Skip to main content

ज्योतिष - आह्वानकर्त्यांना एक निवेदन

लेखक युयुत्सु यांनी मंगळवार, 09/08/2011 13:54 या दिवशी प्रकाशित केले.
एक निवेदन मला मिसळपाव वर वारंवार आह्वाने देण्यात येतात आणि मी ती स्वीकारत नाही अशी पण तक्रार सारखी ऐकायला मिळते. म्हणून मी आह्वाने स्वीकारायचे ठरवले आहे. परंतु ते काही सुटसुटीत अटींच्या चौकटीत बसत असेल तरच... - आह्वानकर्त्याना बर्‍याच वेळेस आपण दिलेले देत असलेले आह्वान "योग्य" आहे की हे कळायची पण अक्कल नसते असे लक्षात आले आहे. तेव्हा अशी आह्वाने एका स्वतंत्र समितीकडून तपासण्यात यावीत. या समितीत ज्योतिषी आणि ज्योतिषनिंदक यांचा समसमान सहभाग असावा. ही समिती आह्वानांची योग्यता ठरविण्यासाठी काही कसोट्या निश्चित करेल. अशा समितीने आहवान योग्य असल्याचे प्रशस्तीपत्रक दिल्यावरच ते आह्वान मी माझ्या अभ्यासाच्या कक्षेत येत असेल तर ते मी स्वीकारेन - मी आह्वान स्वीकारल्यावर मला प्रत्येक जन्मतारखेसाठी रू, ५००/ (रु पाचशे) एवढे आह्वानशुल्क माझ्या बॅंकेत जमा करावेत. हे शुल्क कोणत्याही परिस्थितीत परत केले जाणार नाही.या शुल्कावर योग्य तो कर भरायची माझी तयारी आहे. समितीच्या सदस्यांच्या मानधनाची व्यवस्था आह्वानकर्त्याने करावी. - दिलेल्या आह्वानातिल विदा संगणकावर जमा करण्याची व्यवस्था आह्वानकर्त्याने करायची आहे - आह्वानांतर्गत विश्लेषणासाठी लागणारी सर्व गणनसाधने आह्वानकर्त्याने उपलब्ध करून द्यायची आहेत. - समितीचे सर्व कामकाज उघड असावे. त्यांची इंटरनेटवरील एखाद्या ब्लॉगवर यथाकाल नोंद व्हावी, जेणे करून कोणती आह्वाने योग्य आहेत कोणती स्वीकारली गेली आहेत ते जनतेला समजेल. या माझ्या मूलभूत अटी आहेत. गरज पडल्यास यांना पुरवणी-अटी जोड्ण्यात येतील.

वाचने 25527
प्रतिक्रिया 114

प्रतिक्रिया

In reply to by युयुत्सु

परा, तुमचा प्रतिसाद आवडला.
धन्यवाद :)
पण काय आहे की आह्वान देण ही एक गंभीर गोष्ट असा वी असं मला वाटतं. उगीच कुणिही बेछुट आरोप करावेत हे मला मान्य नाही.
कुठल्या गोष्टीला आव्हान मानायचे आणि कुठल्याला आरोप हे शेवटी आपल्यावरच नसते का? एकदा का चर्चा वैयक्तिक पातळीवर घसरली की मग धाग्याचा खप आणि जुने स्कोर सेटल करण्याचे नंदनवन ह्याशिवाय तुमच्या हातात काही पडणार नाही. मुळात तुम्ही तुमचे अभ्यासू मत / भविष्य हे जे इथे मांडता ते त्या गोष्टीवर अथवा तुमच्या शब्दांवर विश्वास ठेवणार्‍यांसाठी असते. त्यातून त्यांचा काही फायदा व्हावा आणि त्यांनी तुमच्याशी संपर्क साधुन अजुन काही मदत मागीतल्यास तुमचा आर्थिक फायदा व्हावा असे साधे सोपे गणित ह्यामागे आहे. असे असताना आव्हान किंवा आरोप आलेच कुठे मध्ये ? क्षणभर आपण तुम्हाला दुकानदार आणि तुमच्या भविष्याला वस्तु समजु. अशावेळी ह्याला वस्तुची किंमत, उपयोग, सामर्थ्य, फायदा इ. पटले तो पुन्हा पुन्हा येणार आणि इतरांना देखील सांगणार. तुम्हाला त्रास करुन घ्यायची गरजच नाहीये. आणि ज्यांना ह्या वस्तुच्या विषयी विश्वासच नाहीये त्यांच्याशी वाद घालुन उपयोगच नाहीये. ना तुमचा काही फायदा आहे ना त्यांचा.

परा, तुमचा प्रतिसाद आवडला. पण काय आहे की आह्वान देण ही एक गंभीर गोष्ट असा वी असं मला वाटतं. उगीच कुणिही बेछुट आरोप करावेत हे मला मान्य नाही. मला मात्र ही चर्चा ऐतिहासिक ठरेल असे वाटते

तुमचं '' हे'' आव्हान हींमत असेल तर महाराष्ट्र अंधःश्रद्धा निर्मूलन समितीला तुंम्हीच द्या...आणी वरील काही प्रतिक्रीयांमधील तुमच्या म्हणण्या प्रमाणे अंनीसनी हे आव्हान जगातल्या सगळ्या ज्योतिषांना ऑल रेडी देउनच ठेवलेलं आहे...तेंव्हा त्यांनी तुंम्हाला आव्हानाचा सामुदाईक नारळ कधीच देउन ठेवलाय...तेंव्हा आता तुमचीच जबाबदारी आहे,तिकडं जाण्याची.उगीच आमची अक्क्ल काढायच्या फंदात पडू नका. किंवा आपल्या मिपाचेच १ सदस्य श्री.प्रकाश घाटपांडे यांच्या ब्लॉगवर जा. म्हणजे कळेल तुंम्ही कशाचं समर्थन करताय ते. किंवा नरेंद्र दाभोलकरांचं श्रद्धा/अंधःश्रध्दा हे पुस्तक वाचा... '' आह्वानकर्त्याना बर्‍याच वेळेस आपण दिलेले देत असलेले आह्वान "योग्य" आहे की हे कळायची पण अक्कल नसते असे लक्षात आले आहे. तेव्हा अशी आह्वाने एका स्वतंत्र समितीकडून तपासण्यात यावीत. या समितीत ज्योतिषी आणि ज्योतिषनिंदक यांचा समसमान सहभाग असावा. ही समिती आह्वानांची योग्यता ठरविण्यासाठी काही कसोट्या निश्चित करेल. अशा समितीने आहवान योग्य असल्याचे प्रशस्तीपत्रक दिल्यावरच ते आह्वान मी माझ्या अभ्यासाच्या कक्षेत येत असेल तर ते मी स्वीकारेन''...इती युयुत्सु... आंम्ही आव्हान करते आहोतच,पण करवीते तुंम्हीच आहात हे नीट लक्षात ठेवा.आणी आधी तुंम्ही भविष्य म्हणून जी जी माण्डणी करताय, ती बेअक्कल आहे हे लक्षात घ्या. आणी तुंम्हाला आव्हान देणाय्रा समीतीत तुमचे लोक कशाला? हे म्हणजे गुन्हे नियंत्रण समीतीत न्यायालयानी कलम ठरवायला चोरांना सहभागी करुन घेण्यासारखं आहे...जो बिनधास्त आव्हान स्वीकारणारा असेल तो असली कुडमुडी भाषा वापरणार नाही...बाकी तुमच्या अभ्यासाच्या क्क्षेत आंम्ही तुंम्हाला आव्हान आणुन द्यायच...म्हनजे शत्रूला तुंम्ही रनगाड्याचे गोळे माझ्या जवळ द्या,आणी मला मारून दाखवा म्हणण्या सारखच आहे... तुंम्ही जी जी भाकीतं वर्तवता ती खरी येण्यामागे फक्त एकच कारण आहे.लॉ ओफ प्रोबीब्लीटी...संभाव्यता शास्त्र...किंबहुना जे खरं होण्याचे जास्तीत जास्त चानसेस आहेत अश्याच गोष्टी तुंम्ही ज्योतिष शास्त्राच्या नावाखाली सांगत असता,,,त्यात तुमच्या शास्त्राची कर्तबगारी ''चलाख भाषा'' या पलीकडे काहीही नाही... आणी सर्वात महत्वाचं ---तुमच्या इच्छेप्रमाणे मी शाम मानव यांच्याशी अताच बोललो आहे...१५ तारखे नंतर ते पुण्यात येणार आहेत...तेंव्हा तुंम्ही आव्हान स्वीकारणार कुठे ती जागा याच धाग्यावर मला कळवा...

In reply to by अत्रुप्त आत्मा

पराग दिवेकर यांस आह्वान कोण कोणाला देतय याची तुम्ही बरीच गल्लत केली आहे. त्यामुळे तुमच्या प्रतिसादाला उत्तर द्यायचे की नाही असा प्रश्न पडला आहे. अंनिस च्या कुणाची सावली पण मी स्वत:च्या अंगावर पडू देणार नाही. ते लोक चर्चा किती "मोकळेपणाने" करतात हे काही वर्षांपूर्वी याची देही याची डोळा अनुभवले आहे. तेव्हा गरज असेल तर ते माझ्याकडे येतील मी त्यांच्या कडे कशाला जाऊ.

In reply to by युयुत्सु

यालाच म्हणतात पळकाढू...असो...ठीक आहे माझी गल्लत झाली...तुमचा मोबॉईल क्रमांक व्यनी करा.आंम्हीच तुमच्या पर्यंत येऊ...का हेही तुमच्या शास्त्रात बसत नाही तेही कळवा...म्हणजे विषयच मिटेल...बाकी मोबॉईल क्रमांक द्यायच आव्हान स्वीकाराल ना?

In reply to by अत्रुप्त आत्मा

मोबाईल देउ शकत नाही. पण इमेल देउन ठेवतो... म्हणजे सर्व नोंदी व्यवस्थित राहतील. इमेल upadhye.rajeev@gmail.com

मी ५०० रू देऊन एका जन्म तारखेबाबत आव्हान द्यायला तयार आहे पण जर त्याबाबत भूतकाळ व भविष्य व इतर माहीती अचूक वर्तवण्यात चूक झाली तर ०) मी कोणत्याही परीस्थीती आपल्याला दीलेली ५०० रूपये वर्गणी परत मागणार नाही. १) मला झालेल्या मनस्तापाबद्दल रू ७०० भूर्दंड भरावा लागेल . २) यापूढे सदरील शास्त्र (ज्याचा काही आपण अभ्यास करता ते) याचा कधीही व्यावसायीक उपयोग न करण्याची कायदेशीर शपथ घ्यावी लागेल, व या शास्त्राच्या अभ्यासातून निर्माण होणार्‍या सर्व भौतीक लाभांवर पाणी सोडावे लागेल.( पटत असेल तर सदरील गोश्ट कायदेशीर व्याख्येत बसवूया नीम्या नीम्या खर्चाने) ३) रूपये ८०,००० फक्त एखाद्या समाजसेवी संस्थेला बेनामी दान करावे लागतील (शक्य नसल्यास हे दान मिसळपाव.कॉम नावाने करावे लागेल). व संस्था कोनती असावी याबाबत मान्यवरांचे विचार व कौल याद्वारे निर्णय घेण्यात येइल.

In reply to by आत्मशून्य

मन:स्ताप झाला तर डॉक्टर पैसे परत देतो का? जो पर्यंत वैद्यकीय व्यावसायिक असे पैसे परत देत नाहीत तोपर्यंत असे मी प्रॉमिस मी पण देउ शकत नाही.

In reply to by युयुत्सु

डॉक्टर नाटक्या असेल, तर त्याला अद्दल घडवायची जाब विचारायची व नूकसान भरपाइ मागायची सोय कायद्यात आहे. तूम्ही कोण ? कायाद्यासमोर सगळे समान, विसरू नका, तूमच्या कोणत्याही घटनाबाह्य अटी मी स्विकारणार नाही. कायद्यचा/न्यायालयाचा मान ठेवा. जर तूम्ही मला मनस्ताप दीला नाहीत तर तूम्हाला मिळालेल्या पैशाला (रू ५००) टॅक्स व्यतीरीक्त आरकीमीडीजचा बापही हात लावू शकणार नाही. निश्चींत रहा, पण जर कोणी तूम्हाला रू ५०० देऊन विकतच दूखण दारी आणेल अशी अपेक्शा ठेवत असाल तर तूम्ही नक्किच चूकताय. याला आव्हान न्हवे स्वार्थीपणा म्हणतात. तूम्ही डोक्टरच काय डेंटीस्टही वा कंपाऊंडरही म्हणू शकणार नाही असे आव्हान देत बसलात तर....

In reply to by आत्मशून्य

हे बघा आत्मशून्य, तुम्ही घटनेच्या चवकटीची गोष्ट काढलीत म्हणुन सांगतो. तुमच्या घटनाबाह्य अटी मी मान्य कराव्यात असे तुम्हाला कसे वाटते. वर अनेक जणानी मला क्लिनिकल ट्रायलचे उदाहरण दिले. अशा ट्रायल मध्ये तुम्ही भाग घेतला आणि तुम्हाला मनस्ताप किंवा इतर त्रास झाला तर कोणतीही भरपाई (माझ्या माहिती प्रमाणे मिळत नाही). तुम्हाला ज्योतिषाची ट्रायल तर घ्यायची आणि मनस्ताप स्वीकारायची तयारी नाही हे कसे काय ते कळत नाही.

In reply to by युयुत्सु

ते ऊदाहरण मी दिले आहे का ? अथवा माझ्या प्रमाणे वरील अनेक जणांनी तूमच्या मूळ अटी न मोडता आव्हान दीले आहे का ? मग त्यांची उदाहरणे माझ्यावर का लादताय ? यूयूत्सूराव एक मीपाकर म्हणून आपल्यामधे जो बंध आहे त्याचा मान राखून मी तूम्हाला रू २०० ची रोख सवलत देतो. जर मला मनस्ताप झाला तर मी केवळ रू५००चे परत घेइन पण इतर कोणत्याही अटी आता बदलायला लावू नका. मी तूमच्या मूळ अटी कोठेही मोडल्या नसताना तूम्ही माझ्या पण तूमच्या अटींना पूरक अशा अटीमधे दूरूस्ती कशाला दाखवत आहात ? तूम्हाला भिती वाटते काय की खोटे ठराल म्हणून ? तसं असेल तर स्पश्ट बोला, मी अटी घालतोय कारण मला शंका आहेत की मी देलेले आव्हान मला जिंकता येइल की नाही याबाबत. पण तूमचं तर तसं नाहीये ना? तूम्ही इतक्या वर्षांचे अभ्यासक आहात स्वतःवर ठाम आहात मग आव्हानातील उसन अवसान आता आत्मविश्वासामधे बदललेले दीसून यासाठी प्राणांची बाजी देखील लावायला बिंधास्त तयार व्हा हो..... कूठे घटनाबाह्यता वगैरे तपासायचा भित्रेपणा दाखवताय ? तूमच्या माझ्यात तेव्हडा तरे फरक ठेवा की राव ? जर तूम्ही जिंकणारच आहात तर हारल्यानंतर मी मसणात जाइन असे सूध्दा कबूल करायला फार फरक पडतो काय ? बघा बूवा ... तिन्हीलोक आव्हानाने भरून जाऊदेत तूमचे भविष्य खरे ठर्ण्यासाठी कसोटी होऊ दे!

In reply to by आत्मशून्य

बास झालं बालीश कारण देऊन पळ काढणं, आता रिंगणात उतरा...
जी व्यक्ती माझ्या वैयक्तिक प्राधान्यक्रमाचा आदर ठेवू शकत नाही, त्या व्यक्तीचे आह्वान मी का स्वीकारावे असा संभ्रम माझ्या मनात निर्माण झाला आहे.

In reply to by युयुत्सु

हे पार्था मायेच्या पाशातून स्वतःला मूक्त कर आणी कर्तव्याला सामोरे जा. कारण बालीश कारणांची रांग लावून मैदानातून पळ काढणे तूझ्यासारख्या नरोत्तमाला शोभत नाही.

In reply to by युयुत्सु

मग तूमच्या मिपा प्रोफाइलमधे पूढील ओळी चिकटवायचे काय प्रयोजन ? नाहं प्रकाशः सर्वस्य योगमायासमावृतः| मूढोयंनाभिजानाति लोकः मामजमव्ययम् || भ. गी. योगमायेने वेढला असल्यामुळे माझे खरे स्वरुप कुणालाच सहसा कळत नाही. मी जन्म घेत नाही आणि नाश ही पावत नाही हे मूर्ख लोकाना हे समजत नाही. ________ आता लगेच प्रोफाइल एडीट करून वरील ओळी बदलू नका.

In reply to by आत्मशून्य

राव तुम्ही हा गीतेचा श्लोक आहे एव्ह्ढंच पाहीलंत. जरा अर्थही पाहा की त्या श्लोकाचा. ... हे बेअक्कल लोक मला ओळखत नाहीत, ते मलाच जन्म मरणाला कारणीभूत समजतात. :)

In reply to by युयुत्सु

मी गीता मानत नाही.
कधीतरी थोडासा रुचीबदल म्हणून यावर एक लेख लिहू शकाल का? मोहमायेच्या पलिकडे जाऊन डो़क्याला कुठल्याही प्रकारचा शॉट लावून न घेता चिल पिल घेत आयुष्य कसं जगावं हे सांगणारी गीता आपण का मानत नाही हे जाणून घ्यायला निश्चितच आवडेल. :)

In reply to by धन्या

या पूर्वी श्रीकृष्णाची चूक असे दोन लेख लिहीले आहेत. माझ्या ब्ल्~ओग वर ते पहावेत. अरेरे परत जाहिरात.

In reply to by युयुत्सु

हरकत नाही... शक्य असेल तर खरड किंवा व्यनिमध्ये दुवा दया... मी गीता मानत नाही असे तुम्ही म्हणत असूनही तुमच्या मिपा व्यक्तिचित्रामध्ये गीतेमधील श्लोक लावला आहे त्याबद्द्ल पुढे कधीतरी आपले मत जाणून घ्यायला आवडेल.

In reply to by धन्या

मी गीता मानत नाही असे तुम्ही म्हणत असूनही तुमच्या मिपा व्यक्तिचित्रामध्ये गीतेमधील श्लोक लावला आहे त्याबद्द्ल पुढे कधीतरी आपले मत जाणून घ्यायला आवडेल.
ते सांगतील तेव्हां सागतील, पण याबाबतीत मी माझे मत सांगू का ? @ यूयूत्सू
या पूर्वी श्रीकृष्णाची चूक असे दोन लेख लिहीले आहेत. माझ्या ब्ल्~ओग वर ते पहावेत. अरेरे परत जाहिरात.
प्लीज तूमच्या ब्ल्~ओग वर श्रीकृष्णानं यूध्दाला प्रारंभ करण्यापूर्वी तूमच्या आमावस्या पोर्णीमेचा सल्ला मानला नाही असं काही तूम्ही लीहलं नसावं अशी अपेक्शा आहे, हो कारण उगाच का तूम्ही त्याने सांगीतलेला श्लोक प्रोफाइलमधे मीरवाता व वरती मी गीता मानत नाही असे छातेठोकपणे सांगाता ? बाकी असो जर त्या ब्लोगवरील कथेचा वापर करून तूमचा पैसा कमवायचा डाव असेल तर त्या ब्लोगच्या जाहीरातबाजी बद्दल तूमचा त्रीवार धीक्कार करेन. असो... वेगळा धागा काडू त्याबाबत.

In reply to by आत्मशून्य

फक्त एक शंका :-
यापूढे सदरील शास्त्र (ज्याचा काही आपण अभ्यास करता ते) याचा कधीही व्यावसायीक उपयोग न करण्याची कायदेशीर शपथ घ्यावी लागेल, व या शास्त्राच्या अभ्यासातून निर्माण होणार्‍या सर्व भौतीक लाभांवर पाणी सोडावे लागेल.( पटत असेल तर सदरील गोश्ट कायदेशीर व्याख्येत बसवूया नीम्या नीम्या खर्चाने)
हे सर्व वेधशाळेच्या बाबतीत देखील लागू केले तर ? ;) त्यांचे तर सगळेच अंदाज / आडाखे कायम चुकतच असतात.

ज्योतिष, नाडीशास्त्र ह्या विषयांवर कुणी आव्हान देऊ नये व कुणी घेऊ नये असे माझे मत आहे. ज्यांना प्रत्यक्ष अनुभव आलेले असतात ते विश्वास ठेवतात, बाकीचे ठेवत नाहीत. या देशात लोकशाही आहे त्यामुळे कुठल्याही गोष्टीवर विश्वास ठेवायचा की नाही हा ज्याचा त्याचा अधिकार आहे. आणि मिपासारख्या सुजाण सदस्यांच्या संस्थळावर हे घडू नये असे वाटते. कारण तात्विक वादावरुन वैयक्तिक पातळीवर येणे म्हणजे आपण सर्वांनीच आपल्या आवडत्या मिपाची पातळी खाली आणण्यासारखे आहे.

In reply to by तिमा

सुंदर प्रतिसाद. ________________ पण सर्वांनाचह तसं वाटत नाही. स्वतःचं मत दुसर्‍यावर थोपलं नाही तर जग कसं चालणार? :(

In reply to by तिमा

सहमत... हा धागा तात्विक वादावरुन वैयक्तिक पातळीवर येतोय हे लक्षात येताच तसे दोन्ही बाजूंच्या निदर्शनास आणून आम्ही वाचनमात्र झालो. :)

In reply to by तिमा

ज्योतिष, नाडीशास्त्र ह्या विषयांवर कुणी आव्हान देऊ नये व कुणी घेऊ नये असे माझे मत आहे
अत्यंत चूकीच मत वाटतयं. कारण हा एखद्या व्यक्तीच्या अधीकाराचा न्हवे तर एखाद्या शास्त्राच्या अचूकतेचा मामला आहे. इथे यूयूत्सूच्यां जागी बराक ओबामा जरी असते तरी आव्हान असेच दीले पाहीजे. कारण ही व्यक्तीच्या वैयक्तीक नैपूण्याची कसोटी न्हवे की ज्यामधे एखादा तेंडूलकर निपजावा तर एखादा रोहन गावस्कर.... हे जर खरचं शास्त्र आहे तर इथे यूयूत्सू असो वा शिल्पा शिरोडकर... शास्त्रातून प्रेडीक्षन हे अचूकच येणार असले पाहीजे. ज्याचा त्याचा अनूभव हे गोश्ट शास्त्राला/विज्ञानाला लागू पडत नसते.

In reply to by तिमा

नाडी मध्ये पाय गुंतवू नका !! अवघड जागा आहे ती मि पा वरची ..धागा हजारी होइल .. नाडी समर्थक विरोधक गरळ "ओका" यला सुरुवात करतिल.. युयुत्सु चा आव्हान / प्रति आव्हान सम्पु दे ..मग नाडी ला हात घालू ..

युयुस्तुराव, तुमचे आव्हान मी स्वीकारले आहे. बघा तुम्हाला पटते का. १) मी ३ ते ५ व्यक्तींच्या जन्मतारखा, वेळा आणि ठिकाणे तुम्हाला देईन. २) माहिती दिलेल्या प्रत्येक व्यक्तीगणिक रु. ५०० या प्रमाणे पैसे देण्यास मी तयार आहे. ३) प्रत्येक व्यक्तीबाबत सुमारे ५ ते ७ प्रश्न मी विचारीन. ४) हे सर्व प्रश्न हो/नाही स्वरूपाचे (निसंदिग्ध) असतील. ५) सर्व प्रश्नांची उत्तरे आपल्या दोघांना मान्य अशा व्यक्तीकडे बंद लिफाफ्यात मी देऊन ठेवीन. ६) तुमची उत्तरे आली की ती सर्व ताडून पाहिली जातील. ७) आलेले निश्कर्ष मिपावरच नव्हे तर अन्यत्रही तुमच्या नाव-पत्यासहित जाहीर करण्याची मुभा मला असेल. बघा पटतयं का?

In reply to by सुनील

७)आलेले निश्कर्ष मिपावरच नव्हे तर अन्यत्रही तुमच्या नाव-पत्यासहित जाहीर करण्याची मुभा मला असेल.
असे असल्यास मी ही काही जन्मतारखा इ. देईन, प्रत्येक व्यक्तीचे रु. ५०० प्रमाणे सुद्धा देईन. आलेला निष्कर्ष जाहीर पेपरात वगैरे छापण्यास लेखी परवानगी द्यायची तयारी आहे ना?

In reply to by Nile

प्रत्येक व्यक्तीचे रु. ५०० प्रमाणे १० जणांसाठी ५००० रुपये द्यायला तयार आहे. आव्हान पुढीलप्रमाणे: Astrologers and palmists, who hoodwink the gullible by saying that astrology and palmistry are perfectly “Scientific”, can win the award if they can pick out correctly-within a margin of five percent error-those of males, females, and living and the dead from a set of ten palm prints or astrological charts giving the exact time of birth correct to the minute, and places of birth with their latitudes and longitudes. संदर्भ: इथे पहा युयुत्सु खोटे ठरले तरीही त्यांनी ५००० रुपये स्वतःकडे ठेवायला माझी हरकत नाही. फक्त १ अटः मिसळपाववर जाहीर माफी मागावी आणि आलेला निष्कर्ष जाहीर पेपरात छापण्यास (त्याचा खर्च मी करीन) लेखी परवानगी द्यावी. बोला, आहे कबूल?

In reply to by उदय

मी ही ५ जणांची फी भरायला आनंदाने तयार आहे. वर उदय यांनी म्हटले आहे त्यातील "Astrologers and palmists, who hoodwink the gullible by saying that astrology and palmistry are perfectly “Scientific”, can win the award" या वाक्याच्या टोनमधे एक पूर्वग्रह आहे. (दूषित म्हणत नाही.. कदाचित तो ज्योतिष खरे नसल्याबद्दलचा आत्मविश्वासही असेल) पण तेवढा पूर्वग्रहसुद्धा न बाळगता मी हे अशा प्रयोगाचे (आव्हानाचे नव्हे) फलित जाणून घ्यायला उत्सुक आहे. युयुत्सु असा प्रयोग करायला तयार असतील तर पाच लोकांची फी २५०० मी त्यांनी दिलेल्या कोणत्याही अकाउंटला कधीही ट्रान्स्फर करेन. मिसळपाव हे केवळ संवादाचे माध्यम असले तरी यातील आर्थिक भागाशी मी मिसळपावचा कोणताही संबंध जोडणार नाही. या प्रयोगातील आर्थिक किंवा कोणत्याही भागासाठी मिसळपाव जबाबदार असेल अशी अपेक्षा ठेवणार नाही आणि इतरांनीही ठेवू नये. अन्यथा हे नियमबाह्य होऊ शकेल असे वाटते.

In reply to by गवि

मी सूध्दा ४ जणांची फी भरायला आनंदाने तयार आहे. कोणताही परतावा नसो फक्त येणारे रीझल्ट यूयूत्सूरावाच्या नाव पत्ता व फोटोसह कोणत्याही माध्यमात आमच्या खर्चाने केव्हांही कोठेही कधीही व कसेही प्रसीध्द करायची लेखी परवानगी यूयूत्सूरावानी द्यावी. नंतर याबाबत कोणतीही तडजोड होणार नाही.

In reply to by गवि

चाचणी होण्यापूर्वी मी कुठलाही आरोप करत बसणार नाही.(आरोप करण्याइतपत वेळेची उपलब्धताही नाही म्हणा.) पण माझ्या तर्फे मी ५००X२=१००० इतकी रक्कम देण्यास तयार आहे. हल्लीच्या काळात युयुत्सु ह्यांच्याविषयी किंवा त्यांच्या ज्योतिषाविषयी मी कुठलीही तीव्र विरोधी मते दिलेली नाहित. त्यामुळे त्यांनी त्या बाबतीत(पूर्वग्रह वगैरे) निश्चिंत असावे. आत्मशून्य, गवि,सुनील हे काय schedule ठरवतात ते बघाय्चे आता.

In reply to by सुनील

युयुत्सुराव, बघता बघता २०-२५ पत्रिका झाल्या. आता तपशिलाचे ठरवू या का?

मुख्य म्हणजे जे कँडिडेट पहायचे ते आपण स्वतः नसावे. किंवा मिपाकरही नसावे. शक्यतो एकमेकांशी अ‍ॅनॉनिमस असलेले लोक निवडावेत. मी एका प्रतिसादात ढोबळ पद्धत सूचित केली आहे. त्याला सर्वानुमते सुधारुन एक काँक्रीट रूप द्यावे. एकूण वीस लोकांना यात समाविष्ट करता येईल हे वरील प्रतिसादांवरुन दिसतेच आहे. रामदासकाकांनी काहीही उरकू नये आणि न्यूट्रल पंच बनावे अशी इच्छा आणि विनंती. सर्वानुमते मान्य होण्यास योग्य अशी व्यक्ती म्हणून प्रथम त्यांचेच नाव नजरेसमोर येत आहे.

In reply to by गवि

शक्यतो एकमेकांशी अ‍ॅनॉनिमस असलेले लोक निवडावेत.
आधी युयुत्सुंना मैदानात तर उतरू द्या? :-) बाकी माझ्याबद्दल कीतीही माहिती शोधली तरी मी दिलेल्या व्यक्तींची माहिती तिसर्‍या मार्गाने मिळू शकणार नाही अशा तारखा द्यायचा माझा प्रयत्न असेल.

नमस्कार ! या चाचणीत जे प्रश्न आहेत ते त्याची उत्तरे एका लिफाप्यात घालून पंचांकडे द्यावेत. मूख्य म्हणजे ज्यांना पाहिजे त्यांना याची उत्तरे देण्यास मूभा असावी. म्हणजे जोतिषी व इतर जण यांच्यात काही फरक नाही हेही सिद्ध होईल.