ऑफीसात, माझ्या क्युबिकलच्या समोर एक क्युब आहे जेथे कोणीतरी जॉन नावाचे साधारण ५० शीचे गृहस्थ संगणकावर काम करत असतात. मला त्यांचे आडनावदेखील माहीत नाही.
मी जरा उशीरा आले तर जॉन कामात गर्क झालेले आढळतात पण मी जर लवकर आले तर हे गृहस्थ कधी त्यांच्या जागेवर येऊन कामाला लागतात हे कळतसुद्धा नाही. यांचाआवाज चढलेला मी कधीच ऐकला नाही. मृदू पण एकप्रकारचा धाक असलेला आवाज मला तरी वाटतो.
लोकांचा बराच राबता यांचेकडे असतो. बहुसंख्य लोक हे नवीन किंवा जॉनपेक्षा खूप ज्युनिअर वाटतात. ते या सर्वांना सूचना देतात, बरेचदा अपडेटस मागतात. मात्र यांचेकडे लोक आले की माझं मिपा-मिपा काही काळापुरता बंद होतं. कारण बोलण्याच्या मधल्या पॉझमध्ये काही लोक क्वचित माझ्या स्क्रीनकडे पहाताना मला आढळले आहेत. सो आय गेट बस्टेड्!! : ( हा एक प्रकारचा माझ्याकरता न्युइसन्स आहे खरा.
मात्र स्वतःजॉन कधीच माझ्या कामात ढवळाढवळ करत नाहीत. चुकूनही माझा स्क्रीन पहाण्याचा प्रयत्न करत नाहीत वगैरे वगैरे.
मला खूपदा वाटतं त्यांच्याशी ओळख करून घ्यावी कारण त्यांच्या वयामुळे त्यांच्या व्यक्तीमत्वात आलेला भारदस्त आश्वासकपणा तसेच "दुसर्याच्या कामात ढवळाढवळ न करण्याची" त्यांची वृत्ती.
अर्थात मी स्वतः होऊन ओळख करणार नाही कारण ... कारणच नाही. पण त्यांच्याबद्दल खूप कुतूहल आहे. म्हणजे त्यांचा हुद्दा, कामाचे स्वरूप, त्यांना मी शेजारी म्हणून कशी वाटते आदि गोष्टींबद्दल.
पण २ रेषा समांतर जातात त्या एकमेकींना कधीच छेदत नाहीत तद्वत आमची कोणत्याही प्रकल्पात गाठ पडणार नाहीही. पण कुतूहल मात्र राहील.
या जागी अन्य कोणीही स्त्री अथवा पुरुष, भारतिय अथवा परदेशी असता तर मी ओळख करून घेतली असती का? या जरतर ला अर्थ नाही पण नसती असच वाटतं आहे. हा ऑफीसच्या फोर्मल आणि रूक्ष वातावरणाचा परीणाम म्हणता येईल.
वाचने
17390
प्रतिक्रिया
87
मिसळपाव
प्रतिक्रिया
नाही हो विजुभाऊ तो मुख्य
In reply to जॉन ने तुमची ओळख करून घेण्यास by विजुभाऊ
काही आज्मावलेले बर्फ तोडायचे
शुचि, तू हे करू शकशील!
तीन किस्से
मस्त
In reply to तीन किस्से by बहुगुणी
बहुगुणी, जबरदस्त किस्से आणि
In reply to तीन किस्से by बहुगुणी
@बहुगुणी : _/\_ ... धन्यवाद.
In reply to तीन किस्से by बहुगुणी
काका सगळे किस्से
In reply to तीन किस्से by बहुगुणी
प्रतिसाद आवडला.
In reply to तीन किस्से by बहुगुणी
आर यू टेकिंग अस फॉर ए राइड?
नाही प्रियाली, जॉन या
In reply to आर यू टेकिंग अस फॉर ए राइड? by प्रियाली
कैच्या कै!!
In reply to आर यू टेकिंग अस फॉर ए राइड? by प्रियाली
थोडेसे प्रियालीसारखेच म्हणतो.
In reply to आर यू टेकिंग अस फॉर ए राइड? by प्रियाली
सहमत!
In reply to थोडेसे प्रियालीसारखेच म्हणतो. by बिपिन कार्यकर्ते
हाहा नक्कीच.
In reply to सहमत! by पिवळा डांबिस
कदाचित ह्याच कारणासाठी जॉन ने
चितळे-चिवडा