Skip to main content

मौलवींची मौलिक मौक्तिके !

लेखक हुप्प्या यांनी बुधवार, 14/09/2011 04:30 या दिवशी प्रकाशित केले.
http://timesofindia.indiatimes.com/city/lucknow/Qazis-knotty-terms-to-s… ज्या निकाहाच्या वेळी बुफे पद्धतीचे जेवण आणि पार्श्वभूमीवर संगीत असेल तिथे काझी लोक निकाह लावणार नाहीत असे फर्मान काही मुस्लिम धर्म मार्तंडानी काढले आहे. संगीत हे इस्लामला मंजूर नाही. आणि बुफेचे खूळही. ह्या फर्मानामुळे अनेक मुस्लिम कुटुंबांची पंचाईत झाली आहे. चांगले वाजत गाजत, साग्रसंगीत लग्न, आय मीन निकाह लावण्यावर संक्रांत आली आहे. खानेवाला राझी और सुननेवाला राझी तो क्या करेगा काझी असे म्हणता आले असते. पण तसे होत नाही. विशेष म्हणजे शिया आणि सुन्नी दोन्ही गटांचे अध्वर्यू याबाबतीत एकमतात आहेत. (आपल्या लाडक्या सकाळमधेही ही बातमी काही तासांपूर्वी आली होती पण काही अज्ञात कारणांमुळे उडवून लावली आहे.) ऐकावे ते नवलच!

वाचने 13292
प्रतिक्रिया 87

प्रतिक्रिया

In reply to by परिकथेतील राजकुमार

धर्म - संस्कार - रुढी ह्यांच्या नावानी ओकार्‍या काढण्यासाठी अजून एका धाग्याची सोय झाली आक्षेप. गरज पडल्यास कुठल्याही मुतारीत ओकार्‍या काढता येतात. त्यासाठी खास सोय करण्याची (किंवा होण्याची) गरज नसते.

In reply to by मृत्युन्जय

मुतारी हे संबोधन, इथे, नक्की कशासाठी वापरता आहात हे कळले नाही. मनात दोनचार शक्यता आल्या पण खात्री करायच्या आधी विचारावं म्हटलं. अर्थात सांगायला पाहिजेच असे काही नाही, आम्ही आपले फक्त निरीक्षण नोंदवले.

काझी म्हणजे न्यायाधिश किंवा जज आमच्या खानदानात ही बरेचसे बुजुर्ग अजूनही लग्न लावणे, भांडण तंटा सोडवणे, न्यायिक Verdict देणे, योग्य निर्णय घेणे या बाबतित ’काझी’ या हुद्यावर अजूनही काम पहातात अन ते ही हदिया (मानधन) न घेता !! आता हि चांगली बातमी प्रिंट करुनच पाठवायला पाहीजे निश्चितच स्वागतार्ह निर्णय आहे. निकाह मध्ये पैशांचा शोऑफ करणार्‍या लोकांना चांगलाच धडा मिळेल. ~ वाहीदा काझी

In reply to by वाहीदा

आमच्या खानदानात ही बरेचसे बुजुर्ग अजूनही लग्न लावणे, भांडण तंटा सोडवणे, न्यायिक Verdict देणे, योग्य निर्णय घेणे या बाबतित ’काझी’ या हुद्यावर अजूनही काम पहातात अन ते ही हदिया (मानधन) न घेता !! यातला न्यायिक Verdict देणे हा भाग म्हणजे सरकारी न्यायालयाच काम का?

In reply to by सातारकर

होय काही पदवी संपादन करुन न्यायीक Verdict देतात पण त्यासाठी त्यांना सरकारच पैसे देतो पण काही वंशपरंपरागत पध्दतीने ती गोष्ट हाताळतात . असो, बाकी निकाह च्या नावावर पैशांचा जो अपव्यय चालतो त्याला मात्र नक्कीच लगाम लागेल बुफे जेवण लोक हव्वे तेवढे घेतात अन मग मग उष्टावलेले जेवण वाया जाते तसे न करता जेवढे गरज आहे तेवढेच घ्यावे नाहीतर गरिब मुलांना , अनाथांना तरी खायला द्यावे. पैसे लाऊड म्युजिक , थिल्लर शोऑफ बतावण्या करण्यापेक्षा कुणा अनाथमुलीचे लग्नात हातभार लाऊन दाखवा

In reply to by वाहीदा

बाकी निकाह च्या नावावर पैशांचा जो अपव्यय चालतो त्याला मात्र नक्कीच लगाम लागेल
अच्छा अच्छा म्हणून तू इतकी खुश आहेस होय ;)

In reply to by परिकथेतील राजकुमार

तु कित्ती कित्ती मनकवडा रे परा ! स्त्रीयांच्या / मुलींच्या भावना लगेच ओळ्खतोस :P

In reply to by वाहीदा

>>पैसे लाऊड म्युजिक , थिल्लर शोऑफ बतावण्या करण्यापेक्षा कुणा अनाथमुलीचे लग्नात हातभार लाऊन दाखवा हे ठीक आहे. चांगला विचार आहे. पण त्यासाठी या गोष्टीला धर्माचा मुलामा कशाला द्यायला हवा? तुम्हाला या बातमीने आनंद झालेला दिसतो म्हणून विचारतो की प्रत्येक लहानसहान गोष्टीला इस्लाम विरोधी ठरवून बंदी घालणे हे घातक आहे असे नाही वाटत? आज लग्नातील संगीतावर बंदी घातली, उद्या तुम्ही २४ तास बुरखा घातला पाहिजे म्हणतील (एक उदाहरण म्हणून, या जागी तुमच्या व्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणणारे काहीही उदाहरण घेऊ शकता). तेव्हाही असाच आनंद व्यक्त कराल का? मला तर असे वाटते की समाजसुधारणा आणि धर्म हे फार मिक्स करता कामा नये. धर्मानुसार बंदी घालणे हे दुधारी शस्त्र आहे इतके लक्षात असू द्या.

In reply to by विश्वनाथ मेहेंदळे

जर निर्णय काझी घेत असतील तर तसे होईल असे वाटत नाही पण जर काझीला धुडकवून मुल्ला मौलवींनी निर्णय घेऊन जर बंदी लावली तर मग कठीण आहे. कारण कुराणात या विषयी काही वेगळे आहे पण मला हा विषय जास्त वाढवायचा नाही तेव्हा तुर्तास एवढेच

In reply to by वाहीदा

तुम्ही मला अजूनच गोंधळात टाकलत. काही पदवी संपादन करुन न्यायीक Verdict देतात पण त्यासाठी त्यांना सरकारच पैसे देतो ही पदवी सरकारी कायद्याची असते (कोणत्याही विधी महाविद्यालयातून घेतलेली) की धार्मिक? आता ही जर असल्या कोणत्याही महाविद्यालयातून घेतलेली असेल तर न्यायालय आहेच की. तस नसेल, जर ती पदवी धार्मिक शिक्षणाशी संबंधीत असून सरकारी कायदेशीर शिक्षणाशी संबंधीत नसेल, तरी सरकार त्याला पैसे देत? दुसर म्हणजे काही वंशपरंपरागत पध्दतीने ती गोष्ट हाताळतात . हे म्हणजे हिंदूंमधे ब्राम्हण / गुरव / जंगम पूजा-इत्यादी (वंशपरंपरेने - त्या त्या जातीत जन्माला आले म्हणून) करतात त्या प्रकारात का? आणि यांनाही सरकार पैसे देत का?

In reply to by सातारकर

I am talking about actual Judge who are there in Local and District court well if you wana know more google it up !

लाउड म्युझिकच्या बाबतीत निर्णय अतिउत्तम असे म्हणावेसे वाटते. मंद आवाजातील संगितावर आक्षेप नसावा असे वाटते. बुफेबद्दल मात्र गंमत वाटली. बुफेमधे सुकूनमधे जेवता येत नाही हा जावईशोध हास्यास्पद आहे. परवाच एका लग्नात आम्ही बुफे पद्धतीच्या जेवणात अगदी नीट आरामशीर बसून भोजनाचा आस्वाद घेतला. त्याच्बरोबर लहानपणी पंगतीतल्या जेवणातही अर्धपोटी उठल्याची एक आठवण आहे. शिवाय असे निर्णय धार्मिक आवरणाखाली घेतले जातात त्याबद्दल तीव्र असहमती आहे. एकदा का धर्माच्या / कर्मकांडाच्या आवरणाखाली असे फारसे चुकीचे न वाटणारे निर्णय घेतले गेले की मग हळू हळू कोणत्याही बाबतीत हस्तक्षेप होऊ लागतो. त्यामुळे हा ट्रेंड धोकादायक आहे. अर्थात, एखाद्या धार्मिक कर्मकांडाच्या प्रकारात त्या त्या धर्मातील ढुढ्ढाचार्यांचा वरचष्मा राहणारच. कर्मकांड झुगारून देणे अथवा त्यात शक्य तेवढे बदल घडवून ते करणे असे मार्ग कमीतकमी हिंदू धर्मियांमधे सर्रास रूढ होताना दिसत आहेत. इतर धर्मांमधे, विशेषतः मुस्लिम धर्मात, एवढी समाजिक सुधारणा होणे हे काही पायाभूत कारणांमुळे तुलनेने तितकेसे सोपे (शक्य असल्यास) नाही.

चर्चा प्रस्ताव, प्रतिसाद माहितीपूर्ण आणि मनोरंजन करणारे आहेत. चालू ठेवा. :) -दिलीप बिरुटे