✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

तुम्हाला उर्वरित आयुष्यात काय काय 'करायचेच' आहे?

च
चित्रगुप्त यांनी
Sat, 07/30/2011 - 03:22  ·  लेख
लेख
तुम्ही वीस वर्षांचे असा किंवा सत्तरचे, जे काही उर्वरित आयुष्य असेल, त्यात काय काय करायचेच आहे ? मी असा विचार अधून मधून करत आलेलो आहे, आणि अश्या याद्या रोजनिशीत बनवल्याही आहेत, परिणामी कधीतरी का होइना, त्यातील बर्‍याचश्या गोष्टी प्रत्यक्षात उतरल्याही आहेत. उदहरणार्थ, कालिंजर चा किल्ला बघणे, लूव्र व वर्साय बघणे, विजयनगर - हंपीच्या अवशेषात पाच-सात दिवस पायी भटकणे वगैरे. या झाल्या आवडीच्या गोष्टी, परंतु अशी यादी काही कर्तव्यांच्या बाबतीत केली नाही, याचे वैषम्य वाटते. उदाहरणार्थ, मी आठ दहा वर्षांचा असल्यापासून माझी आई मला सांगायची की श्रीकृष्णाची एक सुंदर मूर्ती तिला हवी होती, ती आणायला माझ्या (बाहेरगावी नोकरी करणार्‍या) मोठ्या भावांना तिने सांगून ठेवले होते, का कुणास ठाउक, आपापल्या प्रपंचात गुंतलेल्या भावांनी तशी मूर्ती कधीच आणली नाही. पुढे आईने आशा सोडून दिली असावी, कारण मी मोठा झाल्यावर तिने कधी या गोष्टीचा उल्लेख केला नाहे, मी पण (कलेच्या आणि प्रपंचाच्या नादात) लहानपणची ही गोष्ट विसरून गेलो होतो. १९९५ साली वयाच्या ८५ व्या वर्षी तिचा मृत्यु झाल्यावर मला ही गोष्ट अचानक आठवली, पण आता फार उशीर झालेला होता.... अजून सुद्धा मला कुठे श्रीकृष्णाची सुंदर मूर्ती दिसली की ती खरेदी करतो आणि अश्रू गाळतो... तुमच्या आयुष्यात्तील असे काही प्रसंग?
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
21110 वाचन

💬 प्रतिसाद (94)

प्रतिक्रिया

शंका

नितिन थत्ते
Sat, 07/30/2011 - 15:31 नवीन
मालदीवपर्यंत पोहत जाणार ठीक आहे पण मुंबईपासून पोहत जाणार की कन्याकुमारीपासून?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्मिता.

ठाम मत

कार्लोस
Sat, 07/30/2011 - 21:33 नवीन
अस वाटते कि एक तरी मंत्री आणि दहशदवादि ठार करावा अशी खूप इच्छा आहे .
  • Log in or register to post comments

नविन

कार्लोस
Sat, 07/30/2011 - 21:35 नवीन
सर्व मिपाकराना भेटावेसे वाटते
  • Log in or register to post comments

हजारो ख्वाईशें ऐसी की हर

नगरीनिरंजन
Sat, 07/30/2011 - 23:13 नवीन
हजारों ख्वाईशें ऐसी की हर ख्वाईश पे दम निकले. कधी तरी या इच्छांवर विजय मिळवलाच पाहिजे.
  • Log in or register to post comments

स्विस ब्यांकेत

नितिन थत्ते
Sun, 07/31/2011 - 10:08 नवीन
स्विस ब्यांकेत प्रायव्हेट/सिक्रेट खातं उघडायचं आहे.
  • Log in or register to post comments

हम्म्म्...

पंगा
Mon, 08/01/2011 - 20:50 नवीन
आणि हे जाहीररीत्या सांगत आहात. धन्य आहे. (अवांतर: स्विस ब्यांकेत 'ओपन सीक्रेट' अशी काही खात्याची क्याटेगरी असते काय?)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नितिन थत्ते

संपूर्ण हिंदुस्थान भ्रमण

मदनबाण
Sun, 07/31/2011 - 11:07 नवीन
संपूर्ण हिंदुस्थान भ्रमण करावे आणि भरपुर फोटो काढावे अशी फार मनापासुनची इच्छा आहे. :)
  • Log in or register to post comments

यादी रोज बदलते आहे-वाढते आहे

रामदास
Sun, 07/31/2011 - 12:52 नवीन
लेटेष्ट तेव्हढे सांगतो . हिना रब्बाणी सोबत कराचीला कट्टा जमवायचा आहे.
  • Log in or register to post comments

हा हा हा

सहज
Sun, 07/31/2011 - 13:03 नवीन
यावर बिच्चारे आमचे प्रभु मास्तर म्हणतात - मै करु तो साला, कॅ....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रामदास

हिना रब्बाणी सोबत कराचीला

मदनबाण
Sun, 07/31/2011 - 16:11 नवीन
हिना रब्बाणी सोबत कराचीला कट्टा जमवायचा आहे. आयला... ;) खी खी खी... काकांशी पूर्णपणे सहमत. ;) काही पण म्हणा बाई आहे मात्र टच्च मसाला ! ;) संदर्भ :--- मुत्सद्देगिरीला आभा सौंदर्याची! http://alturl.com/ae6ix
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रामदास

रामदास काका, तुम्ही एकटेच जा

अन्या दातार
Sun, 07/31/2011 - 16:24 नवीन
रामदास काका, तुम्ही एकटेच जा हो कराची कट्ट्याला. मबांना घेऊन जाऊ नका. :) अवांतरः जसा पुण्यात सिक्रेट रेव्ह पार्टी कट्टा झाला, तसा झाला तर उत्तमच, फक्त मला बोलवायला विसरु नका म्हणजे झाले ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण

एवढे ऑब्सेशन?

पंगा
Mon, 08/01/2011 - 21:00 नवीन
खी खी खी... काकांशी पूर्णपणे सहमत.
'खी खी खी'? अ‍ॅज़ इन, 'KHI KHI KHI'??? एवढे ऑब्सेशन बरे नव्हे... तै एवढ्या आवडल्या वाटते?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण

आयला सगळे जण मुन्नाभाई मधल्या

इरसाल
Sun, 07/31/2011 - 13:59 नवीन
आयला सगळे जण मुन्नाभाई मधल्या जहीर सारखे अंतिम इच्छा असल्यासारखे प्रतिसाद देतायेत.
  • Log in or register to post comments

एकदा

चतुरंग
Mon, 08/01/2011 - 08:51 नवीन
विश्वनाथन आनंद बरोबर बुद्धीबळ खेळायचं आहे. सचिनला प्रत्यक्ष फलंदाजी करताना बघायचं आहे. अजून इच्छा आहेत पण आत्ता ह्या दोन चटकन आठवल्या! ;) -इच्छाधारी रंगा
  • Log in or register to post comments

हम्म

चित्रा
Mon, 08/01/2011 - 18:11 नवीन
कल्पना चांगली आहे. पण भरपूर मोठी यादी आहे. काय काय लिहू? इजिप्त, पिरॅमिड बघायचेच आहेत. नाईल नदी. किलीमांजारो. आणि वाळवंटे बघायची आहेत. एकदा तरी स्कूबा डायविंग करायचेच आहे. कुंभाराच्या चाकावर मातीचे भांडे तयार करायचे आहे. इ. इ.
  • Log in or register to post comments

माझ्या आईला कृष्णाची मूर्ती कधीच मिळाली नाही, या प्रकारचे...

चित्रगुप्त
Mon, 08/01/2011 - 18:55 नवीन
माझ्या आईला कृष्णाची मूर्ती कधीच मिळाली नाही, या प्रकारचे... पश्चात्तापदग्ध अनुभव नाहीत का कुणाचे ? आता इतक्या काळानंतर सुद्धा माझे मन मला खाते...की आपण मिळवते झाल्यावर का नाही लक्षात ठेऊन आईची ही लहानशी इच्छा पूर्ण केली ?
  • Log in or register to post comments

तुम्ही म्हणताय थोडा तसाच

मराठे
Mon, 08/01/2011 - 19:08 नवीन
तुम्ही म्हणताय थोडा तसाच अनुभव माझा पण आहे. मी बंगलोरला असताना बाळकृष्णाची पितळेची मूर्ती आणली होती. ती आमच्या घरी देवघरात ठेवली होती. काही दिवस माझी आजी राहायला आलेली असताना तिला ती मूर्ती फार आवडली. "पुढच्या वेळी जाशील तेव्हा माझ्यासाठीपण आण हो नक्की" असं तिने बोलून पण दाखवलं. पण पुन्हा तिथे जाणं झालंच नाही. आज आजी नाही. आजीने माझ्याकडे कधीच काही मागितलं नव्हतं. एकदाच मागितलं पण मी ते पूर्ण करू शकलो नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चित्रगुप्त

बरोबर बोललात साहेब.

आत्मशून्य
Mon, 08/01/2011 - 19:12 नवीन
माझी पोस्ट निगेटीव्ह समजली जाइल म्हणून मी सांगायला थोडा कचरत होतो पण लेखकाला असेच अनूभव अभिप्रेत होते ज्यामधे काहीतरी कायमचं निसटून गेल्याची जाणीव वा खंत आहे.... याचा अंदाज आला होता. असे काही अनूभव नक्किच आहेत पण ते उघड करायचं धाडस नाही.... :(
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चित्रगुप्त

अगदी पश्चात्तापदग्ध वैगरे

सूड
Mon, 08/01/2011 - 20:01 नवीन
अगदी पश्चात्तापदग्ध वैगरे नाही, पण अशा आहेत खर्‍या एक-दोन गोष्टी ज्या आता पूर्ण होण्याची सुतराम शक्यता नाही. असो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चित्रगुप्त

हा धागा सुरु करण्या मागील काहीसा हेतु

चित्रगुप्त
Mon, 08/01/2011 - 20:13 नवीन
हा धागा सुरु करण्या मागील काहीसा हेतु हाही होता की जसे आम्ही आपल्या तरुणपणीची स्वप्ने पूर्ण करण्यात इतके दंग राहिलो, की वृद्ध आई वडिलांची लहानशी इच्छा पूरी करण्याचे भान राहिले नाही, तसे तरूण मिपाकरांचे होउ नये ...
  • Log in or register to post comments

लहानशी इच्छा

स्मिता.
Mon, 08/01/2011 - 20:31 नवीन
आम्ही आपल्या तरुणपणीची स्वप्ने पूर्ण करण्यात इतके दंग राहिलो, की वृद्ध आई वडिलांची लहानशी इच्छा पूरी करण्याचे भान राहिले नाही, तसे तरूण मिपाकरांचे होउ नये ... तुमचा हेतु खरोखर फार उदात्त आहे, विचार करण्याजोगाच आहे. (शब्द जरा कठोर वाटतील) पण काही अनुभव घेतल्याशिवाय त्यांची जाणीव होईल की नाही याबाबत साशंक आहे. मला वाटतं कधी कधी आपण अश्याच गैरसमजात असतो की आपले आई-वडील, कुटुंबातल्या जिव्हाळ्याच्या व्यक्ती कायमस्वरूपी आपल्या सोबतच असतील. त्यामुळे आपण त्यांच्या 'लहान-सहान इच्छा' फारश्या मनावर घेत नाही किंवा कामाच्या व्यापात त्या आपल्या लक्षात रहात नाहीत. या जवळच्या, प्रेमाच्या व्यक्तींच्या निधनानंतर जेव्हा आपल्याला त्यांच्या कमतरतेमुळे एक पोकळी भासायला लागते तेव्हा आपण त्यांच्या निरनिराळ्या आठवणींनी ती पोकळी भरून काढायचा प्रयत्न करत असतो. अश्याच वेळी या 'लहान-सहान इच्छा' आपल्याला अचानक आठवतात. पण तेव्हा वेळ निघून गेलेली असते. कमी-अधीक तीव्रतेचे असे पश्चात्तापदग्ध अनुभव प्रत्येकजण बाळगत असावा असं वाटतं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चित्रगुप्त

...प्रत्येक मनुष्य...

चित्रगुप्त
Wed, 08/03/2011 - 10:10 नवीन
आताच मिपावर कुठेतरी वाचले... .... जग चुकते, त्या चुकीविषयी ऎकते, पण शिकत मात्र नाही ! प्रत्येक मनुष्य आयुष्याच्या शेवटी थोडासा शहाणा होतो; पण तो दुस-याला लागलेल्या ठेचांनी नाही, तर स्वत:ला झालेल्या जखमांनी...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्मिता.

मास्तरांच्या

आनंदयात्री
Tue, 08/02/2011 - 22:44 नवीन
कुणास ठाउक कशी, मास्तरांच्या टोचणीची आठवण झाली अन रडुन मोकळा झालो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चित्रगुप्त

कॉलेजात असताना जिच्यावर

विजुभाऊ
Tue, 08/02/2011 - 15:41 नवीन
कॉलेजात असताना जिच्यावर प्रेम केले तिच्याशी लग्न करायचे आहे
  • Log in or register to post comments

ढयाण ट

इरसाल
Tue, 08/02/2011 - 16:52 नवीन
ढयाण ट ढयाण...........................विजुभो काय हे इथल्या प्रत्येक प्रतीसादकाच्या हृदयाला साद घातलीत. टुकार : गुल गया गुलशन गया गयी होटोकी लाली कॉलेजवालिका पीछा छोडो वो हो गयी बच्चो वाली . ................................इर्शाद, नौशाद, दंगा-फशाद.......................................
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजुभाऊ

=)) इजुभौंच्या सौंना एक

गणपा
Tue, 08/02/2011 - 17:00 नवीन
=)) इजुभौंच्या सौंना एक प्रिंट काढुन द्या रे कुणी तरी वरिल प्रतिसादाची.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: इरसाल

सारा काड्या तुम्ही! कुणाचे

अन्या दातार
Tue, 08/02/2011 - 17:05 नवीन
सारा काड्या तुम्ही! कुणाचे चांगले होत असलेले बघवत नाय का ओ? (ह.घे.हे.वे.सां.न.ल.)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणपा

हा धागा भारीय

प्रसाद गोडबोले
Sun, 10/20/2013 - 18:54 नवीन
मला उर्वरीत आयुष्यात एकदा तरी पृथ्वी प्रदक्षिणा करायचीये ...यॉट मधुन ...जमलेच तर एकट्याने !! (आणि खंत वाटेल असं काही सांगायचय तर खुप मोठ्ठं असं काही नाही फक्त कॉलेजात स्टॅटच्या ऐवजी मॅथ्स घ्यायला पाहिजे होतं यार...साला ह्या कॉर्पोरेट कल्चरमधे पडायलाच नको होतं ...फार मोठ्ठी चुक झाली :( )
  • Log in or register to post comments

लिहून ठेवलेले नाही पण लक्षात

कंजूस
Mon, 10/21/2013 - 06:19 नवीन
लिहून ठेवलेले नाही पण लक्षात आहे .(१)रेखाटन करण्याची इच्छा होती पण पुढे कळले रेखाटनांतून भाव आणि गतिमानता न दिसता गिरगिरेट्या वाटतात .(२)नोकरी लागल्यावर फोटोग्राफी करू .त्याप्रमाणे कैनन एई१ किट घेतले .पॉटरेट बरी आली पण नेचर आणि वाईल्डलाईफ खास नाही जमले .लवकरच फिल्म कैमेर्याचे दिवस संपले .(३)हंपि बदामिची भटकंती करायची होती ती एकट्याने पूर्ण केली पण मोबाईलने फोटो काढले .फोटो आणि व्हिडिओ अनपेक्षितपणे चांगले आले .(४)विनोबा भावेंना चौदा भाषा येत होत्या म्हणून बंगाली ,तमिळ ,कानडी ,मल्याळम ,जर्मन आणि फ्रेंच भाषेची पुस्तके जमा केली .खटाटोप सुरू आहे .(५)सह्याद्री एकट्याने भटकणे गेली पंधरा वर्षे करत आहे आता कर्नाटकमधिल भाग कुमार पर्वत माडिकेरी वगैरे भटकायचा आहे त्यासाठी कानडी आले तर बरे .(६)कैरो म्युझिअम पाहायचे आहे (७)हेरिटेज रेल्वे आणि जर्मनी जपानच्या फास्ट रेल्वेने प्रवास करायचा आहे .(?)आई वडिलांना मोठ्या घरात राहायला न्यायचे ही इच्छा अपुरीच राहिली .¿
  • Log in or register to post comments

धाग्याचा विषय वाचून बकेट

वेल्लाभट
Mon, 10/21/2013 - 06:23 नवीन
धाग्याचा विषय वाचून बकेट लिस्ट चित्रपटाची आठवण झाली
  • Log in or register to post comments

टाईमपास

मराठी कथालेखक
Tue, 10/29/2013 - 16:27 नवीन
जीवन म्हणजे मृत्यू येईपर्यंतचे "वेळ घालविणे" :)
  • Log in or register to post comments

आई वडीलांना वर्ल्ड टुर ला

कॅप्टन जॅक स्पॅरो
Tue, 10/29/2013 - 20:16 नवीन
आई वडीलांना वर्ल्ड टुर ला पाठवायचं आहे. स्वतःचा व्यवसाय सुरु करायचा आहे (पुढ्च्या गुढीपाडव्याला उत्घाटन करायच्या बेतानी काम चालु आहे) :). झालचं तरं एक झक्क ऑडी ए-४/ए-६ घ्यायची आहे.
  • Log in or register to post comments

.

उद्दाम
गुरुवार, 10/31/2013 - 09:40 नवीन
मैं औरंगजेब बनना चाहता हूं !
  • Log in or register to post comments

मैं औरंगजेब बनना चाहता हूं !

काळा पहाड
Sun, 11/03/2013 - 22:02 नवीन
मैं औरंगजेब बनना चाहता हूं !
और मैं हर औरंगजेब का "गुजरात" बनाना चाहता हूं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: उद्दाम

.

उद्दाम
Tue, 11/05/2013 - 14:32 नवीन
की फर्क पडता है? जगाच्या पाठीवर ते २५ % आहेत आणि तुम्ही १२ % . ते सगळ्या जगात आहेत. तुमचा हा आसिंधुसिंधु एकच देश आहे. इथले दोन चार कमीजास्त करुन हिरवा सागर आटणार नाही की भगवे डबके वाढणार नाही. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: काळा पहाड

हिरवा "सागर" असेल तर असुदेकी.

टवाळ कार्टा
Tue, 11/05/2013 - 17:45 नवीन
हिरवा "सागर" असेल तर असुदेकी... भगवे "डबकेच" असायला पाहिजे का???
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: उद्दाम

म्हणजे आत्ता तुम्ही ते नाही?

सुबोध खरे
Sun, 11/03/2013 - 22:06 नवीन
म्हणजे आत्ता तुम्ही ते नाही?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: उद्दाम

ड्युक्स नोज वर चढाई,ग्रॅन्ड

अप्पा जोगळेकर
Sun, 11/03/2013 - 17:00 नवीन
ड्युक्स नोज वर चढाई,ग्रॅन्ड कॅनियन पाहणे,शॉट मारणे आणि अर्थातच आहेत त्याच्या चार-पाच पटींनी अधिक पैसे मिळवणे.
  • Log in or register to post comments

आहेत आहेत. याद्या आमच्याही

खटासि खट
Mon, 11/04/2013 - 14:33 नवीन
आहेत आहेत. याद्या आमच्याही कडे आहेत प्राधान्यक्रमाने.. १. व्यायामासाठी मुहूर्त शोधत आहे. एकदा मिळाला कि सिक्सपॅक अ‍ॅब्ज बनवणे, डोलेशोले बनवणे २. सलमान खान सारखे दाट केस उगवणे ३. धंदा टाकणे ( धंदा तुफान चालल्यास काय काय करायचे याची सेप्रेट यादी आतल्या कप्प्यात हाय. ऐनवेळी गोंधळ नको) ४. नकोच. बॅन होईन.
  • Log in or register to post comments

४ वाचून काय विचार मनात आले ?

खटासि खट
Mon, 11/04/2013 - 14:34 नवीन
४ वाचून काय विचार मनात आले ? इतका पण वाइट नाही हं तुम्ही समजता तितकं. फक्त अनाहिता मध्ये टेंपररी एण्ट्री मारणे ( हे करायचंच आहे :D)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खटासि खट

अहो ख ख साहेब, ही काही तुम्हा

रेवती
Tue, 11/05/2013 - 04:47 नवीन
अहो ख ख साहेब, ही काही तुम्हा एकट्याची शिक्रेट इच्छा नाही. ;) गंमत अशी आहे ना (पुरुषांसाठी) अत्यंत कंटाळवाणे प्रकार चाललेले असतात. हिरव्या सलवार कुडत्यावर निळ्या फुलांची एम्बॉयडरी कशी दिसेल? किंवा त्यावर घुंगरांच्या बांगड्या शोभतील का? या प्रश्नांचा तुम्हाला कंटाळा येईल हे नक्की. फारतर अय्या, ते नवीन प्रकारचे भांडे बाजारात आलेय ते इंडक्षन टॉपला चालते का? मी या नव्या प्रकारच्या सहा कप बश्या घेतल्यात. कश्या वाटतायत ते लगेच सांगा. या चर्चा मुख्य बोर्डावर आल्या तर काय होईल याची कल्पना करा. उगीच का सुखाचा जीव दु:खात घालताय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खटासि खट

फक्त अनाहिता मध्ये टेंपररी

चित्रगुप्त
Tue, 11/05/2013 - 13:54 नवीन
फक्त अनाहिता मध्ये टेंपररी एण्ट्री मारणे ( हे करायचंच आहे :D)
हे 'अनाहिता' काय प्रकरण आहे, हे समजले नव्हते, (असेल एकादे 'चांदनी बार' सारखे ठिकाण, असे वाटले होते) पण रेवतीताईंच्या प्रतिसादावरून वाटले, की हे मिपाच्या 'फक्त (खर्‍याखुर्‍या) स्त्रियांसाठी' असलेल्या बंदिस्त विभागाचे नाव असावे. यावरून आमचा एक जुना धागा आठवला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खटासि खट

सिक्स पॅकवरून आठवलं: एका

आदूबाळ
Tue, 11/05/2013 - 12:59 नवीन
सिक्स पॅकवरून आठवलं: एका आरंभशूर व्यायामी मित्राने परत जिमला प्रवेश घेतला. आम्हाला सांगत होता व्यायामी मित्रः (सुटलेल्या पोटावर हाताने दाखवत) अशी सहा सहा बिस्किटं आली पाहिजेत, बिस्किटं. असा व्यायाम करणारे... दुसरा मित्रः (त्याच्या पोटावरून हात फिरवत) हो, सध्या कणीक आहे ना...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खटासि खट

जगी सर्व सूखी असा कोण आहे??

माम्लेदारचा पन्खा
Mon, 11/04/2013 - 15:33 नवीन
विचारी मना तूच शोधुनी पाहे....!!
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा