राखेमधे लोळतो मी (हजल)
मलिंदा मिळावा असे भाकतो मी
जगावेगळे मागणे मागतो मी
कशाला गडे रोज येतेस स्वप्नी?
असा काय आमिर तुला वाटतो मी?
जसे गुंग व्हावे नशीले पिताना
तुला पाहताना तसा झिंगतो मी
मला नेमक्या टाळती अप्सरा त्या
बहूतेक त्यांना कवी भासतो मी!
दिलेली फुले तू जमा खूप झाली
अता गूळ, साखर, डबा शोधतो मी
करा बंद कानात आकाशवाणी
अरे मच्छरांनो बघा पेंगतो मी
समाजात चर्चेमधे राहण्याला
अभय मस्त राखेमधे लोळतो मी
गंगाधर मुटे
-------------------------------------
(तर ही हजल)
काव्यरस
वाचने
1605
प्रतिक्रिया
7
मिसळपाव
प्रतिक्रिया
वा... सुंदर.
>>दिलेली फुले तू जमा खूप
पोच
पोचपावतीची पोच.
In reply to पोच by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
:)
In reply to पोचपावतीची पोच. by गंगाधर मुटे
अहो साहेब, "शराब और शबाब के
In reply to :) by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
खूप छान मुटे जी. मस्त लिहिले