Skip to main content

कॉकटेल लाउंज : गाथा वाइनची - 1

लेखक सोत्रि यांनी सोमवार, 12/09/2011 22:34 या दिवशी प्रकाशित केले.
गाथा व्हिस्कीची ...गाथा लिक्युर्सची... अगदी प्राचीन काळी जेव्हा माणसाचे पहिल्यांदा स्त्रीशी भांडण झाले आणि ती 'फुरंगटुन' बसली त्या क्षणी माणसाला तितकाच मादक आणि नशीला पर्याय शोधण्याची गरज भासुन त्याने वारुणीचा शोध लावला असावा.  म्हणजे असे काहीतरी असावे हा माझाच जावइशोध आहे. :lol: असो. मानवाच्या उदयाबरोबरच वाइनचा उदय झाला असावा. मानवाने जे काही मादक पेय पहिल्यांदा प्यायले असेल ते वाइन असे समजले जाते (हा माझा जावइशोध नाहीयेय) सर्व प्राचिन संकृतींमधे वाइनला (वारुणी) अत्यंत मानाचे स्थान होते. सर्वच प्राचिन संकृतींच्या म्हणजे सुमेरिअन, इजिप्शीयन, ग्रीक, रोमन्स आणि अर्थातच आपल्या प्राचिन आर्य लोकांनीही वाइन बनवली, चाखली आणि तिची मादकता उपभोगली आहे. मर्त्य मानवाचे सोडा हो, प्रत्यक्ष इंद्राच्या दरबारातही हिचे गोडवे गायले... आय मीन गडवे प्यायले गेलेत ;) तर ही प्राचिन काळापासुन मानवाला माहित असलेली, वाइन, वारुणी, जिच्याबद्दल कविंनी काव्ये/कवने/कविता रचल्या, लेखकांनी ग्रंथच्या ग्रंथ लिहीले, आणि आता माझ्यासारखे ब्लॉगर्स ब्लॉग पाडताहेत ;) तीच्याबद्दल थोडी माहिती करुन घेवुयात. वाइन ही प्रामुख्याने द्राक्षापासुन बनवतात. ती सफरचंद किंवा बेरीच्या वेगवेगळ्या प्रकारच्या फळांपासुनही बनवली जाते. तसेच ती धान्यापासुनही बनवली जाते उदाहरणार्थ जापनीज साके तांदळापासुन बनवितात. पण 90% वाइन ह्या द्राक्षापासुन बनवल्या जातात आणि वेगळा उल्लेख न करता नुसते वाइन म्हटले तर ती ग्रेप वाइनच असते, जगात सगळीकडे. वाइन बनवण्याचा शोध युरोप आणि मध्यपुर्वेत लागला असे समजले जाते. त्यामुळे वाइन दुनिया ही दोन जगात विभागली गेली आहे 1. युरोपिअन - फ़्रान्स - इटली - स्पेन - पोर्तुग़ल 2. न्यु वर्ल्ड - अमेरिका - ऑस्ट्रेलिया - चिली - अर्जेंटिना - इतर देश आपल्यासारख्या पामरांना ह्यातुन बोध एवढाच घ्यायचा की न्यु वर्ल्ड मधल्या वाइन्स विकत घेणे सोपे असते, डोक्याला शॉट नसतो. ह्या वाइनच्या लेबल वर सर्व डिटेल्स लिहिलेल्या असतात. (ह्या डिटेल्स काय ते पुढे येणारच आहे उगीच ‘आता डिटेल्स शोधणे आले’ वगैरे विचार डोक्यात आणुही नका ;) ). युरोपिअन लोकांना त्यांच्या प्रांतांचा जाज्वल्य का काय म्हणतात तसला अभिमान असतो (आणि तो सार्थेही आहे म्हणा) त्यामुळॆ त्या वाइन्सच्या लेबर वर फक्त त्या प्रांताचे नाव असते. आणि म्हनुनच ह्या वाइन्स विकत घ्यायच्या म्हणजे डोक्याला शॉट असतो. युरोपिअनांचे म्हणणे असे की आमच्या वाइन्स प्यायच्यात ना मग जरा ‘अभ्यास वाढवा आणि मोठे व्हा’ :lol:, अक्षरश:, कारण तुम्हाला युरोपचा भुगोल (वाइनच्या अनुषंघाने) माहित असणे जरुरीचे असते ह्या वाइन समजायला आणि विकत घ्यायला. आता जरा वाइनचे वर्गीकरण (क्लासिफिकेशन) बघुयात.खालिल चित्रात वाइनचे वेगवेगळे वर्ग/प्रकार दर्शविले आहेत. थांबा बिचकु नका असे हा चार्ट बघुन, सर्व माहिती येणार आहे. तर वाइनचे मुख्य प्रकार 3 1. टेबल वाइन सर्वसाधारण पणे वाइन म्हणुन पिल्या जाणार्‍या 90% वाइन्स ह्या कॅटेगरी मधे मोडतात. ह्या वाइन्सना विंटेज वाइन्स किंवा व्हरायटल (Varietal) असेही म्हटले जाते. विंटेज म्हणजे द्राक्षाच्या सुगीचे वर्ष. म्हणजे ज्या वर्षी द्राक्षे तयार होउन वाइन बनवण्यासाठी तोडली जातात ते वर्ष. दर विंटेजप्रमाणे वाइनची चव बदलु शकते. म्हणजे एखाद्या वर्षीच्या वातावराणातील बदल जसे तापमान, बर्फाचे वादळ, थंडावा ह्यांच्यामधील सुक्ष्म फरकाने द्राक्षाच्या चवीत बदल होउन वाइअनची चव बदलते. युरोपमधे विंटेज रिपोर्ट्स दर वर्षी प्रकाशित होत असतात, ते वाचुन कोणत्या विंटेजची वाइन घ्यायची ते ठरवतात तेथील दर्दी लोकं. व्हरायटल म्हणजे कोणत्या प्रकारच्या/जातीच्या (म्हणजे व्हरायटीच्या ) द्राक्षापासुन वाइन बनली आहे ते. वाइन बनवण्यासाठी वापरण्यात येणार्‍या खास द्राक्षांच्या भरमसाठ जाती (प्रत) असतात. तर टेबल वाइन्स ह्या व्हरायटल असतात म्हणजे कोणत्या तरी एकाच प्रकारच्या द्राक्षापासुन बनवलेल्या असतात. म्हणजे व्हिस्कीमधे जसे 'सिंगल मॉल्ट' असते तसेच. पण व्हरायटल वाइन बनवायला कमीत कमी 75% द्राक्षही एकाच जातीची असावी लागतात. काही खास वाइनरीज 100% एकाच प्रतीच्या द्राक्षापासुन वाइन्स बनवतात पण मग त्या तश्याच महागही असातात. सर्व व्हाइट, रेड आणि रोज वाइन्स ह्या वर्गात मोडतात. न्यु वर्ल्ड मानकाप्रमाने ह्या वाइन्स मधे जास्तीत जास्त 14% अल्कोहोल कंटेंट असु शकते. युरोपिअन मानकाप्रमाने ह्या वाइन्स मधे 8%  -  14% अल्कोहोल कंटेंट असु शकते. 2. स्पार्कलिंग वाइन ह्या वाइन मधे कार्बन डायऑक्साइड वापरुन हीला बुडबुडेदार बनवले जाते. सर्व शॅंपेन ह्या स्पार्कलिंग वाइन्स  असतात पण सर्व स्पार्कलिंग वाइन्स ह्या शॅंपेन नसतात. असे का बुआ? तर फ्रांस मधल्या शॅंपेन ह्या परगण्यात तयार होणारी द्राक्षे वापरुन शॅंपेन ह्या परगण्यात बनणारी  वाइनच फक्त स्वत:ला शॅंपेन म्हणवुन घेउ शकते. बहुत्करुन स्पार्कलिंग वाइन (युरोपिअन) ह्या व्हाइट आणि रोज प्रकारच्या असतात. पण सध्या ऑस्ट्रेलिअन आणि इटालिअन स्पार्कलिंग वाइन ह्या रेड स्पार्कलिंग वाइनही असतात. ह्या वाइन्स मधे 8% - 12% अल्कोहोल कंटेंट असते. 3. डिझर्ट आणि फोर्टिफाइड वाइन डिझर्ट वाइन्स ह्या गोड वाइन्स असतात जेवण झाल्यावर घेण्यासाठी. मुळ वाइनमधे साखरेचा अंश वाढवुन त्या वाइन मधे गोडवा आणलेला असतो. फोर्टिफाइड म्हणजे स्ट्रॉन्ग बनवणॆ. फोर्टिफाइड वाइन ह्या मुळ वाइनमधे स्पिरीट टाकुन स्ट्रॉन्ग बननलेली असते. जनरली ब्रॅन्डी वाइनमधे टाकुन फोर्टिफाइड वाइन बनवली जाते. ह्या वाइन्स मधे 17% - 22% अल्कोहोल कंटेंट असते. नोट : वाइनची माहिती हा अथांग सागर आहे. एका भागात ही माहिती संपवणे शक्य नाही. बर्‍याच लोकांनी वाइनवर चक्क Ph. D. केली आहे. (क्रमश:)

वाचने 18044
प्रतिक्रिया 47

प्रतिक्रिया

क्रमशः वाचतो आहे. (गॅमे - का गामाय - हा प्रकार दुकानात अजून बघितलेला नाही. शोधायला पाहिजे.)

चांगला उपक्रम आहे, एक सूचना: तुमच्या त्या वाईन्सच्या चार्टमध्ये पिनो ग्रीजीयो घालायची राहिली.... :) असो. पुढील वाटचालीसाठी आशीर्वाद! -मद्यमुनी

In reply to by पिवळा डांबिस

पिडाकाका, धन्यवाद. पिनो ग्रीजीयो राहिली खरी, पण Sangiovese ही इटालिअन व्हराइटी आली असल्यामुळे पिनो ग्रीजीयो व्हराइटी राहिल्याचे लक्षात नाही आले. असो. पुढच्या भागांमधे ह्याची काळजी नक्कीच घेइन. चुकभुल देणे घेणे. - (अभ्यासु) सोकाजी

आमच्या आवडीच्या विषयावर लेखमाला सुरू केल्याबद्दल खूप धन्यु. पुढिल भाग लवकर येवू द्यात :)

उत्तम उपक्रम! अवांतर - हे पुस्तक तुम्हांला नक्की आवडेल.

सोक्या, लेका 'उत्तेजक पेयांपासून अलिप्त' असणार्‍या माझ्यासारख्याना सुध्दा तुझं मदिराख्यान भुलवून ठेवतं !!

सोकाजि एवजी साकियाराव ठेवा नाव

अभ्यास करायला वेळ लागेल. त्यासाठी ४-५ वेळा वाचावे लागेल.:( :-( :sad त्यासाठी "वाचनखुणा" सदरात ठेवण्यात आला आहे.:bigsmile:

>>> 1. टेबल वाइन सर्वसाधारण पणे वाइन म्हणुन पिल्या जाणार्‍या 90% वाइन्स ह्या कॅ.... लेखमाला क्रमशः आहे हे मान्य पण पहिलाच लेख अर्धवट आहे काय? की मलाच पुर्ण दिसत नाहीये?

In reply to by सोत्रि

हॅ हॅ हॅ पिल्यानंतर माणसाची काय अवस्था होते हे माहित आहे हो. म्हणून पिल्यानंतर आम्ही कोणतेही कामे करत नाही.

In reply to by पाषाणभेद

पिल्यानंतर माणसाची काय अवस्था होते हे माहित आहे हो
ठ्वॉ...... आता काय बोलु, पण खर कारण मुलखाचा धांदरटपणा दुसरे काही नाही. असो, पण तुमचा हा प्रतिसाद फार आवडला :) - (धांदरट माणुस) सोकाजी

आपल्या या विषयातील निपूणते बदल मनामधे खरच आदर व कींचीत असूयाही आहे. माहीती बद्दल धन्यवाद व पूढील भागास उत्सूकतापूर्ण शूभेछ्चा.

In reply to by गणपा

गणपाशेठ, तुमच्याच एका निरोपाप्रमाणे पुढचे सहा महिने तरी नुसत्या थियरीवरच भागवावे लागेल ;) - (थियरी समजुन मगच प्रॅक्टिकल करणारा) सोकाजी

In reply to by सोत्रि

तुमच्याच एका निरोपाप्रमाणे पुढचे सहा महिने तरी नुसत्या थियरीवरच भागवावे लागेल हान तिच्या मायला. दिली एक ठेवुन.:p :-p :tongue: असो. आता गणपाशेठ आणि सोकाजी असे एकत्रीत "प्रॅक्टिकल" वाट बघतो आहे. :party: (आशावादी) चिंतामणी.

तुमच्या तक्त्यानुसार आम्ही उजव्या विचारसरणीचे आहोत पण डाव्या गटात आमचे काही मित्रगण (मैत्रीणी) आहेत :-) चियर्स

मस्त सुरवात सोत्रि, वाचतो आहे. 'मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही' असे म्हणतात, सबब आम्हाला ह्या वाईनच्या स्वर्गाची सफर घडवुन आणण्याची 'योग्य' ती व्यवस्था करावी. ;) कलोअ. - छोटा डॉन

वा..मस्त. पुण्यातल्या कोरेगाव पार्कातल्या वार्षिक वाईन फेस्टिवलला नियमित जात असालच. काय सुंदर पर्वणी असते.. अजिबात चुकवत नाही मी तरी. पस्तीस चाळीस वायनरीज, दीडेकशे वाईन्स शॅम्पेनसहित... टेस्ट करण्या करण्यातच टल्ली होण्याची खात्री. :) चकण्याचे जबरदस्त टेसदार स्टॉल्स.. वेगवेगळ्या पाककृती आणि वाईनची वर्कशॉप्स.. सर्वात आवडती जत्रा आहे ही. यंदा असलात तर भेटू..

In reply to by गवि

लेख आवडल्या गेल्या आहे पस्तीस चाळीस वायनरीज, दीडेकशे वाईन्स शॅम्पेनसहित... टेस्ट करण्या करण्यातच टल्ली होण्याची खात्री टेस्ट मोफत मंदी करायला देतात कहो गवि ;) तसं असेल तर जायला हरकत नाही -- (फुकट्या) स्पा

In reply to by स्पा

फुकट नाय रे. पण एकदा एंट्री पास घेतला की झाले. २५०-३०० चा. त्यातही तीन वर एक पास फ्री वगैरे असते.

असो.

भन्नाट आहे रे ! ज्ञानात भर पडली म्ह्णायची आमच्या ~ धन्यवाद !

'___/!\___' धन्य आहात! या किंवा इतर मादक पेय प्रकाराशी संबंध नसला तरी अभ्यास करण्यास आमची काही हरकत नाही. तेव्हा आपल्या या थिअरी वर्गाला हजेरी लावली होती, लावली आहे आणि लावली जाणार आहे याची नोंद घ्यावी. आपला, (अभ्यासू असलेला :-))

सोकाजीराव, या लेखात तुम्ही आमच्या भारताचा उल्लेख न करणं हे काही बरं केलं नाहीत हां! "न्यू वर्ल्ड"मधल्या दक्षिण आफ्रिकेतल्या वाईनही चविष्ट आणि रोचक असतात असा अनुभव आहे. मला त्या आणि ऑस्ट्रेलियन बाटल्यांची लेबलंही आवडतात, मजेशीर, रंगीबेरंगी असतात. आपली भारतीय लेबलं मात्र अगदीच पांढर्‍यावर काळी केलेली असतात. झिन्फन्डेल ही रक्तवारूणी प्रकारातही असते ना? का मलाच पिण्याआधी चढलेली होती? मला विज्ञान दिनाच्या वेळी जी.एम.आर.टी.त जायला आवडायचं. द्राक्षांचा वासच असा काही मादक असायचा .... अहाहा ... बाकी सोकाजीराव, तुमच्या गाथा सुरू ठेवाच. (अनुभवातून मोठी होणारी) अदिती

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

झिनफन्डेल द्राक्ष मुळात लाल वाईन बनवायचे द्राक्ष. परंतु द्राक्षे ठेचल्यानंतर रस वरच्या वर सालांपासून वेगळा काढून आंबवला, तर "व्हाईट" झिनफन्डेल नावाची गुलाबी वाईन तयार करता येते. विकिपेडियावरून कळते, की लाल झिन्फान्डेल पेक्षा ही गुलाबी वाईनच आजकाल अधिक खपते.

In reply to by धनंजय

भारतात रोजे वारूणी रक्त वारूणीएवढ्या सहजतेने उपलब्ध नाही; खप नाही म्हणूनही असेल. त्यामुळे झिनफन्डेल गुलाबी रंगातही मिळते हा माझ्यासाठी गेल्या काही महिन्यांतला शोधच होता.

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

झिन्फन्डेल ही रक्तवारूणी प्रकारातही असते ना?
ऍक्चुअली त्या चार्टमधे "श्वेत, रक्त आणि गुलाबी" ह्या खाली असणारी नावे ही द्राक्षांच्या जातीची आहेत, वाइनची नव्हे. झिन्फन्डेल ही एक द्राक्षाची जात आहे. ह्या द्राक्षापासुन रक्त आणि गुलाबी ह्या दोन्ही प्रकारच्या वाइन्स बनवल्या जातात. तो चार्ट सर्वसमावेशक नाहीयेय, तोंडओळखीकरीता आहे.
का मलाच पिण्याआधी चढलेली होती?
हा प्रकार बहुतेक पाशवी शक्ती मिळाल्यावर होत असावा ;) (पळा आता......)
भारताचा उल्लेख न करणं हे काही बरं केलं नाहीत हां
भारताचा वाइन निर्यातीतला वाटा नगण्य आहे, उल्लेख न करण्याइतका. तरीही भारतीय असल्याचा मला अभिमान वगैरे आहे बर का ;) - (पिण्याआधीच चढावी अशी इच्छा असणारा) सोकाजी

In reply to by सोत्रि

हा प्रकार बहुतेक पाशवी शक्ती मिळाल्यावर होत असावा Wink (पळा आता......)
छ्या, पळू नकोस. त्यापेक्षा आपण बसून एखादी बाटली फस्त करू या!
भारताचा वाइन निर्यातीतला वाटा नगण्य आहे, उल्लेख न करण्याइतका.
तुमच्या-आमच्यासारखे पेताड भारतीय संस्कृतीवर गफ्फा हाणायला लागले की निर्यात करायला वाईन शिल्लक रहाणार काय? बोल पाहू!

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

त्यापेक्षा आपण बसून एखादी बाटली फस्त करू या!
वा वा, छान छान, धन्यु धन्यु............ असे मी, तु परत येताना आणलेली बाटली (फक्त माझ्यासाठी) फस्त केल्यावर म्हणेन :lol: ;) :lol: - (पेताड भारतीय) सोकाजी

माल्बेक ही आणखी एक रेड वाइन. आजकाल दक्षिण अमेरिकेतून चांगल्या (व स्वस्त) वाइन्स येत आहेत. दक्षिण आफ्रिकेतल्या काही वाइन्सही चांगल्या आहेत. एका वाइन जाणकाराकडून प्राण्यांचे चित्र असलेल्या वाइन्स घेऊ नयेत असे ऐकले होते. बर्‍याचशा प्राण्यांचे चित्र असलेल्या (उदा. यलो टेल) ऑस्ट्रेलियन वाइन्स चांगल्या न वाटल्याने मला ते पटू लागलेले आहे. अर्थात या मताला फारसा आधार नाही.

In reply to by क्रेमर

हो, हो, माल्बेक आवडल्याची जुनी आठवण आहे. अलिकडच्या काळात पुन्हा चाखली पाहिजे. पूर्वी मर्लो आवडायची, आता फारशी आवडत नाही. प्राण्यांच्या चित्रांचा आणि वारूणीच्या चवीचा संबंध आता आठवत नाही. अगदी अभ्यास सुरू केल्याच्या दिवसात, चार-सहा वर्षांपूर्वी, साधारणतः सात पौंडांच्या आसपास मिळणारी बाटली घ्यायची आणि अभ्यास करायचा अशी माझी पद्धत होती. तेव्हा जिव्हा पुरेशी तयार झाली नव्हती; त्यामुळे त्या मताचा आता फारसा उपयोग नाही. साऊथ आफ्रिकन वाईन्सच्या अनेक बाटल्यांवर प्राण्यांची नव्हे, तर अशीच रंगीबेरंगी चित्र असल्याचं आठवतं.

In reply to by चित्रा

चित्रातै, आधि प्रतिसादाबद्दल धन्यु. तो चार्ट फक्त वर्गीकरण समजावण्याकरिता होता. ह्या धाग्यात फक्त तोंडओळख करुन दिली आहे. प्रत्येक प्रकारच्या वाइनवर एक स्वतंत्र धागा येणार आहे, त्यावेळी 'मोस्ट पॉप्युलर' व्हराइटी येणार आहेत त्यांच्या डिटेल्स सकट. - (अभ्यासु) सोकाजी

भिषण भालो एकदम ;) पु भा प्र साला एकदम चार्ट वैग्रे... सोत्रि आता डॉक्टरेट मिळवणार. पिण्यावीण वाचाळता व्यर्थ आहे.

सोकाजी, एक भाग लिहायचा आणि मग चार महिने गपगार पडायचं असं चालायचं नाही बरं का. गपगुमान पुढचे भाग सटासट येऊ दे. :) वाईनचे विश्व खरोखर फॅन्टास्टिक आहे. अलिकडेच मी मराठीतील दोन छान पुस्तके वाचली. भारतातील पहिल्या वाईन लेडी अचला जोशी यांचे चरित्र अफलातून आहे. एका साध्यासुध्या गृहिणीने जबरदस्त ज्ञानलालसा आणि परिश्रमांच्या जोरावर स्वतः बनवलेली वाईन अगदी फ्रान्सच्या वाईन ऊत्पादक दिग्गजांच्याही पसंतीला उतरली आणि जगातील वाईन सम्राटाने या महिलेला फ्रान्समध्ये बोलवून सर्वोत्कृष्ट वाईन कशी बनवावी, याचे प्रशिक्षण घेण्यास मदत केली. हा सर्व प्रवास खूप रंजक आहे. दुसरे पुस्तक अनिल दामले यांचे 'खावे त्याच्या देशा' हे आहे. पुस्तक जबरदस्त आहेच पण त्यातील वाईनबद्दलची माहिती केवळ सलाम करण्याजोगी. आता सोकाच्या लेखांचा चवीचवीने आनंद घेतोय.

वाईनशी माझा संबंध कमीच, पण लेख आवडला. पुलेशु