✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

मौलवींची मौलिक मौक्तिके !

ह
हुप्प्या यांनी
Wed, 09/14/2011 - 04:30  ·  लेख
लेख
http://timesofindia.indiatimes.com/city/lucknow/Qazis-knotty-terms-to-solemnise-wedding/articleshow/9973764.cms ज्या निकाहाच्या वेळी बुफे पद्धतीचे जेवण आणि पार्श्वभूमीवर संगीत असेल तिथे काझी लोक निकाह लावणार नाहीत असे फर्मान काही मुस्लिम धर्म मार्तंडानी काढले आहे. संगीत हे इस्लामला मंजूर नाही. आणि बुफेचे खूळही. ह्या फर्मानामुळे अनेक मुस्लिम कुटुंबांची पंचाईत झाली आहे. चांगले वाजत गाजत, साग्रसंगीत लग्न, आय मीन निकाह लावण्यावर संक्रांत आली आहे. खानेवाला राझी और सुननेवाला राझी तो क्या करेगा काझी असे म्हणता आले असते. पण तसे होत नाही. विशेष म्हणजे शिया आणि सुन्नी दोन्ही गटांचे अध्वर्यू याबाबतीत एकमतात आहेत. (आपल्या लाडक्या सकाळमधेही ही बातमी काही तासांपूर्वी आली होती पण काही अज्ञात कारणांमुळे उडवून लावली आहे.) ऐकावे ते नवलच!
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
13240 वाचन

💬 प्रतिसाद (87)

प्रतिक्रिया

श्रद्धांजली प्रतिसाद.

अर्धवट
Wed, 09/14/2011 - 12:07 नवीन
>>सासर्‍यला ढीगभर पोरी असतील तर बोहोल्यावर चढेपर्यंत रुढार्थानं बोहोल्यावर चढल्यानंतर आणि अजून काही तदुद्भव कार्ये झाल्यवरच लग्नविधी पुर्ण झाला असे मानण्याचा सामाजीक संकेत असल्यामुळे तसे होइपर्यंत 'सासरा' हा शब्दप्रयोग टेक्नीकली बरोबर नाही असे वाटते. इथे उपवधूपिता हा शब्द जास्त बरोबर होइल. अर्थात ज्या विशिष्ठ धर्माचा उल्लेख उपरोक्त प्रतिसादात केला आहे त्यातील विवाहविषयक कायद्यातील विषेश तरतूदींमुळे हे विधान काही अपवादात्मक परीस्थीतीत* टेकनीकली बरोबरही असू शकते याची जाणीव आहेच. *उदाहरणार्थ आत्ता आहे त्या सासर्‍याच्या उरलेल्या मुलींपैकीच एकीशी अथवा पुन्हा त्याच तरतूदींच्या आधार घेउन अनेकीशी पुढचे लग्न होत असल्यास
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Nile

काजीला एकदम ईरोध

वेताळ
Wed, 09/14/2011 - 11:35 नवीन
बुफे मुळे निदान सालण्यात व बिर्याणीत ज्यादा मटन कसे येईल हे बघता तरी येते. जर पंगत वाढली तर किलोभर भात घेवुन देखिल एक फोड वाटणीला येत नाही.काजीला हा अनुभव आला नसेल.
  • Log in or register to post comments

छान !

परिकथेतील राजकुमार
Wed, 09/14/2011 - 12:33 नवीन
धर्म - संस्कार - रुढी ह्यांच्या नावानी ओकार्‍या काढण्यासाठी अजून एका धाग्याची सोय झाली :)
  • Log in or register to post comments

हा हा हा

नितिन थत्ते
Wed, 09/14/2011 - 12:44 नवीन
धाग्याचा मूळ (विशिष्ट धर्माविषयी ओकार्‍या काढण्याचा) उद्देश काहींच्या प्रतिसादांमुळे फ्लॉप झाला. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार

नाह

परिकथेतील राजकुमार
Wed, 09/14/2011 - 12:47 नवीन
विशिष्ट धर्माविषयी ओकार्‍या काढण्याचा
ओकार्‍या काढणे जास्ती महत्वाचे थत्ते चाचा :) मग ते कुठल्याही धर्माविषयी का असेना. अर्थात हिंदू धर्माविषयी काढल्यावर काही धोका होण्याचा संभव नसतो म्हणून मग जास्ती जोर येतो. अर्थात ओकार्‍याच काढायच्या आहेत म्हणल्यावर धर्मात तरी फरक कशाला ? सब घोडे बारा टके...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नितिन थत्ते

>>अर्थात हिंदू धर्माविषयी

नितिन थत्ते
Wed, 09/14/2011 - 12:57 नवीन
>>अर्थात हिंदू धर्माविषयी काढल्यावर काही धोका होण्याचा संभव नसतो म्हणून मग जास्ती जोर येतो. इथे काढलेल्या ओकार्‍या कुठल्याही धर्माविषयी असल्या तरी कुणाला काही धोका नसतो. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार

>>अर्थात हिंदू धर्माविषयी

नगरीनिरंजन
Wed, 09/14/2011 - 13:19 नवीन
>>अर्थात हिंदू धर्माविषयी काढल्यावर काही धोका होण्याचा संभव नसतो म्हणून मग जास्ती जोर येतो. कै च्या कै. हिंदू धर्म किती मागासलेला आणि कर्मकांडात गुरफटलेला आहे हे तुमच्या सारख्यांना काय कळणार? शिवाय त्या कर्मकांडांविरुद्ध बोलायची सोय तरी आहे का तुम्हाला? अशा या साचलेल्या डबक्याला स्वच्छ करण्याची हिंमत केवळ हे विचारवंतच करु शकतात. चिल्लर-थिल्लर लोकांची कामं नाहीत ती. हे लोक आहेत म्हणून तरी हिंदूंना काहीतरी आशा आहे भविष्याची.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार

अगदी अगदी

परिकथेतील राजकुमार
Wed, 09/14/2011 - 13:21 नवीन
हे लोक आहेत म्हणून तरी हिंदूंना काहीतरी आशा आहे भविष्याची.
सहमत सहमत. आज सुद्धा जे काही चार क्षण सुखाचे मिळत आहेत ती ह्या लोकांचीच कृपा आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नगरीनिरंजन

+१

नितिन थत्ते
Wed, 09/14/2011 - 14:03 नवीन
>>आज सुद्धा जे काही चार क्षण सुखाचे मिळत आहेत ती ह्या लोकांचीच कृपा आहे. अगदी बरोबर बोललात. वेळोवेळच्या आगरकर, सावरकर आदि 'विचारजंतां'नी लावलेल्या सुधारणांच्या रेट्यामुळेच काहींना "आम्ही पुरोगामी" असा टेंभा मिरवणे शक्य झाले आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार

एक नम्र विनंती...

धमाल मुलगा
Wed, 09/14/2011 - 14:19 नवीन
>>वेळोवेळच्या आगरकर, सावरकर आदि 'विचारजंतां'नी लावलेल्या सुधारणांच्या रेट्यामुळेच कृपा करुन वास्तविक विचारवंत असलेल्यांना विचारजंतांच्या पंक्तीला बसवू नका ही विनंती! मुळात ह्या दोन वर्गवारीतला मुलभूत फरक जाणून घ्यावा. उगाच त गंगूतेल्यानं भोजराजाच्या खांद्यावर मित्रत्वानं थाप मारुन गप्पा केल्यासारखं वाटेल. बाकी गोष्टींबद्दल बोलण्यात अर्थच नसल्याने इत्यलम्!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नितिन थत्ते

थत्ते

सहज
Wed, 09/14/2011 - 14:25 नवीन
थत्ते चाचांशी सहमत, आज आमचा हिंदू धर्म किती पुढारलेला आहे बघा, किती सुधारणा झाल्या आहेत हे अभिमानाने सांगताना वेळोवेळी विरोध पत्करुन कार्य केलेले सुधारक ज्यांना त्या त्या वेळी 'विचारजंत' म्हणुन हिणवल्याचे विसरले जाते. बाकी गंगू तेल्याने भोजराजाच्या खांद्यावर मित्रत्वाची थाप ठेवू नये किंवा ठेवलाच तर त्याचा विशेष उल्लेख केला जावा अश्या काही परंपरा अजुन असतील असे वाटले नव्हते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धमाल मुलगा

हा हा! घेतील हो त्यांचही नाव

नगरीनिरंजन
Wed, 09/14/2011 - 14:31 नवीन
हा हा! घेतील हो त्यांचही नाव घेतील पुढच्या पिढीत. बाकी वर जी नावं घेतलीत त्यांनी बाब्याला नावं ठेवली म्हणून कार्ट्याचे दोष नव्हते शोधले. वाईटाला वाईटच म्हणायचे ते. हा फरक उरेलच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सहज

परंपरा नव्हेच साहेब..

धमाल मुलगा
Wed, 09/14/2011 - 14:32 नवीन
लायकी! एखाद्या तेल्याची लायकी/कुवत, देशाच्या राजाच्या खांद्यावर थाप मारण्याची नसणं हे वावगं नसावं असं वाटतं. उदाहरणादाखल असं समजू, तुमची स्वतः एखादी मोठी कंपनी आहे, आणि गेटावरच्या दारवानाने/ऑफिसातल्य प्युनने वगैरे तुम्ही ऑफिसात आल्यावर तुमच्या पाठीवर थाप मारुन बोललं तर बहुधा तुम्हालाही, एका मोठ्या कंपनीचा मालक म्हणून ते वावगं वाटेल असा कयास! तसं वाटणं नसल्यास क्षमस्व! >>वेळोवेळी विरोध पत्करुन कार्य केलेले सुधारक ज्यांना त्या त्या वेळी 'विचारजंत' म्हणुन हिणवल्याचे विसरले जाते. अहं! तसं नव्हे ते. तुमच्याच वाक्याच्या पुर्वार्धात गम्मत दडली आहे पहा. :) म्हणूनच मी विचारवंत आणि विचारजंत ह्यातला फरक पहा म्हणालो इतकंच. असो, चला, एका मित्राच्या मित्राच्या मित्राचा निकाह आहे, तिकडं जाऊन येतो, बफेवर बंदी येण्याच्या आत!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सहज

लक्षणे

नितिन थत्ते
Wed, 09/14/2011 - 14:28 नवीन
वास्तविक विचारवंत आणि विचारजंत यात फरक ओळखण्याची लक्षणे ठाऊक असल्यास सांगावी. अन्यथा आगरकरांची प्रेतयात्रा काढली गेल्याचे सर्वांना ज्ञात आहे आणि त्यांना (तसेच सावरकरांना देखील) विचारजंत*च समजले जात होते हे सर्वश्रुत आहे. कर्वे यांच्या कुटुंबावर मुरुड गावात बहिष्कारही टाकला गेला होता असे वाचले आहे. *विचारजंत हा चटपटीत शब्द त्या काळी वापरला जात होता का ते माहिती नाही. (मिपा सर्टिफाईड विचारजंत) नितिन थत्ते
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धमाल मुलगा

ठीक!

धमाल मुलगा
Wed, 09/14/2011 - 14:39 नवीन
सावरकर, आगरकर, कर्वे, आणि प्रभॄतींशी बरोबरी करतेवेळी, एकतरी विचारजंत अशा सुधारकांशी बरोबरीकरिता आपली लायकी सिध्द करवू शकत असेल तर मी माझी विनंती/विधाने बिनशर्त मागे घ्यायला तयार आहेच. समाजाचे भले* झाले तर कोणाला नको आहे? *भले=सर्वसामावेशक, समाजाला योग्य असेल असे. आत्मकेंद्रीत वैचारिक अहंगंड सुखावणारे असे नव्हे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नितिन थत्ते

अजुन १०० वर्षांना याच

मृत्युन्जय
Wed, 09/14/2011 - 14:57 नवीन
अजुन १०० वर्षांना याच विचारवंतांना (जंतांना लिहिलेले नाही याची कृपया नोंद घेण्यात यावी) तुमचे पुत्रपौत्र डोक्यावर घेउन नाचतील तेव्हा कळेल तुम्हाला त्यांची किंमत (अर्थात तेव्हा तुमच्यासारखे असंमजस, समाजद्रोही लोक जिवंत नसतील ही गोष्ट वेगळी). तुम्हाला नुसते सावरकर, कर्व, आंबेडकरांचे गोडवे गाता येतात. कोणी सुधारणावादी विचार मांडले की तुम्ही बोंबाबोंब करायला तयार, अहो असे विचार नाही मांडले तर उद्याचे सावरकर, कर्वे, आंबेडकर, आगरकर कसे जन्माला येणार? समकालीन लोकांना विचारवंतांचे उदात्त विचार कळत नाहीत हेच खरे. छ्या आज मिपाकर असल्याची शरम वाटली मला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धमाल मुलगा

सांगा

नितिन थत्ते
Wed, 09/14/2011 - 15:08 नवीन
>>एकतरी विचारजंत अशा सुधारकांशी बरोबरीकरिता आपली लायकी सिध्द करवू शकत असेल लायकी सिद्ध करण्याचा क्रायटेरिया कळवावा. विचार केला जाईल. बाकी आगरकर, कर्वे जे करत सांगत आहेत त्यात समाजाचे भले नाही असेच तेव्हाच्या सामान्यांचे आणि धर्ममार्तंडांचे मत होते. हे नाकारायचा प्रयत्न करू नका. सावरकरांनाही 'लोकांचा बुद्धिभेद करू नका' असाच सल्ला दिला गेला होता हे आम्हास माहिती आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धमाल मुलगा

>>लायकी सिद्ध करण्याचा

धमाल मुलगा
Wed, 09/14/2011 - 15:20 नवीन
>>लायकी सिद्ध करण्याचा क्रायटेरिया कळवावा. विचार केला जाईल. सावरकर, आगरकर,कर्वे!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नितिन थत्ते

असहमत

परिकथेतील राजकुमार
Wed, 09/14/2011 - 14:54 नवीन
वेळोवेळच्या आगरकर, सावरकर आदि 'विचारजंतां'नी
छ्या छ्या ! अहो आगरकर, सावरकर कसले आलेत ? उगाच कोणाची तरी नावे घेउन त्यांना विनाकारण मोठेपण देउ नका. आज समाजाला जर खरी गरज कुणाची असेल तर ती एम. एफ. हुसेन, मिरा नायर, शबाना आझमी अशा लोकांची. अशा लोकांच्या पंक्तित तुम्ही त्या आगरकर, सावरकरांना कुठे आणून बसवताय ? प्रतिक्रिया मागे घ्या बरे. का मी एक डू-आयडी काढून तुमच्या माफिची मागणी करायला सुरुवात करु ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नितिन थत्ते

आँ!!!

Nile
Wed, 09/14/2011 - 20:46 नवीन
>>का मी एक डू-आयडी काढून तुमच्या माफिची मागणी करायला सुरुवात करु ? माफिसाठी पुर्वी टाहो फोडलेले जुने आयडी ड्वोल्यांसमोर आले आणि मी पाणावलो!! ;-) हे गुपित बाहेर काढल्याबद्दल पर्‍याला अर्धी क्वार्टर माझ्याकडून!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार

धर्म - संस्कार - रुढी

मृत्युन्जय
Wed, 09/14/2011 - 13:48 नवीन
धर्म - संस्कार - रुढी ह्यांच्या नावानी ओकार्‍या काढण्यासाठी अजून एका धाग्याची सोय झाली आक्षेप. गरज पडल्यास कुठल्याही मुतारीत ओकार्‍या काढता येतात. त्यासाठी खास सोय करण्याची (किंवा होण्याची) गरज नसते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार

मुतारी??

Nile
Wed, 09/14/2011 - 20:48 नवीन
मुतारी हे संबोधन, इथे, नक्की कशासाठी वापरता आहात हे कळले नाही. मनात दोनचार शक्यता आल्या पण खात्री करायच्या आधी विचारावं म्हटलं. अर्थात सांगायला पाहिजेच असे काही नाही, आम्ही आपले फक्त निरीक्षण नोंदवले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृत्युन्जय

अरे व्वा ! देर आए दुरुस्त आए !

वाहीदा
Wed, 09/14/2011 - 14:29 नवीन
काझी म्हणजे न्यायाधिश किंवा जज आमच्या खानदानात ही बरेचसे बुजुर्ग अजूनही लग्न लावणे, भांडण तंटा सोडवणे, न्यायिक Verdict देणे, योग्य निर्णय घेणे या बाबतित ’काझी’ या हुद्यावर अजूनही काम पहातात अन ते ही हदिया (मानधन) न घेता !! आता हि चांगली बातमी प्रिंट करुनच पाठवायला पाहीजे निश्चितच स्वागतार्ह निर्णय आहे. निकाह मध्ये पैशांचा शोऑफ करणार्‍या लोकांना चांगलाच धडा मिळेल. ~ वाहीदा काझी
  • Log in or register to post comments

नक्की कळल नाही

सातारकर
Wed, 09/14/2011 - 15:00 नवीन
आमच्या खानदानात ही बरेचसे बुजुर्ग अजूनही लग्न लावणे, भांडण तंटा सोडवणे, न्यायिक Verdict देणे, योग्य निर्णय घेणे या बाबतित ’काझी’ या हुद्यावर अजूनही काम पहातात अन ते ही हदिया (मानधन) न घेता !! यातला न्यायिक Verdict देणे हा भाग म्हणजे सरकारी न्यायालयाच काम का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वाहीदा

काही आहेत जे सरकारी न्यायालयात आहेत

वाहीदा
Wed, 09/14/2011 - 15:35 नवीन
होय काही पदवी संपादन करुन न्यायीक Verdict देतात पण त्यासाठी त्यांना सरकारच पैसे देतो पण काही वंशपरंपरागत पध्दतीने ती गोष्ट हाताळतात . असो, बाकी निकाह च्या नावावर पैशांचा जो अपव्यय चालतो त्याला मात्र नक्कीच लगाम लागेल बुफे जेवण लोक हव्वे तेवढे घेतात अन मग मग उष्टावलेले जेवण वाया जाते तसे न करता जेवढे गरज आहे तेवढेच घ्यावे नाहीतर गरिब मुलांना , अनाथांना तरी खायला द्यावे. पैसे लाऊड म्युजिक , थिल्लर शोऑफ बतावण्या करण्यापेक्षा कुणा अनाथमुलीचे लग्नात हातभार लाऊन दाखवा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सातारकर

ला ला ला ला

परिकथेतील राजकुमार
Wed, 09/14/2011 - 15:48 नवीन
बाकी निकाह च्या नावावर पैशांचा जो अपव्यय चालतो त्याला मात्र नक्कीच लगाम लागेल
अच्छा अच्छा म्हणून तू इतकी खुश आहेस होय ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वाहीदा

हो, मग काय तर

वाहीदा
Wed, 09/14/2011 - 16:35 नवीन
तु कित्ती कित्ती मनकवडा रे परा ! स्त्रीयांच्या / मुलींच्या भावना लगेच ओळ्खतोस :P
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार

अगं, सवयच्चे त्याला!

रेवती
Wed, 09/14/2011 - 20:05 नवीन
अगं, सवयच्चे त्याला!;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वाहीदा

>>पैसे लाऊड म्युजिक , थिल्लर

विश्वनाथ मेहेंदळे
Wed, 09/14/2011 - 16:44 नवीन
>>पैसे लाऊड म्युजिक , थिल्लर शोऑफ बतावण्या करण्यापेक्षा कुणा अनाथमुलीचे लग्नात हातभार लाऊन दाखवा हे ठीक आहे. चांगला विचार आहे. पण त्यासाठी या गोष्टीला धर्माचा मुलामा कशाला द्यायला हवा? तुम्हाला या बातमीने आनंद झालेला दिसतो म्हणून विचारतो की प्रत्येक लहानसहान गोष्टीला इस्लाम विरोधी ठरवून बंदी घालणे हे घातक आहे असे नाही वाटत? आज लग्नातील संगीतावर बंदी घातली, उद्या तुम्ही २४ तास बुरखा घातला पाहिजे म्हणतील (एक उदाहरण म्हणून, या जागी तुमच्या व्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणणारे काहीही उदाहरण घेऊ शकता). तेव्हाही असाच आनंद व्यक्त कराल का? मला तर असे वाटते की समाजसुधारणा आणि धर्म हे फार मिक्स करता कामा नये. धर्मानुसार बंदी घालणे हे दुधारी शस्त्र आहे इतके लक्षात असू द्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वाहीदा

जर तो निर्णय काझी घेत असतील

वाहीदा
Wed, 09/14/2011 - 17:04 नवीन
जर निर्णय काझी घेत असतील तर तसे होईल असे वाटत नाही पण जर काझीला धुडकवून मुल्ला मौलवींनी निर्णय घेऊन जर बंदी लावली तर मग कठीण आहे. कारण कुराणात या विषयी काही वेगळे आहे पण मला हा विषय जास्त वाढवायचा नाही तेव्हा तुर्तास एवढेच
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विश्वनाथ मेहेंदळे

अजूनच कोडं

सातारकर
Wed, 09/14/2011 - 17:01 नवीन
तुम्ही मला अजूनच गोंधळात टाकलत. काही पदवी संपादन करुन न्यायीक Verdict देतात पण त्यासाठी त्यांना सरकारच पैसे देतो ही पदवी सरकारी कायद्याची असते (कोणत्याही विधी महाविद्यालयातून घेतलेली) की धार्मिक? आता ही जर असल्या कोणत्याही महाविद्यालयातून घेतलेली असेल तर न्यायालय आहेच की. तस नसेल, जर ती पदवी धार्मिक शिक्षणाशी संबंधीत असून सरकारी कायदेशीर शिक्षणाशी संबंधीत नसेल, तरी सरकार त्याला पैसे देत? दुसर म्हणजे काही वंशपरंपरागत पध्दतीने ती गोष्ट हाताळतात . हे म्हणजे हिंदूंमधे ब्राम्हण / गुरव / जंगम पूजा-इत्यादी (वंशपरंपरेने - त्या त्या जातीत जन्माला आले म्हणून) करतात त्या प्रकारात का? आणि यांनाही सरकार पैसे देत का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वाहीदा

google it up !

वाहीदा
Wed, 09/14/2011 - 17:12 नवीन
I am talking about actual Judge who are there in Local and District court well if you wana know more google it up !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सातारकर

लाउड म्युझिकच्या बाबतीत

बिपिन कार्यकर्ते
Wed, 09/14/2011 - 15:11 नवीन
लाउड म्युझिकच्या बाबतीत निर्णय अतिउत्तम असे म्हणावेसे वाटते. मंद आवाजातील संगितावर आक्षेप नसावा असे वाटते. बुफेबद्दल मात्र गंमत वाटली. बुफेमधे सुकूनमधे जेवता येत नाही हा जावईशोध हास्यास्पद आहे. परवाच एका लग्नात आम्ही बुफे पद्धतीच्या जेवणात अगदी नीट आरामशीर बसून भोजनाचा आस्वाद घेतला. त्याच्बरोबर लहानपणी पंगतीतल्या जेवणातही अर्धपोटी उठल्याची एक आठवण आहे. शिवाय असे निर्णय धार्मिक आवरणाखाली घेतले जातात त्याबद्दल तीव्र असहमती आहे. एकदा का धर्माच्या / कर्मकांडाच्या आवरणाखाली असे फारसे चुकीचे न वाटणारे निर्णय घेतले गेले की मग हळू हळू कोणत्याही बाबतीत हस्तक्षेप होऊ लागतो. त्यामुळे हा ट्रेंड धोकादायक आहे. अर्थात, एखाद्या धार्मिक कर्मकांडाच्या प्रकारात त्या त्या धर्मातील ढुढ्ढाचार्यांचा वरचष्मा राहणारच. कर्मकांड झुगारून देणे अथवा त्यात शक्य तेवढे बदल घडवून ते करणे असे मार्ग कमीतकमी हिंदू धर्मियांमधे सर्रास रूढ होताना दिसत आहेत. इतर धर्मांमधे, विशेषतः मुस्लिम धर्मात, एवढी समाजिक सुधारणा होणे हे काही पायाभूत कारणांमुळे तुलनेने तितकेसे सोपे (शक्य असल्यास) नाही.
  • Log in or register to post comments

सहमत

सातारकर
Wed, 09/14/2011 - 17:22 नवीन
विशेषतः दुसर्‍या परिच्छेदाशी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते

धागा आणि सोबतची खमंग चर्चा

घाटावरचे भट
Wed, 09/14/2011 - 20:39 नवीन
धागा आणि सोबतची खमंग चर्चा वाचून आनंद जाहला!!
  • Log in or register to post comments

उभे नाही तर आडवेपणजेवण हे

आशु जोग
गुरुवार, 09/15/2011 - 23:19 नवीन
उभे नाही तर आडवे पण जेवण हे आवश्यकच -- जेवल्याशिवाय जायचं नाही बरं का !
  • Log in or register to post comments

छान. चालू ठेवा.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Fri, 09/16/2011 - 20:00 नवीन
चर्चा प्रस्ताव, प्रतिसाद माहितीपूर्ण आणि मनोरंजन करणारे आहेत. चालू ठेवा. :) -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा