Skip to main content

राखेमधे लोळतो मी (हजल)

लेखक गंगाधर मुटे यांनी रविवार, 21/08/2011 12:37 या दिवशी प्रकाशित केले.
राखेमधे लोळतो मी (हजल) मलिंदा मिळावा असे भाकतो मी जगावेगळे मागणे मागतो मी कशाला गडे रोज येतेस स्वप्नी? असा काय आमिर तुला वाटतो मी? जसे गुंग व्हावे नशीले पिताना तुला पाहताना तसा झिंगतो मी मला नेमक्या टाळती अप्सरा त्या बहूतेक त्यांना कवी भासतो मी! दिलेली फुले तू जमा खूप झाली अता गूळ, साखर, डबा शोधतो मी करा बंद कानात आकाशवाणी अरे मच्छरांनो बघा पेंगतो मी समाजात चर्चेमधे राहण्याला अभय मस्त राखेमधे लोळतो मी                          गंगाधर मुटे ------------------------------------- (तर ही हजल)
काव्यरस
लेखनविषय:

वाचने 1605
प्रतिक्रिया 7

प्रतिक्रिया

>>दिलेली फुले तू जमा खूप झाली अता गूळ, साखर, डबा शोधतो >> प्र.के.अत्रेंची प्रेमाचा गुलकंद कविता आठवली

वाचतोय. अजून येऊ द्या. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

अजून येऊ द्या. :D युद्धपातळीवर प्रयत्नांची पराकाष्टा करण्याचे प्रयत्न चालूच आहे. ;)

In reply to by गंगाधर मुटे

>>>>युद्धपातळीवर प्रयत्नांची पराकाष्टा करण्याचे प्रयत्न चालूच आहे. आपण शेतकरी संघटनेच्या कामात सतत व्यस्त असता. आपली धावपळ आणि कामावरील प्रेम क्षणभराच्या भेटीत आम्ही ओळखून आहोत आणि इतके असुनसुद्धा- 'तुला पाहताना तसा झिंगतो मी' आणि 'दिलेली फुले तू जमा खूप झाली' या दोन ओळींनी अजूनही आपल्यामागील जांगडगुत्ता अजून सुटला नाही की काय असे वाटले. ;) (हलकेच घ्या) -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

अहो साहेब, "शराब और शबाब के बगैर गझलको (और गझलकारको भी) गझलियत नही आती" हा गझलेचा मुळ सिद्धांत आहे, असे म्हणतात. म्हणून कायदेशिर बाजूची पुर्तता करण्यासाठी अशा रचना रचाव्या लागतात ;)

खूप छान मुटे जी. मस्त लिहिले आहे. हे खुप भन्नाट लिहिले आहे तुम्ही :) >>>मला नेमक्या टाळती अप्सरा त्या बहूतेक त्यांना कवी भासतो मी!