✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

मौलवींची मौलिक मौक्तिके !

ह
हुप्प्या यांनी
Wed, 09/14/2011 - 04:30  ·  लेख
लेख
http://timesofindia.indiatimes.com/city/lucknow/Qazis-knotty-terms-to-solemnise-wedding/articleshow/9973764.cms ज्या निकाहाच्या वेळी बुफे पद्धतीचे जेवण आणि पार्श्वभूमीवर संगीत असेल तिथे काझी लोक निकाह लावणार नाहीत असे फर्मान काही मुस्लिम धर्म मार्तंडानी काढले आहे. संगीत हे इस्लामला मंजूर नाही. आणि बुफेचे खूळही. ह्या फर्मानामुळे अनेक मुस्लिम कुटुंबांची पंचाईत झाली आहे. चांगले वाजत गाजत, साग्रसंगीत लग्न, आय मीन निकाह लावण्यावर संक्रांत आली आहे. खानेवाला राझी और सुननेवाला राझी तो क्या करेगा काझी असे म्हणता आले असते. पण तसे होत नाही. विशेष म्हणजे शिया आणि सुन्नी दोन्ही गटांचे अध्वर्यू याबाबतीत एकमतात आहेत. (आपल्या लाडक्या सकाळमधेही ही बातमी काही तासांपूर्वी आली होती पण काही अज्ञात कारणांमुळे उडवून लावली आहे.) ऐकावे ते नवलच!
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
13240 वाचन

💬 प्रतिसाद (87)

प्रतिक्रिया

सकाळ मधील बातमी अजून उडाली नाही आहे

सिद्धार्थ ४
Wed, 09/14/2011 - 04:40 नवीन
हि बघा लिंक http://72.78.249.107/esakal/20110914/4779604889786783975.htm पण ह्या बातमीचा तुमच्या आमच्या वर काय फरक पडतो. (तुम्ही मुसलमान नाही आहात आणि भविष्यात कुठल्याही मुसलमान मुलाशी / मुलीशी लग्न करणार नसाल असे गृहीत धरतो विचारात आहे ) :)
  • Log in or register to post comments

हे तर काहीच नाही...

राजेश घासकडवी
Wed, 09/14/2011 - 04:50 नवीन
परवा आमच्या मित्राचे लग्न होते. पण आयत्या वेळी भटजीने लग्न लावून द्यायला नकार दिला - का तर म्हणजे पंगतीत गोमांस वाढू नये! आता मी म्हणतो, खानेवाला राझी तो क्या करेगा भटजी असे म्हणता आले असते. पण नाही. भटजीशिवाय नुसते रजिष्टर करावे लागले लग्न. आता मला सांगा, हे काय खरे लग्न का? आधी दोन वर्षे एकत्र रहात होते तसेच रहातात, फक्त एक सर्टिफिकेट घेऊन....
  • Log in or register to post comments

=)) =))

Nile
Wed, 09/14/2011 - 04:53 नवीन
साष्टांग स्विकारा हो गुर्जी!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राजेश घासकडवी

+२

सहज
Wed, 09/14/2011 - 06:00 नवीन
हा हा हा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Nile

+३

३_१४ विक्षिप्त अदिती
Wed, 09/14/2011 - 07:50 नवीन
अहो, हे तर सोडाच. आम्ही म्हटलं आमचं लग्न लावून द्या तर चक्क दक्षिणा, नारळ आणि काय काय मागत होता. वर त्याची पावतीही देणार नाही म्हणाला! आता पावती नाही याचा अर्थ हे पैसे काळे नाही का झाले? आम्ही खपून मिळवलेले पांढरे पैसे असे काळे होताना बघवले नाहीत. मग दिली तडी त्या भटजीला!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सहज

स्विस बॅंक

राजेश घासकडवी
Wed, 09/14/2011 - 07:54 नवीन
स्विस बॅंकेत सर्वाधिक संपत्ती ठेवलेले कोणी भटजीच आहेत असं ऐकून आहे...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती

जय जवान, जय किसान, जय विज्ञान

३_१४ विक्षिप्त अदिती
Wed, 09/14/2011 - 08:46 नवीन
त्या सर्व भटजींची यादी जाहीर करावी अशी मागणी अण्णांनी स्विस सरकारकडे सुपोषण* करावी असं पत्रं मा. सुधीर काळे यांनी लिहावं अशी विनंती मी करत आहे. *उपोषणासहित
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राजेश घासकडवी

वरील प्रतिसादात मिपा सदस्य

विजुभाऊ
Wed, 09/14/2011 - 11:29 नवीन
वरील प्रतिसादात मिपा सदस्य श्री काळे यांचा उल्लेख कशासाठी करण्यात आलेला आहे? कारण नसताना एखाद्याची थट्टा कशासाठी करायची?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती

सुपोषण= सु+पोषण=सु= चागंले,

पाषाणभेद
गुरुवार, 09/15/2011 - 02:02 नवीन
>>> त्या सर्व भटजींची यादी जाहीर करावी अशी मागणी अण्णांनी स्विस सरकारकडे सुपोषण* करावी असं पत्रं मा. सुधीर काळे यांनी लिहावं अशी विनंती मी करत आहे. *उपोषणासहित =================================== सुपोषण= सु+पोषण=सु= चागंले, उत्तम, व्यवस्थीत (उदा. सुगम, सुलोचन, सुनीती आदी.) आता आपण सुपोषण* म्हणजे *उपोषणासहित असे म्हणता आहात. आपण सपोषण म्हटले असते तर ठिक आहे. सुपोषण म्हणजे उपोषणाच्या अगदी विरूद्धअर्थी शब्द तयार होतो आहे. "सुपोषण* म्हणजे *उपोषणासहित" म्हटले म्हणजे एक नविन चुकीचा शब्दार्थ तयार होतो आहे. केवळ आपल्या नजरेस आणून देण्याचा प्रयत्न. बाकी चालू द्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती

नव्हे!

३_१४ विक्षिप्त अदिती
गुरुवार, 09/15/2011 - 03:40 नवीन
सविनय = स+विनय तसेच सुपोषण = स+उपोषण.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पाषाणभेद

वादाचा मुद्दा आहे खरा

पाषाणभेद
गुरुवार, 09/15/2011 - 03:52 नवीन
वादाचा मुद्दा आहे खरा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती

मग ते सौपोषण असे पाहिजे ना ??

विश्वनाथ मेहेंदळे
गुरुवार, 09/15/2011 - 09:30 नवीन
मग ते सौपोषण असे पाहिजे ना ?? (अ + उ =औ ) सुपोषण चा अर्थ नेमका उलट होईल. सु + पोषण असा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती

बरोबरे तुमचं.

३_१४ विक्षिप्त अदिती
गुरुवार, 09/15/2011 - 09:32 नवीन
हां ... पण सौपोषण हा शब्द कानाला बरा नाही वाटत आहे. त्यापेक्षा मी तो शब्द मागे घेऊन उपोषणासहित हाच शब्द पुढे करते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विश्वनाथ मेहेंदळे

>> सौपोषण हा शब्द कानाला बरा

आशु जोग
Fri, 09/16/2011 - 23:01 नवीन
>> सौपोषण हा शब्द कानाला बरा नाही वाटत आहे. त्यापेक्षा मी तो शब्द मागे घेऊन उपोषणासहित हाच शब्द पुढे करते मागे म्हणजे नावामागे सौ
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती

भटजी लोकांबद्दल बरीच माहिती

आशु जोग
गुरुवार, 09/15/2011 - 00:44 नवीन
भटजी लोकांबद्दल बरीच माहिती दिसत्ये म्हणजे तुम्ही ... नक्कीच
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती

(No subject)

३_१४ विक्षिप्त अदिती
गुरुवार, 09/15/2011 - 03:41 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आशु जोग

उत्तम केलं!

पिवळा डांबिस
Wed, 09/14/2011 - 05:01 नवीन
आमचा याबाबतीत काजीलोकांना पाठिंबा!! हिंदू लग्नातही बुफे बंद करून जर पंगत बसवून जेवण वाढलं नाही आणि फिल्मी गाण्यांच्याऐवजी जर सनई-चौघडा वाजवला नाही तर आम्ही लग्न लावणार नाही अशी कणखर भूमिका भटजीलोक घेतील तर बरं होईल!!!!! एका लग्नात तर चक्क भेळ्पुरी-पाणीपुरीच्या गाड्या लावलेल्या पाहिल्या... च्यामारी, ही काय थट्टा आहे? तुम्हाला साग्रसंगीत धार्मिक लग्न करायचंय ना, मग आपापले रीतीरिवाज पाळा ना! नंतर उरलेलं आयुष्य आहेच की मोकळं वधूवरांना, स्वतःच्या आयुष्याची चौपाटी करायला!!!!! पटत नसेल तर मग सरळ रजिष्टर लग्न करा..... ("कायतरी गाण्याचं कुळधर्म पाळा की! उगीच नाही तो हुंबपणा कशाला?", रावसाहेब) :)
  • Log in or register to post comments

असहमत!

विकास
Wed, 09/14/2011 - 06:00 नवीन
श्री. पिडांशी आदर राखत असहमती दर्शवत आहे. त्यांच्या लेखनावरून हे स्पष्ट झाले की त्यांनी यश चोप्रा आणि कंपनींचे चित्रपट आणि त्यातून झालेले लग्नसमारंभाचे लोकशिक्षणाचे कोर्सेच बंक केले आहेत. (त्याबद्दल वेगळा निषेध! ;) ). बाकी वरील बातमी (आणि सकाळमधील) वाचल्यावर असे लक्षात आले आहे की वाजंत्री आणि बफे/बुफे ला आक्षेप आहे. त्यात त्यांनी सरसे सरसे सरकी चुनरीया... पासून ते दिलवाले वगैरे मधील गाण्यांमधे दाखवलेल्या नाचांच्या बाबतीत आक्षेप घेतलेला नाही. म्हणून जर त्यांच्या या अप्रत्यक्ष फतव्याचा निषेध करायचाच असेल तर अशा प्रसंगी सर्वांनी नाचावे...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिवळा डांबिस

>> तुम्हाला साग्रसंगीत

शुचि
Wed, 09/14/2011 - 06:36 नवीन
>> तुम्हाला साग्रसंगीत धार्मिक लग्न करायचंय ना, मग आपापले रीतीरिवाज पाळा ना! >> खरच!!! अगदी १००% खरय. केळीच्या पानावर किंवा ताटात वाढलेला मसाले भात, मठ्ठा, गरम पांढरा भात वरण वर तूपाची धार, पापड कुर्ड्या, कोशींबीर, चटणी, अळूची पातळ भाजी, जिलबी किंवा श्रीखंड-पुरी. किती मस्त जेवण असायचं पूर्वी. सनईने तर इतकी मंगल वातावरणनिर्मीती होते : ) त्यात होमाचा धूर, लाह्या टाकणे. वाळा, मोगरा अशी पारंपारीक अत्तरे लावलेल्या , गजरे माळलेल्या शोडषयौवनांची, पुरंध्रींची, ते आज्जीबाईंपर्यंत सर्वांची एकच लगबग. लहान मुलांचा उत्साह, भटजींचे मंत्रोच्चारण तर या सर्वावर कळस. केवढी मजा असते लग्नात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिवळा डांबिस

नॉस्टेल्जिया

शाहिर
Wed, 09/14/2011 - 08:30 नवीन
+१ शुचि तै ..... एकदुम मंगल वातावरणा मधे पोचवलत .. साग्रसंगीत धार्मिक लग्न आणि वर सांगिअतल्य प्रमाणे जेवण .अहाहा स्वतच्या लग्नात पंगतच हवीच असा (जावइ)आग्रह धरणारा शाहिर
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शुचि

रीतिरिवाज

नितिन थत्ते
Wed, 09/14/2011 - 10:33 नवीन
>>केळीच्या पानावर किंवा ताटात वाढलेला मसाले भात, मठ्ठा, गरम पांढरा भात वरण वर तूपाची धार, पापड कुर्ड्या, कोशींबीर, चटणी, अळूची पातळ भाजी, जिलबी किंवा श्रीखंड-पुरी. किती मस्त जेवण असायचं पूर्वी. हा भोजनप्रकार "अस्साच्या अस्सा" नक्की किती हजार वर्षे रूढ आहे त्याची माहिती मिळेल का? म्हणजे शतका-दशकात काहीच बदल झाले नाहीत का? माझ्याच आठवणीत पाटावरची पंगत बंद होऊन टेबलावरील पंगत रूढ झाली आहे. >>सनईने तर इतकी मंगल वातावरणनिर्मीती होते : ) त्यात होमाचा धूर, लाह्या टाकणे. मंगल वातावरण निर्मिती ही मानसिक स्थिती (a state of mind) आहे. ती सनई पासून सॅक्सोफोनपर्यंत कश्यानेही होऊ शकते. (विवाहात मंगल काय असतं माहिती नाही). होमाच्या धुराने आणि लाह्यांनी उपस्थितांच्या डोळ्यांची आग होण्याखेरीज काही घडत नाही असा स्वानुभव आहे. (होमाच्या धुराने हवा शुद्ध होते असे प्सांगू नका, प्लीज). >>वाळा, मोगरा अशी पारंपारीक अत्तरे लावलेल्या , गजरे माळलेल्या शोडषयौवनांची, पुरंध्रींची, ते आज्जीबाईंपर्यंत सर्वांची एकच लगबग. लहान मुलांचा उत्साह, भटजींचे मंत्रोच्चारण तर या सर्वावर कळस. कुठच्या प्रकारे विवाह होत आहे यामुळे या लगबगीत आणि उत्साहात काही फरक पडत नाही. आता अत्तर वाळ्याचं लावावं की लव्हेण्डरचं हा वैयक्तिक चॉईस असावा. म्हणजे पारंपरिक मोगरा आणि वाळ्याच्या अत्तराऐवजी लव्हेण्डरचं अत्तर लावलं तर मांगल्य कमी होतं असं काही नसावं. >>केवढी मजा असते लग्नात. ती तर अजूनही असतेच. उलट होम आणि लाह्यांचा धूर एलिमिनेट झाला तर आणखी मजा येईल. नितिन थत्ते
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शुचि

ठ्ठो!

ऋषिकेश
Wed, 09/14/2011 - 11:20 नवीन
ठ्ठो! :)) थत्ते चाचा झिंदाबाद!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नितिन थत्ते

थत्तेचाचिच्यांशी १००००% सहमत

विजुभाऊ
Wed, 09/14/2011 - 11:34 नवीन
थत्तेचाचिच्यांशी १००००% सहमत भटजींचे मंत्रोच्चारण तर या सर्वावर कळस. याच्या इतका ईनोदी प्रकार माझ्या पहाण्यात नाही. लग्नातील लाज्या होम यात धार्मिक काय असते ते जाणकारानी भाष्य करून सांगावे. " भारतीय विवाहसंस्थेचा इतिहास" या पुस्तकात होमाचे थोतांड उघड केलेले आहे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नितिन थत्ते

माझ्या लग्नात भटजीची बोबडी

अर्धवट
Wed, 09/14/2011 - 11:38 नवीन
माझ्या लग्नात भटजीची बोबडी वळली* होती मंत्र म्हणताना त्याची आठवण झाली. *वळणारच, त्याच्या मागे सात पैलवान उभे करून ठेवले होते. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजुभाऊ

पैलवान कशासाठी नक्की?

Nile
Wed, 09/14/2011 - 11:41 नवीन
लग्नाआधीपासूनच प्रोटेक्शनची गरज पडली की काय? ;-) (ह. घेणे)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अर्धवट

हाहाहा.. तेव्हा आंधळा होतो

अर्धवट
Wed, 09/14/2011 - 11:52 नवीन
हाहाहा.. तेव्हा आंधळा होतो रे... आत्ता वाटतय की ते पैलवान वास्तवीक माझ्या मागे उभे करायला हवे होते. ;) आख्ख्या आळंदीत दुसरा भटजी मिळेना ऐनवेळेला म्हणून त्याला उचलून आणला होता. पळुन जाउ नये म्हणून पैलवान ठेवले होते..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Nile

ज्याचा त्याचा प्रश्न ..आणि अनुभव

शाहिर
Wed, 09/14/2011 - 11:41 नवीन
आम्ही शुचि तै च्या प्रतिसादाला अनुमोदन दिला आहे म्हणुन... >>हा भोजनप्रकार "अस्साच्या अस्सा" नक्की किती हजार वर्षे रूढ आहे त्याची माहिती मिळेल का? जेवणाच्या बाबतीत एखादा पूर्वी म्हणतो तेव्हा ते स्वअनुभवावरुन असता..ते हजार वर्षे नक्किच नसता.. >>माझ्याच आठवणीत पाटावरची पंगत बंद होऊन टेबलावरील पंगत रूढ झाली आहे. पंगत पाटावरची कि टेबलावरील हा मुद्दा नाहिये ...जेवणामधील पदार्थ या विषयी आहे .. >>मंगल वातावरण निर्मिती ही मानसिक स्थिती (a state of mind) आहे. ती सनई पासून सॅक्सोफोनपर्यंत कश्यानेही होऊ शकते. सर्व साधारण विधान आहे ...आणि मान्सिक स्थिती असेल तर प्रत्येक जण अनुभवा नुसार लिहिल..आम्हाला सनै ने मंगल वाटते म्हणुन आम्ही अनुमोदन दिले .. >>विवाहात मंगल काय असतं माहिती नाही ज्याच्या त्याच्या मानण्यावर आहे ...चिंतातूर जंतू असेल तर मंगल काय असेच म्हणेल .. >> होमाचा धूर, लाह्या टाकणे ह्या विषयी एक किस्सा संगतो एक लेखक एकदा इस्त्राइल ल गेले .. तेथील वास्तव्यात त्याना जेरुसलेम दाखवले ..आणि त्या गृहस्थांनी विचारले , तुम्हाला पवित्र वाटले का ? तर याना काहेच वाटले नव्हते .. तसेच गंगाजल, गंगा नदी हिन्दु संस्कृती मधे पवित्र मानतात .. म्हनुन सश्रद्ध हिन्दुना त्या विषयी पवित्र भावना आहेत .. गणपती ची मुर्ति हि मातीचिच असते ..आप्ले संस्कार , रिति रिवाज त्या मधे देव पण आनतात.. असो..अवांतरा बद्दल क्षमस्व .. होमाचा धूर बर्याच लोकांना पवित्र वाटतो कारण श्रद्धा आणि संस्कार ( ते चुकिचे बरोबर् ते फिल्टरेशन नन्तर ) >>वाळा, मोगरा अशी पारंपारीक अत्तरे लावलेल्या , गजरे माळलेल्या शोडषयौवनांची, पुरंध्रींची, ते आज्जीबाईंपर्यंत सर्वांची एकच लगबग. लहान मुलांचा उत्साह, भटजींचे मंत्रोच्चारण हा ज्यचा त्याचा घरच्या लग्नाचा अनुभव .. पंजाबी किन्वा गुज्राथी लोक वेगले लिह्तिल ...ख्रिस्ती किन्वा मुस्लिम यांची वर्णन करण्याची पद्धात वेगली असेल .. मुद्दा लक्षात घ्या हो ...किस कशाला पाडत बस्ला आहत ?? >>केवढी मजा असते लग्नात. एवढा बाकी सहमत आहे.. स्वानुभवावरुन स्वतापेक्षा जवळच्या नातेवाइक , मित्र यांच्या लग्नात जास्त मजा येते पंगतीला पैज लावुन जेवणारा शाहिर
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नितिन थत्ते

+१

मूकवाचक
Wed, 09/14/2011 - 11:49 नवीन
अमुक एका पद्धतीने केलेल्या सोहळ्यात मान्गल्य असते, परम्परेचे अधिष्ठान असते, मजा असते असे मत असण्याचाही 'वैयक्तिक चॉईस' असायला हरकत नसावी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शाहिर

ब्वॉर्र!!

Nile
Wed, 09/14/2011 - 11:51 नवीन
अमुक एका पद्धतीने केलेल्या सोहळ्यात मान्गल्य, परम्परेचे अधिष्ठान वगैरे असते असे वाटणारे हुकलेले असतात असा आमचा वैयक्तिक चॉईस असायला कुणाची हरकत नसावी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मूकवाचक

ना हरकत प्रमाणपत्र

मूकवाचक
Wed, 09/14/2011 - 11:58 नवीन
जो जे वान्छिल तो ते लाहो प्राणिजात ...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Nile

मांगल्य/पावित्र्य

नितिन थत्ते
Wed, 09/14/2011 - 12:14 नवीन
एक लेखक एकदा इस्त्राइल ल गेले .. तेथील वास्तव्यात त्याना जेरुसलेम दाखवले ..आणि त्या गृहस्थांनी विचारले , तुम्हाला पवित्र वाटले का ? तर याना काहेच वाटले नव्हते .. तसेच गंगाजल, गंगा नदी हिन्दु संस्कृती मधे पवित्र मानतात .. म्हनुन सश्रद्ध हिन्दुना त्या विषयी पवित्र भावना आहेत .. गणपती ची मुर्ति हि मातीचिच असते ..आप्ले संस्कार , रिति रिवाज त्या मधे देव पण आनतात.. असो..अवांतरा बद्दल क्षमस्व .. होमाचा धूर बर्याच लोकांना पवित्र वाटतो कारण श्रद्धा आणि संस्कार ( ते चुकिचे बरोबर् ते फिल्टरेशन नन्तर ) अहो, तेच तर म्हणणे आहे मांगल्य हे त्या सनईच्या सुरांत नसतेच; ते आपल्या डोक्यात असते. (अश्लीलता ही पाहणार्‍याच्या डोळ्यात असते - इति ह. भ. प. दादामहाराज कोंडके) नितिन थत्ते
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शाहिर

ती तर अजूनही असतेच. कसली घं*

अप्पा जोगळेकर
Wed, 09/14/2011 - 23:26 नवीन
ती तर अजूनही असतेच. कसली घं* मजा असते हो अलीकडच्या लग्नात ? पण्णास पदार्थ आतात त्यातले अर्ध्याहून अधिक उत्तर भारतीय प्रकार किंवा जेवणात खाल्ले न जाणारे प्रकार जसे - पाणीपुरी, रगडा पॅटिस, फरसाण इत्यादी इत्यादी. आणि सगळीकडे तेलाचा महापूर. परत ते जड ताट हातात घेउन स्वतःच स्वतःला सर्व्ह करा.या स्वतःच स्वतःला वाढण्याच्या प्रकारामुळे अन्न टाकणे लोकांनी बंद केले असेही दिसले नाही. पैजा लावून लोक जिलब्यांच्या आणि जांबुच्या राशी उठवायचे ती मजा मात्र गेली. शिवाय मधेच नवरा-नवरी मेकाप्साठी कल्टी मारतात तोपर्यंत लोक उपाशी. विवाहात मंगल काय असतं माहिती नाही हे मान्य आहे. पण मग पंगतही नको ती बुफेही नको. लो़कांना बोलावणांच नको असा स्टान्स घेतला तर ठीक.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नितिन थत्ते

लग्न?

Nile
गुरुवार, 09/15/2011 - 00:05 नवीन
>>पण मग पंगतही नको ती बुफेही नको. लो़कांना बोलावणांच नको असा स्टान्स घेतला तर ठीक. मी तर म्हणतो लग्नच नको असा स्टान्स घ्या ना तुम्ही आप्पासाहेब!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अप्पा जोगळेकर

शिवाय मधेच नवरा-नवरी

आत्मशून्य
Fri, 09/16/2011 - 22:36 नवीन
शिवाय मधेच नवरा-नवरी मेकाप्साठी कल्टी मारतात तोपर्यंत लोक उपाशी.
जबरा........ खिक्.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अप्पा जोगळेकर

सीरियस स्वगत

राही
Wed, 09/14/2011 - 13:23 नवीन
मसालेभात,मठ्ठा,अळूची पातळ भाजी इ.इ्. अखिल महाराष्ट्राचे प्रातिनिधिक लग्नजेवण (आणि आता विस्मृतीत गेलेला सांस्कृतिक ठेवा) मानले जातेय की काय? उघड: अर्थात वरती 'आपापले रीतिरिवाज' असा उल्लेख आहे म्हणा!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शुचि

'आपापले रीतिरिवाज

शाहिर
Wed, 09/14/2011 - 13:32 नवीन
'आपापले (सदाशिव पेठी) रीतिरिवाज म्हणायचे आहे का ??
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राही

केवढी मजा असते लग्नातकेवढी

रेवती
Wed, 09/14/2011 - 20:13 नवीन
केवढी मजा असते लग्नात केवढी मजा असते दुसर्‍याच्या लग्नात! तुला तुझ्या लग्नातलं काय आठवतय?;) किती चवीनं जेवलीस तू तुझ्याच लग्नात? एकतर आपणच आपल्याला ओळखू येणार नाही अश्या अवतारात असतो. सगळं आवरून झालं की कोणी आत्या, मावशी येऊन काजळाचं बोट गालावर लावून जातात. आता निदान मला तरी कोणाचीही दृष्ट लागण्याची शक्यता नव्हती. कपड्यालत्त्यामुळं जे काय ध्यान बरं दिसायची शक्यता होती तीही त्या काजळामुळं नाहीशी झाली.;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शुचि

सगळं आवरून झालं की कोणी

इष्टुर फाकडा
Fri, 09/16/2011 - 19:28 नवीन
सगळं आवरून झालं की कोणी आत्या, मावशी येऊन काजळाचं बोट गालावर लावून जातात. Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती

त्या वेळच्या जेवणावळीतील आणखी गमती

चित्रगुप्त
गुरुवार, 09/15/2011 - 11:07 नवीन
......केळीच्या पानावर किंवा ताटात वाढलेला मसाले भात, मठ्ठा, गरम पांढरा भात वरण वर तूपाची धार, पापड कुर्ड्या, कोशींबीर, चटणी, अळूची पातळ भाजी, जिलबी किंवा श्रीखंड-पुरी. किती मस्त जेवण असायचं पूर्वी..... शुचिताई एका वाक्यात बाळपणीच्या अतीव सुखद आठवणींमध्ये घेऊन गेल्या. त्याकाळच्या द्रोण-पत्रावळीवरील जेवणाच्या आणखी काही गंमतीदार आठवणी.... तेंव्हा "टेकूची भाजी" हा एक प्रकार असे. भोपळा किंवा वांगी-बटाट्याच्या मोठमोठ्या फोडींच्या या भाजीचा सर्वसंमत उपयोग म्हणजे मठ्ठा वा अन्य पातळ पदार्थांच्या द्रोणाला ते लवंडू नाहीत म्हणून टेकण लावणे. ही भाजी कुणी खात होते की नाही, कुणास ठाउक. दुसरे म्हणजे "गव्हल्यांची खीर." ही प्रसादाची खीर अगदी थोडीशी, तीही सुरुवातीला एकदाच वाढली जात असे, त्यातही जेवण सुरु करेपर्यंत त्यातले दूध पत्रावळीवर वाहून गेलेले असे. मला ही भयंकर आवडायची. पण जास्त कधीच मिळत नसे, मग मी घरी गेल्यावर आईपाशी हट्ट धरायचो, की मला वाडगाभर गव्हल्यांची खीर करून दे. आई म्हणायची, अरे, थोडक्यात गोडी. पण शेवटी तिने एक दिवस खूप मेहनत घेऊन (गव्हले करणे हे फार कष्टाचे, वेळखाऊ काम होते) वाडगाभर खीर बनवून मला दिली... पण खरोखर ती वाडगाभर खीर माझ्याच्याने खाववली गेली नाही, आणि तितकीशी आवडली पण नाही, तेंव्हा मला "थोडक्यात गोडी" चे मर्म कळले. तेंव्हा पंगतीत ठेकेदाराचे वाढपी नसत, तर लहान मुली, शोडषयौवना, पुरंध्री, आज्जीबाई अश्या सर्व स्त्रिया हौसेने वाढप करायच्या. तेंव्हा (म्हणजे आम्ही जरा मोठे झाल्यावर) "नको असलेला पदार्थ" सुद्धा "हव्याश्या वाटणार्‍या मुलीकडून" पुन्हा पुन्हा मागून घेण्यातली गंमत काही औरच होती. अश्या प्रकारातून काही लग्ने पण जुळायची.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शुचि

सुभाषित

मूकवाचक
Wed, 09/14/2011 - 10:16 नवीन
आहार निद्रा भय मैथुनं च सामान्यमेतत् पशुभिर्नराणाम् | धर्मो हि तेषामधिको विशेष: धर्मेण हीनाः पशुभिः समाना: || या धाग्यावरची चर्चा वाचून एक सुभाषित आठवले. (अवान्तराबद्दल क्षमस्व).
  • Log in or register to post comments

अनुप्रास

सुनील
Wed, 09/14/2011 - 10:16 नवीन
शीर्षकातील अनुप्रास आवडला!
  • Log in or register to post comments

मौजा मौजा

साती
Wed, 09/14/2011 - 10:54 नवीन
मौजा मौजा म्हणा नी मौलवींना विसरा. आमच्या गावातली मुस्लिम लग्नाची पत्रिका स्कॅन करून टाकावीशी वाटते. उदा. By the grace of Allah, we are cordially inviting you on the gracious occasion of wedding of Mohammad Abdulah Mohammad Irfan (B.A.) (son of Haji Mohammad Farat bin Mohammad Sultan- senior electrician, KEB.) with Daughter of Mohammad Rehman bin Imran Hussinsaab,) lab technician KGN diagnostics.) पहिल्यांदी अशी पत्रिका बघितली तेव्हा मुलीचं णाव चुकीने लिहायचं राहिलंय का असंच वाटलं होतं. चार पाच पत्रिकांनंतर लक्षात आलं मुलीचं नाव पत्रिकेत लिहायला बंदीच असते म्हणे.तसंही कुठल्याही स्त्रीचं नाव नसतं पत्रिकेत. असलंच तर.मिसेस अँड मिस्टर अमुक तमुक असंच. बघा म्हणजे लग्नात मुलीच्या नावालाही बुरखा. स्टेजवर फक्त नवरामुलगा उभा असतो गिफ्ट घ्यायला. पुरुषांना तर नवरीमुलगी पहायलाही मिळत नाही. बायकांसाठी वेगळी बसायची आणि जेवणाची व्यवस्था असते.
  • Log in or register to post comments

अरे सहीए!!

Nile
Wed, 09/14/2011 - 11:53 नवीन
सासर्‍यला ढीगभर पोरी असतील तर बोहोल्यावर चढेपर्यंत पुष्कळ 'वैयक्तिक चॉईस' आहे तर! चालेल ब्वॉ आपल्याला. ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: साती

:-)

सहज
Wed, 09/14/2011 - 12:02 नवीन
अरे नाईल्या पाहीले आहेस का कधी पारंपारीक मुस्लीम लग्न? वधू असते पडद्या आड. पडद्या आडून नेमके कोणत्या पोरीचा "कबूल है' आला हे कळायचे नाही... सासु-सासर्‍याचा वैयक्तीक चॉईस 'वर'चढ होणार. :-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Nile

बीग डील!

Nile
Wed, 09/14/2011 - 12:04 नवीन
नाही आवडली तर व्हिडिओ चॅट रीटर्न सर्विस वापरुन परत करायची, हाय काय अन नाय काय!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सहज

:-)

सहज
Wed, 09/14/2011 - 12:15 नवीन
असो पारंपारीक मुस्लीम विवाहात आधी तुझा नायल खान होईल. आम्ही मित्रमंडळी तुझा अगदी 'विधीवत' (इफ यु नो व्हॉट आय मिन) नायल खान करायला लावू. :-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Nile

आम्ही मित्रमंडळी तुझा अगदी

गणपा
Wed, 09/14/2011 - 14:13 नवीन
आम्ही मित्रमंडळी तुझा अगदी 'विधीवत' (इफ यु नो व्हॉट आय मिन) नायल खान करायला लावू. Smile
=)) -हल्कट(नायल्याचा) मित्र. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सहज

कोती बुद्धी!

Nile
Wed, 09/14/2011 - 20:43 नवीन
तुम्हा लोकांची कोती बुद्धी पाहुन एखाद्या प्रतिगाम्यालाही* शरम येईल!! तुम्हा लोकांचं म्हणजे, मी इथे एक हालिवुडातील गोंडस पोरगी पहा म्हणतोय अन तुमचं लक्ष मात्र तिच्या बॉयफ्रेंडच्या मुळव्याधीकडेच, असं आहे! अहो, आजकाल तसल्या शस्त्रक्रिया म्हणजे काय मोठी गोष्ट आहे का? आणि लग्नासारख्या काळ्या पाण्याच्या शिक्षेसमोर तर काहीच नाही. तेव्हा मोठे व्हा** तुम्ही दोघे!! * रुढार्थ वापरणे, स्वतःचे चावट अर्थ उगीच व्यक्त करू नयेत. ** सद्य परिस्थितीत या संदेशाचा प्रसार करणे वारसाने माझ्याकडेच आल्याने मला तसे करण्याशिवाय पर्याय नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणपा

खी: खी: खी:

नंदन
गुरुवार, 09/15/2011 - 05:21 नवीन
आस्वान डॅम आठवला :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सहज

मेलो!!!

Nile
गुरुवार, 09/15/2011 - 05:49 नवीन
=)) अश्लील!! अश्लील!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नंदन
  • 1
  • 2
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा