ज्योतिष - आह्वानकर्त्यांना एक निवेदन
एक निवेदन
मला मिसळपाव वर वारंवार आह्वाने देण्यात येतात आणि मी ती स्वीकारत नाही अशी पण तक्रार सारखी ऐकायला मिळते. म्हणून मी आह्वाने स्वीकारायचे ठरवले आहे. परंतु ते काही सुटसुटीत अटींच्या चौकटीत बसत असेल तरच...
- आह्वानकर्त्याना बर्याच वेळेस आपण दिलेले देत असलेले आह्वान "योग्य" आहे की हे कळायची पण अक्कल नसते असे लक्षात आले आहे. तेव्हा अशी आह्वाने एका स्वतंत्र समितीकडून तपासण्यात यावीत. या समितीत ज्योतिषी आणि ज्योतिषनिंदक यांचा समसमान सहभाग असावा. ही समिती आह्वानांची योग्यता ठरविण्यासाठी काही कसोट्या निश्चित करेल. अशा समितीने आहवान योग्य असल्याचे प्रशस्तीपत्रक दिल्यावरच ते आह्वान मी माझ्या अभ्यासाच्या कक्षेत येत असेल तर ते मी स्वीकारेन
- मी आह्वान स्वीकारल्यावर मला प्रत्येक जन्मतारखेसाठी रू, ५००/ (रु पाचशे) एवढे आह्वानशुल्क माझ्या बॅंकेत जमा करावेत. हे शुल्क कोणत्याही परिस्थितीत परत केले जाणार नाही.या शुल्कावर योग्य तो कर भरायची माझी तयारी आहे. समितीच्या सदस्यांच्या मानधनाची व्यवस्था आह्वानकर्त्याने करावी.
- दिलेल्या आह्वानातिल विदा संगणकावर जमा करण्याची व्यवस्था आह्वानकर्त्याने करायची आहे
- आह्वानांतर्गत विश्लेषणासाठी लागणारी सर्व गणनसाधने आह्वानकर्त्याने उपलब्ध करून द्यायची आहेत.
- समितीचे सर्व कामकाज उघड असावे. त्यांची इंटरनेटवरील एखाद्या ब्लॉगवर यथाकाल नोंद व्हावी, जेणे करून कोणती आह्वाने योग्य आहेत कोणती स्वीकारली गेली आहेत ते जनतेला समजेल.
या माझ्या मूलभूत अटी आहेत. गरज पडल्यास यांना पुरवणी-अटी जोड्ण्यात येतील.
वर्गीकरण
प्रतिक्रिया
चालू द्यात
प्रति-आव्हान
+१
मीपण काही पैसे खर्च करायला
+२
मी ही ५ जणांची फी भरायला
+१
+२ मी दोन जणांची रक्कम भरण्यास तयार आहे....
तपशील
माझ्या पण
मुख्य म्हणजे जे कँडिडेट
शक्यतो एकमेकांशी अॅनॉनिमस
छान चालले आहे... चालू दया...
नमस्कार ! या चाचणीत जे प्रश्न