 - 01:40 नवीन
ती करते तो "अभिनय". पण तरीही तिला अभिनेत्री किंवा नटी म्हणण्याएवढं धैर्य माझ्याकडे नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पक्या

अभिनय तर सो सो होता इश्वर,

सोत्रि
Wed, 09/21/2011 - 00:54 नवीन
अभिनय तर सो सो होता
इश्वर, साहेब, लम्हे, विरासत, वेलकम, जाँबाज़, राम लखन, मेरी जंग असे अनेक चित्रपट तुम्ही पाहिले नसावेतच!
बॉडीसुद्धा काय जॉन अब्राहम, सनी देऑल सारखी तगडी नव्हती.
बॉडीबरोबरच अभिनयसुद्धा तगडा असतो प्राजुतै. तुम्ही सर्वव्यापी असुनही मी हे सांगावे म्हणजे...... तर अमिताभ, दिलीप कुमार ह्यांच्याकडेही तगडी बॉडी नव्हती पण ते तगडा अभिनय मात्र होता. जॉन अब्राहम आणि सनी देऑल ह्याने आभिनयाचे लावलेले दिवे मी पाहिले आहेतच. जॉन अब्राहम हा अभिनेता नाहीयेय हो, तो एक मॉडेल आहे चुकुन तो चित्रपटात आला आणि टिकला. हो फक्त बॉडीच्या जिवावर. अभिनय कशाशी खातात हेही त्याला माहित नाहीयेय. :lol: :) :lol: -(तगड्या अभिनयाच्या अनिलचा पंखा) सोकाजी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्राजु
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा