Skip to main content

शेजारी

लेखक शुचि यांनी गुरुवार, 11/08/2011 23:31 या दिवशी प्रकाशित केले.
ऑफीसात, माझ्या क्युबिकलच्या समोर एक क्युब आहे जेथे कोणीतरी जॉन नावाचे साधारण ५० शीचे गृहस्थ संगणकावर काम करत असतात. मला त्यांचे आडनावदेखील माहीत नाही. मी जरा उशीरा आले तर जॉन कामात गर्क झालेले आढळतात पण मी जर लवकर आले तर हे गृहस्थ कधी त्यांच्या जागेवर येऊन कामाला लागतात हे कळतसुद्धा नाही. यांचाआवाज चढलेला मी कधीच ऐकला नाही. मृदू पण एकप्रकारचा धाक असलेला आवाज मला तरी वाटतो. लोकांचा बराच राबता यांचेकडे असतो. बहुसंख्य लोक हे नवीन किंवा जॉनपेक्षा खूप ज्युनिअर वाटतात. ते या सर्वांना सूचना देतात, बरेचदा अपडेटस मागतात. मात्र यांचेकडे लोक आले की माझं मिपा-मिपा काही काळापुरता बंद होतं. कारण बोलण्याच्या मधल्या पॉझमध्ये काही लोक क्वचित माझ्या स्क्रीनकडे पहाताना मला आढळले आहेत. सो आय गेट बस्टेड्!! : ( हा एक प्रकारचा माझ्याकरता न्युइसन्स आहे खरा. मात्र स्वतःजॉन कधीच माझ्या कामात ढवळाढवळ करत नाहीत. चुकूनही माझा स्क्रीन पहाण्याचा प्रयत्न करत नाहीत वगैरे वगैरे. मला खूपदा वाटतं त्यांच्याशी ओळख करून घ्यावी कारण त्यांच्या वयामुळे त्यांच्या व्यक्तीमत्वात आलेला भारदस्त आश्वासकपणा तसेच "दुसर्‍याच्या कामात ढवळाढवळ न करण्याची" त्यांची वृत्ती. अर्थात मी स्वतः होऊन ओळख करणार नाही कारण ... कारणच नाही. पण त्यांच्याबद्दल खूप कुतूहल आहे. म्हणजे त्यांचा हुद्दा, कामाचे स्वरूप, त्यांना मी शेजारी म्हणून कशी वाटते आदि गोष्टींबद्दल. पण २ रेषा समांतर जातात त्या एकमेकींना कधीच छेदत नाहीत तद्वत आमची कोणत्याही प्रकल्पात गाठ पडणार नाहीही. पण कुतूहल मात्र राहील. या जागी अन्य कोणीही स्त्री अथवा पुरुष, भारतिय अथवा परदेशी असता तर मी ओळख करून घेतली असती का? या जरतर ला अर्थ नाही पण नसती असच वाटतं आहे. हा ऑफीसच्या फोर्मल आणि रूक्ष वातावरणाचा परीणाम म्हणता येईल.
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 17390
प्रतिक्रिया 87

प्रतिक्रिया

In reply to by विजुभाऊ

नाही हो विजुभाऊ तो मुख्य मुद्दा नाही. He being a no-nonsesnse , serious person with probably on higher designation than me , how do i approach that's main question. मी कोण मोठी लागून गेले आहे की माझ्या अस्तित्वाची दखल घेतलीच पाहीजे?

काही आज्मावलेले बर्फ तोडायचे (मी आणि आमच्या मित्र मंडळींनी आज्मावलेले) उपाय करून पहा. १. जोन जवळपास असताना / बघत असताना आपली एखादी वस्तू मुद्दामून खाली पडून हुळूच पुढे सटका , कुठलाही सज्जन माणूस तुम्हाला हाक मारून नक्कीच सांगेल. मग बोलायला सुरुवात करा. २. दुसराच कुठला तरी प्रिंटर डी-फाल्त म्हणून सेट करा .. एक दोन प्रिंट मारा - प्रिंटर पाशी एक दोन चकरा मारून प्रिंट का आला नाही हे बघा ( कसा येणार म्हणा ) नंतर थोडस अस्वथ होवून - हाय मी शुची , मला तुमची मदत पाहिजे प्रिंट येत नाही ये - जरा प्रिंटर चे डीटेल घेवून , मग प्रिंट व्यवस्थित आल कि धन्यवाद वैगरे करा. हाच उपाय वेग-वेगळ्या प्रकारे करू शकता (जस वीपीएन चालत नाही तुमची चालत का , हे अप्लिकेशन चालत नाही इत्यादी इत्यादी) ३. तुमच्या एखाद्या मित्राला मिटिंग request पाठवून द्यायला सांगा आणि ऑफिसच्या एक टोकाला असलेली मिटिंग रूम कुठ आहे अस विचारा ? हाय मी शुची आणि मला तुमची मदत हवी आहे हा नेहमीचा १००% काम करणारा बर्फ तोडण्याचा नामी उपाय आहे.

कसले बहाणे न करता, एक दिवस त्या जॉनच्या क्युबिकलमधे जाऊन सरळ हाय! म्हणून एक स्माईल दे! त्यात काहीच कठीण नाही, एवढ्या साध्या गोष्टीवरून कोणी गोंधळ घालणार नाही की तुला काही वाकडं बोलणार नाही. कोण जाणे जॉनलासुद्धा तुझ्याबद्दल असंच कुतुहल असेल, "ही कोण महिला आहे, भारतीय आहे असं वाटतंय खरं!" तू आपल्या मनाचा निश्चय करत नाहीस, की "मी उद्या जॉनबरोबर बोलेनच!" आणि त्यामुळे उगीच विचार करत राहिली आहेस. जॉनबरोबर जेव्हा तू संवाद सुरू करशील तेव्हा तुलाच असं वाटेल की "अरे, आपण इतके दिवस उगीच गप्प बसलो होतो!"

शुची: सहज ओळखी का करून घ्याव्यात, या संदर्भातले काही अनुभव १. जिंदगी के सफर में गुज़र जाते जो मुकाम, वो फिर नही आते..... महिन्यापूर्वी नव्यानेच रुजू झालेला एक सहकारी माझ्याकडे आला, म्हणाला, "थोडा वेळ आहे?" म्हंटलं, "शुअर, काय हवंय?" म्हणाला, "मी ते Major Equipment Grant चं प्रपोजल countersign साठी Dean कडे पाठवलं होतं आठवड्यापूर्वी, बर्‍याचदा reminder e-mails पाठवल्या, पण अजून उत्तर नाही. उद्या शेवटचा दिवस आहे सबमिशनचा, कुणाला विचारू?" मेडिकल स्कूलच्या डीनची सही ही सहजासहजी मिळणारी गोष्ट नव्हे, ते कागदपत्र प्रायॉरिटी लिस्ट वर नेमकं कुठे आहे हे त्यांची सेक्रेटरी आणि चीफ ऑफ स्टाफ ठरवतात, आणि त्यांच्या हातून ते डीनच्या टेबलपर्यंत पोहोचलं आणि त्यांना वेळ झाला तर ती सही होणार. तेंव्हा नुसत्या इ-मेल रिमाईंडर वर होणारं हे काम नक्कीच नाही. मी म्हंटलं "फोन केला होता का?" "नाही," म्हणाला, "I wasn't sure if the Chief of Staff would like it..he is so imposing, I am almost scared to approach him". खरंही होतं ते म्हणा, रिचर्ड म्हणून चीफ ऑफ स्टाफ होते ते खरंचच माणूस दबेल असं व्यक्तिमत्व. फील्ड मार्शल माणेकशॉ सारख्या भरघोस मिशा आणि तशीच बलदंड देहयष्टी, पब्लिक टरकून असायची डिकला. मी म्हंटलं बस इथे, आताच विचारुयात फोन करून. त्यांना फोन लावला, "डिक, थोडं काम होतं...." त्यांनी सांगितलं की ते प्रपोजल त्यांनी पाहिलंय आणि आज त्यावर सहीदेखील होईल डीनची, पण डीन कडे फॉरवर्ड करण्याआधी या वर्षात आवश्यक असलेली budgetary commitment खरंच शक्य आहे का याचं confirmation Accounts कडून अजून आलं नाहिये, ते तासाभरात मिळेल, त्यानंतर सही होईल आणि मग घेऊन जा म्हणावं. त्याप्रमाणे तासाभरात त्यांचा फोन आला आणि माझा सहकारी जाऊन त्याचं प्रपोजल घेऊन आला. म्हणाला, "Got it! Didn't meet Richard, wanted to say thanks. I will send an e-mail. Thanks for your help." दोन आठवड्यांपूर्वी सोमवारी सकाळी ऑफिसमध्ये येऊन इ-मेल्स पहातो, तर वरतीच डीन कडून सर्व स्टाफ ला आलेली इ-मेल- "Dick is No More!"...आतल्या मजकूरावरून कळलं की गेली चार दशकं तीन डीन्सचा चीफ ऑफ स्टाफ म्हणून काम करणार्‍या, सायकॉलॉजीत मानद प्राध्यापक असलेल्या आणि नुकतीच पी एच डी पूर्ण केलेल्या डिक चा शुक्रवारी संध्याकाळी दु:खद मृत्यू झाला होता. Condolence meeting सोमवारी संध्याकाळी होती. त्यावेळी कळलं की हा कर्तव्यकठोर, फारसं कधी कुणाशी मिळून-मिसळून वागणारा नसला तरी अतिशय कार्यक्षम असा गृहस्थ खरा मनाने अतिशय सरळ होता, स्थानिक चर्चसाठी आणि इतर कामांसाठी खूप देणग्या द्यायचा, आणि पेशंट्सना नकळत आर्थिक मदत करायचा, वगैरे, वगैरे...हे सगळं मग obituaryत छापून आलं, आणि सर्व स्टाफला इ-मेल मधून कळलं. दोन दिवसांपूर्वी सुटीवर परदेशी गेलेला माझा सहकारी परत आला, आणि धावतच माझ्याकडे आला, "Did you see this news about Richard?" मी म्हंटलं,"Yes, that was a real shock." तो म्हणाला "My God! And after reading all those good things about him...now I feel why I did not wait and thank him in person? Now I never will!" 2. Pay it forward सोमवारी सकाळी ९ ची वेळ. एलिव्हेटर मध्ये ८-९ जण भरले होते. आपापल्या मजल्यांची बटनं दाबून झाल्यावर सगळी मंडळी आपले स्मार्ट फोन काढून बटनं दाबायला लागलेली (मी देखील!) दार बंद होता-होता एक कृष्णवर्णीय मध्यमवयीन स्त्री धावतच आत आली, कुणीतरी हात लांबवून दार उघडं ठेवून तिला आत येऊ दिलं, तिने 'थँक यू' म्हणतांना दार बंद झालं. तेवढ्या क्षणभरच वर बघणारी मंडळी पुन्हा आपापल्या फोनांकडे वळली आणि एलिव्हेटर वरच्या दिशेने निघाली. "Good Morning, Everybody!" त्या स्त्रीने खणखणीत आवाजात मागे वळून लोकांकडे पहात म्हंटलं, गोड हसून. एक-दोघांनी, खजील होत "Good Morning!" म्हंटलं. तिसर्‍या मजल्यावर एलिव्हेटर थांबल्यावर ती स्त्री उतरून "बाय!" म्हणून मागे न पहाता निघून गेली. त्यानंतरच्या जवळ जवळ प्रत्येक मजल्यावर एलिव्हेटर थांबल्यावर, बाहेर जाणारी प्रत्येक व्यक्ती उरलेल्यांना "हॅव अ नाईस डे!" म्हणत गेली. ...दुसर्‍या दिव्याची ज्योत लावण्याने पणतीचं काहीच बिघडत नाही. ३. केवळ हलकी-फुलकी गंमत अशीच सकाळची घाईची वेळ. मी, बरोबर बरीच निरनिराळ्या ऑफिसातील लोकं, आणि एक वैद्यकीय शास्त्रज्ञ पण खडूस म्हणून प्रसिद्ध असलेले डॉक्टर एलिव्हेटर मध्ये. दार बंद होता-होता एक शिडशिडीत तरूण धावत आत आला. सेल्स रिप्रेझेन्टेटिव्ह वगैरे असावा अशी हातात ब्रीफकेस, काळा सूट, पण झटकन लक्षात भरली ती त्याची उंची, आम्ही सगळे ५-६ फूटी मंडळी असलेल्या त्या एलिव्हेटरमध्ये हा चांगला सात फूटी लंबूतडांग तरूण एका कोपर्‍यात सरकून उभा राहिला. एलिव्हेटर वर निघाली. पिन-ड्रॉप शांततेत आवाज आला, ते खडूस म्हणून कुप्रसिद्ध असलेले डॉक्टर त्या तरूणाला विचारत होते, "How's the weather up there?" नंतर उसळलेला हशा मी अजून विसरू शकलेलो नाही ;-)

In reply to by बहुगुणी

>> दुसर्‍या दिव्याची ज्योत लावण्याने पणतीचं काहीच बिघडत नाही.>> सुंदर. मस्त आहेत किस्से तुमचे. धन्यवाद बहुगुणी.

In reply to by बहुगुणी

बहुगुणी, जबरदस्त किस्से आणि ..दुसर्‍या दिव्याची ज्योत लावण्याने पणतीचं काहीच बिघडत नाही. हे तर एकदम मनाला हलवुन गेलं, धन्यवाद अजुन एक दिवस सुखाचा केल्याबद्दल, हळु हळु माझ्या ध्येयाकडं पोहोचतोय मी.

In reply to by बहुगुणी

काका सगळे किस्से जबरदस्त.
...दुसर्‍या दिव्याची ज्योत लावण्याने पणतीचं काहीच बिघडत नाही.
__/\__

या चर्चेवर झालेले प्रतिसाद वाचत असताना अचानक मला सहजच शुचिताई इथे आल्या तेव्हाची आठवण झाली. त्यांनी माझ्याशी स्वतः ओळख काढून घेतल्याचेही आठवते. त्यावेळी त्यांनी मला खरड पाठवली होती (किंवा निरोप पाठवला होता.) माझ्या ब्लॉगवर फेरफटका मारला होता. माझी सूर्यरास कोणती वगैरे हे देखील शोधून काढले होते. नेटावरची माझी ओळख (निदान खरडवहीतील तरी) इतकी फ्रेंडली नाही. असे असताना जर शुचिताई मला कॉन्टॅक्ट करू शकतात (आणि त्यांनी अशाप्रकारे नेटावर अनेकांशी ओळख करून घेतली असावी.) तर त्या जॉनला साधं हाय म्हणू शकत नाहीत हे पटले नाही. लोक कसे वागतात (किंवा नेटावरील काही आयडीज कशा वागतील) हे जाणून घेण्याचा तर हा प्रयत्न नव्हे?

In reply to by प्रियाली

नाही प्रियाली, जॉन या व्यक्तीच्या हुद्द्याचं दडपण येणं स्वाभाविक आहे, तसेच ऑफीसमध्ये नो-नॉन्सेन्स वातावरण असतं. मी उगाच गप्पा छाटू शकतच नाही. मला फक्त "हाय" म्हणण्यापेक्षा, मी एक शेजारी म्हणून कशी आहे तसेच जॉन यांच्या कामाचे स्वरूप आदि गोष्टींबद्दल चौकशी करायला आवडेल. मला जी व्यक्ती इन्ट्रिग करते तिचा मी खरं तर बर्‍यापैकी पिच्छा पुरवते पण ऑफीसमध्ये कधीच असा प्रसंग आला नाही. किंवा आमनेसामने देखील नाही. मला इथल्या काही आय डींनी ज्यांनी इन्ट्रिग केलं त्यांच्याशी मी आपण होऊन बोलले पण इथे वातावरण ऑफीससारखं रूक्ष नाही. हा फरक आहे. शिवाय ४ ओळी खरडणं आणि आमनेसामने बोलणं हादेखील फरक आहे.

In reply to by प्रियाली

नेटावरची माझी ओळख (निदान खरडवहीतील तरी) इतकी फ्रेंडली नाही. इश्श्य, काहितरीच काय बोलायचं तरी? :) @ शुचि, जॉनच्या हुद्द्याचं दडपण येतं.... अहो कसलं काय, तोही तुमच्यासारखा क्यूबिकलमध्येच आहे ना? म्हणजे तो डायरेक्टर, व्हाइस प्रेसिडेन्ट तरी नक्कीच नाही.... तुम्हाला त्या व्यक्तिबद्दल औत्सुक्य वाटत असेल तर सरळ जाउन बोला. तो जर खरा अमेरिकन असेल तर त्याला त्यात काहीही विचित्र वाटणार नाही..... पण त्याचबरोबर 'तो माझ्याशी आधी का नाही बोलला?' वगैरे पुर्वग्रह मनातून काढुन टाका.... कदाचित तुम्हाला तो जेव्हढा औत्सुक्यपूर्ण वाटतो तितक्या त्याला तुम्ही वाटत नसाल! सो व्हॉट, बी अ स्पोर्ट!!!! किंवा वाटत असलांत तरी आपण बोललो तर या परकीय मुलीचा काय समज होईल कोण जाणे असं त्यालाही वाटत असेल...... मैत्री वाढवण्याचा सोपा उपाय म्हणजे स्वतः जाऊन मित्र होणे... बेस्ट लक!!

In reply to by प्रियाली

थोडेसे प्रियालीसारखेच म्हणतो. शुचिबाय इथे आली होती तेव्हाची आणि आजची शुचि यात तिने स्वतःच तुलना करून बघावी. हळूहळू का होईना पण नक्कीच काही लोकांना ती स्वतःहून अ‍ॅप्रोच झाली असणार. त्यामुळे फायदे झाले की तोटे याचा विचार करून बघावा.

In reply to by बिपिन कार्यकर्ते

हळूहळू का होईना पण नक्कीच काही लोकांना ती स्वतःहून अ‍ॅप्रोच झाली असणार. नक्की माहिती नाही, पण शक्यता नाकारता येत नाही!!! :) काय शुचिबाय, आमी म्हनतो ती बात सच्ची की झूट? तुमचां काय म्हंन्ना? ;)

चितळे चिवडा स्टील च्या डब्ब्यातुन दिल्यास फरक पड्ण्याची किंचीत शक्यता आहे.