एका आधुनिकोत्तर तरुणीची ही दारूण फेसबुककथा आहे. तरुण अन् तरुणी पूर्वी प्रत्यक्ष बागेत वगैरे भेटत. आजकालच्या व्हर्च्युअल विश्वात ते फेसबुकाच्या फार्मव्हिलमध्ये भेटतात. अशाच एका तरुणीला, आपल्या कवितेच्या नायिकेला एक तरुण भेटला. वॉल फोटो वगैरे तपासायचे कांदेपोहे झाल्यानंतर रीतसर फ्रेंड रिक्वेस्ट झाली. एकमेकांना त्यांनी बघितलं नव्हतं. तरी वॉलपोस्टा लाइक करून, सारख्याच कॉजेसना सपोर्ट करून, फार्मव्हिलमध्ये एकमेकांच्या झाडांना पाणी घालून त्यांची मैत्री वाढली. तिने त्याला आपल्या अकाउंटचा पासवर्ड दिल्यानंतर मात्र चित्र पालटलं. त्याने आपल्याच मित्र मैत्रिणींनी तिला लिहिलेली पत्रं वाचली, चॅट लॉग्ज बघितले आणि त्याचे डोळे पांढरे झाले. ताडकन त्याने तिला अनफ्रेंड केलं...
आपल्या दुरावलेल्या मित्राला परत बोलावण्यासाठी वसंत सबनीसांची क्षमा मागून ती म्हणते....
लाईक नेहमी तुम्हास केलं
इग्नोरू नका फुका
अन् राया मला, अनफ्रेंड करू नका॥
वॉल वाचली इन्फो पाहिलीत
कॉमन फ्रेंडही किती निघालेत
आल्बम फोटो चेकही केलेत
फ्रेंड रिक्वेस्ट अन् मला धाडलीत
ऍक्सेप्ट केली मी, नैका?
आता राया मला अनफ्रेंड करू नका॥
विश्वासाने दिला तुम्हा जरी
अकाउंट पासवर्ड माझा मी तरी
फ्रेंड्सचे अपुल्या मेसेज वाचलेत
लॉग्ज पाहुनी डोळे पांढरे
भवल्या भलत्या चुका
पण राया मला, अनफ्रेंड करू नका॥
सदर धाग्यासाठी माझे गुर्जी आणि फेसबुकमित्र राजेश घासकडवी यांचे आभार.
काव्यरस
वाचने
8309
प्रतिक्रिया
41
मिसळपाव
प्रतिक्रिया
=))
एक बाळबोध मार्लीश ( मराठी+
In reply to =)) by बिपिन कार्यकर्ते
बाबौ!
(No subject)
हा हा हा!
मेलो...
=))=))=))=))
=)) =))
खी खी खी =)) =))
कविता वाचून अदितीला एवढेच
चुकताय का?
In reply to कविता वाचून अदितीला एवढेच by अनामिक
आम्ही नै ब्वॉ कुणाला
In reply to चुकताय का? by प्रियाली
=)) =)) _/\_ धन्य आहेस.
=)) =))
पुढल्या म्हराटी पिच्चरमदे
_/\_ ! (पण या पोरी लोक लगेच
पहिलं आमचं आमंत्रण तर
जोरदार टाळ्या
भलतीच दारुण कथा आहे!
हा हा हा .. जबरदस्त !!
काय दुर्बिटणे बाई... ! मी
'स्सुरेख' वगैरे म्हणन जरा
>>>>अन आता हात सोड त्या
In reply to 'स्सुरेख' वगैरे म्हणन जरा by स्पंदना
मस्त
पथदर्शक (विडंबन) कविता
वॉलपोस्टा लाइक करून, सारख्याच
_/\_ प्रणाम _/\_
सदर धाग्यासाठी माझे गुर्जी
चान चान
=))
गुमराह
लाईक केल्या गेले आहे.
In reply to गुमराह by नंदन
उसे एक खूबसुरत मोड देकर छोडना अच्छा
In reply to गुमराह by नंदन
मस्त
In reply to गुमराह by नंदन
डबलप्लस अनगुड अनफ्रेण्ड
=)) =)) =))
मस्त विडंबन... पण त्या पोरीने
धनाजीराव आणि आळशांचा राजा यांजप्रती:
पाचकळ (नेहमीप्रमाणेच)
पाचकळ (नेहमीप्रमाणेच) ही
In reply to पाचकळ (नेहमीप्रमाणेच) by शिल्पा ब
मस्तच