✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

(राया मला अनफ्रेंड करू नका)

३ — ३_१४ विक्षिप्त अदिती, गुरुवार, 09/01/2011 - 21:27
एका आधुनिकोत्तर तरुणीची ही दारूण फेसबुककथा आहे. तरुण अन् तरुणी पूर्वी प्रत्यक्ष बागेत वगैरे भेटत. आजकालच्या व्हर्च्युअल विश्वात ते फेसबुकाच्या फार्मव्हिलमध्ये भेटतात. अशाच एका तरुणीला, आपल्या कवितेच्या नायिकेला एक तरुण भेटला. वॉल फोटो वगैरे तपासायचे कांदेपोहे झाल्यानंतर रीतसर फ्रेंड रिक्वेस्ट झाली. एकमेकांना त्यांनी बघितलं नव्हतं. तरी वॉलपोस्टा लाइक करून, सारख्याच कॉजेसना सपोर्ट करून, फार्मव्हिलमध्ये एकमेकांच्या झाडांना पाणी घालून त्यांची मैत्री वाढली. तिने त्याला आपल्या अकाउंटचा पासवर्ड दिल्यानंतर मात्र चित्र पालटलं. त्याने आपल्याच मित्र मैत्रिणींनी तिला लिहिलेली पत्रं वाचली, चॅट लॉग्ज बघितले आणि त्याचे डोळे पांढरे झाले. ताडकन त्याने तिला अनफ्रेंड केलं... आपल्या दुरावलेल्या मित्राला परत बोलावण्यासाठी वसंत सबनीसांची क्षमा मागून ती म्हणते.... लाईक नेहमी तुम्हास केलं इग्नोरू नका फुका अन् राया मला, अनफ्रेंड करू नका॥ वॉल वाचली इन्फो पाहिलीत कॉमन फ्रेंडही किती निघालेत आल्बम फोटो चेकही केलेत फ्रेंड रिक्वेस्ट अन् मला धाडलीत ऍक्सेप्ट केली मी, नैका? आता राया मला अनफ्रेंड करू नका॥ विश्वासाने दिला तुम्हा जरी अकाउंट पासवर्ड माझा मी तरी फ्रेंड्सचे अपुल्या मेसेज वाचलेत लॉग्ज पाहुनी डोळे पांढरे भवल्या भलत्या चुका पण राया मला, अनफ्रेंड करू नका॥ सदर धाग्यासाठी माझे गुर्जी आणि फेसबुकमित्र राजेश घासकडवी यांचे आभार.

प्रतिक्रिया द्या
8279 वाचन

💬 प्रतिसाद (41)

=))

बिपिन कार्यकर्ते
गुरुवार, 09/01/2011 - 21:33 नवीन
=))
  • Log in or register to post comments

एक बाळबोध मार्लीश ( मराठी+

विजुभाऊ
Fri, 09/02/2011 - 20:06 नवीन
एक बाळबोध मार्लीश ( मराठी+ इंग्लीश ) कविता. प्रयत्न करण्याचा बरा प्रयत्न केलेला आहे. पुलेशु. आवांतरः दुशली ब च्या ग्यादरिंगला चालेल का विचारायल पाहिजे हेडमास्तरीणबैना. अतीआवांतर : प्रवर्तक धाग्यात प्रतिक्रीया देणार...... वाद वाढवणार.....टी आर पी घेणार.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते

बाबौ!

प्रियाली
गुरुवार, 09/01/2011 - 21:37 नवीन
बाबौ!
  • Log in or register to post comments

(No subject)

चिंतामणी
गुरुवार, 09/01/2011 - 21:40 नवीन
:bigsmile:
  • Log in or register to post comments

हा हा हा!

चतुरंग
गुरुवार, 09/01/2011 - 21:42 नवीन
घासुगुर्जी आणि अदिती यांच्या संयुक्त विद्यमाने आलेले विडंबन वाचून ड्वाले पाणावले! ;) (फ्रेंडली)रंगा
  • Log in or register to post comments

मेलो...

श्रावण मोडक
गुरुवार, 09/01/2011 - 21:43 नवीन
मेलो...
  • Log in or register to post comments

=))=))=))=))

आत्मशून्य
गुरुवार, 09/01/2011 - 22:13 नवीन
कूल... फ्रेंड रिक्वेस्टवरून असाच एक किस्सा आठवला त्या काळचा*. एका मूलीचे अकऊंट क्याफेत तसच ओपन राहीले होते. लगेच त्यावरून मित्राने स्वतःला फ्रेंड रिक्वेस्ट टाकून तिला उलटी खरड पाठवली होती हायु नो मी म्हणून :) * हे ऑर्कूटवरती घडलं होतं.. सबब तो काळ आता इतीहास जमा झालाय.
  • Log in or register to post comments

=)) =))

नगरीनिरंजन
गुरुवार, 09/01/2011 - 21:58 नवीन
=)) =))
  • Log in or register to post comments

खी खी खी =)) =))

प्रीत-मोहर
गुरुवार, 09/01/2011 - 22:05 नवीन
खी खी खी =)) =))
  • Log in or register to post comments

कविता वाचून अदितीला एवढेच

अनामिक
गुरुवार, 09/01/2011 - 22:15 नवीन
कविता वाचून अदितीला एवढेच विचारावेसे वाटते "मज्याशी मय्त्री कर्नार कं?"
  • Log in or register to post comments

चुकताय का?

प्रियाली
गुरुवार, 09/01/2011 - 22:16 नवीन
मला अन्फ्रेंद कर्नार क? असे विचारायला हवे. ;) की नंतर अन्फ्रेंद कर्न्यासाती आधी फ्रेंद करून घेताय? ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनामिक

आम्ही नै ब्वॉ कुणाला

अनामिक
गुरुवार, 09/01/2011 - 22:26 नवीन
आम्ही नै ब्वॉ कुणाला अन्फ्रेंद करत!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रियाली

=)) =)) _/\_ धन्य आहेस.

गणपा
गुरुवार, 09/01/2011 - 22:21 नवीन
=)) =)) _/\_ धन्य आहेस.
  • Log in or register to post comments

=)) =))

Nile
गुरुवार, 09/01/2011 - 22:32 नवीन
पूढील आवाहन: "राया चला चेपूवरी, अनफ्रेंड करू चला"... ;-)
  • Log in or register to post comments

पुढल्या म्हराटी पिच्चरमदे

रेवती
गुरुवार, 09/01/2011 - 22:33 नवीन
पुढल्या म्हराटी पिच्चरमदे यावर एक नाच असायला हरकत नाही.
  • Log in or register to post comments

_/\_ ! (पण या पोरी लोक लगेच

आळश्यांचा राजा
गुरुवार, 09/01/2011 - 22:46 नवीन
_/\_ ! (पण या पोरी लोक लगेच असे फ्रेण्डांना पासवर्ड देतातच कशाला!)
  • Log in or register to post comments

पहिलं आमचं आमंत्रण तर

पिंगू
गुरुवार, 09/01/2011 - 22:58 नवीन
पहिलं आमचं आमंत्रण तर स्वीकारा दुर्बिटनैताई... मग पुढे बघू अनफ्रेंड करायचं की नाही ते.. - (चेपुमित्र) पिंगू
  • Log in or register to post comments

जोरदार टाळ्या

पुष्करिणी
गुरुवार, 09/01/2011 - 23:30 नवीन
जोरदार टाळ्या :) :) :)
  • Log in or register to post comments

भलतीच दारुण कथा आहे!

कवितानागेश
Fri, 09/02/2011 - 00:01 नवीन
:D भलतीच दारुण कथा आहे! :D
  • Log in or register to post comments

हा हा हा .. जबरदस्त !!

सुहास झेले
Fri, 09/02/2011 - 01:34 नवीन
हा हा हा .. जबरदस्त !! :D
  • Log in or register to post comments

काय दुर्बिटणे बाई... ! मी

प्राजु
Fri, 09/02/2011 - 02:05 नवीन
काय दुर्बिटणे बाई... ! मी नाही हो तुम्हाला अन्फ्रेन्ड केलं...! :)
  • Log in or register to post comments

'स्सुरेख' वगैरे म्हणन जरा

स्पंदना
Fri, 09/02/2011 - 06:32 नवीन
'स्सुरेख' वगैरे म्हणन जरा उचित वाटत नाही पण 'डोक्केबाज गो अदिती!' अस मात्र म्हणु शकते, अन आता हात सोड त्या गुर्जींचे , कायम काय त्यांची मदत, एकदा शिकवल्क की पुढ आपन सुरु करायच असत.
  • Log in or register to post comments

>>>>अन आता हात सोड त्या

प्यारे१
Fri, 09/02/2011 - 09:20 नवीन
>>>>अन आता हात सोड त्या गुर्जींचे , कायम काय त्यांची मदत, एकदा शिकवल्क की पुढ आपन सुरु करायच असत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पंदना

मस्त

निनाद
Fri, 09/02/2011 - 06:46 नवीन
मस्त!
  • Log in or register to post comments

पथदर्शक (विडंबन) कविता

मनीषा
Fri, 09/02/2011 - 08:00 नवीन
पथदर्शक (विडंबन) कविता ... (पुढच्यास ठेच ...इ.इ. ) (- नॉट सो फ्रेन्डली) मनीषा
  • Log in or register to post comments

वॉलपोस्टा लाइक करून, सारख्याच

स्वानन्द
Fri, 09/02/2011 - 11:24 नवीन
वॉलपोस्टा लाइक करून, सारख्याच कॉजेसना सपोर्ट करून, फार्मव्हिलमध्ये एकमेकांच्या झाडांना पाणी घालून त्यांची मैत्री वाढली.
हा हा!! लै भारी :D
  • Log in or register to post comments

_/\_ प्रणाम _/\_

मृत्युन्जय
Fri, 09/02/2011 - 11:27 नवीन
_/\_ प्रणाम _/\_ :)
  • Log in or register to post comments

सदर धाग्यासाठी माझे गुर्जी

इरसाल
Fri, 09/02/2011 - 12:53 नवीन
सदर धाग्यासाठी माझे गुर्जी आणि फेसबुकमित्र राजेश घासकडवी यांचे आभार. पैकी कोणाच्या फेबु चे आहे ?
  • Log in or register to post comments

चान चान

परिकथेतील राजकुमार
Fri, 09/02/2011 - 13:26 नवीन
धाग्यामागची प्रेरणा सांगीतली असती तर अजून बहार आली असती ;)
  • Log in or register to post comments

=))

वाहीदा
Fri, 09/02/2011 - 16:11 नवीन
GREYSON CHANCE चे "Unfriend You" गाणे आठविले =)) You come on to everybody Everybody all the time You give up to anybody What I thought was only mine So it's over now we're through, so I'll unfriend you You're the best liar I ever knew, so I will unfriend you 'Cause I should have known, right from the start That you didn't have a human heart Yeah it's over my last move is to unfriend you Unfriend you So I'll unfriend you! Unfriend you ! पण आम्ही नाही हो तुला कधीच अन्फ्रेंड करणार :-)
  • Log in or register to post comments

गुमराह

नंदन
Fri, 09/02/2011 - 16:11 नवीन
नावाच्या चित्रपटातल्या 'तारुफ़ रोग हो जाये तो उसको भूलना बेहतर तालुक बोझ बन जाये तो उसको तोडना अच्छा' ह्या ओळी आठवल्या :)
  • Log in or register to post comments

लाईक केल्या गेले आहे.

गणपा
Fri, 09/02/2011 - 19:38 नवीन
लाईक केल्या गेले आहे. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नंदन

उसे एक खूबसुरत मोड देकर छोडना अच्छा

रामदास
Fri, 09/02/2011 - 20:09 नवीन
ही ओळ पण आठवली.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नंदन

मस्त

शुचि
Fri, 09/02/2011 - 20:19 नवीन
मस्त.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नंदन

डबलप्लस अनगुड अनफ्रेण्ड

नितिन थत्ते
Fri, 09/02/2011 - 18:14 नवीन
डबलप्लस अनगुड अनफ्रेण्ड करायलाच पायजेलाय आता.
  • Log in or register to post comments

=)) =)) =))

प्रभो
Fri, 09/02/2011 - 18:33 नवीन
=)) =)) =))
  • Log in or register to post comments

मस्त विडंबन... पण त्या पोरीने

धन्या
Fri, 09/02/2011 - 19:28 नवीन
मस्त विडंबन... पण त्या पोरीने आपल्या अकाउंटचा पासवर्ड शेअर करण्याचा वायझेडपणा का बरे करावा?
  • Log in or register to post comments

धनाजीराव आणि आळशांचा राजा यांजप्रती:

३_१४ विक्षिप्त अदिती
Fri, 09/02/2011 - 20:28 नवीन
सांगोवांगीच्या गोष्टी अशा की या मुलीला तिच्या फेसबुक खात्यात काही फिल्टर टाकायचे होते, जे करणं तिला जमत नव्हतं. या तरूणाने आपल्याला हे जमेल असं सांगितलं. म्हणून तिने विश्वासाने फक्त काही तांत्रिक कामांसाठी त्याला पासवर्ड दिला तर हे मेसेज-गेट प्रकरण झालं. अपर्णा अक्षय आणि प्यारे१ यांजप्रती: शिकवणार्‍याने शिकवलं, आपण शिकायचा प्रयत्नही केला. पण आपल्या डोळ्यातलं मुसळ दिसत नाही म्हणून थोरामोठ्यांची मदत घेतलेली बरी असते. कोणाची मदत घेऊन आपण लहान होत नाही. बरं लिखाणात मदत घेणं, करणं म्हणजे काय पासवर्ड वाटणं नव्हे! नंदन आणि रामदासकाका यांजप्रती: होय, काही ओझी काढून टाकल्या जात आहेत, काही गोष्टी "खूबसूरत" दिसेपर्यंतच सोडून दिल्या जात आहेत. अनामिक, मी मयत रि क्रेन पन ए.एस.एल? परा, प्रेरणा काय ते समजलं असेलच. >> (- नॉट सो फ्रेन्डली) मनीषा << आवडलं. >>पैकी कोणाच्या फेबु चे आहे ? << फेसबुक एकच आहे, मार्क झुकरबर्गचं.
  • Log in or register to post comments

पाचकळ (नेहमीप्रमाणेच)

शिल्पा ब
Fri, 09/02/2011 - 21:49 नवीन
पाचकळ (नेहमीप्रमाणेच)
  • Log in or register to post comments

पाचकळ (नेहमीप्रमाणेच) ही

अनामिक
Fri, 09/02/2011 - 23:49 नवीन
पाचकळ (नेहमीप्रमाणेच) ही तुमची सही आहे की कवितेवरचा प्रतिसाद? (ह.घ्या.)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शिल्पा ब

मस्तच

जाई.
Fri, 09/02/2011 - 23:13 नवीन
I Like it. :)
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा