Skip to main content

'ओपनहायमर' पुस्तक प्रकाशन

लेखक चिंतातुर जंतू यांनी मंगळवार, 30/08/2011 13:06 या दिवशी प्रकाशित केले.
आण्विक शस्त्रास्त्रांविषयीच्या मतांमुळे अमेरिकन सरकारच्या रोषाचा धनी ठरलेला सुप्रसिद्ध भौतिकशास्त्रज्ञ ओपनहायमर याच्या जीवनावर आधारित चरित्रात्मक पुस्तकाचं आज संध्याकाळी पुण्यात प्रकाशन होणार आहे. लेखिका: माणिक कोतवाल (यांनी पूर्वी गॅलिलिओवरही चरित्रात्मक पुस्तक लिहिलेलं आहे.) प्रकाशकः राजहंस प्रकाशन, पुणे स्थळः एस. एम. जोशी सभागृह, गांजवे चौक वेळः सं. ५:३० वा. अध्यक्षः अच्युत गोडबोले उपस्थिती: डॉ. शंकरराव गोवारीकर कार्यक्रम सर्वांसाठी खुला आहे. ओपनहायमरविषयी अधिक माहिती इथे मिळेल.

वाचने 2449
प्रतिक्रिया 7

प्रतिक्रिया

कार्यक्रमास शुभेच्छा. ओपनहायमर पुस्तक परिक्षण वाचायला आवडेल. (अध्यक्षः अच्युत गोडबोले म्हणजे बोअर करणार असा कयास! हे लेखक म्हणून फारच टुकार आहेत असे माझे मत आहे. त्यांचे बोर्डरूम नावाचे एक पुस्तक वाचले आणि पस्तावलो होतो. पुस्तक काहीच्या काही 'बेसिक' होते. त्यानंतर धीर धरून एक संगीत विषयक पुस्तक वाचले त्यात स्वतःची वाजवलेली टिमकी फार बोअर करून गेली... :( त्यानंतर या इसमाच्या भानगडीत पडायचे नाही असे ठरवून टाकले. )

In reply to by निनाद

+१ त्यांचे बोर्डरूम नावाचे एक पुस्तक वाचले आणि पस्तावलो होतो. पुस्तक काहीच्या काही 'बेसिक' होते. त्यानंतर धीर धरून एक संगीत विषयक पुस्तक वाचले _त्यात_ स्वतःची वाजवलेली टिमकी फार बोअर करून गेली............. तो सगळीकडॅ तेच करतो